हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या विविध भागात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. लातुरला देखील काल पावसाने झोडपून काढले. त्यामुळे लातूर आणि आसपासच्या भागातील शेतात पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे. बरेच दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या. शेतकरी पावसाची वाट पाहत होते. पण काल जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळण्याऐवजी पिके वाहून जाण्याची वेळ आली आहे.
ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिले आहे. शिवाय इतर पिकांचे देखील मोठे निक्सन झाले आहे. औसा तालुक्यात देखील सारखीच परिस्थिती असून कमी कालावधीत झालेल्या तुफान पावसामुळे सखल भागात पाणी जमा झाले आहे. ज्या शेतीतून पाणी जाण्यास वाट नाही अशा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे.
पुन्हा पावसाचा जोर वाढणार
हवामान खाताना वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे तीन-चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पाचव्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.