हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातुन एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. शेतात चरण्यासाठी गेलेल्या बैलजोडीला विजप्रवाहीत तारांचा स्पर्श झाल्याने बैलजोडीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली असुन या घटनेने खेडूळा ता . पाथरी जि.परभणी येथील शेतकर्यावर मोठे संकट कोसळले आहे .
पाथरी तालुक्यातील खेडूळा गावचे रहिवाशी असणारे शेतकरी महादेव सोपानराव वऱ्हाडे यांची शेती सारोळा खुर्द शिवारात गट क्र . ४४ मध्ये आहे . शुक्रवारी त्यांच्या मालकीचे बैल शेतामध्ये चरत असता आचानक पाऊस व जोरात वारा सुटल्यामुळे विजेची तार तुटुन बैलाच्या अंगावर पडुन विद्यतु प्रवाहीत तारेचा स्पर्श झाल्याने दोन्ही बैलाचा जागीच मुत्यु झाला आहे .
यात या शेतकऱ्याचे दिड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून ऐन रब्बी पेरणीच्या तोंडावर बैलजोडी दगावल्याने मोठे संकट कोसळले आहे . याप्रकरणी शेतकर्याने महसुल प्रशासनाला पंचनामा करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.