Pik Vima : काय सांगता? इतिहासात पहिल्यांदाच भरला सर्वाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा, अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

Pik Vima : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अवकाळी पाऊस असेल यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. मात्र शेतकऱ्यांचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक रुपयात पिक विमा ही योजना सुरू केली आहे. सध्या या योजनेचा अनेक शेतकरी लाभ घेताना दिसत आहेत.

देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी एवढा मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आतापर्यंत जवळपास 50 कोटी लाख शेतकऱ्यांनी एक रुपया पिक विमा योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर अजून जे शेतकरी राहिले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी पिक विमा भरण्याची मुदत देखील वाढवण्यात आली आहे.

3 ऑगस्टपर्यंत भरता येणार पिक विमा

मागच्या काही दिवसापासून अनेक शेतकरी पिक विमा योजनेचा अर्ज करताना दिसत आहेत. पिक विमा अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै होती मात्र ३०जुलै पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचे हे अर्ज भरायचे राहिले होते. त्यामुळे सरकारने यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली होती शेतकऱ्यांच्या याच मागणीचा विचार करून सरकारने पिक विमा योजनांमध्ये ३ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ केली आहे. त्याचबरोबर पिक विम्याचा अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट होती ती देखील हँग होत होती त्यामुळे ती वेबसाईट सुरळीत सुरु करून सरकारने ३ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याचे आवाहन केले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार – धनंजय मुंडे

राज्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने चांगले थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. मात्र फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे पावसाअभावी जर नुकसान झाले असेल तर त्यासाठी राज्य सरकार मदत करणार आहे. ज्या भागांमध्ये फळबाग उत्पादकांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कृषी विभागाच्या वतीने त्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली करण्यात येईल अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

इथे चेक करा सरकारी योजनांची माहिती

शेतकरी मित्रांनो तुम्हाला पिक विमा बद्दल कोणतीही माहिती पाहिजे असेल तर लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा यामध्ये तुम्ही यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात, त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे याबद्दल तुम्हाला संपूर्ण सविस्तर आणि अचूक पद्धतीने माहिती मिळेल. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इंस्टाल करा.

See also  धनतेरस पर Gold खरीदारों की बल्ले बल्ले! महज ₹27563 में खरीदे एक तौला सोना..

Leave a Comment