दिलासादायक ! गोगलगायीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी पावसामुळे कोवळया सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कारण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. गोगलगायींमुळे सर्वाधिक नुकसान बीड, लातूर आणि उस्मानाबाद या भागात झाले होते. या जिल्ह्यासहित अन्य काही भागातील 1 लाख 63 हजार 889 हेक्टर क्षेत्र गोगलगायीनं बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनास द्यावेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा अधिक असेल त्यांना मदतीसाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त व संबंधित जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारनं नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश पारित केले आहेत. यामुळं गोगलगायी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दिलासादायक गोगलगायीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी पावसामुळे कोवळया सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कारण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत द्या

दरम्यान धनंजय मुंडे यांनी मागणीची दाखल घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे. मात्र गोगलगायीने ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत देण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. त्यांनी म्हंटले आहे की, हजारो हेक्टरवरील सोयाबीन क्षेत्राच्या चार-चार पेरण्या करुनही शेतकऱ्यांना गोगलगाय नियंत्रण करता आले नाही. पीकही हाती लागणार नाही. अशा बिकट परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या परिस्थितीची, आमच्या मागणीची सरकारने दखल घेतली याचे समाधान आहे. मात्र, या पेरण्यांचा खर्च किती वाया गेला असेल याचा अंदाज सरकारने लावणे गरजेचे आहे. नुकसानीची आकडेवारी व शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समोर असताना पुन्हा निकष, पंचनामे, 33 टक्के कशासाठी? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. गोगलगायीने ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत देण्यात यावी, या मागणीवर आम्ही ठाम आहोत.

See also  दिव्यांग बच्चों को मिला सहायता उपकरण

 

Leave a Comment