Category: पीक लागवड

  • शेवटच्या टप्प्यात असे करा सोयाबीन पिकावरील किड आणि रोग व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून बऱ्याच ठिकाणी पापडी अवस्थेतील शेंगा भरत आहेत, अशा अवस्थेत सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात चक्री भुंगा,खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी ( स्पोडोप्टेरा- लष्करी अळी) या पंतगवर्गिय किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर काही ठिकाणी केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. या किडींचे वेळीच व्यवस्थापन नाही केल्यास सोयाबीन उत्पन्नात मोठे नुकसान होऊ शकते. त्यासोबतच पावसाचा खंड पडल्याने पिकास पाण्याचा ताण बसत आहे.

    त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी सोयाबीन वर रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामध्ये प्रादुर्भाव झालेली पाने सुरुवातीला पाण्यात भिजल्या प्रमाणे दिसतात त्यानंतर लवकरच हिरवट-तपकिरी ते लालसर-तपकिरी होतात. संक्रमित भाग नंतर तपकिरी किंवा काळ्या रंगाचा होतो. जास्त पाऊस किंवा जास्त दमट परिस्थितीत, बुरशीच्या मायसेलियल वाढीप्रमाणे पानांवर जाळी तयार होते. पानांवर गडद तपकिरी स्क्लेरोशिया तयार होतात. रिमझिम पावसामध्ये या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन उत्पन्नात घट येऊ शकते त्यामुळे वेळीच उपायोजना करणे आवश्यक आहे

    तसेच मागिल काही वर्षांच्या अनुभवावरून असे लक्षात येते की येणाऱ्या काळात शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन खालील प्रमाणे कीड व रोगांचे व्यवस्थापन करावे.

    कीड आणि रोगांचे व्यवस्थापन

    किडीकरीता 

    क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % – ६० मिली प्रती एकर किंवा थायमिथोक्झाम १२.६%+ लँम्बडा सायहँलोथ्रिन ९.५% (पूर्वमिश्रित कीटकनाशक) – ५० मिली प्रती एकर किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ % + लँम्बडा सायहँलोथ्रिन ४.६ %- ८० मिली प्रती एकर (पूर्वमिश्रित कीटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८% – १०० ते १२० मिली प्रती एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन ८.४९ % + इमिडाक्लोप्रीड १९.८१ % (पूर्वमिश्रित कीटकनाशक) -१४० मिली प्रती एकर यापैकी कुठलेही एक कीटकनाशक फवारावे.

    वरील कीटकनाशक सर्व प्रकारच्या किडी (खोडकीडी आणि पाने खाणा-या अळ्या) करीता काम करतात.
    म्हणून किडीनुसार वेगळे-वेगळे कीटकनाशक फवारण्याची आवश्यकता नाही.

    पानावरील ठिपके, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट,शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाकरीता

    टेब्युकोनॅझोल १०%+ सल्फर ६५ % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – ५०० ग्रॅम प्रति एकर किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ % -२५० मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन २०% – १५० ते २०० ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन १३.३ %+ इपिक्साकोनाझोल ५ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -३०० मिली प्रति एकर फवारावे.

    पिवळ्या मोझॅक रोगाकरिता प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून बांधावर न टाकता नष्ट करावीत आणि रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी किडीचे व्यवस्थापन करावे

    पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे तसेच कोरडवाहू सोयाबीनला अवर्षणप्रवण परिस्थितीत तग धरून ठेवण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच १३:००:४५ खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

    फवारणी करताना पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही

    किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी .

    डॉ.के.टी.आपेट
    वनस्पती रोगशास्त्र विभाग
    डॉ.जी.डी.गडदे आणि डॉ.डी.डी.पटाईत
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

    अधिक माहितीसाठी संपर्क करा
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
    परभणी
    ☎ ०२४५२-२२९०००

  • अशा प्रकारे करा लिंबू पिकावरील लीफ माइनर किडीपासून बचाव; जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : खरे तर बागायती पिके ही शेतकऱ्यांसाठी नगदी पिके आहेत. गेल्या काही वर्षांत लिंबूचे उत्पादन शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. लिंबू हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. ज्याचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी सोपे मानले जाते. परंतु, ते फायदेशीर करण्यासाठी, शेतकर्‍यांनी अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. लीफ मायनर कीटक लिंबू रोपासाठी घातक आहे.

    हा कीटक फक्त लहान वनस्पतींमध्ये आढळतो

    देशातील ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ. एस.के. सिंग यांच्या मते, लिंबाची रोपटी लहान असताना त्या काळात लिंबूवर्गीय पानावरील किरकोळ लिंबूवर्गीय कीटक दिसून येतो. ते म्हणाले की, ही एक प्रमुख कीड असून मार्च ते नोव्हेंबरपर्यंत सक्रिय राहते. लिंबू, संत्रा आणि पोमेलो यांसारख्या लिंबूवर्गीय फळांच्या गटाचे ते नुकसान करते.

    ते म्हणाले की, लिंबूवर्गीय लीफमायनर अळ्या लिंबाच्या झाडांच्या कोवळ्या पानांमध्ये उथळ बोगदे किंवा खोबणी बनवतात. कीटक सामान्यतः संत्री, लिंबू, पेपरमिंट्स, द्राक्षे आणि इतर वनस्पतींवर आढळतात. लिंबूवर्गीय लीफमायनर ही एकमेव खाणन कीटक आहे. जे सहसा लिंबू (लिंबूवर्गीय) पानांवर हल्ला करतात.

    या किडीची लक्षणे कशी ओळखावीत

    देशाचे ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ. एस.के. सिंग यांच्या मते, लिंबूवर्गीय लीफमायनर हा एक अतिशय लहान, हलका रंगाचा कीटक आहे, जो 1/4 इंचापेक्षा कमी लांबीचा आहे. यात तपकिरी आणि पांढर्‍या खुणा असलेले चांदी आणि पांढरे इंद्रधनुषी अग्रभाग आणि प्रत्येक पंखाच्या टोकावर एक वेगळा काळा डाग आहे. मागचे पंख आणि शरीर पांढरे असून मागचे पंख मार्जिनपासून पसरलेले आहेत.

    कीटकांच्या अळ्या फक्त लिंबाच्या पानांच्या खोडांमध्ये आणि इतर जवळच्या वनस्पतींमध्ये आढळतात, ते म्हणाले. जसजशी अळी विकसित होते तसतसे ते पानाच्या पृष्ठभागावरून खाली वाहणाऱ्या शिरांच्या आत एक पातळ (विष्ठा) चिन्ह सोडते, एक पातळ रेषा म्हणून दिसते. ही विशेषता कीटक ओळखण्यात मदत करण्यासाठी वापरली जाते. या किडींच्या हल्ल्यामुळे पाने सुकतात.

    कसे कराल नियंत्रण ?

    ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ.एस.के.सिंग यांच्या मते शेतकऱ्यांनी या किडीचा प्रादुर्भाव झालेली पाने गोळा करून नष्ट करावीत. पावसाळ्यात बाधित भागांची जोरदार छाटणी करावी. वारंवार सिंचन आणि नायट्रोजन खतांचा जास्त वापर टाळा. अळ्या झाडे खोदून आत असल्याने कीटकनाशकांच्या वापराने त्यांना सहज मारता येत नाही. तथापि, काही पद्धतशीर कीटकनाशकांच्या वापरामुळे संसर्ग काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

     

     

     

     

  • वेळीच करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन…..!

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दिर्घ उघडीप नंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी सिंचन दिल्यास अथवा मोठे पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा मोठे पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.

    आकस्मिक मर व्यवस्थापन

    १. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा.
    २. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
    ३. लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया+ १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली याप्रमाणे आळवणी करावी.
    किंवा
    १ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.
    ४. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.

    वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.

    डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी
    आणि
    डॉ. ए.डी.पांडागळे
    कापूस संशोधन केंद्र, नांदेड
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

     

    अधिक माहितीसाठी संपर्क करा
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
    परभणी
    ☎ ०२४५२-२२९०००

  • फुलगळ आणि फळगळ का होते ? जाणून घ्या कारणे

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, बदलते हवामान आणि नवनवीन कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे फुलगळ आणि फळगळीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आजच्या लेखात आपण फळगळ आणि फुलगळ याची कारणे जाणून घेऊया …

    फुलगळ का होते ?

    १ ज्यास्त नत्र युक्त खते त्यामुळे फुलगळ होते excess नायट्रेट मुळे

    2 जिब्रेलीन वाढले की फुलगळ होते मग ते पाऊस झाला तरी जिब्रेलीन वाढते किंवा स्प्रे मधून गेला तरी

    3 सतत पाऊस चालला त्यामुळे ही फुलगळ होते

    4 काही वेळा बुरशी मुळे ही फुलगळ कळी कुज होते

    5 हार्मोन्स imbalance मुळे ही फुल गळ होते तेव्हा आम्ही ड्रीप किंवा स्प्रे मधून NAA देतो

    6 खूप थंडी म्हणजे 10 अंश सेल्सियस तापमान झाले की फुलगळ होते

    7 आणि 38 अंश सेल्सियस च्या वर तापमान गेले तरी फुलगळ होते 15 ते 35 हा बॅलन्स पाहिजे तापमान

    9 नत्र युक्त खते स्प्रे मधून गेली की फुल गळ होते

    10 झिंक ,बोरॉन ,कॅल्शियम च्या कमतरतेमुळे देखील फुलगळ होते

    11 लवकर म्हणजे सेटिंग च्या काळात किंवा फुल लागली तेव्हा पोटॅश दिले किंवा सल्फर दिले तरी फुल गळ होते

    12 झाडाला पाण्याचा ताण दिला तरी फुलगळ होते

    13 किंवा अधिक पाणी दिले तरी फुलगळ होते

    14 झाडावर भुरी ,डाऊनी ,करपा चा अटॅक झाला तरी फुलगळ होते

    15 झाडाला 16 अन्नद्रव्य ही स्टेज नुसार वेगवेगळी दयावी लागतात ती मागे पूढे झाली तरी फुलगळ होते

    16 जर काही प्रमाणात तणनाशक फवारले गेले असेन तरी फळ आणि फुल गळते ,

    17 चुकीचे संजीवक फवारणी झाली किंवा प्रमाण चुकले तरी फुलगळ होते

    18 प्रखर सूर्यप्रकाश या मुळे देखील फुल गळ होते

    19 सकाळी दव ,धुके पडले तरी फुलगळ होते

    20 Self Pollination नसलेल्या पिकाच्या च्या व्हरायटी जर नेट मध्ये लावल्या तरी एकही फुल सेटिंग होत नाही

    21 सेंथेटिक पायरेथ्रईड गटातिल कीटकनाशके च्या फवारणी मुळे जसे कराटे ,सायपरमेथ्रीन 25% यांच्या फवारणी मुळे देखील फुलगळ होते

    फुलगळ फळगळीची महत्वाची कारणे

    १) कमकुवत परागीभवन

    २) अपुरा किंवा गरजेपेक्षा जास्त प्रकाश

    ३) जमिनीचा कमी सुपीकता

    ४) बुरशी किंवा किडींचा प्रादुर्भाव त्यामुळे झाडावर झालेला परिणाम

    ५) अनेक झाडांमध्ये फुलकळी निघाल्यानंतर ५० तासांच्या आत परागीभवन न झाल्यास फुलगळ होऊ शकते.

    ६) जमिनीत व परिणामी झाडात नायट्रोजनचे प्रमाण जास्त झाल्यास

    ७) झाडाला पाणी कमी पडल्यास किंवा जास्त झाल्यास

    ८) हवेचा वेग खूप जास्त असल्यास

    ९) झाड हाताळताना झाडाला काही इजा झाल्यास

    १०) हवेतील आर्द्रता ४०% पेक्षा कमी अथवा ७०% पेक्षा जास्त झाल्यास

    ११) फुलकळी निघण्याच्या वेळी झाडाला सूट न होणारे रासायनिक औषध फवारल्यास

    १२) झाडाला फॉस्फरस कमी पडल्यास

    १३) दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात खूप तफावत असल्यास

  • All About Black Guava Cultivation

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हिरवा पेरू लाल पेरू अशा पेरूच्या जाती आपल्याला माहीतच असतील मात्र तुम्ही कधी काळ्या पेरूच्या शेतीबद्दल ऐकले आहे का ? होय …! तुम्ही बरोबर ऐकलंत. आज आपण जाणून घेणार आहोत काळ्या (Black Guava Cultivation)  पेरूच्या शेतीबद्दल…

    भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवीन बदल केले जात आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना महागडी, दुर्मिळ आणि नगदी पिके घेण्यासही प्रोत्साहन दिले जात आहे, कारण या पिकांना बाजारात मागणी आणि किंमतही जास्त आहे. अशाच एक दुर्मिळ आणि महागड्या पिकामध्ये काळ्या पेरू शेतीचा समावेश होतो, ज्यामध्ये सध्या असलेले औषधी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेतच, शिवाय शेतकऱ्यांना कमी वेळात चांगला नफाही देऊ शकतात. त्याच्या वैशिष्ट्यांमुळे, ही जात खूप लोकप्रिय झाली आहे. कमी खर्चात (Black Guava Cultivation) लागवड करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

    काळा पेरू

    सामान्य पेरूच्या तुलनेत, काळ्या पेरूमध्ये औषधी गुणधर्म, आवश्यक पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून रोगांपासून संरक्षणाचे काम करतात. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते वृद्धत्वाची लक्षणे रोखण्यासाठी उपयुक्त आहे. या कारणासाठी काळ्या पेरूमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील असतात.

    काळ्या पेरूची लागवड

    काळ्या पेरूची ही जात बिहार कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली, त्यानंतर देशभरातील बहुतांश शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करण्यास सुरुवात केली. अलीकडे हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील कोलार भागात काळ्या पेरूची लागवड सुरू झाली आहे. येथे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर (उत्तर प्रदेश) रोपवाटिकेतून रोपे खरेदी करून पुनर्रोपणाचे काम करण्यात आले आहे.

    –काळ्या पेरूच्या पानांचा आणि आतल्या लगद्याचा रंग देखील गडद लाल किंवा शोक असतो.
    –काळ्या पेरूच्या फळाचे वजन सुमारे 100 ग्रॅम असते.
    –ते दिसण्यात जितके आकर्षक आहेत, तितकाच कमी खर्च त्यांच्या लागवडीत होतो.
    –सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याची लागवड फक्त थंड प्रदेशात केली जाते आणि त्याच्या फळांमध्ये कीटक-रोग येण्याची शक्यता नसते.

    व्यावसायिक शेतीचा फायदा होईल

    आतापर्यंत देशभरात केवळ पिवळा पेरू आणि हिरवा पेरू यांचाच दबदबा आहे, परंतु काळ्या पेरूची (Black Guava Cultivation) व्यावसायिक शेती नवीन बाजारपेठ निर्माण करू शकते. त्याच्या लागवडीसाठी थंड आणि कोरडे तापमान असावे लागते. तर पाण्याचा निचरा होणारी चिकणमाती माती उत्तम आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, काळ्या पेरूची लागवड करण्यापूर्वी जमिनीची तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून पिकाला धोका होण्याची शक्यताही कमी असते.

     

  • पपईच्या दमदार उत्पदनासाठी वापरा तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ महत्वपूर्ण टिप्स

    हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात पारंपारिक शेतीतील धोके वाढले आहेत. अशा स्थितीत फळबागा ही शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. ज्यामध्ये पपईची लागवड हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार मानला जातो. पण, पपईची लागवड आणि फायदे यामध्ये आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. एकंदरीत हे स्पष्ट आहे की पपईची लागवड करताना आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर फायदा कमी आणि हानी होण्याची शक्यता जास्त असते.

    पपईच्या शेतात पाणी थांबू नये

    पपईची लागवड फायदेशीर कशी करावी या विषयावर ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ. एस.के. सिंग सांगतात की, पपई पिकवण्यासाठी आणि उत्पादनासाठी आदर्श तापमान २१ सेंटीग्रेड ते ३६ सेंटीग्रेड असावे. दुसरीकडे, पपईच्या यशस्वी लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी पुरेशी माती असणे आवश्यक आहे, कारण पपईच्या शेतात २४ तासांपेक्षा जास्त पाणी साचल्यास पपई वाचवणे अशक्य आहे. ते पुढे म्हणतात की पपई पिकाला उष्ण हवामानात ओलावा आणि थंड हवामानात कोरड्या निसर्गाच्या जमिनीत चांगली फुले येतात. अत्यंत कमी तापमानाच्या संपर्कात आल्याने पानांचे नुकसान होऊ शकते आणि झाडेही नष्ट होऊ शकतात. पपईसाठी सर्वोत्तम माती pH 6.0 ते 7.0 दरम्यान आहे.

    रोपवाटिका दोन प्रकारे तयार करता येते

    फळ तज्ञ डॉ.एस.के.सिंग यांच्या मते, शेतकरी पपईची रोपवाटिका दोन प्रकारे तयार करू शकतात. ज्यामध्ये एक मार्ग उंच बेड आहे आणि दुसरा मार्ग पॉलिथिन पिशवी आहे. ते पुढे स्पष्ट करतात की, वाढलेल्या बेड पद्धतीने रोपवाटिका वाढवताना, माती चांगली तयार केली जाते आणि योग्य प्रमाणात सर्व शेणखत आणि बिया योग्य अंतर ठेवून पेरल्या जातात. त्याचबरोबर पॉलिथीन पिशव्या पद्धतीने नर्सरी तयार करण्यासाठी पपईच्या बिया पॉलिथिन बॅगमध्ये पेरल्या जातात. यानंतर, 30 ते 45 दिवसांनंतर, मुख्य भागात रोपे लावता येतात.

    रोपे लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

    फळ तज्ज्ञ डॉ.एस.के.सिंग यांच्या रोपवाटिकेत पपईची रोपे तयार झाल्यानंतर त्यांच्या लागवडीसाठी जमीन तयार करावी लागते. त्यासाठी वारंवार नांगरणी करून जमीन चांगली तयार करून 1 फूट लांब व 1 फूट खोल व 1 फूट रुंद खड्डे खणणे आवश्यक आहे. डॉ सिंह यांच्या म्हणण्यानुसार, खोदलेले खड्डे किमान १५ दिवस उन्हात सुकवू द्या, त्यानंतर मुख्य भागात रोपे लावता येतील. खोदलेल्या खड्ड्यातील अर्धा भाग पेरणीपूर्वी किमान १५ दिवस आधी ५ ग्रॅम कार्बोफ्युरान आणि २५-३० ग्रॅम डीएपीने खोदलेल्या मातीने भरता येतो. रोपवाटिकेत तयार केलेली झाडे, माती आणि मुळांसह, झाकण काढून अर्ध्या मातीने भरलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी ठेवले जाते आणि अर्धे उर्वरित मातीने झाकले जाते.

    लागवडीनंतर लगेचच हलके पाणी द्यावे. 15 दिवसांपूर्वी खोदलेल्या खड्ड्यात डीएपी टाकता येत नसेल, तर रोप लावताना रासायनिक खत टाकू नये, कारण त्यामुळे मुळांना इजा होऊ शकते.

     

  • DAP म्हणजे काय? जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत

    हॅलो कृषी ऑनलाईन : चांगल्या पिकासाठी खत सर्वात उपयुक्त आहे. आजच्या काळात देशातील बहुतांश शेतकरी शेतात डीएपी खताचा वापर करू लागले आहेत, त्यामुळे या लेखाद्वारे डीएपी खताशी संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. डीएपीचे पूर्ण नाव डी अमोनियम फॉस्फेट आहे, जे अल्कधर्मी स्वरूपाचे रासायनिक खत आहे. याची सुरुवात 1960 साली झाली. पाहिले तर ते रासायनिक खतांमध्ये वेगळे महत्त्व असलेल्या खतांच्या श्रेणीत येते. भारतीय बाजारपेठेतही हे खत शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

    काय आहे DAP ?

    डीएपी हे शेतात वापरल्या जाणार्‍या फॉस्फोरिक खतांपैकी एक मानले जाते. हरितक्रांतीनंतर शेतकऱ्यांनी त्याचा सर्वाधिक वापर सुरू केला आहे. या खतामध्ये 18 टक्के नायट्रोजन आणि 46 टक्के फॉस्फरस आढळतात.एवढेच नाही तर त्यात 39.5 टक्के विद्राव्य फॉस्फरस, 15.5 टक्के अमोनियम नायट्रेट ही पोषक तत्वांसह उपलब्ध आहेत. हे कंपोस्ट भारतीय बाजारपेठेत 50 किलोच्या पॅकसह उपलब्ध आहे.

    डीएपी कंपोस्टची वैशिष्ट्ये

    –त्याचा वापर करून पिकांना पोषक तत्वांचा पुरवठा होतो.

    –हे रोपाची चांगली वाढ आणि विकास करण्यास अनुमती देते.

    बाजारात DAP ची नवीन किंमत?

    भारतीय बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या सोयीनुसार खते अनुदानासह व विनाअनुदान दिली जातात. बाजारात अनुदानाशिवाय डीएपी खताच्या 50 किलोच्या गोणीची किंमत 4073 रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर अनुदानित 50 किलोच्या पोत्याची किंमत 1350 रुपयांपर्यंत आहे.

    शासकीय नियमानुसार खत

    देशातील खतांचा काळाबाजार पाहता सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी खतांची नवीन यादीही जारी करते, ज्यामध्ये शेतकऱ्याला त्याच्या शेतासाठी किती खत मिळावे याची सर्व माहिती उपलब्ध असते.

     

     

  • नीम केक खत म्हणजे काय? जाणून घ्या त्यातील पोषक तत्व आणि किंमती बद्दल

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतात पिकाची चांगली वाढ होण्यासाठी शेतकरी अनेक प्रकारच्या खतांचा वापर करतात, परंतु त्यामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक दोन्ही खते आढळतात. शेतकऱ्यांचा सर्वाधिक विश्वास सेंद्रिय खतांवर वाढत आहे, कारण त्यांचा शेती आणि पीक दोघांनाही रासायनिक खतांपेक्षा कितीतरी पट जास्त फायदा होतो.यापैकी एक खत म्हणजे निंबोळी खत, जे शेतकरी बांधवांमध्ये खूप लोकप्रिय आहे. चला तर मग आजच्या या लेखाद्वारे कडुलिंब खताबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

    नीम केक खत म्हणजे काय?

    निंबोळी खत हे एक प्रकारचे खत आहे, जे पिकाच्या चांगल्या वाढीसाठी वापरले जाते. ज्याप्रमाणे फळे आणि फुलांमध्ये बिया आढळतात, त्याचप्रमाणे कडुलिंबातही बिया असतात. या बियांपासून निंबोळी खत तयार केले जाते. कडुलिंबाचा केक कडुलिंबाच्या बियापासून काढलेला तेलाचा अवशेष आहे. ज्याचा उपयोग कडुलिंबाच्या दाण्यांसोबत चांगला दळल्यानंतर केला जातो. त्यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. इतकेच नाही तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, तांबे, लोह, मॅंगनीज यांसारखे इतर पोषक घटकही त्यात योग्य प्रमाणात आढळतात. अनेक गुणांमुळे शेतकरी त्याचा उपयोग बागायती आणि फुलशेतीसाठी करतो.

    निंबोळी खताचे फायदे

    –या खताचा शेतात वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढते.

    –यामुळे पिकातील सुमारे 50 टक्के हानिकारक रोग दूर होतात.

    –रासायनिक औषधे आणि कीटकनाशकांचा वापर खूपच कमी आहे.

    –कडुलिंब हे पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य खत आहे.

    –पर्यावरणपूरक खत

    –रासायनिक खतापेक्षा कमी किमतीत कडुलिंब खत बाजारात उपलब्ध आहे.

    –पिकामध्ये त्याचा वापर केल्याने चंपा, तेलबिया, थ्रिप्स, पांढरी माशी इत्यादी मऊ त्वचा असलेल्या किडी मरतात.

    निंबोळी खताची किंमत ?

    भारतीय बाजारपेठेत निंबोळी खताची किंमत उर्वरित खतांच्या तुलनेत शेतकरी बांधवांसाठी अत्यंत किफायतशीर आहे. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर सध्या बाजारात 50 किलो निंबोळी खताच्या पोत्याची किंमत 900 रुपयांपर्यंत आहे.

     

  • डंख मरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव ? कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : आळीच्या डंखाने शेतकऱ्याला दवाखान्यात भरती करण्याची घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिराळा परिसरात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यातच समाज माध्यमांवर या अळीबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या. या आळीचा पिकांसाठी धोकादायक आहे का ? अळीने डंख केल्यास काय काळजी घ्यावी ? यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कार्यरत असलेले कीटक शास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे व डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी पुढील माहिती दिली आहे.

    या आळीला इंग्रजीमध्ये ‘स्लज कॅटरपिलर’ असे म्हणतात. ही एक बहुभक्षी कीड आहे. बांधावरील गवतावर, एरंडी,आंब्याच्या झाडावर, चहा , कॉफी यासारखे पिके व इतर फळ पिकावर तुरळ ठिकाणी एखादी आळी दिसून येत असते. असे असले तरी एखाद्या परिसरामध्ये ही कीड जास्त प्रमाणात आल्यास अधाशाप्रमाणे पानावरील हिरवा भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवल्याचे देखील उदाहरणे आहेत. पावसाळ्यात, पावसाळ्याच्या शेवटी, उष्ण व आर्द्र हवामानात ही अळी दिसून येते. या आळीच्या अंगावर बारीक बारीक केस असतात. त्याखाली काही विष ग्रंथी असतात व या केसातून ते विशिष्ट रसायन किंवा विष त्यांच्या स्वसंरक्षणासाठी बाहेर टाकतात. हे रसायन त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेवर चट्टे पडून अग्नी दाह होतो. ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही.

    गांधींल माशीने डंक केल्यावर दाह होतो, केसाळ आळी यांच्या संपर्कातून एलर्जी होते. त्याचप्रमाणे स्लज कॅटरपिलर या आळीच्या संपर्कात त्वचा आल्यासच अग्नी दहा होत असतो, तो शक्यतो सौम्य असतो. पण ज्या व्यक्तींना ऍलर्जी आहे किंवा दम्याचा त्रास आहे, त्या व्यक्तीमध्ये मात्र तीव्र स्वरूपाची लक्षणे पहावयाला मिळू शकतात.

    काय घ्यावी काळजी ?

    — बांधावरील गवत काढत असताना किंवा शेतातील इतर कामे करत असताना या किडीचे निरीक्षण करून ही कीड आपल्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.

    –त्याचप्रमाणे काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्या त्वचेशी या किडीचा किंवा तिच्या केसाचा संपर्क आल्यास आपण घरी वापरतो तो चिकट टेप हा दंश झाल्याच्या ठिकाणी हलक्या हाताने लावून काढून घ्यावा. त्यामुळे या अळीचे केस सहजपणे निघून जाऊन दाह कमी होण्यास मदत होते.

    — त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी दंश झाला आहे त्या ठिकाणी बर्फ लावणे व काही प्रमाणात बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट करून लावणे हे देखील फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. पण लक्षणे तीव्र असल्यास मात्र नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे योग्य राहील.

    या किडीच्या नियंत्रणासाठी विशिष्ट अशा रसायनाची किंवा कीटकनाशकाची शिफारस नसली तरी नेहमीच्या वापरातील कीटकनाशक जसे की, क्लोरोपायरीफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी),प्रोफेनोफोस (२० मिली प्रती १० लि. पाणी) ,क्वीनॉलफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी), इमामेक्टिन बेंजोएट (४ ग्रॅम प्रती १० लि. पाणी ), ५ टक्के निमार्क हे उपयुक्त ठरू शकतात. अशी माहिती आंबेजोगाई जिल्हा बीड विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र डॉ. व्ही. पी. सूर्यवशी यांनी दिली.

     

  • राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज; कशी घ्यावी पिकांची काळजी ? वाचा कृषी सल्ला

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 06 सप्टेंबर रोजी परभणी, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड व औरंगाबाद जिल्हयात; दिनांक 07 सप्टेंबर रोजी लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्हयात तर दिनांक 08 सप्टेंबर रोजी लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 08 सप्टेंबर रोजी हिंगाली, परभणी, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना; दिनांक 10 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर दिनांक 09 सप्टेंबर रोजी हिंगोली, परभणी, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार ते खुप मुसळधार पावसाची शक्यता आहे. सद्य हवामानानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्यवस्थापन

    पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर कापूस, तुर, भुईमुग व मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

    फळबागेचे व्‍यवस्‍थापन

    पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर केळी, द्राक्ष व सिताफळ बागेत वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

    भाजीपाला

    पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

    फुलशेती

    पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.