सणासुदीमुळे झेंडूला मिळतोय चांगला दर

हॅलो कृषी ऑनलाईन : गणेशोत्सवानंतर आता नवरात्र सुरु झाल्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली असून इतर फुलांसह झेंडूला देखील राज्यभरात चांगला दर मिळतो आहे. विशेषतः दसऱ्याला झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा आहे. पावसामुळे झेंडू पिकाला फटका नुकत्याच झालेल्या पावसानं झेंडूच्या फुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळं झेंडूची आवक … Read more

लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीस परवानगी देण्याची बैलगाडा चालकांची मागणी…

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा सातारा जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये जनावरांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या गाय आणि बैल वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 7 सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर,बाजार भरवण्यावर आणि शर्यतीवर बंदी घातली आहे. बैलगाडा प्रेमी आणि आयोजकांनी लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी परवानगीची मागणी … Read more

सातारा जिल्ह्यात लंपीचा उद्रेक 11 पैकी 10 तालुक्यात शिरकाव

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा राज्यात लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा जिल्ह्यातील जनावरांना लंपी त्वचा रोगाचा उद्रेक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात या रोगाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात 5 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. लंपी रोगाने जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 71 … Read more

कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता; कांदा उत्पादकांना मिळणार का दिलासा ?

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात नाफेडने जुलै महिन्यातच कांद्याची खरेदी पूर्ण केली होती. राज्यात सर्वाधिक खरेदी नाशिक जिल्ह्यातून झाली होती.तर आता नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा साठवणुकीत सडल्याची माहिती आहे. यावर्षी नाफेडने 2 लाख 38 हजार टन कांद्याची खरेदी केली होती.हा कांदा अद्याप बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही. खरेदी केलेला आणि बफर स्टॉकमध्ये साठवलेला कांदा ऑगस्ट … Read more

हरभरा, ज्वारी, करडईच्या बियाण्यांना मिळणार अनुदान

हॅलो कृषी ऑनलाईन : अकोला शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे, तसेच कडधान्य व तृणधान्य पिकांच्या नवीन वाणांचा प्रचार, प्रसार होण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानित दराने बियाणे देण्यात येत आहेत. यासाठी पीक प्रात्यक्षिकांतर्गत हरभरा, रब्बी ज्वारी, करडई पिकांसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्यल्प, अल्प भूधारकांनी ‘महाडीबीटी’वर अर्ज करावेत, असे आवाहन … Read more

How Much Will Cotton Get Per Muhurta Rate?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात कापसाला (Cotton Rate) दहा हजारहून अधिक भाव मिळाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात कापसाचे भाव किती रहाणार ? याबाबत कापूस उत्पादकांसह व्यापाऱ्यांमध्ये देखील उत्सुकता आहे. अमेरिकन बाजारात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात कापसाचे दर मुहूर्ताला आठ ते नऊ हजार रुपये इतकेच राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. परदेशात कापसाची उत्पादकता … Read more

रब्बी हंगाम फायद्यात ! सलग चौथ्या वर्षी उच्च पातळी बंधारे तुडुंब

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी गोदावरी नदीवर पाथरी तालुक्यात येणारे ढालेगाव , मुदगल या हे उच्च पातळी बंधारे सलग चौथ्या वर्षी तर तारुगव्हाण उच्च पातळी बंधारा पाणी आढवल्या नंतर सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब भरलेला आहे. येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांना या पाण्याचा सिंचनासाठी वापर होणार असल्याने गोदाकाठच्या गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. पाथरी … Read more

काळ्या कुळकुळीत म्हशीला झाले पांढरे शुभ्र रेडकू

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी कराड काळ्याभोर म्हशीला नेहमी काळेच रेडकू होत असते मात्र येरवळे जुने गावठाण येथील नितीन मोहिते यांच्या काळ्याभोर म्हशीला मात्र नुकतेच दुधासारखे पांढरे शुभ्र रेडकू झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला हे रेडकू पूर्णपणे पांढरे शुभ्र असून ते गायीच्या वासरा सारखे दिसते ही एक दुर्मिळ बाब आहे अपवादात्मक अशा प्रकारची घटना … Read more

गोरेगावात शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर फेकले कांदे, बटाटे

हॅलो कृषी ऑनलाईन : सेनगावातील गोरेगाव येथील शेतकरी संपाच्या आठव्या दिवशी शुक्रवारी (ता. २३) अनेक गावांतील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला. सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अतिवृष्टिग्रस्त यादीतून वगळल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गोरेगाव व परिसरातील शेतकरी आंदोलने करीत संपावर गेले आहेत. आजच्या ८ व्या दिवशी गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी चौफुली रस्त्यावर … Read more

‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला, ‘जागर एफआरपीचा’ अभियान

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस हंगामाची दिशा ठरवण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे. ‘जागर एफआरपीचा’ अभियान याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘चार वर्षांपासून एफआरपीचा दर … Read more