समाधानकारक…! कापसाला मुहुर्तालाच मिळाला अकरा हजारांचा भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, मागील वर्षी कापसाला १४ हजार रुपयांचा कमाल दर मिळाला होता. यंदा देखील कापसाच्या दरात तेजी असण्याचा अंदाज तज्ञ मंडळींकडून व्यक्त केला जात आहे. तसे पाहायला गेल्यास ग्रामीण भागामध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात येते. औरंगाबाद मध्ये देखील कापसाचे मुहूर्त केले गेले. या दरम्यान कापसाला तब्बल ११ हजार … Read more

राज्यातील ‘हा’ साखर कारखाना देणार एकरकमी FRP

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापुरातील शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी हंगामासाठी कारखान्याच्या परंपरेनुसार एकरकमी एफआरपी (FRP) देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व श्रीदत्त साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टच्या … Read more

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ; पहा आता किती मिळेल रक्कम ?

हॅलो कृषी ऑनलाईन : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव पशु किंवा मनुष्याची जीवितहानी झाल्यास, किंवा अपंगत्व अथवा जखमी झाल्यास शासनाकडून संबंधित पशुपालकाला किंवा जीवितहानी झालेल्या मनुष्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळते. वन्यप्राण्यांच्या हल्लाप्रकरणी आर्थिक परवड लक्षात घेऊन अर्थसाहाय्य आणि नुकसान भरपाईत नुकतीच शासनाने वाढ केली आहे. यासंबंधी नव्या निर्णयाची माहिती पत्रकाद्वारे पशुसंवर्धन विभागामार्फ़त देण्यात आली आहे. नव्या … Read more

देशात पुन्हा शेतकरी आंदोलन! एमएसपी हमी कायद्याच्या मागणीसाठी 6 ऑक्टोबरपासून दिल्ली ग्रामीण भागात बैठक

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. यावेळी शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील तणावाचा विषय पिकांच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी कायद्याचा असणार आहे. या संदर्भात शेतकरी संघटना एमएसपी हमी किसान मोर्चाने तयारी पूर्ण केली आहे. त्याअंतर्गत यावेळी दिल्ली ग्रामीणच्या व्यासपीठावरून शेतकरी आंदोलनाची रूपरेषा तयार केली … Read more

फुलांना मोठी मागणी, मात्र आवकेत घट

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे महाराष्ट्रात नवरात्र आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध फुलांची मागणी वाढते.फुल उत्पादकांसाठी हा एक महत्त्वाचा सण आहे.यावेळी पुण्यातील एपीएमसी मार्केटचा फुलांचा बाजार चांगलाच फुलतो. दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांकडून झेंडू, गुलाब,  पांढरा शेवन्ती मोगरा या फुलांना मागणी वाढल्याने चांगला दर मिळत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी नाशिक, अमरावती जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे फुलशेतीचे मोठ्या … Read more

केळीच्या दरात पुन्हा घसरण, जोर धरू लागली किमान भाव निश्चित करण्याची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते तर कधी बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. एकीकडे कांद्याचे भाव गडगडल्याने उत्पादकांची सातत्याने आंदोलने होताना दिसत आहेत, तर दुसरीकडे केळीच्या दरातही घसरण होताना दिसत आहे. नवरात्र संपताच भावात घसरण झाली. 2000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकल्या जाणाऱ्या केळीचा भाव आता 600-1200 रुपयांवर … Read more

सौर पंपांसाठी 15 कोटी 27 लाख रुपयांना मंजुरी

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियानासाठी (KUSUM) (कुसूम टप्पा -२)  राज्य सरकारने १५ कोटी, २७ लाख ५४ हजार रुपयांचा निधी महाऊर्जाला देण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात जेथे वीज पोहोचली नाही अशा ठिकाणी कृषी पंपांना सौर उर्जेद्वारे वीज देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून राज्यात एक लाख कृषी सौर पंप बसविण्यात … Read more

विजतारांच्या घर्षणाने अर्धा एकर ऊस जळून खाक; शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान

विजतारांच्या घर्षणाने अर्धा एकर ऊस जळून खाक; शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी शेतातून गेलेल्या विजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगी मध्ये अर्धा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्‍या ढालेगाव येथे घडली आहे .यावेळी शेतकऱ्याचे मोठे आर्थिक … Read more

योगेश्वरी कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही; अखील भारतीय किसान सभेचे आमरण उपोषण सुरु

योगेश्वरी कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही; अखील भारतीय किसान सभेचे आमरण उपोषण सुरु | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी 2021-22 च्या गळीत हंगामातील ऊस बिलासाठी 17 ऑगस्ट च्या मोर्चामध्ये ठरल्या प्रमाणे व्यवहार न झाल्यामुळे सोमवार 3 ऑक्टोबर पासुन पाथरी (जि . परभणी ) … Read more

पावसामुळे मोसंबीच्या बागा अडचणीत, फळगळीमुळे शेतकरी चिंतेत

हॅलो कृषी ऑनलाईन : यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे मुख्य पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिक, जालानसह राज्यातील काही भागात यापूर्वी अचानक मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये पावसामुळे कांदा पिकांचे नुकसान झाले असतानाच जालन्यातील मोसंबीच्या बागाही धोक्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवर … Read more