PM Kisan : पीएम किसानचा 12 वा हप्ता पंतप्रधान मोदींच्या हस्ते हस्तांतरित

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना मागच्या अनेक दिवसांपासून खरंतर ज्याची प्रतीक्षा होती तो आजचा दिवस उजाडलेला आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसानच्या (PM Kisan) बाराव्या हप्ता चे पैसे हस्तांतरित केले आहेत. पी एम किसान सन्मान संमेलन 2022 या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसानच्या बाराव्या हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले.

दरम्यान यावेळी आठ करोड शेतकऱ्यांना 16000 करोड रुपये (PM Kisan) पाठवण्यात येणार आहेत. यावेळी प्रास्ताविक मंत्री मांडवीया यांनी केले तर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कवीड काळानंतर पहिल्यांदाच हा कार्यक्रम ऑफलाईन पार पडला.

पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये दिले जातात. आजचा हस्तांतरित केलेला हप्ता हा (PM Kisan) बारावा हप्ता आहे. ही योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाली. या अंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम-किसान योजनेंतर्गत 2 लाख कोटींहून अधिकचा लाभ मिळाला आहे.

एक राष्ट्र एक खत

या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडियन पीपल्स फर्टिलायझर प्रकल्प – वन नेशन वन फर्टिलायझरचेही लोकार्पण केले . या योजनेअंतर्गत पंतप्रधान भारत युरिया पिशव्या लॉन्च केल्या गेल्या. जे कंपन्यांना ‘भारत’ या एकाच ब्रँड नावाखाली खतांची विक्री करण्यास मदत करेल. म्हणजेच आता सर्व खत पिशव्यांवर भारत युरिया, भारत डीएपी असे लिहिलेले असेल. खताची उपलब्धता आणि वापरासह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खतांच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी एक ई-मासिक सुरू केले जाईल.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *