हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे
पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (२०२२-२३) आंबिया बहरामध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्रा, व पपई या फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
पिके आणि विमा हप्त्याची रक्कम पुढीलप्रमाणे
आंबा
दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरूर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापूर व सासवड या तालुक्यांतील आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम १५ हजार ४०० रुपये इतकी आहे.
डाळिंब
दौंड, आंबेगाव बारामती, जुन्नर, इंदापूर, सासवड, शिरूर, हवेली व खेड या तालुक्यांतील डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जानेवारी २०२३ असून, विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम ९ हजार ७५० रुपये इतकी आहे.
द्राक्ष
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर व शिरूर या तालुक्यांतील द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम १६ हजार रुपये इतकी आहे.
केळी
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, खेड, हवेली व शिरूर या तालुक्यांतील केळी फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम ७ हजार रुपये इतकी आहे.
मोसंबी
इंदापूर तालुक्यातील मोसंबी फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम ४ हजार रुपये इतकी आहे.
संत्रा
शिरूर तालुक्यातील संत्रा फळपिकासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ४ हजार रुपये इतकी आहे.
पपई
आंबेगाव, जुन्नर व इंदापूर तालुक्यांतील पपई फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम १ हजार ७५० रुपये इतकी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आंबिया बहरातील फळपिकांची विमा नोंदणीसाठी राष्ट्रीय पीकविमा पोर्टल https://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अधिक माहितीसाठी भारतीय विमा कंपनीचे १८०० ४१९ ५००४ दूरध्वनी क्रमांक ०२२-६१७१०९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.