प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पाथरीतील शेतकऱ्यांचे उपोषण सहाव्या दिवशी मागे

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी

पिक विमा व ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून सुरू असलेले परभणी जिल्ह्यातील पाथरी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशी उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले आहे.

पाथरी तहसील कार्यालयासमोर मागील आठवड्यात 15 ऑक्टोबर पासून चालू असलेले शेतकरी बेमुदत उपोषण व आंदोलन प्रशासनाकडून गुरुवार 20 ऑक्टोबर रोजी लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात वापस घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी व तहसीलदार सुमन मोरे यांनी उपोषणकर्त्यांना पाथरी येथील उपविभागीय कार्यालया मध्ये चर्चेसाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांनी उपोषण स्थळी येत उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना येत्या 25 तारखेपर्यंत तालुक्यातील तीनही महसूल मंडळांमध्ये झालेल्या खरीप पिक नुकसानीचे पंचनामे करत अनुदानासाठी अहवाल सादर करणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी आंदोलक शेतकरी पांडुरंग शिंदे ,अमोल भाले पाटील, संदीप टेंगसे ,महेश कोल्हे, विष्णु काळे ,पांडुरंग सोनवणे ,बापूराव कोल्हे , श्याम धर्मे,परमेश्वर नवले, ऋषीकेश नाईक ,सिद्धेश्वर इंगळे ,अविराज टाकळकर , पिंकू शिंदे ,प्रताप शिंदे , गोपाळ साखरे , माऊली गिराम, विष्णु उगले , नकुल गायकवाड , पिन्टू घुंबरे ,पंकज नाईक,भारत फुके ,महारुद्र वाकणकर ,शाहरुख सत्तार , सुनिल पितळे , माऊली काळे ,अरुण काळे , सुनिल काळे , नरेश फुके , रणजित शिंदे, यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रीकांत विटेकर ,कॉम्रेड दीपक लिपणे ,भोगावचे प्रगतीशील शेतकरी अर्जुन साबळे ,तुकाराम हरकळ , विजय कोल्हे ,आदींची उपस्थिती होती .दरम्यान प्रारंभी उपोषण पाठींबा देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी भेट दिली होती .

See also  कैम्प लगाकर बिजली बिल का किया सुधार

Leave a Comment