मेणबत्ती व्यवसाय | मेणबत्ती उद्योग, साहित्य,विक्री

मेणबत्ती व्यवसाय | मेणबत्ती उद्योग, साहित्य,मेणबत्ती कशी तयार करतात | मेणबत्ती कशी बनवायची (menbatti udyog in marathi / menbati vyavsay mahiti marathi )>> मेणबत्ती व्यवसाय हा नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या उद्योजक मित्रांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मेणाची संपूर्ण जगातील मागणी ही जवळ जवळ १५०० कोटी पाउंड इतकी असून, यातील ६० % मेणबत्ती व्यवसायासाठी वापरण्यात येते. आणि ही मागणी दिवसें दिवस वाढतच आहे, याचे कारण म्हणजे लोक विविध उत्सवा मध्ये तसेच धार्मिक कार्यात मेणबत्तीचा वापर करतात. आणि तुम्ही जर चांगल्या डिजाइन आणि कलर मध्ये मेणबत्ती बनवून विकत असाल तर त्या बरेच लोक शो साठी देखील वापरतात.

 

लोकल बिजनेस ऑनलाइन ऑफर – @299 प्लान

मेणबत्ती व्यवसाय हा कमी खर्चात उभा राहणारा आणि चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. हल्ली जरी मोबाइल टॉर्च च वापर वाढला असला तरी मेणबत्ती ही फक्त लाइट गेल्यावरच लावतात असे दिवस देखील आता नाहीत. आता लोक शो म्हणून देखील मेणबत्तीचा वापर करताना पाहायला मिळतात. गणपती उत्सव, दिवाळी यांसारख्या सणांना मेणबत्तीची मागणी अधिक असते. त्यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी अनेक जन इच्छुक असल्याचे पाहायला मिळते.

युवा उद्योजकां बरोबरच महिलांसाठी घरगुती व्यवसाय म्हणून देखील मेणबत्ती व्यवसाय उपयुक्त ठरू शकतो. या लेखा मध्ये तुम्हाला मेणबत्ती व्यवसाया विषयी सर्व माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न . चला तर बघूयात मेणबत्ती व्यवसाय कसं सुरू करायचा.

Table of Contents

मेणबत्ती व्यवसाय आवश्यक सर्व माहिती मराठी | मेणबत्ती तयार करण्यापासून विक्री पर्यंत संपूर्ण माहिती (Candle Making Business In Marathi / menbatti banavane udyog in marathi)

मेणबत्ती व्यवसाय

या लेखा मध्ये तुम्हाला मेणबत्ती कशी तयार करतात, मेणबत्ती व्यवसाया साठी लागणारे साहित्य, कच्चा माल व त्याची किंमत, कच्चा माल घेण्याचे ठिकाण, व्यवसाया साठी लागणारी जागा, लागणारा वेळ, आवश्यक मशीनरी पासून ते तयार मेणबत्ती ची पॅकिंग, मार्केटिंग च्या पद्धती, या व्यवसाया साठी आवश्यक भांडवल, मिळणारा नफा व व्यवसाय रजिस्टर कसा करावा पर्यंत सर्व माहिती खाली दिलेली आहे.

मेणबत्ती व्यवसाय करण्यासाठी लागणारा कच्चा माल (Candle Making Business Raw Material)

मेणबत्ती व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला जास्त काही कच्चा माल लागत नाही अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच विविध मटेरियल आहे. खाली लिस्ट मध्ये दिलेला कच्चा माल तुम्हाला मेणबत्ती बनवण्या साठी लागतो. ह्या कच्चा मालाची अंदाजे किंमत खाली दिलेली आहे व तुम्ही हा माल कुठून विकत घेऊ शकता ती देखील माहिती तुम्हाला खाली वाचायला मिळेल.

See also  ये मिनी जेनरेटर है कमाल – 4 घंटे नॉनस्टॉप चलेगा TV, AC और पंखा, कीमत जान खुश हो जाएंगे आप..

मेणबत्ती तयार करण्यासाठी आवश्यक कच्चा माल व त्याची किंमत (Candle Making Raw Material & Price)

कच्चा माल किंमत
मेणबत्ती धागा रिळ ३० रुपये प्रति रिळ
एरंडेल तेल (Castor Oil) ३२५ रुपये प्रति लिटर
पॅराफिन मेण (Paraffin Wax) १२० रुपये प्रति किलो
थर्मामीटर (Thermometer) २७० ते ३२० रुपये प्रति नग
ओवन ३००० ते ८००० रुपये
सुवासिक वासासाठी सेंट २५० ते ३०० रुपये प्रति बाटली
विविध रंग (Colors) ८० ते १०० रुपये प्रति पॅकेट
मेणबत्ती साचा (Candle Dyes) ४०० ते ३००० रुपये प्रति नग
मेणबत्ती व्यवसाय कच्चा माल किंमत

मेणबत्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल घेण्याचे ठिकाण (Raw Material For Candle Making – Purchase From Where ? )

१) मेणबत्ती धागा रिळ – लोकल मार्केट मधून घेऊ शकता किंवा पॅराफिन मेण ज्या ठिकाणा हून घेणार आहात तिथून देखील एकदम जास्त संख्येत घेऊ शकता.

२) एरंडेल तेल (Castor Oil) – खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण एरंडेल तेल आवश्यकते नुसार खरेदी करू शकता. https://dir.indiamart.com/impcat/castor-oil.html

३) पॅराफिन मेण (Paraffin Wax) – खाली दिलेल्या इंडिया मार्ट वेबसाइट च्या लिंक द्वारे आपण पॅराफिन मेण आवश्यकते नुसार खरेदी करू शकता किंवा खाली दिलेल्या “Check It On Amazon” बटन वर क्लिक करा.

https://dir.indiamart.com/impcat/candle-raw-material.html

४) थर्मामीटर (Thermometer) – खाली काही उपयोगी थर्मामीटर दिलेले आहेत यातील तुम्ही योग्य तो निवडू शकता.

५) ओवन – खाली काही स्वस्त व या व्यवसाया साठी उपयुक्त ओवन दिलेले आहेत.

६) सुवासिक वासासाठी सेंट – खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण सेंट आवश्यकते नुसार खरेदी करू शकता. https://dir.indiamart.com/impcat/fragrance-oil.html

७) विविध रंग (Colors) – खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण मेणबत्ती चे रंग आवश्यकते नुसार खरेदी करू शकता. https://dir.indiamart.com/impcat/candle-color.html

८) मेणबत्ती साचा (Candle Dyes) – खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण मेणबत्ती साचा खरेदी करू शकता. https://dir.indiamart.com/impcat/candle-dyes.html

मेणबत्ती कशी तयार करतात | मेणबत्ती तयार करण्याची प्रक्रिया (Candle Making Procedure)

मेणबत्ती तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत हाताने(Manually), सेमी ऑटोमॅटिक मशीन किंवा पूर्णतः ऑटोमॅटिक मशीन द्वारे. मशीन द्वारे मेणबत्ती बनवण्यासाठी जास्त काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. आणि हाताने मेणबत्ती तयार करण्यासाठी सुरवातीला तुम्हाला साधारण २९० ते ३८० डिग्री पर्यंत तापमान देऊन मेणाला वितळवावे लागेल त्यानंतर त्या अत्यंत गरम मेणाला मेणबत्ती ज्या आकाराची बनवायची आहे त्या साच्या (Dye) मध्ये टाकून थंड होई पर्यंत थांबावे. थंड झाल्यानंतर ते मेन मेणबत्तीचा आकार घेईल, आता त्याला ड्रिल मशीन किंवा मोठ्या आकाराच्या सुई ने मधोमध धागा घातला जातो. आणि गरम मेण टाकून एकजीव केले जाते. आणि अशा प्रकारे तयार झालेली मेणबत्ती पॅकिंग करून विक्रीस जाते.

मेणबत्ती व्यवसाय करण्यासाठी लागणारी जागा (Area Needed For Candle Making Business)

मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय तुम्ही तुमच्या राहत्या घरापासून किंवा एक रूम भाड्याने घेऊन देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला १० x १० ची रूम असली तरी चालते. ह्या व्यवसायाची ही खासियत आहे की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त जागा लागत नाही.

पण तुम्हाला व्यवसाया साठी जागा निवडताना एका गोष्टीची काळजी घ्याची आहे ती म्हणजे तिथे मेण वितळवण्यासाठी पर्याप्त जागा असावी आणि रूम ला कमीत कमी एखादी खिडकी असावी. त्याच बरोबर तुमच्या मेणबत्ती व्यवसाया साठी लागणारा कच्चा माल व तयार केलेल्या मेणबत्ती ह्या त्या रूम मध्ये ठेवण्यासाठी पुरेशी जागा असावी. मेणबत्ती व्यवसाय करताना अशी जागा निवडा की ज्या ठिकाणा वरुन तुम्ही व्यवसायाशी संबंधित सर्व कार्ये व्यवस्थित करू शकताल. व भविष्यातील वाढत्या व्यवसायाच्या दृष्टीकोणातून जागा निवडावी.

See also  खुशखबरी! अब Jio 4G SIM पर ही मिलेगी 5G सर्विस, बस करना होगा ये काम..

मेणबत्ती बनवण्यासाठी लागणारा वेळ (Time Required To Make Candles)

मेणबत्ती तयार करण्यासाठी लागणारा वेळ हा तुम्ही कोणत्या पद्धतीने मेणबत्ती बनवत आहात त्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही सेमी ऑटोमॅटिक किंवा पूर्णतः ऑटोमॅटिक मशीन द्वारे मेणबत्ती बनवत असाल तर तुम्ही साधारण पणे तासाला १००० ते १२०० मेणबत्ती बनवू शकता. आणि हेच काम जर तुम्ही घरगुती पद्धतीने आणि हाताने कोणते ही मशीन न वापरता करत असाल तर तुम्ही एकूण किती लोक हे काम करत आहात व तुमच्या कडे मेणबत्ती बनवण्याचे किती साचे आहेत त्यावर हे अवलंबून आहे. सर्वसाधारण पणे एक व्यक्ति दिवसाला ८० ते १०० मेणबत्ती अगदी सहज तयार करू शकतो.

मेणबत्ती तयार करण्यासाठी आवश्यक मशीन (Candle Making Machines)

मेणबत्ती तयार करण्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या मशीनचा देखील वापर करू शकता. या मशीन वेगवेगळ्या क्षमतेच्या व प्रकारच्या असतात. बाजारामध्ये मेणबत्ती बनवायची मशीन तुम्हाला अगदी सहज मिळू शकते. उत्पादन क्षमते नुसार ३०,००० पासून ३ लाख ५० हजार रुपयांपर्यंत विविध मशीन बाजारात उपलब्ध आहेत. सर्व साधारण पणे ३ प्रकारच्या मेणबत्ती मशीन मिळतात ज्या खालील प्रमाणे:-

मॅनुयल मशीन:- या प्रकारच्या मशीन हाताळणे सोपे असून ह्या मशीन मधून तुम्ही ताशी १००० पर्यंत मेणबत्ती बनवू शकता. ह्या मशीन मध्ये कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले नसून ह्या मशीन द्वारे काम करताना. बर्‍याच गोष्टी ह्या तुम्हाला स्वतःला कराव्या लागतात.

सेमी ऑटोमॅटिक मशीन:- मेणबत्ती बनवण्याच्या या मशीन मध्ये तुम्ही मेणबत्ती चा आकार आवश्यकते नुसार सेट करू शकता, तसेच ह्या मशीन मध्ये मेणाला लगोलग थंड करण्यासाठी कुलेंट म्हणून पाण्याचा वापर केला जातो.या मशीन वर मॅनुयल मशीन या तुलनेत जास्त जलद आणि चांगले काम करता येते.

पूर्णतः ऑटोमॅटिक मशीन:- पूर्ण पणे ऑटोमॅटिक अशा या मशीन वर तुम्ही विविध आकाराच्या जसे की वाढदिवसाची मेणबत्ती, गोलाकार, आयतकार, चौकोनी मेणबत्ती तयार करू शकता. त्याच बरोबर सेमी ऑटोमॅटिक मशीन चे देखील सर्व फीचर ह्या मशीन मध्ये उपलब्ध आहेत.

सजावटीच्या मेणबत्ती

ही मशीन मिनिटाला साधारण २०० ते २३० मेणबत्ती तयार करू शकते. या व्यतिरिक्त तुम्ही विविध साचे वापरुन ह्या मशीन मध्ये वेगवेगळ्या आकाराच्या मेणबत्त्या देखील बनवू शकता. या सर्व अत्याधुनिक फीचर मुळे बाजारात या प्रकारच्या मशीन ची किंमत ही जास्त आहे.

वरील पैकी कोणतेही मशीन घ्यायचे असल्यास आपण खाली दिलेल्या लिंक वर विविध मशीन पाहू शकता. https://dir.indiamart.com/impcat/candle-making-machine.html

तयार मेणबत्ती पॅकिंग कशी करावी (Candle Packing)

मेणबत्ती तयार झाल्यानंतर सर्वात अंतिम प्रक्रिया म्हणजे मेणबत्ती पॅकिंग, मेणबत्ती पॅकिंग ही हाताने किंवा मशीन द्वारे देखील केली जाते. मेणबत्तीच्या आकारानुसार व रंगांनुसार त्याची पॅकिंग केली जाते. सर्वसाधारण पणे मेणबत्ती ही विविध रंगाच्या प्लॅस्टिक पेपर मध्ये पक्क केली जाते. मेंबत्तीची पॅकिंग हीच मेणबत्तीची सुरक्षितता ठरवते जेणेकरून अधिक तापमानात मेणबत्ती वितळू नये.

सर्वसाधारण पणे मेणबत्तीच्या आकाराचा कार्डशीट चा बॉक्स तयार करून घेतला जातो आणि मेणबत्तीला बबल च्या प्लॅस्टिक शीट मध्ये गुंडाळून त्या बॉक्स मध्ये टाकले जाते. आणि बॉक्स वर कंपनी चे नाव व इतर माहिती असलेले स्टिकर लावले जाते.

मेणबत्ती व्यापाराची मार्केटिंग (Candle Making Business Marketing)

मेणबत्ती व्यवसाय करून तुम्हाला जर यशस्वी होयचे असेल तर सर्वात महत्वाची आणि जरूरी प्रक्रिया म्हणजे तुम्ही बनवलेल्या मेणबत्ती ची मार्केटिंग / जाहिरात करणे. कोणत्याही व्यवसाया मध्ये मार्केटिंग द्वारे तुम्ही तुमचे उत्पादन किती लोकां पर्यंत पोहचवता त्यावर तुमचा व्यवसायातील नफा ठरतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या या मेणबत्ती व्यवसायचे मार्केटिंग करताना हा व्यवसाय जास्तीत जास्त लोकां पर्यंत कसा पोहचेल याची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे.

See also  अब 1 साल नहीं कराना होगा रिचार्ज – मिलेगा 36 GB डेटा, फ्री कॉल्स और SMS..

सुरवातीच्या काळात तुम्ही लोकल मार्केट मध्ये तुमच्या तयार केलेल्या मेणबत्ती ची विक्री कशी वाढेल त्यावर लक्ष देणे अधिक फायदेशीर ठरू शकते. तुमच्या जअवल पास चे मार्केट पुर्णपणे तुमच्या व्यवसायाच्या अखत्यारीत आल्यानंतर तुम्ही तुमचा मेणबत्ती व्यवसाय राज्यभर, देशभर किंवा जगभर देखील घेऊन जाऊ शकता. त्यासाठी खाली काही मार्केटिंग करण्याच्या पद्धती दिलेल्या आहेत.

पॅमप्लेट किंवा पोस्टर:- तुम्ही तुमचा हा व्यवसाय विविध ठिकाणी पोस्टर लाऊन किंवा वर्तमान पत्रा मध्ये वगैरे पॅमप्लेट वाटून देखील अधिक लोकांपर्यंत पोहचवू शकता. मार्केटिंग करण्याची ही आता जुनी पद्धत झाली आहे परंतु आज देखील या पद्धतीने मार्केटिंग केल्यास चांगले रिजल्ट मिळतात.

ऑनलाइन मार्केटिंग:- गूगल च्या विविध सर्विस जसे की गूगल बिजनेस, गूगल अॅड आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय अधिक अधिक लोकांपर्यंत पोहचवू शकता.त्याच बरोबर तुम्ही तुमचे स्वतःचे असे एखादे ऑनलाइन स्टोर देखील चालू करू शकता त्यासाठी तुम्ही instamojo सारख्या वेबसाइट चा वापर करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःच्या ब्रॅंड च्या नावाने वेबसाइट बनवून देखील अधिक अधिक लोकांपर्यंत ऑनलाइन पोहचू शकता.

यांखेरीस तुम्ही amazon, flipkart सारख्या ecommerse साइट वर तुमच्या आकर्षक डिजाइन च्या मेणबत्त्या विकू शकता.

सोशल मीडिया:- आताच्या दैनंदिन आयुष्यात बहुसंख्य लोक हा आपला दिवसातील बराच वेळ हा सोशल मीडिया वर घालवत असतात. मग तुम्ही अशाच सोशल मीडिया साइट वर तुमच्या मेणबत्ती च्या व्यवसायाची जाहिरात करू शकता. फेसबूक, इनस्टाग्राम सारख्या वेबसाइट वर ब्रॅंड च्या नावाने तुम्ही पेज चालू करून तुमच्या मेणबत्ती व्यवसाय अधिक लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता. आणि ह्या सोशल मीडिया साइट वर जाहिरात करून तुम्ही अवघ्या काही पैशांमध्ये हजारो, लाखो लोकांपर्यंत तुमचा व्यवसाय नेऊ शकता.

मेणबत्ती व्यवसाय करण्यासाठी किती भांडवल लागते (Total Cost Of Candle Making Business)

किती भांडवल लागेल ?

जर तुम्ही जास्त भांडवल न गुंतवता हा व्यवसाय करू इच्छित असाल, व कमीत कमी खर्चात व्यवसाय उभा करण्याची तुमची इच्छा असेल. तर तुम्ही हा व्यवसाय कमीत कमी १०,००० ते ५०,००० रुपयांमध्ये अगदी सहज पाने सुरू करू शकता व उद्योजक बनू शकता. आणि जर तुम्हाला वरील पैकी एखादी मशीन घेऊन हा व्यवसाय चालू करायचा असेल तर साधारण पणे १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

मेणबत्ती व्यवसायातील नफा (Profit In Candle Making Business)

व्यवसायातील नफा

मेणबत्ती व्यवसाय करण्यासाठी जास्त मनुष्यबळ लागत नाही, त्यामुळे तुम्हाला मेणबत्ती बनवण्यासाठी येणारा खर्च देखील कमी होतो. तरी तुम्हाला या व्यवसाया मधून नफा मिळवण्यासाठी मेणबत्ती तयार करण्यासाठी तुमचे होणारे सर्व खर्च विचारात घेऊन, तुमच्या उत्पनासाठी लागणार्‍या किंमती मध्ये नफा मिळवून मेणबत्तीची विक्री किंमत ठरवली पाहिजे. हे करत असताना तुम्हाला सुरवातीच्या काळात प्रतिस्पर्ध्या च्या मेणबत्तीची किंमत देखील तुम्ही विचारात घेणे अपेक्षित आहे. या व्यवसायातून भविष्यात चांगला नफा कमवण्यासाठी सुरवातीला तुम्हाला तुमच्या ब्रॅंड चे नाव क्वालिटी साठी ओळखले जाईल याची काळजी घेणे गरजेचे आहे.

मेणबत्ती बनवताना घ्यावयाची काळजी / सावधानता (Safety In Candle Making)

सुरक्षा – सावधानता

मेणबत्ती तयार करण्याच्या प्रक्रिये मध्ये सुरक्षा घ्यावी लागते ती फक्त ज्यावेळी मेण गरम असते. गरम मेण साच्यामध्ये ओतत असताना तुम्हाला काळजी घेण्याची गरज असते जर ते तापलेले मेण इतरत्र सांडले किंवा ज्वलनशील पदार्थ जवळ असेल आणि तापमाना वरील नियंत्रण सुटले तर ती पेट घेऊ शकते. तसे बघायला गेले तर मेण वितळवताना त्याचे तापमान हे २९० ते ४०० डिग्री असते जे की सुरक्षित आहे. परंतु तरी देखील सावधानता ही सर्वात मोठी सुरक्षा असते.

सारांश – मेणबत्ती व्यवसाय

या लेखामध्ये मेणबत्ती व्यवसाय करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणताही व्यवसाय किंवा उद्योग नव्याने सुरवात करण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे इच्छा आणि जर तुमची इच्छा प्रबळ असेल तर तुम्हाला तो व्यवसाय करण्यापासून व त्यामध्ये यशस्वी होण्या पासून कोणीच अडवू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो कसली ही भीती न बाळगता करा सुरवात. हा पूर्ण वाचल्या नंतर ही काही अडचण किंवा प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून विचारू शकता.

मेणबत्ती कशी बनवायची / मेणबत्ती कशी बनवतात?

मेणबत्ती बनवण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारचा कच्चा माल लागतो जसे की,मेणबत्ती धागा रीळ,एरंडेल तेल,पॅराफिन मेण, सुवासिक वासासाठी सेंट व विविध रंग इ. त्याच बरोबर थर्मामीटर व मेणबत्तीचा साचा यां सारख्या गोष्टी देखील लागतात. वरील लेखामध्ये या बाबतची सर्व माहिती दिलेली आहे.

आपल्याला मेणबत्ती व्यवसाय / मेणबत्ती उद्योग / मेणबत्ती कशी बनवायची (menbatti business) ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सुचना असल्यास त्यादेखील आम्हाला सांगा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Leave a Comment