काढणीपश्चात नुकसान विमाभरपाई लाभासाठी दावे दाखल करण्याचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणीपश्चात नुकसान या जोखिमेचा लाभ मिळावा यासाठी पीकविमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विमा दावे (पूर्वसूचना-इंटीमेशन) दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीपातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडिद,ज्वारी या पिकांना विमा संरक्षण आहे. चालू खरीप-२०२२ हंगामात अतिवृष्टी, पूर इत्यादी कारणामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे.

सद्यस्थितीत सोयाबीन पीक कापणीसाठी तयार असून काही ठिकाणी कापणी झालेले सोयाबीन शेतातच पडून आहे. सध्या चालू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अथवा काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या लाभासाठी इंटिंमेशन (माहिती) दाखल करणे ही अट अनिवार्य आहे. पावसाने नुकसान झालेल्या सर्व पीकविमाधारक शेतकऱ्यांनी दावे (इंटिमेशन) तत्काळ दाखल करावेत, असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.

अधिक माहीतीसाठी या नंबरवर संपर्क 

शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यात पीएमएफबीआय पोर्टल, कंपनीचा टोल फ्री क्र. १८००१०३७७१२, कंपनीचा ई-मेल आयडी : [email protected] , केंद्र शासनाचे क्रॉप इन्शूरन्स ॲप व ऑफलाईन पद्धतीद्वारे इंटिमेशन (माहिती) देता येते. इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *