पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, या तारखेला खात्यात 2000 रुपये येतील

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे, कारण या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपयांची आर्थिक मदत पाठवते. ही रक्कम 1 वर्षात 3 हप्त्यांमध्ये पाठवली जाते. पीएम किसान चा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून आता १२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

मात्र या योजनेसाठी ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. अशा परिस्थितीत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना, ज्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांना यावेळी 12 व्या हप्त्याच्या पैशासाठी खूप संघर्ष करावा लागू शकतो.

पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येईल?

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी अशी आहे की, 5 सप्टेंबरपर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्णपणे हस्तांतरित होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी जोडली गेली आहेत, त्यांच्या खात्यात पुढील हप्ताच हस्तांतरित केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

70 लाख शेतकरी पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.

माहितीनुसार, देशातील सुमारे 70 लाख शेतकरी या योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकतात. मात्र, अद्याप वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांची आकडेवारी शासनाला प्राप्त झालेली नाही. पण पुढील 1 ते 2 दिवसांच्या दरम्यान त्यांच्या संख्येची पुष्टी होऊ शकते अशी बातमी आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *