Category: बातम्या

  • सोलापूर बाजार समितीत लाल मिरचीचा ठसका ! पहा किती मिळतोय दर ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लाल मिरचीला (Red Chili Rate) चांगलाच उठाव मिळाला. तसेच दरही वधारलेले राहिले. वास्तविक, गेल्या महिनाभरापासून मिरचीचे दर किरकोळ चढ-उतार वगळता कायम तेजीत आहेत.

    मिरचीला प्रतिक्विंटलला कमाल १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्यात लाल मिरचीची आवक प्रतिदिन तीन ते पाच क्विंटल अशी जेमतेम राहिली. पण मागणीमध्ये सातत्य राहिल्याने दर मात्र चांगलेच वधारले.

    लाल मिरचीची आवक प्रामुख्याने जिल्ह्यातील विविध भागातूनच होतेच, पण सर्वाधिक आवक कर्नाटकातील विजापूर, इंडी, गुलबर्गा या भागातून होते. पण गेल्या महिना-दीड महिन्यापासून आवकेत सातत्याने घट होत आहे. मूळात गेल्यावर्षी मिरचीची लागवड कमी झाली.

    त्याचा परिणाम आता लाल मिरचीच्या आवकेवर झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या पंधरवड्यापासून तर मागणी आणि आवकेतील तूट वाढत आहे. त्यामुळे दरात तेजी वाढत आहे. गतसप्ताहात मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १० हजार रुपये ५०० रुपये, सरासरी १२ हजार ५०० रुपये आणि सर्वाधिक १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाला.

    मिरची बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    10/10/2022
    सोलापूर लोकल क्विंटल 9 9000 21500 12602
    नागपूर लोकल क्विंटल 169 11000 18000 16250
    नंदूरबार ओली क्विंटल 2 4250 4250 4250
    08/10/2022
    सोलापूर लोकल क्विंटल 5 12400 18500 18500
    मुंबई लोकल क्विंटल 196 20000 35000 27500
    07/10/2022
    सोलापूर लोकल क्विंटल 3 15000 15000 15000
    मुंबई लोकल क्विंटल 383 20000 35000 27500
    शिरपूर पांडी क्विंटल 1 4150 4150 4150
    नंदूरबार ओली क्विंटल 147 4200 6000 5100
    06/10/2022
    सोलापूर लोकल क्विंटल 3 15500 15500 15500
    नागपूर लोकल क्विंटल 629 11000 18000 16250
    मुंबई लोकल क्विंटल 117 20000 35000 27500
    नंदूरबार ओली क्विंटल 220 3100 6000 4550
    04/10/2022
    नंदूरबार हायब्रीड क्विंटल 4 9100 9600 9350
    सोलापूर लोकल क्विंटल 4 13000 13000 13000
    नागपूर लोकल क्विंटल 233 11000 18000 16250
    मुंबई लोकल क्विंटल 187 20000 35000 27500
    नंदूरबार ओली क्विंटल 531 3500 6700 5100

     

  • धक्कादायक ! पुढारी राजकारणात व्यस्त; गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून नाट्यमय राजकारण अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. अद्यापही राज्यातील राजकारनाचा रंग काही फिका होतांना दिसत नाही. एकीकडे मंत्री आणि राजकारणी यांच्यातली तु तू मै मै थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे मात्र राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातुन शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी उजेडात आली आहे. मागच्या ९ महिन्यात मराठवाड्यातील तब्बल 756 शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचा पाऊल उचलले आहे. शिवाय यातील 400 शेतकऱ्यांनी पावसाळ्यात म्हणजेच पीकं उगवण्याच्या हंगामात जीवन संपवलं आहे.

    मराठवाड्यला शेतकरी आत्महत्येचं ग्रहण

    सरकारकडून अनेक उपाययोजना करूनही मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या काही थांबता-थांबत नसल्याचे चित्र आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे ध्येय घेऊन सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्यातील 292 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे पिके हातून गेली आहे. सरकराने मदतीची घोषणा केली असली तरीही अनेक ठिकाणी मदत अजूनही पोहचलेली नाही. त्यामुळे हतबल झालेली शेतकरी आत्महत्या करत जीव संपवत आहे. विशेष म्हणजे ज्या सप्टेंबर महिन्यात राज्यकर्ते कोणाचा कोणता पक्ष या राजकारणात व्यस्त होते, त्यावेळी मराठवाड्यातील 90 शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

    आत्महत्या आकडेवारी ( 1 जानेवारी 2022 ते 30  सप्टेंबर 2022 )

    अ.क्र. महिना  शेतकरी आत्महत्या संख्या 
    1 जानेवारी 59
    2 फेब्रुवारी 73
    3 मार्च 101
    4 एप्रिल 47
    5 मे

    76
    6 जून 108
    7 जुलै 83
    8 ऑगस्ट 119
    9 सप्टेंबर 90
    एकूण  756

    103 प्रकरणे अपात्र ठरली…

    नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोज्यातून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर या गेल्या नऊ महिन्यांत 756 शेतकरी आत्महत्याची नोंद झाली आहे. यातील 561 प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरली असून, 103 प्रकरणे अपात्र ठरली आहे. तर 92 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक196 शेतकऱ्यांना आत्महत्या झाल्या आहेत.

    संदर्भ : एबीपी माझा

  • पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरु होऊ देणार नाही : राजू शेट्टी

    हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आम्ही एफआरपीपेक्षा जास्त ऊसाला दर मिळावा म्हणून भांडतो. परंतु तुमच्या सातारा जिल्ह्यात एफआरपी पेक्षा 100-200 रूपये दर कमी दिला जात आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता संघटित होणे गरजेचे आहे. तेव्हा सातारा जिल्ह्यात पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू होवू देणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. नागठाणे (ता. सातारा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एकरकमी एफआरपी व आले पिकांची एकत्रित खरेदी यासाठी ‘जागर’ सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

    काटामारी शेतकऱ्यांच्या मुळावर

    यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, ‘काटामारी शेतकऱ्यांच्या मुळावर आली असून, ही रोखण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांप्रमाणे ऑनलाइन प्रणालीचा वापर कारखानदारांनी करावा, यासाठी शासनावर स्वाभिमानी दबाब वाढवेल. आले खरेदी करताना व्यापारी नवे- जुने करत आहे. ही पद्धत शेतकऱ्यांच्या नुकसानीची आहे. यासाठी सातारा, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणी सभा घेऊन एकत्रित खरेदी करण्यास भाग पाडणार आहे. यातूनही काही व्यापारी वाकड्यात गेल्यास त्यांची गाठ स्वाभिमानीशी आहे.

    काटामारीतून होत असलेली साखर चोरीमुळे २२५ कोटींचा जीएसटी बुडविला जात असल्याचे संबंधित विभागाला निदर्शनास आणू दिले आहे. कारखान्यांनी काटामारीतून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुटले आहेत. ही लूट थांबविण्यासाठी साखर कारखान्यांनी पेट्रोलियम कंपन्यांप्रमाणे ऑनलाइन वजनकाटा बसविण्यासाठी सरकारवर दबाव आणणार आहे. आले व्यापाऱ्यांनी प्रचलित परंपरेनुसार आल्याची एकत्रित खरेदी करावी, अन्यथा स्वाभिमानीशी गाठ आहे, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

    यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य बाळकृष्ण साळुंखे, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जयकुमार कोल्हे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, देवानंद पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, अॅड. विजयराव चव्हाण, अॅड. सतीश कदम, कृषिभूषण मनोहर साळुंखे आदी उपस्थित होते.

  • दिवाळीसाठी रेशन कार्ड धारकांना किराणा सामान मिळणार 100 रुपयांत

    हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीचा सण जवळ येताच. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी काही ऑफर्स येत राहतात. कारण दिवाळीच्या वेळी लोक सर्वाधिक खरेदी करतात. आर्थिक दुर्बल नागरिकांना देखील दिवाळी साजरी करता यावी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी १०० रुपयात किराणा सामान दिले जाणार आहे.

    100 रुपयात किराणा

    दिवाळीच्या काळात राज्यातील शिधापत्रिकाधारकांना अधिक आनंद देण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने चांगली ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे.
    या ऑफरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लोकांना १०० रुपयांत किराणा सामान दिला जाणार आहे. पण ही ऑफर फक्त महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांसाठी आहे.

    हे सामान 100 रुपयात

    शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, शेंगदाणे, खाद्यतेल आणि पिवळी डाळ 100 रुपयांना दिली जाणार आहेत.

    लाखो लोकांना फायदा

    सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेला फायदा होणार आहे. वास्तविक, राज्यात सुमारे १.७० कोटी कुटुंबे आहेत, ज्यांच्याकडे शिधापत्रिकेची सुविधा आहे. लोक सरकारी रेशन दुकानांना भेट देऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. पण या ऑफरचा लाभ तुम्ही दिवाळीपर्यंतच घेऊ शकता हे लक्षात ठेवा. या काळात तुम्ही फक्त दिवाळीसाठी रेशन खरेदी करू शकता.

     

  • सायेब…अनुदानाचं पैकं लवकर द्या, मग आई दिवाळीला पोळ्या करेल…शेतकऱ्याच्या चिमुकल्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र एकदा वाचाच

    हॅलो कृषी ऑनलाईन : कधी शेतमालाला दर नाही, कधी नैसर्गिक आपत्तीमुळे हातचं पीक वाया जातं शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहिती… शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि व्यथा सांगणारं एका चिमुकल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हिंगोलीच्या एका शाळेत शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरानं हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.

    काय आहे पत्रात ?

    ” एकनाथ शिंदे
    मंत्री सायेब, मुंबई

    माझे बाबा शेती करतात आमच्या घरी शेती कमी आहे. असे बाबा म्हणतात मी बाबाले म्हणलं की मले गुपचूप खायला पैसे द्या की, माह्या संग भांडण करतात. म्हणतात यावर्षी सगळी सोयाबीन गेली वावर इकतो देतो तुला दहा रुपये… आईने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या पण नाही केल्या. आई म्हणे इथं इख खायला पैसे नाहीत वावरातली सोयाबीन गेली. महे बाबा दुसऱ्याच्यात कामाला जातात मी आईला म्हटलं. दिवाळीला पोळ्या कर ती म्हणे की बँकेत अनुदान आलं की करू पोळ्या….

    साहेब आमच्या घरी सणाला पोळ्यालाबी गुपचूप ले पैसे नाहीत आम्हाला घर नाही. आम्हाले काहीच नाही. मी बाबा संग भांडण केलं की ती आई म्हणे आपल्या जवळच्या गावात शेतकऱ्याच्या पोराने पैसे मागितले म्हणून फाशी घेतली आता मी बाबाले पैसे नाही मागत…

    साहेब आमचं घर पहा की, तुम्ही या अनुदानाचे पैसे लवकर द्या मग दिवाळीला आई पोळ्या करते. तुम्ही या पोळ्या खायले साहेब…

    तुमचा आणि बाबा चा लाडका,”
    प्रताप कावरथे वर्ग सहावा,
    जिल्हा परिषद शाळा गोरेगाव हिंगोली…

    अशा आशयाचे हे पत्र मुख्यमंत्र्यांना या चिमुकल्याने लिहले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे मंत्री राजकारणात व्यस्त असताना शेतकऱ्याची खरी व्यथा जाणून या चिमुकल्याच्या घरी दिवाळीला पोळ्या बनतील का ? शेतकऱ्याला अनुदान मिळेल का ? शेतकऱयांचे प्रश्न मार्गी लागतील का ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

     

  • पावसात भिजली हजारो क्विंटल लाल मिरची; नुकसान भरपाई देण्याची मागणी




    पावसात भिजली हजारो क्विंटल लाल मिरची; नुकसान भरपाई देण्याची मागणी | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली आहे. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेलया लाल मिरचीला देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता व्यक्त केली जात आहे.

    नंदूरबार म्हणजे लाल मिरची ची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत केवळ राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील मिरची विक्रीसाठी येत असते. सध्या मिरचीला चांगला दरही मिळतो आहे. मात्र परतीच्या पावसामुळे नंदूरबार बाजार समितीत ओली मिरची खरेदी करुन पथार्‍यांवर वाळवण्यासाठी टाकली असता ओली होऊन खराब झाली आहे. हजारो क्विंटल मिरची पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

    मिरचीला विमा कवच द्या

    खरेदी केलेल्या मिरचीला विमा सुरक्षा कवच द्यावे परतीचा पाऊस आणि आवकळी पाऊस यामुळे मोठे नुकसान होत असते. मात्र, सरकार याकडं लक्ष देत नसल्यानं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले.

     

    error: Content is protected !!





  • IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती जाहीर केल्या, जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशात शेतीचा हंगाम सुरू होताच खतांच्या किमती वाढल्या आणि त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात, पण या बातम्या शेतकऱ्यांसाठी खूप निराश आणि अस्वस्थ करणाऱ्या आहेत. हंगामात खते ही शेतकऱ्यासाठी मौल्यवान वस्तूपेक्षा कमी नाही, त्यामुळेच त्याची किंमत कमी ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि शासन प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार खताची व्यवस्था करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

    वास्तविक, आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, परंतु इफकोच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

    काय आहेत किंमती

    IFFCO ने 2022 च्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या किमती जाहीर केल्या आहेत. काळाबाजार रोखण्यासाठी खतांच्या पाकिटांवर किंमती छापल्या जाणार आहेत. तिथेच खताची विक्री कोणत्या दराने केली जाईल हे छापले जाईल.

    यावर्षी अनुदानित खताची किंमत

    युरियाच्या एका पॅकेटची किंमत – रु. 266.50

    डीएपीच्या एका पॅकेटची किंमत – 1350 रुपये

    NPK च्या एका पॅकेटची किंमत – 1470 रुपये

    एमओपीच्या पॅकची किंमत – 1700 रुपये

    विनाअनुदानित खताची किंमत

    युरियाच्या एका पॅकेटची किंमत – 2450 रुपये

    डीएपीच्या एका पॅकेटची किंमत – 4073 रुपये

    NPK च्या एका पॅकेटची किंमत – 3291 रुपये

    एमओपी खताच्या एका पॅकेटची किंमत – 2654 रुपये

  • परतीच्या पावसाने दाणादाण ! सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान, शेतकरी चिंतेत

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सतत पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे, अशी स्थिती आहे. त्यामुळे या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी नाराज असून, पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात काढलेली पिके पूर्णपणे भिजली आहेत.

    यासोबतच पुणे, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यासह राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यातील कोकण आणि विदर्भात १४ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान

    महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, बुलडाणा, चिखली या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीची सर्वाधिक लागवड केली जाते. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात सोयाबीन पिकाची काढणी केली होती. मात्र, पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज केले. काढणीस आलेले सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले आहे.

    शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

    यावेळी शेतात पिकाची काढणी सुरू झाली आहे. अशा स्थितीत अचानक आलेल्या पावसामुळे तयार पिकाचे नुकसान होत आहे. या पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीची काढणी सुरू आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे. परंतु, पावसामुळे सोयाबीन खराब होत आहे. दुसरीकडे सोयाबीनबरोबरच कापूस पिकांनाही फटका बसला आहे. एकीकडे पावसाने शेतकऱ्यांना त्रास दिला, तर दुसरीकडे सोयाबीनला बाजारात अत्यंत कमी भाव मिळत आहे. सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.

     

     

     

  • संशोधकांनी विकसित केली गव्हाची नवी जात, सिंचनाशिवाय 35 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतात शेतकरी…

    हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम शिगेला पोहोचला आहे. त्याअंतर्गत खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या भाताच्या सुरुवातीच्या जातीची काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. ज्यामध्ये कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या गव्हाच्या वाणांची पेरणी 20 ऑक्टोबरनंतर करण्याचा सल्ला देत आहेत. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीची तयारी सुरू केली आहे.

    ज्या अंतर्गत शेतकरी आजकाल गव्हाचे बियाणे गोळा करण्यात गुंतले आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी खूप चांगली माहिती आहे. गव्हाच्या विविध जातींपैकी शास्त्रज्ञांनी गव्हाची नवीन जात विकसित केली आहे. ज्यामध्ये अनेक गुण आहेत. उदाहरणार्थ, गव्हाची ही जात सिंचनाशिवाय एका हेक्टरमध्ये 35 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यास सक्षम आहे.

    गव्हाची ही नवीन जात कानपूरच्या चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. ज्याचे नाव K-1616 आहे. गव्हाची ही जात उत्तर प्रदेशात पेरणीसाठी अधिसूचित करण्यात आली आहे. ज्याची पेरणी उत्तर प्रदेशातील कोणत्याही जिल्ह्यात करता येते. मात्र, त्याचे बियाणे पुढील वर्षीपासून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

    K-1616 संकरित वाण गव्हाच्या दोन जातींचे मिश्रण करून तयार केले

    चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कानपूरच्या शास्त्रज्ञांनी गव्हाच्या दोन जातींचे मिश्रण करून K-1616 ही नवीन जात विकसित केली आहे. जी एक संकरित वाण आहे. माहितीनुसार, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी 4 वर्षांच्या मेहनतीनंतर गव्हाच्या एचडी-2711 आणि के-711 यांचे मिश्रण करून के-1616 ही संकरित वाण विकसित केली आहे.

    दोन सिंचन मिळाल्यावर 55 क्विंटलपर्यंत उत्पादन

    चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेला गव्हाचा नवीन वाण K-1616, सिंचनाशिवाय प्रति हेक्टर 35 क्विंटलपर्यंत उत्पादन करण्यास सक्षम आहे. त्यामुळे या प्रकारच्या पिकाला पाणी देऊन शेतकरी त्यातून अधिक उत्पादन घेऊ शकतात. माहितीनुसार, K-1616 या जातीच्या गव्हाला दोन वेळा सिंचन दिल्यास ते 50 ते 55 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देण्यास सक्षम आहे. खरेतर, गव्हाची K-1616 ही नवीन जात कोरड्या भागासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर रब्बी हंगामात कमी पाऊस पडल्यास त्यातून उत्पादन घेता येते.

    प्रथिने 12 टक्क्यांपर्यंत, पेरणी फक्त पुलवाने करता येते

    गव्हाच्या नवीन जाती K-1616 मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. ते शेतात आल्यानंतरच शेतकरी पेरणी करू शकतात. तर त्याच वेळी, त्याच्या धान्यांमध्ये 12 टक्क्यांपर्यंत प्रथिने आढळली आहेत. त्याच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, ते रोग-प्रतिरोधक आहे, ज्यामध्ये काळा, पिवळा रोग होण्याचा धोका नाही.
    त्याचबरोबर या जातीचे धान्य इतर जातींपेक्षा मोठे व लांब असते. गव्हाची सामान्य जात पेरणीनंतर १२५ ते १३० दिवसांत परिपक्व होण्यासाठी तयार होते, तर के-१६१६ जातीचे पीक १२० ते १२५ दिवसांत परिपक्व होते.

     

     

     

     

     

  • ‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीच्या निकषात बदल…

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून या रोगाला अटकाव घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या ठरावीक संख्येइतक्या जनावरांनाच नुकसानभरपाई दिली जात होती. आता त्यात बदल करत संख्येचे निर्बंध दूर करून जितकी जनावरे ‘लम्पी स्कीन’ने दगावतील तितक्या जनावरांना नुकसानभरपाई मिळणार आहे. पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग यांनी मंगळवारी (ता. ४) जुन्या आदेशात बदल करून नवीन आदेश काढला आहे.

    लम्‍पीची साथ आल्यानंतर मृत पावलेल्या जनावरांबाबत संबंधित पशुपालकांना अर्थसाह्य देण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र जे पशुपालक हे अल्‍प भूधारक, अत्यल्‍प भूधारक आहेत, त्‍यांनाच हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच हा लाभ केवळ एका शेतकऱ्या‍साठी तीन जनावरांच्या मृत्यूपर्यंतच होता. या शासन निर्णयात आता बदल करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार, सर्व शेतकरी व पशुपालकांना या निर्णयाचा लाभ होईल. तसेच जनावरांच्या संख्येवर घातलेली मर्यादाही उठवण्याचा महत्त्‍व‍पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

    किती मिळणार रक्कम ?

    गाय किंवा म्‍हैस लम्‍पी स्कीनने मृत पावल्यास संबंधित पशुपालकास ३० हजार रुपये, ओढकाम करणारी जनावरे, जसे की बैल मृत पावला तर २५ हजार व वासरू असेल, तर १६ हजार रुपये मदत देण्यात येईल. जितकी जनावरे लम्पी स्कीनने दगावतील तितक्या सर्व जनावरांसाठी मिळणार मदत
    अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे पशुधन मृत पावलेल्या सर्व पशुपालकांना अर्थसाह्य मिळणार आहे. केवळ ‘लम्पी स्कीन’ने मृत झालेल्या जनावरांनाच्या पशुपालकांनाच मिळणार भरपाई मिळणार आहे.