हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 06 सप्टेंबर रोजी परभणी, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड व औरंगाबाद जिल्हयात; दिनांक 07 सप्टेंबर रोजी लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्हयात तर दिनांक 08 सप्टेंबर रोजी लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 08 सप्टेंबर रोजी हिंगाली, परभणी, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना; दिनांक 10 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर दिनांक 09 सप्टेंबर रोजी हिंगोली, परभणी, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार ते खुप मुसळधार पावसाची शक्यता आहे. सद्य हवामानानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर कापूस, तुर, भुईमुग व मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर केळी, द्राक्ष व सिताफळ बागेत वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.
भाजीपाला
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.
फुलशेती
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.