प्रेरणादायी ! 1 हजार पशुधनाचे सरपंचाकडून लम्पी प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

जिल्ह्यातील पाथरी तालूक्यात येणाऱ्या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी पुढाकार घेतल्यानंतर १ हजार पशुधनाचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे . विशेष म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन ही लसीकरण मोहीम दोन्ही गावच्या सरपंचांनी मोफत राबविली आहे.

प्रेरणादायी 1 हजार पशुधनाचे सरपंचाकडून लम्पी प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

तालूक्यातील वाघाळा गावचे सरपंच बंटी घुंबरे व सिमुरगव्हाण चे सरपंच विष्णु उगले यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत स्वतःच्या गावातील पशुधनाला लम्पी आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागशी समन्वय साधत शनिवार १७ सटेंबर रोजी मोफत लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन केले होते . यामध्ये वाघाळा गावात ७०० तर सिमुरगव्हाण येथील ३०० पशुधनाचे लसीकरण करण्यात आले . दरम्यान राज्य सरकार येत्या काही दिवसात लम्पी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन लसीकरण मोहीम हाती घेणार आहे त्याआधी सामाजीक दायित्वातून पशुधनाची दोन्ही सरपंचानी घेतलेली काळजी तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.

वाघाळा येथे लसीकरण यशस्वीतेसाठी सरपंच बंटी घुंबरे यांच्यासह अभिजीत घुंबरे , महेश घुंबरे , पशुवैद्यकीय अधिकारी शिंदे , संभाजी काकडे , सखाराम बोबडे , सुरेश होके यांनी तर सिमुरगव्हाण येथे उपसरपंच सुनील नायकल , ग्राम पंचायत सदस्य रामजी उगले,गणेश उगले, विकास कदम,रामेश्वर उगले,चांगदेव उगले, विष्णु रामभाऊ उगले,सेवक मारोती गवारे,ग्राम रोजगार सेवक बळीराम उगले,दिलीप उगले,ओमप्रकाश उगले,माऊली उगले , डॉ . पि. एल.जाधव , डॉ .चोरे ,डॉ .रवी विरकर , डॉ . रिजवान अन्सारी , डॉ . गजानन बनगर यांनी परिश्रम घेतले .

See also  पटना हाईकोर्ट ने बिहार के स्थानीय निकायों में अन्य पिछडा वर्गों को आरक्षण दिए जाने के मुद्दे पर सुनवाई पूरी का निर्णय सुरक्षित रख लिया

Leave a Comment