उडीद बाजार वधारला ! आज मिळाला कमाल 10,500 रुपयांचा भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीच्या बाजारात दरवाढ झाल्यानंतर उडीदाच्या बाजारात सुद्धा दर वाढ झाल्याचे दिसून आलं होतं उडीदला कमाल 9000 रुपयांचा भाव मिळत होता मात्र आजचे बाजार भाव पाहिले असता. उडीदला रेकॉर्ड ब्रेक असा दर मिळालेला आहे. आज उडीदला कमाल भाव 10500 मिळालेला आहे.

आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीनमधील उडीद बाजरभावानुसार आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन क्विंटल उडीदाची आवक झाली याकरिता किमान भाव 9500 कमाल भाव दहा हजार पाचशे तर सर्वसाधारण भाव हा दहा हजार रुपये इतका मिळाला आहे. सध्या बाजारात उडदाची आवक कमी असली तरी दर मात्र चांगले मिळत आहेत

त्यामुळे तुरीचा दर जरी कमी झाला असला तरी उडीद बाजारात मात्र तेजी कायम असल्याचे दिसून येत आहे. शिवाय इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार भाव आणि आवक पाहता आवक ही वाढलेली दिसून येत आहेत. आज सर्वाधिक उडीदाची आवक ही दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 254 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 7350, कमाल भाव सात हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण भाव 7430 रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे उडीद बाजारभाव

29/08/2022
पुणे क्विंटल 2 8400 9000 8700
कारंजा क्विंटल 35 3540 4805 4500
मंगळवेढा क्विंटल 3 6400 6400 6400
बीड हायब्रीड क्विंटल 1 3435 3435 3435
कल्याण हायब्रीड क्विंटल 3 9500 10500 10000
वाशीम काळा क्विंटल 25 4500 7200 6000
शेवगाव काळा क्विंटल 3 6101 6101 6101
औराद शहाजानी काळा क्विंटल 2 7150 7150 7150
तुळजापूर काळा क्विंटल 60 6100 7100 6800
देवळा काळा क्विंटल 1 6805 6805 6805
दुधणी काळा क्विंटल 254 7350 7505 7430
अमरावती लोकल क्विंटल 3 3500 5300 4400
मुंबई लोकल क्विंटल 77 6000 6500 6200
जामखेड लोकल क्विंटल 11 4000 7200 5600
मुरुम लोकल क्विंटल 12 5000 6666 5833
उमरगा लोकल क्विंटल 1 4500 6000 5500
See also  समता ग्रामीण विकास के तत्वाधान में एक दिवसीय सेमिनार का आयोजनन

Leave a Comment