How Much Will Cotton Get Per Muhurta Rate?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात कापसाला (Cotton Rate) दहा हजारहून अधिक भाव मिळाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात कापसाचे भाव किती रहाणार ? याबाबत कापूस उत्पादकांसह व्यापाऱ्यांमध्ये देखील उत्सुकता आहे. अमेरिकन बाजारात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात कापसाचे दर मुहूर्ताला आठ ते नऊ हजार रुपये इतकेच राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

परदेशात कापसाची उत्पादकता घटण्याची शक्यता

कापूस (Cotton Rate) व्यापार क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात अतिवृष्टीमुळे तर चीनमध्ये कोरड्या दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन कमी होणार, अशी चर्चा रंगली होती. अमेरिकेतही मध्यंतरी पाऊस कमी होता. त्यामुळे तिथेही कापसाची उत्पादकता कमी होईल, अशी शक्यता होती.

अमेरिकेच्या बाजारात आता मात्र कापसाचे भाव पडू लागले आहेत. गेल्या वर्षी एक पाउंड रुईचा भाव एक डॉलर ७० सेंट पर्यंत वाढला होता. तो मध्यंतरी एक डॉलर १५ सेंट पर्यंत घसरला. त्यानंतर कमी उत्पादकतेच्या शक्यतेमुळे त्यात वाढ होत एक डॉलर ३० सेंटपर्यंत तो पोहोचला. भारताचा विचार करता पंजाब- हरियानाच्या बाजारपेठेत नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे.

या कापसाला सुरुवातीला नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे यंदाही कापसाला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु अचानक अमेरिकन बाजारात कापसाच्या दरात घट झाली. एक पाउंड रुईचा दर हा एक डॉलर १२ सेंट पर्यंत घसरला. त्यामुळे येत्या काळात भावातील ही पडझड आणखी होण्याची शक्यता आहे.

किती राहील सरकीला दर ?

अमेरिकन बाजारात सध्या असलेला दर कायम राहिल्यास दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी होणाऱ्या कापसाला आठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळेल. यात सरकीचे भाव (Cotton Rate) तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचे राहतील, असा अंदाज आहे. सोयाबीनमधील मंदीच्या पार्श्वभूमीवर हे दर कमी मिळण्याची शक्यता आहे.

See also  पूर्व एवं वर्तमान सांसदों, विधायकों के विरुद्ध लंबित आपराधिक मुकदमों से सम्बंधित मामलों पर पटना हाइकोर्ट में सुनवाई कल तक टली

विशेष म्हणजे एक डॉलर १२ सेंट प्रतिपाऊंड रुईचा भाव हा अमेरिकेच्या बाजारात १९९४-९५ साली होता. त्यावेळी भारतातील कापसाचे दर २५०० ते २७०० रुपये क्विंटल होते. यंदा ते ८००० रुपये राहतील, असेही जाणकारांनी सांगितले.

Leave a Comment