Category: पशुधन

  • लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीस परवानगी देण्याची बैलगाडा चालकांची मागणी…

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    सातारा जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये जनावरांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या गाय आणि बैल वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 7 सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर,बाजार भरवण्यावर आणि शर्यतीवर बंदी घातली आहे. बैलगाडा प्रेमी आणि आयोजकांनी लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे.

    अन्यथा बैलाची किंमत कमी होईल…

    बैलांना रोज फेरी मारणे तसेच स्पर्धेमध्ये पळवणे हे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे बैल या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ शकतात आणि त्या बैलाची किंमत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लसीकरण झालेल्या जनावरांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र करून काही अटी शर्ती घालून परवानगी द्यावी अशी मागणी बैलगाडा प्रेमी करत आहेत.

    साताऱ्यात लंपीचा उद्रेक

    दरम्यान सातारा जिल्ह्यातील जनावरांना लंपी त्वचा रोगाचा उद्रेक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात या रोगाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात 5 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. लंपी रोगाने जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 71 गावे बाधित झाली आहेत. आत्तापर्यंत 573 जनावरांना लंपीची लागण झाली आहे, तर 82 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. 449 जनावरांवर सध्या उपचार करण्यात येत आहे.

    जिल्ह्यातील 3 लाख 52 हजार जनावरांना पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 1 लाख 43 हजार 63 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.. पशुसंवर्धन विभागाकडे 2 लाख 81 हजार 900 लसमात्रा उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय शिंदे यांनी दिली आहे.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

    १) लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • काळ्या कुळकुळीत म्हशीला झाले पांढरे शुभ्र रेडकू

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी कराड

    काळ्याभोर म्हशीला नेहमी काळेच रेडकू होत असते मात्र येरवळे जुने गावठाण येथील नितीन मोहिते यांच्या काळ्याभोर म्हशीला मात्र नुकतेच दुधासारखे पांढरे शुभ्र रेडकू झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला

    हे रेडकू पूर्णपणे पांढरे शुभ्र असून ते गायीच्या वासरा सारखे दिसते ही एक दुर्मिळ बाब आहे अपवादात्मक अशा प्रकारची घटना घडू शकते

    विशेष म्हणजे हे रेडकू अगदी पांढरे शुभ्र असून चांगले ठणठणीत आहे काळ्याभोर म्हशीला पांढरे शुभ्र रेडकू झाल्यामुळे नितीन मोहिते व त्यांच्या कुटुंबीयांनाही अचंबा वाटला..

    म्हशीला चुकून गायीचे इंजेक्शन दिले गेले असल्यास असा दुर्मिळ प्रकार घडू शकतो असे डॉक्टरांचे मत आहे

    या पांढऱ्या शुभ्र रेडकाला पाहण्यासाठी येरवळे सह परिसरातील ग्रामस्थांची गर्दी होत आहे..

  • ‘लंपी’ चा प्रसार करणाऱ्या कीटकांपासून कशी कराल सुटका ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो आहे. या रोगाचा प्रसार हा मुख्यतः कीटकांमार्फत होतो. मात्र या कीटकांना रोखण्याच्या उपाययोजना जाणून घेऊयात …

    लम्पी स्कीन रोग याचा प्रसार हा अनेक मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा या एक प्रमुख होय. यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही प्रजातींचे गोचीडे यांचा समावेश होतो.

    1.पशुधनास प्रखर उन्हाच्या वेळेस चारावयास सोडू नये (सकाळी 10 ते 17 पर्यंत गोठयात ठेवावे)
    2. शेणाचा उकिरडा/खड्डा शेण टाकल्यानंतर पॉलिथीन/ताडपत्रीने झाकून टाकावा.
    3. गोठयात स्वच्छता ठेवावी.
    4.पशुधनाच्या शरीरावर कमीत कमी एक आठवडयाच्या अंतराने 5% निम सिड कर्नल एक्सट्रक्ट (निम अर्क) (NSKE) अथवा वनस्पतीजन्य 10 मिली निम तेल + 10 मिली निलगीरी तेल + 10 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम अंगाचा साबण + 1 लिटर पाणी हे द्रावण फवारावे.
    5. गोठयाची स्वच्छता करून गोचीडाची अंडी गोळा करून शेकोटीमध्ये जाळावी.
    6. आजार सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.
    7. रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पशुधनास लसीकरण करून घ्यावे.

    देशातील 18.5 लाख गुरांना लंपीची लागण

    सध्या देशातील 15 हून अधिक राज्यांतून लंपी त्वचेच्या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत देशभरात सुमारे 18.5 लाख गुरांना चर्मरोगाची लागण झाली आहे. त्यापैकी 12.5 लाख प्रकरणे एकट्या राजस्थानमधून नोंदवली गेली आहेत.

    23 एप्रिल रोजी पहिले प्रकरण उघडकीस आले

    लंपी त्वचा रोग देशभरात झपाट्याने पसरला आहे. उदाहरणार्थ, शून्य प्रकरणांपासून ते जवळजवळ (Lumpy) दशलक्ष प्रकरणांपर्यंतचा प्रवास 5 महिन्यांत व्हायरसने कव्हर केला आहे, जो चिंताजनक आहे. खरं तर, 23 एप्रिल रोजी लंपी त्वचेच्या आजाराची पहिली केस नोंदवली गेली होती, ज्या दरम्यान गुजरातमधील कच्छमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर अनेक राज्यांतील गुरांना ढेकूण त्वचारोगाने ग्रासले. ढेकूळ त्वचारोगाचा झपाट्याने होणारा प्रसार हा चिंतेचा विषय आहे.

    75000 हून अधिक गुरांचा मृत्यू

    आत्तापर्यंत 75000 हून अधिक गुरे लंपी त्वचेच्या (Lumpy) आजाराने दगावली आहेत. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे राजस्थानमधूनच नोंदवली गेली आहेत. यानंतर पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, झारखंड या राज्यांमध्ये गुरांच्या त्वचेच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याचा सर्वाधिक फटका गाईंना बसला आहे.

  • 18.5 Lakh Cattle Infected In The Country

    हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारीनंतर देश पुन्हा एकदा संसर्गजन्य आजाराच्या (Lumpy) विळख्यात सापडला आहे. यावेळी लंपी त्वचेच्या आजाराने गुरांचा बळी घेतला आहे. लम्पी त्वचेच्या आजाराने देशभरात वेगाने पाय पसरले आहेत आणि गुरांना लागण केली आहे. उदाहरणार्थ, सध्या देशातील 15 हून अधिक राज्यांतून लंपी त्वचेच्या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत देशभरात सुमारे 18.5 लाख गुरांना चर्मरोगाची लागण झाली आहे. त्यापैकी 12.5 लाख प्रकरणे एकट्या राजस्थानमधून नोंदवली गेली आहेत.

    23 एप्रिल रोजी पहिले प्रकरण उघडकीस आले

    लंपी त्वचा रोग देशभरात झपाट्याने पसरला आहे. उदाहरणार्थ, शून्य प्रकरणांपासून ते जवळजवळ (Lumpy) दशलक्ष प्रकरणांपर्यंतचा प्रवास 5 महिन्यांत व्हायरसने कव्हर केला आहे, जो चिंताजनक आहे. खरं तर, 23 एप्रिल रोजी लंपी त्वचेच्या आजाराची पहिली केस नोंदवली गेली होती, ज्या दरम्यान गुजरातमधील कच्छमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर अनेक राज्यांतील गुरांना ढेकूण त्वचारोगाने ग्रासले. ढेकूळ त्वचारोगाचा झपाट्याने होणारा प्रसार हा चिंतेचा विषय आहे.

    75000 हून अधिक गुरांचा मृत्यू

    आत्तापर्यंत 75000 हून अधिक गुरे लंपी त्वचेच्या (Lumpy) आजाराने दगावली आहेत. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे राजस्थानमधूनच नोंदवली गेली आहेत. यानंतर पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, झारखंड या राज्यांमध्ये गुरांच्या त्वचेच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याचा सर्वाधिक फटका गाईंना बसला आहे.

    प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम

    त्वचा रोग प्रतिबंधक. ज्या अंतर्गत बाधित गुरांना गाउट पॉक्सची लस दिली जात आहे. जे त्यांचा प्रभावी परिणाम दाखवत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एकट्या राजस्थानला 30 लाख लसी देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर लंपी त्वचारोगाच्या प्रतिबंधासाठी गोट पोक्सच्या १.५ कोटी डोसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच वेळी, लंपी त्वचा रोगाची लस देखील देशात विकसित केली गेली आहे. ज्याचे उत्पादन सध्या सुरू आहे.

     

     

  • Lumpy : ‘लम्‍पी’ त्वचारोगामुळे राज्यात 271 जनावरांचा मृत्यू

    हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये होणाऱ्या लंपी या त्वचारोगाचा (Lumpy) मोठ्या प्रमाणात फैलाव राज्यात होताना दिसत आहे. दिनांक १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यापैकी २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर या रोगातून ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. याबाबतची माहिती माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.

    २५ लाख लस मात्रा उपलब्ध

    सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘लम्पी स्कीन (Lumpy) आजाराने राज्यभरात सोमवार अखेर २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजार २९१ जनावरे आजारमुक्त झाली आहेत,’’ अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. तर ‘‘तातडीच्या लसीकरणासाठी २५ लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. या विविध जिल्ह्यांमधील प्रादर्भावाचे प्रमाण पाहून वितरित केल्या जातील,’’ असेही त्यांनी सांगितले.

    २७१ पशुधन दगावले

    सिंह म्हणाले, ‘‘ राज्यातील २७ जिल्ह्यांमधील १ हजार १०८ गावांत ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. उर्वरित जनावरांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २७१ पशुधन मृत झाले आहे. तर तातडीच्या लसीकरणासाठी विविध जिल्ह्यांमध्ये ४९ लाख ८३ लाख लशींच्या मात्रा उपलब्ध आहेत. यापैकी बाधित क्षेत्राच्या ५ कि.मी. परिघातील १ हजार १०८ गावांतील १६ लाख ४५ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.’’

    मुंबई नियंत्रित क्षेत्र जाहीर

    ‘लम्पी स्कीन’च्या (Lumpy) प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबई हे ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही मुंबई पोलिसांनी दिला आहे.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

     लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • What If In Case Of Death Of Livestock Due To Lumpy

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी (Lumpy) त्वचा रोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावर देखील प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान लंपी मुळे पशुधन दगावल्यास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.

    किती मिळणार मदत ?

    राष्‍ट्रीय आपत्ती धोरणानुसार राज्य शासनाच्या १०० टक्के अर्थसहाय्यातून (Lumpy) ही मदत दिली जाईल. या साठीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दूधाळ पशुधनासाठी ३० हजार, ओढकाम करणाऱ्या पशुधासाठी (बैल) २५ हजार, तर वासरांना १६ हजार रुपये मदत मिळेल. ही मर्यादा अनुक्रमे तीन, तर वासरांसाठी ६ ठेवण्यात आली आहे.

    मदत देण्यासाठी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा पशुचिकित्सालयांचे प्रमुख समितीमध्ये असेल.

    ३२ कोटी ५० लाखांची तरतूद

    लम्पी स्कीन आजार राज्यात १२६ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. या पशुधनासाठी मदतीबाबत कोणतेही निकष नव्हते. या बाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार राज्य सरकार (Lumpy) मदत देणार आहे. यासाठी ३२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

  • सावधान ! लंपी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविणाऱ्यावर होणार कठोर कारवाई

    हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लंपीरोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.

    सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, “लंपी चर्मरोग आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगर परिषद अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) इ. चा वापर करून जनजागृती करावी अशा सूचना पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी-अधिकारी यांना दिल्या.

    खासगी सेवादात्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

    लंपी आजारावर उपयुक्त असणाऱ्या औषधींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लंपी चर्म आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासीता छात्र (ईंटर्नीज) यांना प्रति लसमात्रा रु.3 प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. सर्व खासगी सेवादात्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविणेचे श्री.सिंह यांनी आवाहन केले आहे.

    ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी

    शासकीय पशुवैद्यकांनी तसेच खाजगी पशुवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत तक्रार असल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. पशुपालकांनी अशी तक्रार विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ वर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी अशा सूचनाही यावेळी त्यांनी यावेळी दिल्या.

  • प्रेरणादायी ! 1 हजार पशुधनाचे सरपंचाकडून लम्पी प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    जिल्ह्यातील पाथरी तालूक्यात येणाऱ्या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी पुढाकार घेतल्यानंतर १ हजार पशुधनाचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे . विशेष म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन ही लसीकरण मोहीम दोन्ही गावच्या सरपंचांनी मोफत राबविली आहे.

    तालूक्यातील वाघाळा गावचे सरपंच बंटी घुंबरे व सिमुरगव्हाण चे सरपंच विष्णु उगले यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत स्वतःच्या गावातील पशुधनाला लम्पी आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागशी समन्वय साधत शनिवार १७ सटेंबर रोजी मोफत लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन केले होते . यामध्ये वाघाळा गावात ७०० तर सिमुरगव्हाण येथील ३०० पशुधनाचे लसीकरण करण्यात आले . दरम्यान राज्य सरकार येत्या काही दिवसात लम्पी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन लसीकरण मोहीम हाती घेणार आहे त्याआधी सामाजीक दायित्वातून पशुधनाची दोन्ही सरपंचानी घेतलेली काळजी तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.

    वाघाळा येथे लसीकरण यशस्वीतेसाठी सरपंच बंटी घुंबरे यांच्यासह अभिजीत घुंबरे , महेश घुंबरे , पशुवैद्यकीय अधिकारी शिंदे , संभाजी काकडे , सखाराम बोबडे , सुरेश होके यांनी तर सिमुरगव्हाण येथे उपसरपंच सुनील नायकल , ग्राम पंचायत सदस्य रामजी उगले,गणेश उगले, विकास कदम,रामेश्वर उगले,चांगदेव उगले, विष्णु रामभाऊ उगले,सेवक मारोती गवारे,ग्राम रोजगार सेवक बळीराम उगले,दिलीप उगले,ओमप्रकाश उगले,माऊली उगले , डॉ . पि. एल.जाधव , डॉ .चोरे ,डॉ .रवी विरकर , डॉ . रिजवान अन्सारी , डॉ . गजानन बनगर यांनी परिश्रम घेतले .

  • पशुधनाच्या औषधांचा खर्च शासन करणार, दिवसाला एक लाख जनावरांना लसीकरण : विखे पाटील

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान हरियाणा नंतर आता राज्यातही लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यात या आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. या साथीला अटकाव करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले असून राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लंपी रोगग्रस्त पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येणार अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते.

    राज्यासाठी एका आठवड्यात 50 लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खासगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी असे देखील विखे पाटील यावेळी म्हणाले. खासगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना निवास व अनुशंगिक व्यवस्था आणि प्रति लसीकरण तीन रुपये प्रमाणे मानधन सुरु करावं. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर भेटी देवून लंपी चर्म आजाराबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

    एका दिवसात एक लाख लसीकरण

    पुढे बोलताना ते म्हणाले, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आल्याने देशातील अन्य राज्यांच्या तूलनेत या आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे. आजारावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन पाच किलोमीटर परिसरातील पशुधनासोबतच राज्यभरातील पशुधनाचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. एका दिवसात एक लाख पशुधनाचे लसीकरण करण्यात येत असून, येत्या काळात हा वेग अधीक वाढेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    किती मिळणार मदत ?

    –मृत जनावरांसाठी गाय 30 हजार, बैल 25 हजार आणि वासरु 16 हजार याप्रमाणे मदत देण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती दल आणि राज्य पातळीवरील हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे.
    — जिल्हा पातळीवर देखील हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
    — म्हशींवर या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत नसल्याने म्हशींच्या संदर्भातील केंद्र सरकारची मंजुरी घेऊन बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात येईल.

  • Establishment of Coordinating Cell in Ministry




    lumpy : Establishment of Coordinating Cell in Ministry











































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंबी रोगाविषयी संपर्क साधण्यासाठी मंत्रालयात समन्वय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. (02 2 – 28 45 13 2) या दूरध्वनी क्रमांकावर पशुपालकांनी संपर्क साधावा असावाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे पी गुप्ता यांनी केला आहे.

    राज्यात लंपी चर्म रोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण करणे, बाधित पशुधनावर औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. तथापि काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच शेतकरी पशु पालकांना संपर्क साधता यावा व क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयात रूम नंबर 520 पाचवा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरू करण्यात आला आहे.

    राज्यातील चर्म रोगाचा वेळोवेळी आढावा घेणे, या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेला मार्गदर्शन करणे, उपाययोजनांबाबत राज्य शासनाला शिफारस करणे, इत्यादींसाठी पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यालयाचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये तज्ञ व्यक्ती आणि शास्त्रज्ञांचा समावेश देखील करण्यात आला आहे.

    error: Content is protected !!