Agriculture Technology : आता खत विस्कटताना हाताचं दुखणं होणार कमी, शेतकऱ्यानं बनवलं भन्नाट यंत्र; देशी जुगाडाचा व्हिडीओ पहाच

Agriculture Technology : शेतकऱ्यांना शेती करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र त्या सर्व अडचणींनांवर मात करत शेतकरी शेती करत असतात. पहिल्या काळातील शेतकऱ्यांच्या तुलनेत आताच्या काळातील शेतकरी शेतीतून जास्त पैसे कमवत असल्याचं दिसत आहे. आताच्या काळातील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करतात आणि त्यातून चांगले पैसे देखील कमवतात. नवीन तंत्रज्ञानामुळे अंग मेहनतही कमी लागते आणि शेतकऱ्यांना नफा देखील यातून जास्त मिळतो.

खत विस्कटण्यासाठी देशी जुगाड

शेती करत असताना आपल्याला अनेक प्रकारची कामे करावी लागतात. यामध्ये पिकांची लागवड असेल त्यावर औषध फवारणी असेल किंवा पिकांना खत टाकणे अशी अनेक कामे आपल्याला करावी लागतात. मात्र सध्या शेतकरी वेगेवेगळे जुगाड बनवत असल्याने या कामांना जास्त वेळ लागत नाही. अगदी कमी वेळामध्ये ही कामे सहजरित्या होऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खत विस्कटण्यासाठी बनवलेल्या देशी जुगाडाची माहिती सांगणारे. (Agriculture Technology)

शेतीसंबंधित जुगाड कुठे खरेदी करणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेती संबंधित कोणतेही जुगाड खरेदी करायचे असेल तर तुम्हाला आमचे Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करावे लागेल. त्यासाठी तुम्ही लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. यामध्ये तुम्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करा आणि त्यामध्ये शेतकरी दुकान म्हणून ऑप्शन आहे. त्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर शेती संबंधित अनेक जुगाड किंवा अन्य काही गोष्टी तुम्ही त्या ठिकाणाहून खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप इन्स्टॉल करा

किती खर्च येतो?

खत विस्कटायचं म्हटलं अन तुमचं क्षेत्र एक एकर किंवा त्याहून जास्त असेल तर हाताने खत विस्कटून हात दुखायला लागतो. मात्र आता एका शेतकऱ्याने यावर भन्नाट यंत्र बनवलं आहे. तुम्हीसुद्धा त्यानुसार स्वतः काहीतरी जुगाड करून खत विस्कटनी यंत्र बनवू शकताय. यासाठी खुप्प जास्त खर्चसुद्धा येत नाही. फक्त एक पंख्याप्रमाणे फिरणारं काही तरी तुम्ही उपलब्ध केलं कि हे यंत्र बनवता येईल.

यंत्र नक्की कसं काम करतं?

सध्या एका शेतकऱ्याने खत टाकण्यासाठी एक भन्नाट जुगाड बनविले आहे. यामध्ये शेतकऱ्याने जुगाड बनवताना चौकोनी आकाराचा एक डब्बा घेतला आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आपला औषध फवारणीचा हातपंप जसा असतो त्या आकाराचा एक प्लास्टिकचा डब्बा शेतकऱ्याने घेतला आहे. त्याचबरोबर याला एक पट्टा बनविला आहे त्यामुळे आपण ते गळ्यात घालून खत टाकू शकतो. यामधील एक खासियत म्हणजे याच्या खालील बाजूस शेतकऱ्याने एक पंखा बसवला आहे. त्यानंतर त्या चौकोनी डब्ब्यातून खा खाली पडण्यासाठी देखील ऍडजेसमेंट केलेली आहे. यामुळे आपण तो पंखा फिरवला की खत शेतामध्ये पसरून पडत आहे.

या जुगाडाचा फायदा काय?

  • कमी वेळेमध्ये जास्त शेतात आपण खत टाकू शकतो.
  • खत टाकण्यासाठी जास्त माणसांची गरज भासत नाही एक माणूस आरामशीर खत टाकू शकतो.
  • वेळेची खूप मोठी बचत होत आहे.
  • हे जुगाड एकदम हलके असल्याने आपण त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो.
  • जास्त मजुरांची आवश्यकता भासत नाही.
See also  101 कन्या व महिलाओं ने कलश यात्रा निकाली,शुरू हुआ श्रीमद्भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ

Leave a Comment