Weather Update Today : ऑगस्ट महिन्यात कसा राहील पावसाचा जोर; हवामान विभागाने जारी केला महत्वाचा अंदाज…

Weather Update Today : मागच्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 94 ते 160 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कमी पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर ऑगस्ट च्या सुरुवातीस मात्र पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये राज्यामधील काही भाग वगळता इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण तुरळक असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन दिवसांसाठी कोणत्याच राज्यांना रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये मात्र पावसाची उघडी पाहायला मिळेल. दरम्यान कोल्हापुरात परिस्थिती वेगळी असून राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूर्व सरण्यास सुरुवात झाली आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये देशभरातील पावसाचा अंदाज

ऑगस्ट 2023 दरम्यान देशभरातील सरासरी पर्जन्यमान सामान्यपेक्षा कमी असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 1971-2020 च्या आकडेवारीवर आधारित संपूर्ण देशभरात ऑगस्टमधील पावसाचा LPA 254.9 मिमी आहे.

हिमालयीन उपविभाग, पूर्व मध्य भारत आणि पूर्व आणि ईशान्य भारताच्या काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण द्वीपकल्पातील बहुतांश भाग आणि मध्य भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागातील राज्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज IMD ने सांगितला आहे.

See also  विष्णुपद मंदिर में किया जा रहा है शुद्धीकरण अनुष्ठान और क्षमा याचिका पूजा

Leave a Comment