आनंदाची बातमी, मोफत रेशन योजना 3 महिन्यांसाठी वाढवली

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील नागरिकांसाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKAY) मिळणाऱ्या रेशनची तारीख बुधवारी वाढवली आहे. आता या योजनेतून लोकांना आणखी ३ महिने मोफत रेशन मिळत राहील. सरकारने यापूर्वी PMGKAY योजनेतून मिळणारे रेशन सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंतच दिले जाईल असे सांगितले होते, परंतु लोकांच्या समस्या लक्षात घेता सरकारने आपला निर्णय मागे घेतला आहे. आता ही योजना डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वीही अनेकवेळा ही योजना पुढे नेण्यात आली आहे.

भारत सरकारने ही योजना कोरोनाच्या काळात सुरू केली. या क्रमाने सरकारने दारिद्र्यरेषेखालील वर्गवारीत येणाऱ्या कुटुंबांना मोफत रेशन सुविधा उपलब्ध करून दिली. प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला रेशनकार्डवर दर महिन्याला 4 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ मोफत दिले जातात.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) व्यतिरिक्त, मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत.

१)कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

२)या बैठकीत नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी 10,000 कोटी रुपयांपर्यंतची तरतूद करण्यात आली आणि दिल्ली रेल्वे स्थानक बस, ऑटो आणि मेट्रो रेल्वे सेवांसह रेल्वे सेवा एकत्रित करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

३)या बैठकीदरम्यान रेल्वेमंत्री वैष्णव यांनी असेही सांगितले की, अहमदाबाद रेल्वे स्टेशन, मोडेराचे सूर्य मंदिर आणि सीएसएमटीच्या हेरिटेज बिल्डिंगच्या पुनर्रचनेत कोणताही बदल होणार नाही. केवळ मंदिराच्या आजूबाजूच्या इमारतींची डागडुजी केली जाणार आहे.

 

See also  सड़क निर्माण कार्य पूरा नहीं होने से ग्रामीणों में आक्रोश।

Leave a Comment