हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये जमा केली जाते. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
कधी येणार १२ वा हप्ता ?
ताज्या अपडेटनुसार, पीएम किसान (PM Kisan) योजनेचा हप्ता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो. त्याबाबत हचली देखील होत असल्याचे समजते आहे. जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीला वेग आला आहे. ई-केवायसीसाठी वेळ मर्यादा पर्याय वेबसाइटवरून काढून टाकण्यात आला आहे. तथापि, शेतकऱ्यांना अजूनही पोर्टलद्वारे ई-केवायसी करण्यास मिळत आहे.
या लोकांना मिळणार नाही योजनेचा लाभ
जेव्हा पीएम किसान योजना सुरू करण्यात आली, तेव्हा त्याच्याशी संबंधित अनेक नियमही बनवण्यात आले, जेणेकरून खऱ्या शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळेल.
–सर्व डॉक्टर, प्राध्यापक, अभियंता यासारख्या व्यवसायातील लोकांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही.
–संस्थागत जमीनधारक, घटनात्मक पदे असलेले शेतकरी कुटुंबे, राज्य किंवा केंद्र सरकारचे सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारी स्वायत्त संस्था येथे काम करणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
–सेवानिवृत्त पेन्शनधारक आणि 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन असलेले आयकर दाते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
–ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी करताना चुकीची माहिती भरली आहे किंवा चुकीचे बँक खाते आणि आधार क्रमांक भरला आहे अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाभार्थी यादी तपासा
PM किसान (PM Kisan) योजनेचा 12वा हप्ता तुमच्या खात्यात येईल की नाही याबद्दल तुमच्या मनात शंका असल्यास, हे शोधण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे.
–सर्वप्रथम, तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जा आणि नंतर लाभार्थी यादीवर क्लिक करा.
–तेथे, लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा.