Category: पीक लागवड

  • यंदाच्या रब्बी हंगामात करा हरभऱ्याच्या ‘या’ वाणांची लागवड; मिळेल चांगले उत्पादन

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. खरीप पिकांची कापणी अनेक भागात सुरु आहे. आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत ते रब्बी हंगामाचे…रब्बी हंगामात घेतले जाणारे मुख्य पीक म्हणजे हरभरा होय आजच्या लेखात हरभऱ्याची लागवड आणि वाण यांच्याविषयी माहिती घेऊया. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी हरभरा लागवड तंत्राविषयी पुढील माहिती दिली आहे.

    जमीन

    हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी, काळी, कसदार चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. क्षारयुक्त जमीनीवर हरभऱ्याची लागवड करु नये. खरीपाचे पीक घेतल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. हरभरा पिकाला कोरडे व थंड हवामान मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची अजिबात सोय नसेल तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २० सप्टेंबर नंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण वापरावेत.

    पेरणी

    बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. पेरणीची वेळ टाळल्यास किंवा डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पन्न फार कमी मिळते. काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी.

    सुधारित वाण कोणते वापरावे ?

    – विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विक्रांत हे वाढ मर रोग प्रतिकारक्षम असून जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहे.

    – काबुली हरभऱ्यामध्ये विराट, पिकेव्ही -२, पिकेव्ही – ४ आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. यापैकी विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत.

    – फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे. विशाल हा टपोऱ्या दाण्याचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. फुले विक्रम हा नविन वाण यांत्रिक पद्धतीने काढण्याकरिता प्रसारित केला आहे.

    सामान्यतः देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तीफणीने करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेंटीमीटर व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेऊन टोकन होईल असे ट्रॅक्टर वर चालणारे पेरणी यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केले आहे. त्याचा वापर करणे फायदेशीर आहे. या प्रकारे पेरणी केल्यास विजय व फुले विक्रम हरभऱ्याचे हेक्टरी ६५ ते ७० किलो तर विशाल, विजय, विराट किंवा पीकेव्ही २ या वाणांचे एकरी शंभर किलो बियाणे लागते. हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो. भारी जमिनीत ९० सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला १० सेंटिमीटर अंतरावर एक एक बियाणे टोकावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वाफशावर पेरणी केली असता उगवण चांगली होते.

     

  • पपई लागवडीसाठी ऑक्टोबर हा सर्वोत्तम महिना, झाडाला लवकर रोगांपासून संरक्षण दिल्यास नफा निश्चित…

    हॅलो कृषी ऑनलाईन : पपई लागवड हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार आहे. वास्तविक पपई हे नगदी पीक आहे, जे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देते. अशा स्थितीत गेल्या काही दशकांत पपई लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या संदर्भात ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ.एस.के.सिंग यांनी पपई लागवडीची सविस्तर माहिती दिली आहे.

    त्यांनी सांगितले की ऑक्टोबर हा पपई लागवडीसाठी अनुकूल काळ आहे. उदाहरणार्थ, शेतकरी यावेळी शेतात पपईचे रोप लावू शकतात. पण, यासोबतच पपईच्या रोपाचीही काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागते. पपईच्या रोपाला सुरुवातीच्या काळात रोगांपासून संरक्षण दिले नाही तर रोप खराब होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.

    झाड सुकू लागते

    ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ.एस.के.सिंग यांनी पपईची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी झाडाच्या मुळावर कुजण्याचा रोग अधिक त्रासदायक ठरतो. यासोबतच पपईच्या रिंग स्पॉटसारख्या आजारांपासून बचाव करणे खूप कठीण होऊन बसते. शेतकऱ्यांनी यावर वेळीच पावले उचलली पाहिजेत, तरच त्याच्या व्यावसायिक लागवडीतून उत्पन्न मिळू शकेल. अन्यथा, लागवडीनंतर काही दिवसांनी रोप सुकते.

    या महिन्यात लागवड केलेल्या पपईच्या रोपामध्ये विषाणूचे प्रमाण कमी असते

    ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ एसके सिंह यांच्या मते, शेतकरी या महिन्यात त्यांच्या शेतात पपईची लागवड करू शकतात. या महिन्यात लागवड केलेल्या पपईमध्ये विषाणूजन्य रोग कमी होतात. पपईच्या रिंग स्पॉट रोगाचा प्रादुर्भाव पपईला फुलोरा येण्यापूर्वीच झाला तर त्याला फळे येत नाहीत. या आजारावर नियंत्रण मिळवता येते. त्यांनी सांगितले की, हा आजार शक्यतोवर थांबणे आवश्यक आहे.

    पपईच्या रिंग स्पॉट व्हायरसपासून बचाव करणे महत्वाचे

    अखिल भारतीय फळ प्रकल्प (ICAR-AICRP on Fruits) आणि डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, पुसा (RPCAU Pusa) यांनी पपईच्या झाडाला रोगापासून संरक्षण देण्यासाठी एक तंत्र विकसित केले आहे. त्यांच्या मते, उभ्या पपई पिकातील विविध विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात.

    पपईचे रिंग स्पॉट विषाणू रोगापासून पपईचे संरक्षण करण्यासाठी ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ. एस.के. सिंग यांच्या मते, 2% निंबोळी तेल 0.5 मिली प्रति लिटर स्टिकरमध्ये मिसळून आठव्या महिन्यापर्यंत एक महिन्याच्या अंतराने फवारणी करणे आवश्यक आहे. उच्च प्रतीची फळे आणि पपईच्या झाडांमध्ये रोग-विरोधी गुणधर्म निर्माण करण्यासाठी युरिया @ 04 ग्रॅम, झिंक सल्फेट 04 ग्रॅम आणि विद्राव्य बोरॉन 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात विरघळवून पहिल्यापासून एक महिन्याच्या अंतराने फवारणी करणे आवश्यक आहे. महिना ते आठवा महिना. फवारणी करणे आवश्यक आहे.

    यावेळी फवारणी करावी

    ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ.एस.के.सिंग यांच्या मते या रसायनांची वेगवेगळ्या वेळी फवारणी करावी. झिंक सल्फेट आणि बोरॉन एकत्र मिसळल्याने द्रावण घट्ट होते. त्यामुळे फवारणी करणे कठीण होते. पपईचा सर्वात घातक रोग, मुळांच्या कुजण्याच्या व्यवस्थापनासाठी, हेक्साकोनाझोल @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात विरघळवून एक महिन्याच्या अंतराने माती पूर्णपणे भिजवणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, पहिल्या महिन्यापासून आठव्या महिन्यापर्यंत हे काम वरील द्रावणाने माती भिजवून करावे. सुरुवातीला, ओले होण्यासाठी प्रति झाड फारच कमी औषध द्रावण आवश्यक आहे. परंतु, वनस्पती जसजशी वाढते तसतसे द्रावणाचे प्रमाणही वाढते. सातव्या ते आठव्या महिन्यापर्यंत, एक मोठी रोपे भिजवण्यासाठी 5-6 लिटर औषध द्रावण आवश्यक आहे.

     

     

     

     

     

  • रब्बी ज्वारीची लागवड करताय ? जाणून घ्या कोणते वापराल वाण ? कशी कराल पेरणी ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरिपातील पिके आता काढणीला आली आहेत. आता लावकारच शेतकरी रब्बी पिकांच्या लागवडीकडे लक्ष घालायला सुरुवात करतील. आजच्या लेखात आपण जाणून घेउया रब्बी ज्वारी चे वाण आणि पेरणीबाबत माहिती…

    रब्बी ज्वारी:

    १) हलक्या जमिनीत (खोली ३० सें.मी पर्यंत) फुले यशोमती, फुले अनुराधा, फुले माऊली या जातींची निवड करावी.

    २) मध्यम जमिनीत (खोली ६० सेंमी.पर्यंत) फुले सुचित्रा, फुले चित्रा, फुले माउली, परभणी मोती, मालदांडी ३५-१ या जातींची निवड करावी.

    ३) भारी जमिनीत (खोली ६० सेंमी.पेक्षा जास्त) फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही-२२, पीकेव्ही-क्रांती, परभणी मोती आणि संकरित जाती ः-सीएसएच १५, सीएसएच १९, या जातींचा वापर करावा.
    ४) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधकाची (३०० मेष) प्रक्रिया करावी. त्यामुळे काणी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि २५० ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.

    ५) पेरणी १५ सप्टेंबरच्या अगोदर किंवा १५ ऑक्टोबरनंतर केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून ज्वारीची पेरणी योग्य वेळी करावी.

    ६) पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरावी. एकाच वेळी खत व बियाणे पेरावे. कोरडवाहू क्षेत्रात ४५ × १५ – २० सेंमी अंतरावर पेरणी करावी. हेक्टरी १० ते १२ बियाणे पेरणीसाठी पुरेसे होते.

    ७) कोरडवाहू क्षेत्रातील हलक्या जमिनीत पेरणी करते वेळी हेक्टरी एक गोणी युरिया द्यावा. मध्यम खोल जमिनीमध्ये दीड ते दोन गोणी युरिया आणि अडीच गोणी स्फुरद द्यावे. भारी जमिनीस अडीच गोण्या युरिया आणि साडेतीन गोण्या स्फुरद द्यावे. कोरडवाहू जमिनीमध्ये संपूर्ण नत्र आणि स्फुरद दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.

    ८) बागायती क्षेत्रातील मध्यम खोल जमिनीमध्ये तीन गोण्या युरिया, पाच गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट व एक ते सव्वा गोणी म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. नत्र दोन हप्त्यांत, पेरणीच्या वेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.

    कोळपणी महत्त्वाची…

    १) रब्बी हंगामातील पिकांमध्ये कोळपणीचा महत्त्वाची आहे. एक कोळपणी केली म्हणजे पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. कोरडवाहू रब्बी ज्वारीमध्ये तीन वेळेस कोळपणी करावी.

    २) पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाले असता फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे वाढणारे तण नष्ट करून त्यावाटे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.

    ३) दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासेच्या कोळप्याने करावी. त्या वेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडू लागलेल्या असतात, त्या कोळपणीमुळे बंद होतात. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंद होते.

    ४) तिसरी कोळपणी पीक आठ आठवड्यांचे झाले असता दातेरी कोळप्याने करावी. दातेरी कोळपे मातीत व्यवस्थित घुसून माती ढिली करते आणि त्यामुळे भेगा बुजविल्या जातात. त्या वेळी जमिनीत ओल फार कमी असेल त्या वेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते.

  • जाणून घेऊया; बुरशीनाशके आणि त्यांची बाजारातील नावे

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    शेतामध्ये पिकांवर फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणारी विविध प्रकारची बुरशीनाशके आपण कृषी केंद्रावरून विकत घेत असतो परंतु आपल्याला बुरशीनाशकात हवे असणारे समाविष्ठ घटक आणि बाजारात विक्री होणारे ट्रेड नाव यात फरक असतो त्यामुळे तुम्हाला हवे असणाऱ्या घटकाचे बुरशीनाशक बाजारात कोणत्या नावाने मिळते याची माहीती खास तुमच्यासाठी

    कार्बेडेंझीम ५० टक्के – बाविस्टिन,धानुस्टिन
    मॅन्कोझेब ७५ टक्के – डायथेन एम-४५,युथेन एम-४५, मॅकोबन एम-४५
    कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के – ब्लू कॉपर,ब्लिटॉक्स,धानूकॉप

    एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – ॲमिस्टार टॉप, गोडीवा सुपर,
    प्रोपीकोनॅझोल २५ टक्के – टिल्ट, विजेता, प्रोपार, बंपर
    क्लोरथॅलोनील ७५ टक्के – कवच, जटायू, इशान, सिनेट

  • जाणून घ्या, हळदीवरील करपा, कंदकुज आणि कंद माशीचे व्यवस्थापन…!

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्यपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या हळदीवर करपा, पानावरील ठिपके आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तरी येणाऱ्या काळात या बुरशीजन्य रोगांचा, कंदकुज तसेच कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच कंदमाशीचे खालील प्रमाणे व्यवस्थापन वेळीच करणे अत्यंत गरजेचे आहे.

    हळदीमधील पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापन

    १. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी.

    २. रासायनिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

    प्रादुर्भाव कमी असल्यास
    कार्बेडेंझीम ५० टक्के – ४०० ग्रॅम किंवा
    मॅन्कोझेब ७५ टक्के -५०० ग्रॅम किंवा
    कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के – ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

    प्रादुर्भाव जास्त असल्यास
    एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – २०० मिली किंवा
    प्रोपीकोनॅझोल २५ टक्के – २०० मिली किंवा
    क्लोरथॅलोनील ७५ टक्के – ५०० ग्रॅम
    यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

    हळदीमधील कंदकुज व्यवस्थापन

    १. कंदकुज करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.

    २. जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.

    ३.कंदकूज झाली असल्यास जमिनीतून
    कार्बेडेंझीम ५०% -१ ग्रॅम किंवा
    मॅन्कोझेब ७५ टक्के -३ ग्रॅम किंवा
    कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के -५ ग्रॅम
    यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी.
    (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.)

    हळदी वरील कंदमाशी व्यवस्थापन:

    १. प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने
    क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा
    डायमिथोएट (३०% प्रवाही ) १५ मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.

    २. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.

    ३. पीक तण विरहित ठेवावे.

    ४. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी.

    ५. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.

    ६. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

    (संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)

    टीप : हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.

    डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

    अधिक माहितीसाठी संपर्क करा
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
    परभणी
    ☎ ०२४५२-२२९०००

  • वावरतील सोयाबीन कापूस, पिकांची काय घ्यावी काळजी ? रब्बी मका, ज्वारीसाठी कुठले वाण वापराल ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    १) कापूस

    पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझीन 25% 400 मिली किंवा डायफेन्थुरॉन 50% 240 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    २)सोयाबीन :

    काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची स्वच्छ हवामानात काढणी करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी किंवा ढिग करून झाकून ठेवावे.

    ३)तूर :

    तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. शक्य असेल तेथे तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

    मका वाण :

    रब्बी हंगामात मका पिकाच्या पेरणीसाठी धवन, शक्ती-1, करवीर, डेक्क्न-105 इत्यादी वाणांपैकी एका वाणाची निवड करावी.

    रब्बी ज्वारी:

    पेरणीसाठी परभणी सुपर मोती (एसपीव्ही-2407), परभणी मोती (एसपीव्ही-1411), परभणी ज्योती (एसपीव्ही-1595/सीएसव्ही-18), पीकेव्ही क्रांती, फुले यशोदा, सीएसव्ही-22 आर, सीएसव्ही-29आर (एसपीव्ही-2033), मालदांडी (एम35-1), फुल रेवती (एसपीव्ही-2048), फुले सुचित्रा इत्यादी वाणांपैकी निवड करावी.

    रब्बी सुर्यफुल :

    पेरणीसाठी लातूर सुर्यफुल-8, फुले भास्कर, मॉर्डन, लातूर संकरित सुर्यफुल-171, लातूर संकरित सुर्यफुल-35 इत्यादी वाणापैकी वाणाची निवड करावी.

  • सद्यस्थितीतील कापूस पिकातील रोग आणि किडींचे कसे कराल व्यवस्थापन ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या हवामानामुळे कापूस पिकावर रोग आणि किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यावर काय उपाय करायचे याबाबतची माहिती आपण आजच्या लेखात घेऊया. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीकडून प्रसारित करण्यात आली आहे.

    १) कापूस पिकातील दहिया :

    कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    २) रसशोषण करणारी कीड :

    कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझीन 25% 400 मिली किंवा डायफेन्थुरॉन 50% 240 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    ३) गुलाबी बोंडअळी :

    कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

  • ICAR ने विकसित केली लिंबूची एक सुधारित जात; जाणून घ्या वैशिष्ट्ये

    हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दशकांत पारंपारिक पिकांबरोबरच फळबागांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. फळबागांना चांगला भाव मिळणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. खरे तर फळबाग पिकांचा विचार देशात नगदी पिकांच्या श्रेणीत केला जातो. त्यामुळे बागायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अनेक शेतकरी लिंबाची लागवड करून नफा कमवत आहेत. त्यामुळे त्याचवेळी कृषी शास्त्रज्ञही लिंबाच्या नवीन जाती विकसित करण्यात गुंतले आहेत. या क्रमाने, भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) केंद्र फलोत्पादन प्रयोग केंद्र वेजलपूर गोध्रा गुजरातने लिंबू थार वैभव ही नवीन जात विकसित केली आहे. ज्यामध्ये अनेक गुण आहेत. थार वैभव या लिंबाच्या नवीन जातीची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्याची रोपे कधी लावता येतील हे जाणून घेऊया.

    लागवडीनंतर ३ वर्षापासून फळे येण्यास सुरुवात होते

    लिंबाची थार वैभव ही ऍसिड जात आहे. ज्याची फळे लागवडीनंतर ३ वर्षांनी मिळू शकतात. विशेष म्हणजे या प्रकारच्या वनस्पती कमी घनतेतच चांगले उत्पादन देतात. त्याची फळे आकर्षक पिवळ्या रंगाची गुळगुळीत साल आणि गोलाकार असतात. त्याच वेळी, रस (49%), आंबटपणा (6.84%) फळांमध्ये आहे. त्यामुळे एका फळात फक्त 6 ते 8 बिया असतात. शास्त्रज्ञांच्या मते, थार वैभव जातीच्या वनस्पतीमध्ये सरासरी 60 किलो फळे देण्याची क्षमता असते.

    शास्त्रज्ञांच्या मते, उन्हाळ्यात त्याची फळे तयार होतात. झाडांच्या गुच्छावर सरासरी 3-9 फळे येतात. खरं तर, अशा प्रकारच्या जातींना देशातील ऍसिड लाईम उत्पादकांकडून खूप मागणी आहे, म्हणून उत्पादकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते सोडण्यात आले.

    लिंबू लागवड फायदेशीर

    पारंपारिक पिकांच्या तुलनेत बागायती पिकांची लागवड गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. ज्यामध्ये लिंबाची लागवड शेतकऱ्यांसाठी एक चांगला सौदा मानली जाते. किंबहुना वाढत्या शहरीकरणात व्हिटॅमिन सीची गरज भागवण्यासाठी लोकांमध्ये लिंबाची मागणी वाढली आहे. यामुळे, तो सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचा एक आवश्यक भाग बनला आहे. त्याचबरोबर इतर बागायती पिकांच्या तुलनेत लिंबाचा भाव नेहमीच जास्त असतो. तर, इतर बागायती पिकांच्या तुलनेत लिंबू लागवडीसाठी नियमित मेहनत घ्यावी लागत नाही.

     

     

     

     

     

  • जाणून घ्या, तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन कसे करायचे ?




    जाणून घ्या, तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन कसे करायचे ? | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्या तुरीला चांगला भाव मिळत आहे. खरीप हंगामातील तूर अद्यापही शेतात आहे. मात्र कधी पाऊस, कधी ऊन, अशा बदलत्या वातावरणामुळे तूर पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. आजच्या लेखात आपण तुरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती घेऊया…

    लक्षणे

    खोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर फायटोप्धोरा रोग आहे.

    उपाय

    त्यासाठी २५ ग्रॅम मेटालॅक्झील एम ४ टक्के+ मॅन्कोझेब ६४ टक्के (रिडोमील गोल्ड)(संयुक्त बुरशीनाशक) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी. किंवा ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी व आळवणी करावी.

    error: Content is protected !!





  • रब्बीसाठी या पद्धतीने तयार करा रोपवाटिका, 21 दिवसांत रोपे होतील तयार

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेती हे अनिश्चिततेचे काम आहे, जिथे पावसाचा फटका तर कधी कीड-रोगाचा नेहमीच धोका असतो. देशभरात माती आणि हवामानानुसार शेती केली जात असली तरी सध्याच्या काळात हवामान बदलामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

    कृषी तज्ज्ञांच्या मते हवामानामुळे होणारे नुकसान थांबवता येत नसले तरी कीटक रोगांमुळे होणारे नुकसान टाळता येते. विशेषत: जेव्हा बागायतीचा विचार केला जातो तेव्हा थेट पेरणीऐवजी रोपवाटिका म्हणजेच रोपवाटिका तयार करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून बिया व्यवस्थित अंकुरित होतील आणि झाडांचा पूर्ण विकास होईल.

    बागायती पिकांसाठी रोपवाटिका तयार करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. त्यासाठी शेताच्या कोणत्याही कोपऱ्यात खते आणि सुधारित बियाणे टाकून बेड तयार करू शकता. जेथे 21 दिवसांत रोपे लावण्यासाठी तयार होतात.

    अशा पद्धतीने करा रोपवाटिका

    पिकांची रोपवाटिका तयार करण्यासाठी एक बेड तयार करावा लागतो. उदाहरणार्थ, जर एक एकर जमिनीवर पीक लावायचे असेल, तर 33 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 2 फूट उंच अशा 10 ते 15 बेड्स तयार कराव्या लागतील. या पलंगांना मजबुती देण्यासाठी चारही बाजूंनी खांब लावावेत, त्यावर प्लॅस्टिकचे पत्रे किंवा हिरवी जाळी टाकून झाडांना मुसळधार पाऊस किंवा तुषारपासून वाचवता येते.

    कोणत्याही पिकासाठी चांगले पोषण हे फार महत्वाचे असते. तसेच  पिकांपासून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी चांगले खत-खत द्यावे लागते, त्यासाठी विविध उपायांचा अवलंब करावा लागतो.उदाहरणार्थ, 100 चौरस फुटांची रोपवाटिका तयार करायची असेल, तर माती, कंपोस्ट खत, नदीची वाळू, खडी, शेळी खत, सुमारे 25 किलो शेणखत, लाल माती, भाताचा पेंढा, राख यांचा 4 टोपल्यांमध्ये वापर केला जातो. भाताचा पेंढा सोडला तर या सर्व गोष्टी बारीक चाळतात आणि या सर्व गोष्टी मिसळून रोपवाटिकेत बेड तयार करण्यासाठी वापरतात. हे मिश्रण वापरल्यानंतर, रोपांची उगवण करणे खूप सोपे आहे.

    बियाणे कसे पेरायचे

    नर्सरीमध्ये बेड तयार केल्यानंतर, बियाणे प्रक्रिया करून ओळीत पेरले जाते, ज्यामुळे झाडे वाढणे सोपे होते. बियाणे पेरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की वरून बियाणे शिंपडू नका, तर लहान खड्ड्यात पेरणी करा. बियाणे पेरल्यानंतर हलके पाणी द्यावे व वाफ्यावर काळ्या प्लास्टिकच्या पत्र्याने किंवा गवताने झाकून ठेवावे. असे केल्याने रोपाची उगवण सहज होते.

    ३० दिवसांनी शेतात लागवड करावी

    भाजीपाला रोपवाटिकेत रोप 21 दिवसात तयार होते आणि ते शेतात लावण्यासाठी योग्य वेळ 30 दिवसांची असते. लक्षात ठेवा की लावणी करण्यापूर्वी, शेत चांगले तयार करा, जेणेकरून रोपाला कोणतीही हानी होणार नाही.