Category: फलोत्पादन

  • हे एक सफरचंद 1600 रुपयांना मिळतं, नाव आहे ‘ब्लॅक डायमंड’…! जाणून घ्या याच्या शेतीबद्दल

    हॅलो कृषी ऑनलाईन : साधारणपणे लोकांना माहित आहे की सफरचंद फक्त लाल आणि हिरव्या रंगाचे असतात. काहींना लाल काश्मिरी सफरचंद खायला आवडते तर काहींना हिरवे हिमाचली सफरचंद. पण सफरचंदाचा रंगही काळा असतो हे फार कमी लोकांना माहीत असेल. विशेष बाब म्हणजे गडद जांभळ्या रंगाचे हे सफरचंद ब्लॅक डायमंड ऍपल म्हणून ओळखले जाते. या दुर्मिळ सफरचंदाची लागवड फक्त तिबेटच्या टेकड्यांवर केली जाते. विशेष म्हणजे तिबेटमधील या सफरचंदाचे नाव ‘हुआ नियू’ आहे. हे तिबेटमधील सर्वात महत्त्वाचे फळ आहे. त्याची मागणी जगभर आहे.

    हे सफरचंद दिसायला खूपच आकर्षक वाटत असले तरी त्याची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करेल. प्रत्येक सफरचंदाची किंमत $7 आणि $20 दरम्यान असू शकते.हे सफरचंदही महाग आहे कारण त्याची लागवड समुद्रसपाटीपासून 3100 मीटर उंचीवर केली जाते. सफरचंद उत्पादकांसाठी ब्लॅक डायमंड सफरचंद एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाही.

    एका अहवालानुसार, दिवसभर सूर्यप्रकाश आणि रात्री थंड तापमानामुळे ब्लॅक डायमंड सफरचंदांना त्यांचा रंग आणि चव मिळते. ब्लॅक डायमंड ऍपलचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या झाडांना पहिली पाच ते आठ वर्षे फळेही येत नाहीत.

    काळ्या सफरचंदाचे ताजे फळ पाहून त्यावर मेण लावल्यासारखे वाटते. त्याचा पोत बघायला अतिशय आकर्षक वाटतो. असे नाही की या प्रकारची सफरचंद दीर्घकाळापासून केली जात आहे. काळ्या सफरचंदाची लागवड 2015 पासून सुरू झाली. यापैकी बहुतेक सफरचंद बीजिंग, शांघाय, ग्वांगझो आणि शेन्झेनमधील सुपरमार्केटमध्ये खाल्ले जातात.

    ब्लॅक डायमंड सफरचंद सामान्य सफरचंदांपेक्षा गोड आणि कुरकुरीत असतात. परंतु जर आपण त्याच्या फायद्यांबद्दल बोललो तर ते लाल सफरचंदांसारखे फायदेशीर नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका काळ्या सफरचंदाची किंमत 500 ते 1600 रुपयांपर्यंत असते.

     

     

  • आंबिया बहरातील फळ पीकविम्याचा लाभ घ्या ; पहा कोणत्या पिकासाठी किती रक्कम ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे

    पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (२०२२-२३) आंबिया बहरामध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्रा, व पपई या फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

    पिके आणि विमा हप्त्याची रक्कम पुढीलप्रमाणे

    आंबा

    दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरूर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापूर व सासवड या तालुक्यांतील आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम १५ हजार ४०० रुपये इतकी आहे.

    डाळिंब

    दौंड, आंबेगाव बारामती, जुन्नर, इंदापूर, सासवड, शिरूर, हवेली व खेड या तालुक्यांतील डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जानेवारी २०२३ असून, विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम ९ हजार ७५० रुपये इतकी आहे.

    द्राक्ष

    दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर व शिरूर या तालुक्यांतील द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम १६ हजार रुपये इतकी आहे.

    केळी

    दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, खेड, हवेली व शिरूर या तालुक्यांतील केळी फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम ७ हजार रुपये इतकी आहे.

    मोसंबी

    इंदापूर तालुक्यातील मोसंबी फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून, विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम ४ हजार रुपये इतकी आहे.

    संत्रा

    शिरूर तालुक्यातील संत्रा फळपिकासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ४ हजार रुपये इतकी आहे.

    पपई

    आंबेगाव, जुन्नर व इंदापूर तालुक्यांतील पपई फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम १ हजार ७५० रुपये इतकी आहे.

    अधिक माहितीसाठी संपर्क

    शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आंबिया बहरातील फळपिकांची विमा नोंदणीसाठी राष्ट्रीय पीकविमा पोर्टल https://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अधिक माहितीसाठी भारतीय विमा कंपनीचे १८०० ४१९ ५००४ दूरध्वनी क्रमांक ०२२-६१७१०९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.

  • फुलगळ आणि फळगळ का होते ? जाणून घ्या कारणे

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, बदलते हवामान आणि नवनवीन कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे फुलगळ आणि फळगळीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आजच्या लेखात आपण फळगळ आणि फुलगळ याची कारणे जाणून घेऊया …

    फुलगळ का होते ?

    १ ज्यास्त नत्र युक्त खते त्यामुळे फुलगळ होते excess नायट्रेट मुळे

    2 जिब्रेलीन वाढले की फुलगळ होते मग ते पाऊस झाला तरी जिब्रेलीन वाढते किंवा स्प्रे मधून गेला तरी

    3 सतत पाऊस चालला त्यामुळे ही फुलगळ होते

    4 काही वेळा बुरशी मुळे ही फुलगळ कळी कुज होते

    5 हार्मोन्स imbalance मुळे ही फुल गळ होते तेव्हा आम्ही ड्रीप किंवा स्प्रे मधून NAA देतो

    6 खूप थंडी म्हणजे 10 अंश सेल्सियस तापमान झाले की फुलगळ होते

    7 आणि 38 अंश सेल्सियस च्या वर तापमान गेले तरी फुलगळ होते 15 ते 35 हा बॅलन्स पाहिजे तापमान

    9 नत्र युक्त खते स्प्रे मधून गेली की फुल गळ होते

    10 झिंक ,बोरॉन ,कॅल्शियम च्या कमतरतेमुळे देखील फुलगळ होते

    11 लवकर म्हणजे सेटिंग च्या काळात किंवा फुल लागली तेव्हा पोटॅश दिले किंवा सल्फर दिले तरी फुल गळ होते

    12 झाडाला पाण्याचा ताण दिला तरी फुलगळ होते

    13 किंवा अधिक पाणी दिले तरी फुलगळ होते

    14 झाडावर भुरी ,डाऊनी ,करपा चा अटॅक झाला तरी फुलगळ होते

    15 झाडाला 16 अन्नद्रव्य ही स्टेज नुसार वेगवेगळी दयावी लागतात ती मागे पूढे झाली तरी फुलगळ होते

    16 जर काही प्रमाणात तणनाशक फवारले गेले असेन तरी फळ आणि फुल गळते ,

    17 चुकीचे संजीवक फवारणी झाली किंवा प्रमाण चुकले तरी फुलगळ होते

    18 प्रखर सूर्यप्रकाश या मुळे देखील फुल गळ होते

    19 सकाळी दव ,धुके पडले तरी फुलगळ होते

    20 Self Pollination नसलेल्या पिकाच्या च्या व्हरायटी जर नेट मध्ये लावल्या तरी एकही फुल सेटिंग होत नाही

    21 सेंथेटिक पायरेथ्रईड गटातिल कीटकनाशके च्या फवारणी मुळे जसे कराटे ,सायपरमेथ्रीन 25% यांच्या फवारणी मुळे देखील फुलगळ होते

    फुलगळ फळगळीची महत्वाची कारणे

    १) कमकुवत परागीभवन

    २) अपुरा किंवा गरजेपेक्षा जास्त प्रकाश

    ३) जमिनीचा कमी सुपीकता

    ४) बुरशी किंवा किडींचा प्रादुर्भाव त्यामुळे झाडावर झालेला परिणाम

    ५) अनेक झाडांमध्ये फुलकळी निघाल्यानंतर ५० तासांच्या आत परागीभवन न झाल्यास फुलगळ होऊ शकते.

    ६) जमिनीत व परिणामी झाडात नायट्रोजनचे प्रमाण जास्त झाल्यास

    ७) झाडाला पाणी कमी पडल्यास किंवा जास्त झाल्यास

    ८) हवेचा वेग खूप जास्त असल्यास

    ९) झाड हाताळताना झाडाला काही इजा झाल्यास

    १०) हवेतील आर्द्रता ४०% पेक्षा कमी अथवा ७०% पेक्षा जास्त झाल्यास

    ११) फुलकळी निघण्याच्या वेळी झाडाला सूट न होणारे रासायनिक औषध फवारल्यास

    १२) झाडाला फॉस्फरस कमी पडल्यास

    १३) दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात खूप तफावत असल्यास

  • संत्रापट्टयात पुन्हा फळगळीचा फटका | Hello Krushi

    हॅलो कृषी ऑनलाईन : संततधार पावसाच्या परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रापट्टयात पुन्हा फळगळीने थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजनांची शिफारस संशोधन संस्थांकडून होत नसल्याने शेतकऱ्यांना हे नुकसान बघण्याशिवाय कोणताच पर्याय संत्रा उत्पादकांसमोर उरला नसल्याचेही वास्तव आहे.

    बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

    जूनपर्यंत तापमान कायम ४० ते ४३ अंशापर्यंत होते. तापमानातील वाढीचा फटका बसत हंगामाच्या सुरुवातीलाच लहान फळांची गळ झाली. एकूण पाच लाख टन उत्पादनांपैकी सुमारे दोन लाख टन लहान आकाराची फळे गळून पडली, असा दावा ‘महाऑरेंज’ने केला होता. यामुळे सरासरी ५०० कोटींचे नुकसान झाले. यातून कसेबसे सावरत बागेतील शिल्लक फळांच्या व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. मात्र जुलै महिन्यात पावसाची संततधार झाली. तर काही भागात अतिवृष्टी नोंदविण्यात आली. तब्बल २१ दिवस सूर्याचे दर्शनच झाले नाही. परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे पुन्हा फळगळ होऊन सुमारे १ लाख २५ हजार टन फळांची गळ झाल्याचा अंदाज ‘महाऑरेंज’चे तांत्रिक सल्लागार सुधीर जगताप यांनी व्यक्‍त केला आहे.

    आंबिया बहराचे व्यवस्थापन

    डिसेंबर महिन्यात बाग ताणावर सोडून डिसेंबर अखेरीस पाणी दिले जाते. परंतु हा बहार पाण्याऐवजी थंडीमुळे जास्त फुटतो. डिसेंबर-जानेवारीत फूलधारणा होते. या हंगामातील फळे नोव्हेंबर महिन्यात तोडणीसाठी येतात.

    कोलेटोट्रिकम, डिप्लोडिया, बॉट्रायटीस, अल्टरनेरिया या चार प्रकारच्या बुरशींचा प्रादुर्भाव फळगळीला कारणीभूत ठरतो. फळमाशीचाही (फ्रूटफ्लाय) काही भागात फटका बसला असल्याचे सुधीर जगताप यांनी सांगितले.