पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील संतप्त शेतकऱ्याने फळबाग पेटवली





पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील संतप्त शेतकऱ्याने फळबाग पेटवली | Hello Krushi







































हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ खरीप पिकांचे नाही तर फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. विरोधी पक्षनेते शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांच्या मधून देखील लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे असे असताना. अद्याप पंचनामेच झाले नसल्याकारणाने संतप्त शेतकऱ्यांनी तीन एकर क्षेत्रावरील मोसंबीची बाग जाळून टाकल्याची घटना घडली आहे. ही घटना कृषी मंत्री असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.

अनेकदा प्रयत्न करूनही कोणतीच मदत मिळण्याची आशा नसल्यामुळे अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीन एकर क्षेत्रावरील मोसंबीच्या बागेला आग लावल्यात आणि यात मोसंबीची झाड जळून खाक झाल्यात ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातल्या उमरविहिरे येथील आहे. सोयगाव तालुक्यात पीकांना सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी फटका बसला. तर बदलत्या वातावरणामुळे मोसंबी, केळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं. विशेष म्हणजे ऑगस्टपासून फळांची गळती वाढलेली असताना तालुका कृषी विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना दूरच, परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदीही घेतली नाही. मदतीची आशा धूसर होत चालल्याने संतप्त होऊन उमरविहिरे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकर मोसंबीच्या बागेला आग लावली. यात मोसंबीची झाडे जळून खाक झाली आहेत.

See also  बिहार: BJP MLC जांच में शराबी निकले, बीजेपी ने रिपोर्ट पर उठाया सवाल, जानें RJD और कांग्रेस ने क्या कहा

कृषिमंत्र्यांच्या मतरदार संघाचीच अशी अवस्था

कृषीमंत्री अब्दुल सत्तार राज्यभरात दौरा करत नुकसानीची पाहणी करून आढावा घेत आहे. सोबतच पंचनामे करण्याचे आदेश देतांना या प्रकियेत एकही बाधित शेतकरी सुटणार नाही अशा सूचना देत आहेत. असे असताना मात्र कृषीमंत्री सत्तार यांच्या मतदारसंघातच अजूनही पंचनामे करणारे पथक बांधावर पोहचले नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे खुद्द कृषीमंत्री यांच्या मतदारसंघात अशी परिस्थिती असेल तर इतर जिल्ह्यात काय अवस्था असेल असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

error: Content is protected !!





Leave a Comment