Category: बातम्या

  • केंद्र शासनांच्या प्रमुख योजनांचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात केंद्र शासनाच्या विविध प्रमुख योजनांचा आढावा घेतला. केंद्र शासनाच्या लोक कल्याणकारी योजनाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना देवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही बैठकीत दिले.

    या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    देसाई म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण चे उद्दिष्ट शासनाकडून प्राप्त झाले आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करा. ज्या लाभार्थ्यांकडे घर बांधण्यासाठी जागा नाही अशांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नगर पालिकांचे मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी यांना उद्दिष्ट द्या व वेळावेळी या योजनेचा आढावा घ्यावा.

    जल जीवन मिशन अंर्तत ग्रामीण पाणी पुरवठ्याची मंजूर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करावा. आयुष्मान भारत योजनेंर्गत ई-कार्ड दिले जाते. शासनाने ठरवून दिलेल्या शस्त्रक्रिया या योजनेंतर्गत मोफत करण्यात येते. याचा गरजु लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शिबीरांचे आयोजन करुन ई-कार्डचे वाटप करावे. यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांची बैठक आयोजित करावी. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ई-केवायसी करुन घ्यावे.

    बेठकीत श्री. देसाई यांनी किसान क्रेडीट कार्ड, अटल पेन्शन योजना, स्वनिधी, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, स्वामित्व कार्ड, भारत नेट व स्वामित्व योजना ड्रोनद्वारे गावांचे सर्व्हेक्षण या योजनांचा आढावा घेवून योजना विषयीचे जे प्रश्न जिल्हास्तरावर आहे ते तात्काळ सोडविले जातील. ज्या कामांना मंत्रालयस्तरावर मंजूरी पाहिजे असेल तर अशा कामांचे प्रस्तावही द्यावेत त्यालाही मंजूरी आणली जाईल, असेही त्यांनी बैठकीत सांगितले

  • काढणीपश्चात नुकसान विमाभरपाई लाभासाठी दावे दाखल करण्याचे आवाहन

    हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली

    पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणीपश्चात नुकसान या जोखिमेचा लाभ मिळावा यासाठी पीकविमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विमा दावे (पूर्वसूचना-इंटीमेशन) दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

    हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीपातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडिद,ज्वारी या पिकांना विमा संरक्षण आहे. चालू खरीप-२०२२ हंगामात अतिवृष्टी, पूर इत्यादी कारणामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे.

    सद्यस्थितीत सोयाबीन पीक कापणीसाठी तयार असून काही ठिकाणी कापणी झालेले सोयाबीन शेतातच पडून आहे. सध्या चालू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अथवा काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या लाभासाठी इंटिंमेशन (माहिती) दाखल करणे ही अट अनिवार्य आहे. पावसाने नुकसान झालेल्या सर्व पीकविमाधारक शेतकऱ्यांनी दावे (इंटिमेशन) तत्काळ दाखल करावेत, असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.

    अधिक माहीतीसाठी या नंबरवर संपर्क 

    शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यात पीएमएफबीआय पोर्टल, कंपनीचा टोल फ्री क्र. १८००१०३७७१२, कंपनीचा ई-मेल आयडी : [email protected] , केंद्र शासनाचे क्रॉप इन्शूरन्स ॲप व ऑफलाईन पद्धतीद्वारे इंटिमेशन (माहिती) देता येते. इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

  • कुरघोड्या बंद करा, न्याय देता का नाही ? कधी भेटू ? जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर




    कुरघोड्या बंद करा, न्याय देता का नाही ? कधी भेटू ? जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. आधी जुलै मध्ये झालेली अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे शेतकरी कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी शासनाच्या मदतीकडे शेतकरी डोळे लाऊन बसला असताना सत्ताधारी मात्र राजकारणात व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पहिला जातोय का ? असा सवाल निर्मण होता असून सध्याच्या परिस्थितीमुळे व्यथित झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क पोस्टर लावून सरकार विरोधात रोष व्यक्त केला आहे. हे अनोखे पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

    संकटांनी घेरलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ग्राम अंचळ येथील दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखडे यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आपली व्यथा मांडणारं पोस्टर लावलं आहे. “आमची सहनशिलता संपली आहे. उखाळ्या, पाखाळ्या, कुरघोड्या बंद करा, शेतकऱ्यांना भिक नको, कुत्रे आवरा, रक्षकच झाले भक्षक, वाशिम जिल्ह्यातील भ्रष्टाचारी प्रशासनाचा नंगानाच बंद करा” अशी वाक्ये लिहून पोस्टर च्या माध्यमातून राज्यकर्ते आणी प्रशासनाला जागं करण्यासाठी लक्षवेधी पोस्टर आंदोलन केलं आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो देखील लावले आहेत.

    दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखडे हे आपली शेतजमिन मिळवण्यासाठी गेल्या बारा वर्षापासून लोकशाही व्यवस्थेनुसार प्रशासनाशी लढत आहेत. आपल्याकडं प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, आपल्याला न्याय मिळावा या हेतूने वानखडे यांनी पोस्टरच्या माध्यमातून अनोख्या पध्दतीचं आंदोलन केलं आहे. शिवाय दिवाळी सण तोंडावर आला असताना देखील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकराची मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रशांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पोस्टर लावल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी विनंती त्यांनी केली. शेतकऱ्याची दखल कोणाही घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

     

    error: Content is protected !!





  • विद्युत तारेचा स्पर्शाने बैल जोडीचा मृत्यू; शेतकऱ्यावर मोठे संकट




    विद्युत तारेचा स्पर्शाने बैल जोडीचा मृत्यू; शेतकऱ्यावर मोठे संकट | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी

    परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातुन एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. शेतात चरण्यासाठी गेलेल्या बैलजोडीला विजप्रवाहीत तारांचा स्पर्श झाल्याने बैलजोडीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली असुन या घटनेने खेडूळा ता . पाथरी जि.परभणी येथील शेतकर्‍यावर मोठे संकट कोसळले आहे .

    पाथरी तालुक्यातील खेडूळा गावचे रहिवाशी असणारे शेतकरी महादेव सोपानराव वऱ्हाडे यांची शेती सारोळा खुर्द शिवारात गट क्र . ४४ मध्ये आहे . शुक्रवारी त्यांच्या मालकीचे बैल शेतामध्ये चरत असता आचानक पाऊस व जोरात वारा सुटल्यामुळे विजेची तार तुटुन बैलाच्या अंगावर पडुन विद्यतु प्रवाहीत तारेचा स्पर्श झाल्याने दोन्ही बैलाचा जागीच मुत्यु झाला आहे .

    यात या शेतकऱ्याचे दिड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून ऐन रब्बी पेरणीच्या तोंडावर बैलजोडी दगावल्याने मोठे संकट कोसळले आहे . याप्रकरणी शेतकर्‍याने महसुल प्रशासनाला पंचनामा करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

    error: Content is protected !!





  • सांगलीत पिकतोय महागडा काळा तांदूळ ; आसाममधून बियाणे मागवून जिल्ह्यात केला पहिलाच प्रयोग…

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सांगली

    सांगलीच्या शिराळा तालुक्यातील पुनवत: सागाव येथील प्रगतिशील शेतकरी शशिकांत रंगराव पाटील यांनी शेतात ‘ब्लॅक राईस’ जातीच्या भाताचे पीक घेतले आहे. या भाताचे बियाणे त्यांनी आसाममधून मागविले आहे. एक वेगळा प्रयोग करत काळा भात पीक घेण्याचा हा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. मात्र परिसरात या भात पिकाचा विषय चांगलाच रंगत आहे..

    शिराळा तालुक्यात खास करून भात शेती केली जाते. शशिकांत पाटील सात एकर शेतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. यावर्षीच्या खरीप हंगामात पारंपरिक भात बियाणांपेक्षा नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी मित्रांच्या साहाय्याने आसाममधून ब्लॅक राईस हे २०० ते २५० रुपये किलो असलेले महागडे बियाणे मागविले.

    ढोलेवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतात त्यांनी २३ मे रोजी या भाताची पेरणी केली. पेरणीतून उगवलेल्या रोपांतून त्यांनी बाजूच्या दुसऱ्या क्षेत्रात जुलै महिन्यात रोपलागण केली.पेरणी केलेल्या पिकापेक्षा लागणीचे पीक अधिक चांगले आहे. सध्या हे भात परिपक्व होत आलेले आहे.या भाताची लाबी आणि आतील तांदूळ काळ्या रंगाचा आहे. साधारण सात गुंठ्यांत घेतलेले हे पीक इतर भात पिकापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ चार-साडेचार फूट उंचीचे झाले आहे. या पिकासाठी त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला आहे.

    शिराळा तालुक्यातील पोषक वातावरणात हा भाताचा प्रयोग यशस्वी ठरत असून यातून चांगले उत्पन्न मिळेल असा पाटील यांना विश्वास आहे.परिसरात या भात पिकाचा विषय चांगलाच रंगत आहे. हा तांदूळ खाण्यास पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. हा तांदूळ शिजण्यास वेळ लागतो.पण पौष्टिक असतो.या तांदळाची किंमत ही जास्त आहे.उत्पादक शेतकऱ्याला ही चांगला नफा मिळवून देते.

  • नांदेड जिल्ह्यात आत्महत्येचा आलेख वाढला, अवघ्या दोन महिन्यात 26 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात दररोज शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. मात्र मराठवाड्यात सध्या शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, एकट्या नांदेड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुपटीने वाढल्या आहेत. संततधार पावसामुळे या भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे. अधिकृत अंदाजानुसार, नांदेडमधील आत्महत्यांची संख्या जुलैमधील आठवरून ऑगस्टमध्ये 26 वर पोहोचली.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये जिल्ह्यातून ऑगस्टपर्यंत एकूण 93 शेतकरी आत्महत्या झाल्या. आणि अधिकाऱ्यांनी यापैकी ६३ जणांना एक लाख रुपयांच्या भरपाईसाठी पात्र मानले. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यात 119 शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. त्यापैकी केवळ 65 शेतकरी कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाली. आतापर्यंत एकट्या मराठवाड्यातील ६६१ शेतकऱ्यांनी जीव दिला आहे. त्यापैकी सुमारे 485 जणांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली आहे. अवाढव्य कर्ज तसेच खराब हवामानामुळे होणारे अतोनात नुकसान यामुळे शेतकऱ्यांना असे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे.

    3,652,872 हेक्टर जमीन खराब 

    नांदेडच्या सिरंजनी गावचे प्रमुख पवन करेवाड म्हणाले की, या वर्षी पावसाने गाव आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सुमारे 20 टक्के शेतकऱ्यांची शेतजमीन पूर्णपणे वाहून गेली आहे. जुलैच्या पहिल्या पावसानंतर काही शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या आकडेवारीनुसार, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 3,652,872 हेक्टर जमीन खराब झाली आहे. शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, खराब हवामानामुळे शेतीच्या नुकसानीसोबतच परिस्थिती बिकट झाली आहे.

    13,200 प्रति हेक्टर रु.च्या रकमेचा हक्क 

    माझी पाच एकर जमीन सोयाबीन, कापूस वाहून गेल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले. नांदेडमधील हिमायतनगर येथील शेतकरी किरण गाडे यांनी सांगितले की, मी झाडे लावू किंवा माती तयार करू शकेन अशी शक्यता नाही. ते म्हणाले की, संपूर्ण मातीची झीज झाली असून येत्या हंगामासाठी सुपीकता आणि शेतजमिनी पूर्ववत करणे कठीण होणार आहे. गाडे यांनी त्यांच्या पिकावर 80 हजार रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती. गतवर्षी जेवढे पीक काढले जाईल, त्यांच्याकडून मला खूप आशा असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, जमिनीचे नुकसान झाले असले तरी मला राज्य सरकारकडून मदत म्हणून 13,200 रुपये प्रति हेक्टर रक्कम मिळण्यास पात्र आहे.

    नुकसान भरून काढण्यासाठी कोणतीही तरतूद नाही

    महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या प्रमाणात नुकसान भरून काढण्याची कोणतीही तरतूद नाही. सध्या शेतकऱ्यांच्या पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले तरच ते आर्थिक भरपाई मिळण्यास पात्र आहेत. त्याच वेळी, ज्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे संपूर्ण नुकसान झाले आहे त्यांना भरपाई लागू आहे. पण एवढी मर्यादित मदत आणि बिघडलेली परिस्थिती हे देखील शेतकऱ्यांना आत्महत्येकडे ढकलण्याचे कारण आहे.

    अडीच एकर जमिनीवर केलेली सोयाबीनची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली

    सरकारी नोंदीनुसार, नांदेडमधील परवा गावातील राजू गोथमवाड या शेतकऱ्याने १४ जुलै रोजी आत्महत्या केली. 2021 मध्ये 2.5 एकर जमिनीवर केलेली सोयाबीनची लागवड पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. गोठमवाड यांनी एका खासगी सावकाराकडून चार टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. तोट्याबरोबर व्याज वाढले. जूनमधील पावसाने बियाणे उगवण्यास मदत केली, परंतु एक महिन्यापेक्षा जास्त काळ पाऊस न झाल्यामुळे वाढ खुंटली. पाऊस परतल्यानंतर, पिके जास्त प्रमाणात सडली. अशाप्रकारे गोथमवादने आपले जीवन संपवले. कर्ज म्हणून मागितलेले 2 लाख रुपये आपण फेडू शकत नाही हे त्याला माहीत होते.

    संदर्भ टीव्ही ९

     

     

     

     

     

  • 12th Installment Of PM Kisan Coming On ‘This’ Day

    हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या पैशासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढत आहे. आतापर्यंत 12 वा हप्ता मिळालेला नाही. ऑगस्टमध्येच पैसे मिळतील, अशी आशा होती. मात्र, आता ही प्रतीक्षा जास्त काळ राहणार नाही. देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेची भेट मिळणार आहे. 2000 रुपयांचा 12 वा हप्ता १७-18 ऑक्टोबर दरम्यान मिळू शकेल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या एका ट्विटर पोस्ट मधून देण्यात आली आहे.

    पी एम किसानच्या बाराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना आता एक आनंदाची बातमी मोदी सरकारने दिली आहे. दिनांक 17 आणि 18 ऑक्टोबर 2022 रोजी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले आहे. दिल्लीतल्या आय ए आर आय पुसा नवी दिल्ली येथील ग्राउंड वर दिनांक 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी शेतकरी मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं आहे. याच दरम्यान पीएम किसान सन्मान निधीचा बारावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित केला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय स्वास्थ्य रसायन खते मंत्री मनसुख मंडविया यांची उपस्थिती असणार आहे.

    दरम्यान यंदाच्या हप्त्याला उशीर होण्याचे कारण म्हणजे फक्त (PM Kisan) शासनाकडून जमिनीच्या नोंदींची पडताळणी केली जात आहे. केवायसी करून घेणे. जेणेकरुन जे पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळतील. जे लोक अपात्र आहेत त्यांना पैसे मिळू नयेत. महसूल विभागाचे कर्मचारी अनेक शेतकऱ्यांना फोन करून त्यांच्या जमिनीच्या नोंदींची माहिती घेत आहेत.

    चुकीच्या पद्धतीने पैसे घेतल्यास काय करावे ?

    ज्या अपात्र लोकांनी पैसे घेतले आहेत त्यांना ती रक्कम सरकारला परत करावी लागेल, असा सरकारचा हेतू स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही आयकरदाते किंवा पेन्शनधारक असाल तर ते पैसे परत करा. अन्यथा सरकार तुम्हाला नोटीस पाठवेल. पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या पोर्टलवर पैसे परत करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तुम्ही केंद्र सरकारच्या पोर्टलवरूनही (https://bharatkosh.gov.in/) परत येऊ शकता. यासाठी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचीही मदत घेता येईल.

  • जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाथरी तालुक्यातील गावांमध्ये ई-पिक पाहणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता . प्रतिनिधी

    परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवार 12 ऑक्टोबर रोजी पाथरी तालुक्यातील वाघाळा रेणापुर या गावांमध्ये भेट देत ई – पिक पाहणी केली . यावेळेस स्थानिक शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा करत 15 ऑक्टोबर पर्यंत ई -पिक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले .यासोबतच उर्वरित शेतकऱ्यांना ई -पिक पाहणी करण्यास मदत करण्यासंदर्भात महसूल प्रशासनाला निर्देश दिले .

    जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सकाळी ९.३० ते ११ वा दरम्यान पाथरी तालुक्यातील रेनापुर ,वाघाळा शिवारामध्ये असणाऱ्या पिकांची पाहणी करत शेतकर्‍याची ई -पीक अँप द्वारे पाहणी व नोंद केली .रेनापुर येथे आशश्रोबा नबाजी आव्हाड यांच्या शेतामध्ये त्यांचा मुलगा सखाराम आव्हाड यांच्या मोबाईलवर ई-पिक नोंद करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . तर वाघाळा येथेही त्यांनी गावातील अर्ध्या अधिक शेतकऱ्यांचे पीक पाहणी नोंद झाली नसल्याचे निदर्शनास आणून देत पुढील तीन दिवसात नोंदणी करून घेण्यासंदर्भात सूचना केल्या.

    यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानी संदर्भात निवेदन दिले आहे . यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी , तहसीलदार सुमन मोरे ,तलाठी दीक्षित , तलाठी कुलकर्णी मा .सभापती दादासाहेब टेंगसे ,सरपंच बंटी घुंबरे , सरपंच चोखोबा उजगरे , संदीप टेंगसे लक्ष्मणराव टेंगसे , अनुप घुंबरे .पद्माकर मोकाशे ,माणिकआप्पा घुंबरे , राजेभाऊ वनकळसे , सुदामराव घुंबरे आदींची उपस्थिती होती.

  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी आनंद घेऊन येणार ! कांद्याच्या दरात वाढ जाणून घ्या किती मिळतोय भाव ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कमी भावाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परतला आहे, कारण आता कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे त्यांना पूर्वीचे नुकसान भरून काढण्याची आशा आहे. येवला, नाशिक, कळवण, संगमनेर, कल्याण अशा अनेक मंडईंमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो सरासरी १५ रुपयांच्या पुढे गेले आहेत. अद्याप उत्पादन किंमत निघू शकलेली नसली तरी एक-दोन-पाच रुपये किलोसारखी परिस्थिती फारशी वाईट नाही.

    दिवाळीपूर्वी भावात आणखी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. कारण आता बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा खराब होऊन निम्म्यावर आला आहे. त्यामुळे आवक कमी होईल. या प्रकरणात, किंमत वाढण्याची अधिक शक्यता असेल. देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक महाराष्ट्र आहे. देशातील सुमारे ४० टक्के कांद्याचे उत्पादन येथे होते. सुमारे 15 लाख शेतकरी कुटुंबे या शेतीशी निगडीत आहेत. परंतु, दुर्दैवाने गेल्या पाच महिन्यांत जेवढे भाव मिळत होते, त्यापेक्षा यंदा त्यांना खूपच कमी भाव मिळाला आहे.

    चांगला भाव मिळाल्याने शेतकरी खूश पण…

    महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे सांगतात की, भाव वाढल्याने शेतकरी खूश आहेत. मात्र तरीही त्यांचे नुकसान भरून निघालेले नाही. कारण यंदा संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाला नाही. व्यापाऱ्यांनी किलोला फक्त 1 ते 8 रुपये दिले. जे अत्यंत कमी आहे. शेतकऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी किमान 30 रुपये प्रतिकिलो भाव मिळेल, त्यानंतर त्यांचे नुकसान भरून काढले जाईल.

    आजचे कांदा बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    12/10/2022
    कोल्हापूर क्विंटल 3942 700 2500 1400
    औरंगाबाद क्विंटल 1264 400 1700 1050
    मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 9010 1500 2600 2050
    खेड-चाकण क्विंटल 1000 1000 2000 1500
    मंगळवेढा क्विंटल 107 300 1900 1800
    सोलापूर लाल क्विंटल 14067 100 3000 1400
    धुळे लाल क्विंटल 678 200 2200 1600
    नागपूर लाल क्विंटल 1800 1000 2500 2125
    अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 310 1000 2600 1800
    पुणे लोकल क्विंटल 8426 700 2200 1450
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 14 1000 1400 1200
    कल्याण नं. १ क्विंटल 3 2100 2200 2150
    कल्याण नं. २ क्विंटल 3 1800 2000 1900
    कल्याण नं. ३ क्विंटल 3 700 800 750
    नागपूर पांढरा क्विंटल 1000 1000 2500 2125
    येवला उन्हाळी क्विंटल 10000 300 2320 1650
    येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 3000 200 2345 1900
    लासलगाव उन्हाळी क्विंटल 8790 700 2356 1950
    मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 13000 300 2226 1880
    पैठण उन्हाळी क्विंटल 2176 600 2300 1850
    चांदवड उन्हाळी क्विंटल 5200 1070 2440 1750
    मनमाड उन्हाळी क्विंटल 3500 200 2090 1800
    पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 22000 650 2830 2250
    पारनेर उन्हाळी क्विंटल 10941 300 2600 1600
    देवळा उन्हाळी क्विंटल 7625 925 2280 1900

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

  • अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊनही सोयाबीनचे भाव का पडत आहेत?

    हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असले तरी दरात घट दिसून येत आहे. सोयाबीनचे जास्त उत्पादन आणि मागील थकबाकीदार साठा यामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत स्पॉट मार्केटमध्ये सोयाबीनचा भाव 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे सुमारे ०.३४ दशलक्ष मेट्रिक टन सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातही सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

    तरुण सत्संगी, सहाय्यक महाव्यवस्थापक (कमोडिटी रिसर्च), ओरिगो ई-मंडी यांच्या मते, देशातील सर्वात मोठे सोयाबीन उत्पादक राज्य मध्य प्रदेशमध्ये अवकाळी पावसामुळे 1,92,000 मेट्रिक टन सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. ते म्हणतात की, राज्यातील इंदूर, सागर, मंदसौर, नीमच आणि रायसेन जिल्ह्यांतील काही भागात सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

    या भागात अधिक नुकसान

    तरुण सत्संगी म्हणतात की मध्य प्रदेशातील एकूण पीकांपैकी सुमारे 4 टक्के पीक, जे सुमारे 1,92,000 मेट्रिक टन आहे, नष्ट झाले आहे. इंदूरमधील किशनगंज, नीमचमधील कवई, रायसेनमधील शाहबाद आणि सकतपूर, मंदसौरमधील नाहरगढ आणि सागरमधील बारा आणि करबाना येथे सोयाबीन पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

    सोयाबीनचे उत्पादन किती होईल

    सत्संगीच्या मते, जून 2022 पासून सोयाबीनच्या घसरणीच्या ट्रेंडमध्ये कोणतेही दृश्यमान बदल झालेले नाहीत. ते म्हणतात की सुमारे 0.34 दशलक्ष मेट्रिक टन पीक नुकसान असूनही, पीक वर्ष 2022-23 मध्ये सोयाबीनचे उत्पादन 12.14 दशलक्ष मेट्रिक टन असल्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या 11.95 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादनापेक्षा 1.6 टक्के जास्त आहे. तरुण म्हणतात की आम्ही याआधी पीक वर्ष 2022-23 साठी आमच्या सुरुवातीच्या उत्पादन अंदाजामध्ये 12.48 दशलक्ष मेट्रिक टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता, जो सध्याची परिस्थिती पाहता कमी करण्यात आला आहे.

    शेतकऱ्यांची रणनीती फसली

    सध्या, देशात 3.25 दशलक्ष मेट्रिक टन सोयाबीनचा भूतकाळातील थकबाकीदार साठा आहे, जो पीक वर्षाच्या सुरुवातीला (ऑक्टोबर-सप्टेंबर) सामान्य साठ्याच्या 4 पट पातळीवर आहे. शेतकऱ्यांनी केवळ सोयाबीनचा साठाच ठेवला नव्हता, तर मोहरीचा साठाही ठेवला होता, पण दुर्दैवाने शेतकऱ्यांची ही रणनीती त्यांच्या बाजूने कामी आली नाही, असे ते म्हणतात.