Category: पीक लागवड

  • पीक संरक्षणासाठी ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्यांचा वापर कसा कराल ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, कधी ढगाळ हवामान तर कधी जोराचा पाऊस यामुळे पिकांमध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा स्थितीत ट्रायकोग्रामा हा मित्र कीटक पतंगवर्गीय किडींचे व्यवस्थापन क्षमपणे करतो. आजच्या लेखात आपण याच बाबत माहिती घेणार आहोत.

    असा करतात वापर

    ट्रायकोग्रामाचे प्रयोगशाळेमध्ये संगोपन करून त्यापासून मिळवलेली अंडी शेतामध्ये प्रसारित करता येतात. त्याची अंडी चिकटवलेल्या कार्डला ‘ट्रायकोकार्ड’ असे म्हणतात. साधारण पोस्टकार्डसारख्या दिसणाऱ्या (२० × १० सें.मी.) कागदावर धान्यांमध्ये जाळी करणाऱ्या पतंगाची २० हजार अंडी चिटकवलेली असतात. त्यामध्ये ट्रायकोग्रामा नावाचा लहान परोपजीवी कीटक असतो.

    हा गांधील माशीसारखा दिसणारा, पण आकाराने सूक्ष्म ०.४ ते ०.७ मि.मी. असतो. तो शेतात फिरून पिकांची नुकसान करणाऱ्या अळीवर्गीय कीटकांची अंडे शोधून काढतो. त्या किडींच्या अंड्यामध्ये स्वत:चे अंडे टाकतो. या अंड्यातून १६ ते २४ तासांमध्ये अळी बाहेर पडते. ही बाहेर पडलेली अळी साधारण दोन ते तीन दिवस किडीच्या अंड्यातील घटकांवर उदरनिर्वाह करते. यामुळे अंड्यातून नवीन कीड तयार होत नाही. ती अंड्यातच मरते. या साऱ्या प्रक्रियेमध्ये पिकांचे कोणतेही नुकसान होत नाही की पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. साधारण ७ ते ८ व्या दिवशी ट्रायकोग्रामा प्रौढ किडीच्या अंड्यातून बाहेर पडतो. प्रौढ पुढे २-३ दिवस शेतात फिरून अळीवर्गीय किडीच्या अंड्याचा शोध घेत, त्यात आपली अंडी घालतो. ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम ८ ते १० दिवसांत पूर्ण होतो.

    वापर केव्हा व कसा करायचा?

    कापूस, ज्वारी, मका, ऊस, भेंडी अशा पिकांमध्ये पेरणीपासून ४० ते ४५ दिवसांनी अळीवर्गीय किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच २ ते ३ ट्रायको कार्ड प्रति एकरी वापरावे. ट्रायकोकार्डवरील आखलेल्या जागेवर दहा पट्ट्या कात्रीने हळुवार कापाव्यात. हे १० तुकडे वेगवेगळ्या पानांच्या खालील बाजूने स्टेपल करावेत. ट्रायकोकार्ड हे सकाळी किंवा संध्याकाळी शेतात लावावे. हे कार्ड वापरल्यामुळे पतंगवर्गीय किडींचा अंडी अवस्थेत नाश करता येतो.

    घ्यावयाची काळजी 

    शेतात ट्रायकोकार्डचा वापर केल्यानंतर १० ते १५ दिवस रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये. ट्रायकोकार्ड हे १ सी.सी.चे असावे. त्यावरील पॅरासिटीझमचे प्रमाण ८० ते ९० टक्के असलेच पाहिजे. हे कार्ड तयार झाल्यापासून ३५ दिवसांपर्यंत वापरता येते. ट्रायकोकार्ड खरेदी करताना परोपजीवी कीटक बाहेर पडण्याची तारीख बघून घ्या. त्या मुदतीपूर्वीच वापरा. ट्रायकोकार्ड प्रखर सूर्यप्रकाश, कीटकनाशके, मुंग्या आणि पालीपासून दूर ठेवा. ट्रायकोकार्ड हे कृषी विद्यापीठ किंवा शासनमान्य प्रयोगशाळांकडूनच विकत घ्यावे.

    कामगंध सापळा

    किडीच्या नैसर्गिक पुनरुत्पादनासाठी नर व मादी पतंगाचे मिलन होणे आवश्यक असते. मादी पतंगाच्या विशिष्ठ अशा गंधाकडे नर पतंग आकर्षित होतात. या तत्त्वाचा वापर करून कीड व्यवस्थापनासाठी फेरोमोन सापळे म्हणजेच कामगंध सापळे तयार केले जातात. त्यांचा वापर प्रामुख्याने तीन प्रकारे करता येतो.
    १) कामगंध सापळे वापरून किडींचे सर्वेक्षण करणे. २) मोठ्या प्रमाणात सापळे लावून मोठ्या प्रमाणात किडीचे पतंग सापळ्यात पकडून (मास ट्रॅपिंग) त्यांचा नाश करणे. ३) कीटकांच्या मिलनात अडथळा निर्माण करून त्यांच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला अटकाव करणे.

    सापळा वापरण्याची पद्धत व प्रमाण

    सापळ्याच्या प्लॅस्टिक पिशवीचे टोक जमिनीकडे येईल, अशा प्रकारे मजबूत काठीच्या एका टोकाला बांधावा. ती काठी पिकाच्या उंचीच्या एक ते दोन फूट इतकी उंच असावी. दोन सापळ्यामधील अंतर ५० मीटर असावे. सापळ्याच्या वरच्या बाजूला एक छप्पर असते. त्याच्या आतील बाजूला एका खाचेमध्ये लिंग प्रलोभन (ल्युअर) लावले जाते. लिंग प्रलोभन (ल्युअर) पॅकेटमधून काढल्यानंतर साधारणपणे २०-२५ दिवसांपर्यंत त्याचा गंध टिकतो. कामगंध सापळा पीकवाढीच्या सुरुवातीपासून किंवा फुलोरा अवस्थेपासून पाने खाणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी ५ व मास ट्रॅपिंगसाठी म्हणजे मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करण्यासाठी २० कामगंध सापळे प्रति हेक्टरी शेतात लावावेत. सापळ्यात अडकलेले नर पतंग नष्ट करावेत. अशा प्रकारे कामगंध सापळ्यांचा वापर करून पतंगवर्गीय किडींचा नाश करून पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल. वेगवेगळ्या पिकांमध्ये उदा. कपाशी, सोयाबीन, मका, तूर, वांगी, भेंडी येणाऱ्या विविध पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या ल्युअर वापराव्या लागतात.

    किडी प्रजाती अंडी प्रति हेक्टर सोडण्याचे प्रमाण

    –कापसावरील बोंड अळ्या ट्रायकोग्रामा चिलोनिस १,५०,००० ४-६ वेळा

    –गुलाबी बोंड अळी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री १,५०,००० ०३

    –मक्यावरील लष्करी अळी ट्रायकोग्रामा प्रिटिऑसम १,२५,००० ०३

    –उसावरील खोडकिडा ट्रायकोग्रामा चिलोनिस ५०,००० ०६

    –नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणारे ल्युर

    किडींचे नाव लिंग प्रलोभन (ल्युअर) पीक

    –गुलाबी बोंड अळी पेक्टिनोल्युअर कपाशी

    –मक्यावरील लष्करी अळी एफएडब्ल्यू ल्युअर ज्वारी, मका

    –तंबाखूवरील पाने खाणारी अळी स्पोडोल्युअर सोयाबीन, कपाशी

    –हिरवी घाटे अळी हेक्झाल्युर कपाशी, सोयाबीन, तूर

    –ठिबक्यांची बोंड अळी व्हिटल्युअर भेंडी

    –शेंडे व फळ पोखरणारी अळी लुसिनल्युअर वांगी

    डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२०००

    डॉ. श्रद्धा धुरगुडे, ८८३०७७६०७४

    (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

  • सप्टेंबरमध्ये ‘या’ पिकांची लागवड करा, हिवाळ्यात मिळणार बंपर नफा

    हॅलो कृषी ऑनलाईन : सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. अशा स्थितीत येत्या काही दिवसांत कडाक्याचे ऊन पडते . या बदलत्या ऋतूचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांवरही होत असल्याने सप्टेंबर महिन्यात कोणती शेती करावी, याचा सल्ला आम्ही शेतकरी बांधवांना देणार आहोत.

    सप्टेंबरमध्ये भाजीपाला व बागकाम करा

    भाजीपाला आणि बागायती पिकांसाठी सप्टेंबर हा महत्त्वाचा महिना मानला जातो. भाजीपाला पिके आणि बागकामासाठी हा महिना योग्य आहे, त्यामुळे तुम्हालाही भाजीपाला लागवड करायची असेल तर हे काम या महिन्यात पूर्ण करा. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्यांची लागवड करण्याचा सल्ला देणार आहोत, ज्याची लागवड करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. या लेखात खाली दिलेल्या भाज्या केवळ खाण्यासाठीच उत्तम नसतात, तर त्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानल्या जातात, त्यामुळे त्यांची मागणी वर्षभर बाजारात राहते.

    १) टोमॅटो

    टोमॅटो लागवडीसाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत पेरणी केली जाते, त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत त्याचे पीक तयार होते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाजारात टोमॅटोची मागणी वर्षभर सारखीच असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास लाखो रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

    २)फुलकोबी

    फुलकोबी ही अशी भाजी आहे, जी क्वचितच कोणी खात नसेल. हिवाळा आला की त्याची भाजी, पकोडे, पराठे हे प्रत्येक घरात नक्कीच खाल्ले जातात. आता लोकांनी ते सूप आणि लोणच्याच्या स्वरूपातही वापरण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच याच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांनी या महिन्यात लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. त्याची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान केली जाते. यानंतर, पेरणीनंतर सुमारे 60 ते 150 दिवसांत फुलकोबीचे पीक विक्रीसाठी तयार होते.

    ३)मिरची

    सप्टेंबर ते ऑक्टोबर हे महिने मिरची लागवडीसाठी सर्वात योग्य मानले जातात. आता वर्षभर लागवड केली जात असली तरी. अशा परिस्थितीत प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या मिरचीची लागवड करून शेतकरी बांधव १४० ते १८० दिवसांत त्यातून नफा मिळवू शकतात.लाल मिरची, हिरवी मिरची, मोठी मिरची आणि बरेच काही मिरच्यांचे अनेक प्रकार. या सर्व वाणांची खास गोष्ट म्हणजे याचा वापर प्रत्येक घरात दररोज केला जातो, कधी लोणच्याच्या स्वरूपात, कधी कोशिंबीरच्या स्वरूपात तर कधी भाजीला तिखटपणा आणण्यासाठी दररोज वापरला जातो, त्यामुळे शेतकरी त्याची लागवड करतात.

    ४)कोबी

    सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी कोबीची लागवड करू शकतात. त्याची पेरणी बेड तयार करून केली जाते. विविध जातींपासून २ ते ४ महिन्यांत उत्पन्न देते. फक्त 60 दिवसांनंतर, तुम्ही त्याचे पीक बाजारात नेऊन विकू शकता. त्यामुळे हिवाळ्यात शेतकऱ्यांना चांगला नफा मिळावा यासाठी सप्टेंबर महिन्यात लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांनी दिला आहे. ही एक भाजी आहे जी अनेक गोष्टींमध्ये कच्ची देखील वापरली जाते.

    ५)गाजर

    गाजराची लागवड ऑगस्टच्या अखेरीस सुरू होऊन नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत केली जाते. अशा परिस्थितीत, सप्टेंबर नुकताच सुरू झाला आहे, त्यामुळे त्याच्या लागवडीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. आता पेरणी केली तर ३ ते ४ महिन्यांनी उत्पादन घेता येईल. सफरचंद गाजरात इतके पौष्टिक तत्व असते, ही म्हण तुम्हीही ऐकली असेल. होय, गाजर हे भारतातील प्रमुख भाजीपाला पिकांपैकी एक आहे, कारण ते केवळ बनवूनच नव्हे तर कच्चे देखील वापरले जाते. याच्या मदतीने लोणची, हलवा, सॅलडसह अनेक गोष्टी बनवल्या जातात. थंडीच्या मोसमात गाजराच्या हलव्याची सर्वाधिक चर्चा होते. थंडीचा हंगाम सुरू होताच त्याची मागणी गगनाला भिडू लागते. यासोबतच हे डाएट करणाऱ्या लोकांमध्येही खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना नफ्याची दारे खुली होतील.

     

     

  • सद्य हवामान स्थितीत फळबागा,भाजीपाला,चारापिकांची कशी घ्याल काळजी ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    फळबागेचे व्‍यवस्‍थापन

    संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत फळ गळ दिसून येत असल्यास एनएए 4 मिली + चिलेटेड झिंक 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत फळ वाढीसाठी 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. चिकू बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

    भाजीपाला

    भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

    चारा पिके

    चारा पिकासाठी उशीरा लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. चारापिकात पाण्याचा ताण बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

    फुलशेती

    गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुलपिकात पाण्याचा ताण बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

  • ज्वारीवर लष्करी आळीचा हल्ला तर सोयाबीनवर मोझॅक; असे करा वावरातल्या पिकांचे व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    सोयाबीन : सोयाबीन पिक सध्या फुलोरा ते शेंगा वाढीच्या अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास सोयाबीन पिकास संरक्षित पाणी द्यावे. कोरडवाहू सांयाबीन पिकात पोटॅशियम नायट्रेट 1% म्हणजेच 13:00:45 खताची (100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून) फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त झाडे तात्काळ उपटून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकर 15-20 पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 140 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक फवारावे.

    खरीप ज्वारी : उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 % 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 % 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिक सध्या पोटरी अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे‍.

    बाजरी : बाजरी पिक सध्या पोटरी अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे‍.

    ऊस : ऊस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर फवारणी करावी.

    हळद: पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

     

  • अशा प्रकारे करा कारल्याची शेती; मिळेल मोठा नफा

    हॅलो कृषी ऑनलाईन : कडूपणा या नैसर्गिक गुणधर्मांसाठी कारला बाजारात ओळखला जातो. ही भाजी आरोग्यासाठी देखील फायदेशीर भाज्यांपैकी एक आहे. भारतात याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते जसे – करवेलक, करवेलिका, कारेल, कारली आणि कारली इत्यादी, परंतु यापैकी, कारले हे नाव सर्वात लोकप्रिय आहे.

    जाळी पद्धत वापरा

    कारल्याच्या लागवडीसाठी जाळी पद्धत सर्वोत्तम मानली जाते, कारण या पद्धतीमुळे कारली नेहमीच्या पिकापेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते. या पद्धतीत शेतकरी आपल्या संपूर्ण शेतात जाळी तयार करून वेल पसरवला जातो. या पद्धतीमुळे पिक जनावरे नष्ट करत नाहीत आणि त्याच वेळी वेल भाजीपाला असल्याने ते जाळ्यात चांगले पसरते. या पद्धतीचे सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी कोथिंबीर आणि मेथी यांसारख्या अतिरिक्त भाजीपाला खाली असलेल्या रिकाम्या जागेत वाढवू शकतात.

    हरितगृह आणि पॉली हाऊस पद्धत

    या दोन्ही पद्धतींद्वारे शेतकरी कधीही त्यांच्या शेतात कारले लागवडीचे फायदे मिळवू शकतात. पाहिल्यास, आजच्या काळात अशा प्रकारच्या नवीन जाती बाजारात आल्या आहेत, ज्यामुळे शेतकरी हिवाळा, उन्हाळा आणि पाऊस या तिन्ही हंगामात पिकवू शकतात.

     

  • पावसाळ्यात हळदीतील तण व्यवस्थापन कसे कराल ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : हळदीबरोबरच इतर सर्व पिकांच्या लागवडीवर तणांचा धोका सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांची चिंताही वाढू लागली आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर तो उष्णकटिबंधीय देश आहे. जेथे उच्च तापमान आणि आर्द्रता तण वाढण्यास प्रोत्साहित करतात. पिकाची झाडे आणि तण जमिनीतील ओलावा, पोषक तत्वे, प्रकाश आणि जागेसाठी एकमेकांशी लढतात, ज्यामुळे पिकामध्ये पोषक तत्वांचा अभाव असतो. पिकाच्या वाढीदरम्यान, तणांमधील स्पर्धा वाढते ज्यामुळे राइझोमच्या उत्पन्नावर परिणाम होतो.

    असे आढळून आले आहे की कीटक किंवा वनस्पतींच्या एकत्रित रोगांपेक्षा तणांचा पिकाला जास्त धोका असतो. याचा परिणाम म्हणून, राइझोमचे उत्पादन 10 ते 15% कमी होते. हळदीच्या झाडांची वाढ रोखून तण अनेकदा अनेक नवीन रोग आणि कीटक वाढण्यास मदत करतात. त्यामुळे हळद पिकातील तण काढून टाकणे आवश्यक आहे. विशेषत: पावसाळ्यात जेव्हा जमिनीत असलेल्या सर्व नायट्रोजनचा वापर करून तणांची वाढ होते. हे ध्येय साध्य करण्याचे अनेक मार्ग आहेत.

    हळदीतील तण व्यवस्थापनाच्या सांस्कृतिक पद्धती:

    –जमीन तयार करताना तणांची मुळे आणि खोड काढून टाका.

    –तण वाढू नये म्हणून योग्य प्रकारे कुजलेले कंपोस्ट वापरा.

    –वापरण्यापूर्वी साधने स्वच्छ करणे आवश्यक आहे.

    –वाहिन्यांपासून तण दूर ठेवा.

    –तणांची वाढ रोखण्यासाठी आणि हळदीच्या उगवणाला गती देण्यासाठी, लागवडीनंतर लगेचच पाने आणि पेंढ्यापासून बनवलेला पालापाचोळा वापरा.

    हळदीतील तण व्यवस्थापनाची रासायनिक पद्धत:

    उपचार पद्धती (स्टेम आणि लीफ उपचार) च्या आधारावर, औषधी वनस्पती प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये विभागल्या जातात. पूर्व-उद्भव (माती उपचार), आणि उदयानंतर.

    मात्र, हळदीच्या लागवडीत तणनाशकांना वाव नाही. कारण तणनाशके पाणी, हवा, माती आणि अन्न दूषित करतात आणि मानवी आरोग्यालाही धोका निर्माण करतात. हळदीचे औषधी मूल्य आणि वनौषधींमुळे उद्भवलेल्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेता, हळदीतील गैर-रासायनिक तण नियंत्रणासाठी विविध कृषी पद्धतींचे मूल्यमापन केले गेले आहे.

     

     

  • ढगाळ हवामानामुळे पिकांत कीड, रोगांचा प्रादुर्भाव; तज्ञांच्या सल्ल्याने करा पीक व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 30 व 31 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    कापूस : कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    तूर : तुर पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    भुईमूग : भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग पिकात अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत शक्य असल्यास भुईमूगाच्या पिकावरून रिकामे ड्रम फिरवावे. त्यामूळे अऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होऊन शेंगाची संख्या वाढते परिणामी उत्पादनात वाढ होते.

    मका : उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकाच्या कणसांची काढणी करून घ्यावी.

     

  • असे करा कपाशीवरील रसशोषक किडींचे व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, मागच्या काही दिवसांपासून कापूस बाजारात चांगलीच तेजी आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल हा कापूस लागवडीकडे आहे. यंदाच्या खरिपातही कापूस लागवडीला प्राधान्य दिले जाते आहे. मात्र हवामान बदलामुळे कापसावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पन्नात घट येते. आजच्या लेखात आपण कपाशीवरील रसशोषक किडींचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती घेऊया…

    १) पांढरी माशी :

    प्रौढ माशी आकाराने लहान शरीरावर पिवळसर झाक असून पंख पांढरे असतात. डोक्यावर दोन तांबडे ठिपके असतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालील बाजूला राहून रस शोषतात. अशी पाने कोमेजतात. अधिक प्रादुर्भावामध्ये पाने लालसर ठिसूळ होऊन शेवटी वाळतात. पिल्लांच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड चिकट द्रवामुळे पानावर काळी बुरशी वाढते. तसेच पांढरी माशी रोगाचा प्रसार करते. या किडीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशीवर सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतो. नोव्हेंबर महिन्यात अधिक प्रादुर्भाव दिसून येतो.

    २) मावा :

    ही कीड रंगाने पिवळसर किंवा फिकट हिरवी आणि आकाराने अंडाकृती असते. मावा व त्याची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यावर समुहाने राहून रस शोषतात. अशी पाने निस्तेज होऊन आक्रसतात, खालील बाजूला मुरगळलेली दिसतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. मावा किडीच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड चिकट द्रवामुळे पाने चिकट बनतात. कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून, पानाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण होतात.

    ३)तुडतुडे :

    प्रौढ व पिल्ले फिकट हिरवे, पाचरी प्रमाणे असतात. समोरच्या पंखावर एक काळा ठिपका असतो. तुडतुड्यांच्या पिल्लांना पंख नसतात. तुडतुड्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते तिरके चालत चटकन उडी मारतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालील बाजूला राहून रस शोषतात. त्यामुळे पाने प्रथम बाजूने पिवळसर होऊन नंतर तपकिरी होतात. अधिक प्रादुर्भावामध्ये संपूर्ण पाने लाल तांबडी, त्यांच्या कडा मुरगळलेली दिसतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते. अशा झाडांना पाते, फुले आणि बोंडे कमी प्रमाणात लागतात.

    आर्थिक नुकसान पातळी :

    – १० मावा प्रति पान,

    – ८ ते १० प्रौढ पांढरी माशी किंवा २० पिल्ले प्रति पान,

    – २ ते ३ तुडतुडे प्रति पान

    आढळून आल्यानंतर रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. त्यापूर्वी एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करत राहावा.

    कसे करावे व्यवस्थापन ?

    -वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा जमा करून नष्ट करावा.

    -खुरपणी, कोळपणी करून पीक ताणविरहित ठेवावे.

    -माती परिक्षणानुसार नत्र खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा. त्यामुळे कपाशीची अनावश्यक कायिक वाढ होणार नाही. अशा पिकावर कीड कमी प्रमाणात राहील.

    -निसर्गतः रसशोषक किडीवर उपजीविका करणारे मित्र कीटक उदा. ढालकीटक, सिरफिड माशी, क्रायसोपा, ॲनसियस असे परोपजीवी कीटक आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा. मित्र किटकांचे संवर्धन होईल.

    – पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत.

    -पीक वाढीच्या सुरुवातीपासून निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

    -किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास खालील पैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)

    फ्लोनिकॅमिड (५० टक्के डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम किंवा

    थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा

    ब्युप्रोफेजीन (२५ टक्के एससी) २ मिलि किंवा

    फिप्रोनील (५ टक्के एससी) ३ मिलि किंवा

    डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्ल्युपी) १.२ ग्रॅम किंवा

    ॲसीफेट (५० टक्के) अधिक इमिडाक्लोप्रीड (१.८ एसपी) (संयुक्त कीटकनाशक) २ ग्रॅम

    विशेषतः फूल किडीच्या व्यवस्थापनाकरिता,

    फिप्रोनिल (५ टक्के एससी) ३ मिलि किंवा स्पिनेटोरम (११.७ टक्के एससी) ०.८४ मिलि

    टीप : फवारणीसाठी शुद्ध पाणी वापरावे.

    शेतात कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा.

    फवारणीसाठीच्या मात्रा हाय व्हॉल्यूम पंपासाठीच्या आहेत.

    संपर्क – ०२४५२-२२८२३५

    (कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

  • खरीप पिकामध्ये आंतरमशागतीचे नियोजन कसे कराल?

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. सध्याच्या स्थितीत पिकांमध्ये आंतरमशागत महत्वाची आहे. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते. याचा फायदा पिकाबरोबरच जमिनीतील सूक्ष्म जिवांच्या कार्यासाठी होतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप पिकातील आंतरमशागतीचे महत्व आणि नियोजनाविषयी पुढील माहिती दिली आहे.

    पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच मातीतील ओलावा टिकवण्यासाठी कोळपणी करावी. तणांच्या प्रादुर्भावानुसार आणि पिकांच्या प्रकारानुसार साधारणतः २ ते ३ कोळपण्या नंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाचव्या-सहाव्या आठवड्यापर्यंत कोळपणी करावी.

    पेरणी झाल्यानंतर पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार विशेषतः नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो. खुरपणी किंवा कोळपणी झाल्यानंतर खत मातीत मिसळले जाईल या पद्धतीने द्यावे. मात्र खत दिल्यानंतर पिकाला पाणी द्यावे.

    पिकांच्या दोन ओळीत सेंद्रिय पदार्थांचे, उदा. गव्हाचे काड, बाजरीचे सरमाड, तुरकाठ्या, ज्वारीची धसकटे, उसाचे पाचट, पिकांचा टाकाऊ भाग इत्यादी आच्छादन म्हणून वापरावे. साधारणपणे प्रती हेक्टरी पाच टन या प्रमाणात सेंद्रिय आच्छादकाचा वापर करावा.

    आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, जमिनीचे तापमान नियंत्रित राखणे इत्यादी फायदे होतात.

    खांदणी आंतरमशागत

    खांदणी मुख्यतः ऊस, आले, बटाटा, हळद, भुईमूग इत्यादी पिकांसाठी केली जाते. उसासाठी खांदणी ही महत्त्वाची आंतरमशागत आहे, यामुळे पाणी एकसारखे बसते, शिवाय पीक लोळत नाही. उसासाठी दोन ते अडीच महिन्यांनी बाळबांधणी व ४ ते ५ महिन्याचे पीक होताच पक्की बांधणी करावी.

    आंतरमशागतीचे नियोजन

    आंतरमशागतीची कामे झाल्यावर तूर, कपाशीमध्ये दर दोन ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. या सऱ्या मुळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उपयोग होतो. तुरीच्या जोमदार वाढीसाठी १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी.अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस शेत तणविरहीत ठेवावे.

    –सोयाबीन पिकाची लागवड रुंद वरंबा सरीवर केली असल्यास रिकाम्या सरीमध्ये तण राहणार नाही याची काळजी घ्यावी.

    –हुलगा, मटकी, चवळी आणि राजमा ही पिके २० ते २५ दिवांचे असतांना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.

    –भुईमुग पिकात, १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात व दोन खुरपण्या घ्याव्यात. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरवात झाल्यानंतर आंतरमशागत करू नये.

    –सूर्यफूल पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक खुरपणी करावी, दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.

    –भाजीपाला पिकांमध्ये आवश्यकतेनुसार खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावे. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत. आवश्यकतेनुसार वर खतांच्या मात्रा द्याव्यात. वेलींना वळण देण्यासाठी ताटी उभारावी.

     

  • शेतकऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा, किडीपासून संरक्षणासह तण नियंत्रणाकडे लक्ष द्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशात खरीप हंगाम शिगेला पोहोचला आहे. ज्या अंतर्गत आजकाल बहुतांश शेतकऱ्यांनी भात लावणी पूर्ण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धानासह इतर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे, ज्यांची छोटी रोपे आता शेतात दिसत आहेत. वास्तविक हा हंगाम खरीप हंगामातील पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हे लक्षात घेऊन देशातील सर्वोच्च कृषी संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ने शेतकऱ्यांसाठी कृषी सल्लागार जारी केला आहे. ICAR ने शेतकऱ्यांना काय सल्ला दिला आहे ते जाणून घेऊया.

    भात रोपांचे कीटकांपासून संरक्षण करणे आवश्यक

    ICAR ने जारी केलेल्या सल्ल्यानुसार, यावेळी भात पीक प्रामुख्याने वनस्पतिवृद्धीच्या अवस्थेत आहे. अशा स्थितीत भाताच्या झाडांमध्ये लीफ कर्ल किंवा स्टेम बोअरर कीटक येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी, निरीक्षण करणे आवश्यक आहे. स्टेम बोअरपासून संरक्षणासाठी, शेतकरी फेरोमोन प्रपंच @ 3-4 एकर लागू करू शकतात. त्याच वेळी, ICAR ने आपल्या सल्लागारात म्हटले आहे की या हंगामात भात पिकाचा नाश करणाऱ्या ब्राऊन प्लांट हॉपरचा हल्ला सुरू होऊ शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने शेतात जाऊन झाडाच्या खालच्या भागाऐवजी डास सदृश्य किडीची पाहणी करावी.

    इतर पिकांमध्ये तण नियंत्रण

    ICAR ने जारी केलेल्या सल्ल्यामध्ये बाजरी, मका, सोयाबीन आणि भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील तणांचे नियंत्रण करण्यास सांगितले आहे. ज्या अंतर्गत ICAR ने शेतकऱ्यांना तण काढण्याचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी, ICAR ने शेतकऱ्यांना या हंगामात कुरणांवर गाजर (प्रगत वाण – पुसा वृषी) पेरण्याचा सल्ला दिला. यासाठी एकरी ४ ते ६ किलो बियाणे वापरता येते. पेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास २ ग्रॅम कॅप्टनची प्रक्रिया करावी. त्याचबरोबर शेत तयार करताना शेतात देशी खत व स्फुरद खतांचा समावेश करावा.

    भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सल्ला

    ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो, मिरची, वांगी, फ्लॉवर आणि कोबी या भाज्यांची लागवड केली आहे त्यांना फळ बोअरर, टॉप बोअरर यांसारख्या कीटकांपासून त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याच वेळी, ICAR ने फुलकोबी आणि कोबीमध्ये डायमंड बॅक मॉथचे निरीक्षण करण्यासाठी फेरोमोन सापळे फवारण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टोमॅटो, हिरवी मिरची, वांगी व फुलकोबीची लवकर रोपे तयार आहेत, त्यांनी हवामान लक्षात घेऊन त्यांची पुनर्लावणी बेडवर (शॉलो बेड) करावी.