Category: बातम्या

  • केळीच्या दरात पुन्हा घसरण, जोर धरू लागली किमान भाव निश्चित करण्याची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते तर कधी बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. एकीकडे कांद्याचे भाव गडगडल्याने उत्पादकांची सातत्याने आंदोलने होताना दिसत आहेत, तर दुसरीकडे केळीच्या दरातही घसरण होताना दिसत आहे. नवरात्र संपताच भावात घसरण झाली. 2000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकल्या जाणाऱ्या केळीचा भाव आता 600-1200 रुपयांवर आला आहे. आता त्याची किमान किंमत निश्चित करण्याची मागणी होत आहे.

    दुसरीकडे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केळीच्या झाडांवर सीएमव्ही रोगामुळे फळबागा खराब होत आहेत. त्यामुळे केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. रोगामुळे झाडाची वाढ थांबते.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे झाडे उपटून फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत भावात झालेली घसरणही शेतकऱ्यांसाठी संकटापेक्षा कमी नाही.

    काय म्हणतात शेतकरी?

    महाराष्ट्र केळी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष किरण चव्हाण सांगतात की, सणानिमित्त बाजारपेठेत केळीला मागणी आहे. मात्र व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी करत आहेत. यातून शेतकऱ्यांना नफा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचे खरे फळ व्यापारी खात आहेत. यंदा केळीला काही दिवस विक्रमी भाव मिळाला, मात्र, तो कायम नाही. आता भाव उतरले आहेत. ज्यामुळे नुकसान होत आहे. केळी जनतेसाठी स्वस्त झाली आहे, असे अजिबात नाही.

    किमान भाव निश्चित करण्याची मागणी

    चव्हाण पुढे म्हणाले, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरी दर्जाची केळी चिप्स बनवण्यासाठी वापरली जात आहे. अशा केळीचा भाव 300 – 450 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. , मात्र पहिल्या क्रमांकाच्या दर्जाच्या केळीलाही केवळ ६००- १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे.

    गेल्या महिन्यात केळी उत्पादक संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केळीचा किमान भाव १८.९० रुपये प्रतिकिलो जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दसऱ्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा केळी संघाची भेट घेणार आहेत. अशा स्थितीत केळी उत्पादकांच्या मागण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.

     

     

     

     

     

  • सौर पंपांसाठी 15 कोटी 27 लाख रुपयांना मंजुरी

    हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियानासाठी (KUSUM) (कुसूम टप्पा -२)  राज्य सरकारने १५ कोटी, २७ लाख ५४ हजार रुपयांचा निधी महाऊर्जाला देण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात जेथे वीज पोहोचली नाही अशा ठिकाणी कृषी पंपांना सौर उर्जेद्वारे वीज देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून राज्यात एक लाख कृषी सौर पंप बसविण्यात येणार आहेत.

    यापैकी १० टक्के हिस्सा राज्य सरकार भरणार आहे. ज्या ठिकाणी वीज गेलेली नाही अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना तीन एचपी, पाच एचपी आणि साडेसात अश्वशक्ती क्षमतेच्या सौर कृषिपंपांसाठी सौरऊर्जा वीज जोडणी देण्यात येते. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठी आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ९० टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ९५ टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येते. राज्यात ही योजना राबविताना एक लाख पारेषण विरहित सौर कृषी पंप मंजूर केले असून त्याची अंमलबजावणी महाऊर्जा करत आहे.

    कुसूम नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षात राज्यात ५० हजार नग सौर कृषिपंप बसविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार १४ पुरवठादारांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यांतर्गत ३० हजार ५२७ लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा जमा केला असून त्यातील १० हजार ६५ पंपांपैकी ८९१८ सर्वसाधारण गटातील शेतकरी आहेत. तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील लाभार्थ्यांसाठी ६९६ आणि आदिवासी विकास विभागाकडील लाभार्थ्यांसाठी ४५१ पंप देण्यात येणार आहेत. सध्या ८४११ लाभार्थ्यांच्या बोअरवेलच्या ठिकाणी पंप बसविण्याचे काम सुरू आहे.

    या योजनेसाठी राज्य सरकारकडून १० टक्के, लाभार्थी हिस्सा १० टक्के आणि केंद्र सरकारकडून ३० टक्के हिस्सा देण्यात येणार आहे. उर्वरित ३० टक्के महावितरणकडील इस्क्रो खात्यात वाढीव वीज विक्रीवरील करातून परस्पर जमा होणाऱ्या रक्कमेतून सरकारच्या मान्यतेनंतर वर्ग करण्यात येणार आहे. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या अनुदानाच्या १० टक्के हिस्सा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात या योजनेकरिता अर्थसंकल्पात १०९ कोटी ११ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार १० टक्के शासन हिस्सा देण्यासाठी अर्थसंकल्पित निधीच्या १५ टक्केनुसार महाऊर्जाला १५ कोटी, २७ लाख ५४ हजार रुपये वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

    कुसूम योजना (दुसरा टप्पा)

    एकूण सौर कृषिपंप : एक लाख

    यंदाच्या वर्षात मंजुरी : ५० हजार कृषीपंप

    एकूण मंजुरी : १०९ कोटी ११ लाख

    अर्थसंकल्पीय मंजुरीच्या १५ टक्के निधी : १५, २७ ५४

    लाभार्थी शेतकरी

    सर्वसाधारण गट : ८९१८

    सामाजिक न्याय विभाग लाभार्थी : ६९६

    आदिवासी विकास विभाग लाभार्थी : ४५१

    संदर्भ – ऍग्रोवन

     

  • विजतारांच्या घर्षणाने अर्धा एकर ऊस जळून खाक; शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान




    विजतारांच्या घर्षणाने अर्धा एकर ऊस जळून खाक; शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    शेतातून गेलेल्या विजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगी मध्ये अर्धा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्‍या ढालेगाव येथे घडली आहे .यावेळी शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .

    पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील शेतकरी माणीक बालासाहेब शिंदे यांच्या ढालेगाव शिवारात मालकिच्या गट क्र . 50 मध्ये क्षेत्र 0 हे 20 आर एवढ्या क्षेत्रावर ऊस असुन आज रविवार 02 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:40 वाजता विजेच्या शेतातून विजावितरणच्या तारांमध्ये घर्षण होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला आहे .

    दरम्यान शेतकर्‍याने प्रशासनाकडे ऊसाचा पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे .

    error: Content is protected !!





  • योगेश्वरी कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही; अखील भारतीय किसान सभेचे आमरण उपोषण सुरु




    योगेश्वरी कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही; अखील भारतीय किसान सभेचे आमरण उपोषण सुरु | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    2021-22 च्या गळीत हंगामातील ऊस बिलासाठी 17 ऑगस्ट च्या मोर्चामध्ये ठरल्या प्रमाणे व्यवहार न झाल्यामुळे सोमवार 3 ऑक्टोबर पासुन पाथरी (जि . परभणी ) येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

    2021-2022 च्या हंगामातील ऊस बिल थकबाकी व ठेकेदाराचे कमिशन डिपॉझीट व इतर मागण्यासाठी पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर कारखान्यावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता . त्यावेळी कारखाना प्रशासनाने काही लेखी अश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. पण ठरल्या प्रमाणे शेतकऱ्यांसोबत व्यवहार केलेला नाही म्हणत आता योगेश्वरी शुगर प्रशासनाच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकरी पाथरी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर
    आमरण उपोषणास बसले आहेत.

    यावेळी योगेश्वरी शुगर प्रशासनाने दिलेल्या लेखी पत्राचे उल्लंघन केल्यामुळे योगेश्वरी प्रशासनावर शेतकर्यांची फसवणुक केल्यामुळे गुन्हा दाखल करावा अशी उपोषण कर्त्यांची मागणी आहे. कॉ. दिपक लिपणे कॉ. भागवत कोल्हे कॉ. भागवत शिंदे ,कॉ . गोकुळ शिंदे, काँ . सुभाष नखाते यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपोषणाला बसले आहेत .

    error: Content is protected !!





  • पावसामुळे मोसंबीच्या बागा अडचणीत, फळगळीमुळे शेतकरी चिंतेत

    हॅलो कृषी ऑनलाईन : यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे मुख्य पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिक, जालानसह राज्यातील काही भागात यापूर्वी अचानक मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये पावसामुळे कांदा पिकांचे नुकसान झाले असतानाच जालन्यातील मोसंबीच्या बागाही धोक्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवर पसरलेल्या मोसंबीच्या फळबागांना फटका बसला आहे. फळगळीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

    प्रत्यक्षात मोसंबी फळावर बुरशीजन्य रोग, किटचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे फळे खराब होऊन अकाली गळून पडत आहेत. पावसामुळे फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळे खराब झाल्याने मोसंबीचा शेतकरी अडचणीत, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

    लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे

    यावेळी मोसंबीचे उत्पादन चांगले झाले आहे. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी होते. परंतु, आता फळे खराब झाल्याने शेतकरी नाराज झाला आहे. तयार फळे नष्ट होत असल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे फळे रोगग्रस्त होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. फळे कुजत आहेत.तसेच मोसंबीच्या बागांमध्ये जास्त पाणी साचल्याने बागेला रोगराईची लागण होत आहे.त्यानंतर शेतकऱ्यांकडे बागा तोडण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्हाला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

    उत्पादनात मोठी घट

    साधारणत: एका मोसंबीच्या झाडापासून सुमारे एक क्विंटल उत्पादन मिळते. आजची परिस्थिती बघितली तर पावसामुळे एका झाडात फक्त 10 ते 20 किलो साहित्य शिल्लक राहिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आता शेतकऱ्यांनी करायचे तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोसंबी पिकाचा विमा उतरवूनही कंपन्यांकडून विम्याचा परतावा मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. सरकारने हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमचा उदरनिर्वाह मोसंबीच्या फळावर होतो.शेतकरी मदतीची याचना करत आहेत.

     

     

     

     

     

  • यंदा ‘पणन’ची 50 केंद्रांवरच कापूस खरेदी, जाणून घ्या कधी सुरु होणार केंद्रे ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : यवतमाळ 

    मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव मिळत आहे यंदाच्या वर्षी देखील कापसाचा भावात तेजी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पणन महासंघाकडून यंदाच्या वर्षी कापूस खरेदी केंद्रे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर वर्षी पणन कडून ७० केंद्रांवर कापूस खरेदी करण्यात येते मात्र यंदाच्या वर्षी केवळ ५० केंद्रे सुरु करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. तसे पत्र शासनाला पाठविले असून, शासन काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

    खरेदी केंद्रांची संख्या का केली कमी ?

    राज्यात दोन वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांअभावी तारांबळ उडाली होती. त्यामुळेच पणन महासंघाने यंदापासून केवळ ५० केंद्रे सुरू करण्याचा ठराव घेतला आहे. अशातच आता ‘पणन’ची केंद्रे कमी झालेली आहेत. ‘सीसीआय’ची कापूस खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. पणनची केंद्रे नोव्हेबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. नोंदणीप्रक्रिया सुरू झाली असली तरी केंद्र उघडण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. आधीच मनुष्यबळ कमी असल्याने कामकाज चालविताना पणन महासंघाला अडचणी येत आहेत.

    अमरावती विभाग हे प्रमुख कापूस उत्पादक प्रदेशात येते. दोन वर्षांपूर्वी हंगामात मोठ्या प्रमाणात पणन व ‘सीसीआय’च्या केंद्रांवर कापसाची खरेदी झाली होती. यंदा कापसाला खासगी बाजारात दर चांगले आहेत. परिणामी, यंदा ‘पणन’कडे कापसाची आवक राहणार नाही. असे असले तरी नियोजन म्हणून पणन महासंघाने ५० केंद्रे उघडण्याची तयारी दर्शविली आहे. यंदा पुरामुळे कपाशीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दसरा आला असला तरी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात कापूस आलेला नाही.

    त्यातच आता खासगी बाजारात असलेल्या दरामुळे ‘पणन’कडे कापूस येण्याची शक्यता धूसर आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना आधार म्हणून ‘पणन’चे केंद्र सुरू केली जाणार आहेत. ‘सीसीआय’ किती केंद्रे उघडणार, याबाबत अजून स्पष्टता नसली तरी त्यांच्या केंद्रांची संख्यादेखील घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात व राज्यात किती केंद्रे, कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना आहे.

     

  • उसाच्या 265 बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…

    हॅलो कृषी ऑनलाईन : हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड करतात. मागच्या दोन वर्षात तर राज्यात ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी अशा ठिकाणी देखील उसाचे उत्पादन घेतले गेले जिथे परंपरागत उसाची शेती केली गेली नाही. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखरेचे देखील चांगले उत्पादन राज्यामध्ये झाले आहे. असे असताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उसाबाबत एक महत्वाचा सल्ला दिला आहे. ते शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये बोलत होते.

    यावेळी बोलताना पवार यांनी म्हंटले की, सध्या रानं ओली आहेत, वापसा नाही. त्यामुळे आत्ता लगेच उसाची तोडणी झाली तर रिकव्हरी चांगली होणार नाही. रिकव्हरी चांगली आली तरच उतारा चांगला पडतो, साखर जास्त निघते. साखर जास्त निघाली, तर भाव चांगला मिळतो. एका टन ऊसातून किती साखर निघते यावर ते अवलंबून असतं. काही ठिकाणी १० टक्के, ११ टक्के, १२ टक्के निघते. कोल्हापुरात तर टनामागे ११४ किलो साखर निघते. म्हणजे १४ टक्के साखर निघते. एवढा विरोधाभास आहे.”

     २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका

    पुढे बोलताना त्यांनी उसाच्या बेण्याबद्दल सांगितले ते म्हणाले “एका टनातून किती साखर निघणार हे जमिनीच्या पोतावर, उसाचं बेणं कोणतं आहे यावर अवलंबून असतं. माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका. तुमचा ऊस वेळेवर जायचा असेल, भाव चांगला मिळवायचा असेल तर ८६-०-३२ , ८०-०५, १०-००१, १२-१२-१ ही उसाची बेणी वापरा,” असा सल्ला अजित पवारांनी दिली.

    “आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा शुगर इन्स्ट्युट ही संस्था चालवतो. तिथं नवीन उसाचं बेणं तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कमी पाण्यात त्या उसाला दशी न पडता उसाचं टनेज जास्त येईल यावर संशोधन करत आहेत. त्यातून काही वाणांचा शोध लगाला.”

    संदर्भ -लोकसत्ता

  • नंदूरबार जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

    हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी कापसाला मिळालेला चांगला भाव पाहता यावर्षी देखील राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी देखील कापसावरील रोगराईचे संकट शेतऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवणार असे दिसते आहे. राज्यत कापसाचे चांगले उत्पादन घेणाऱ्या नंदुरबार जिल्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

    जळगाव, धुळे, नंदूरबार हे जिल्हे सर्वात मोठा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखले जातात. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कापसाचे उत्पादन घेतलं जाते. मात्र, नंदूरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. कारण कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे.

    कापसाला मिळालेला चांगला भाव यावर्षी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कापसाची पाने लाल पडून गळत आहेत. पर्यायाने झाडाचे पोषण खुटत आहे.त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होत असतो. एकूण यावर्षी वेळेवर झालेला पाऊस आणि पोषक वातावरणामुळं कापसाचे उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

    नंदूरबार जिल्ह्यातील पंधरा ते वीस हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारनं लाल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शेतकऱ्यांना सरसकट एकरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

     

  • सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार




    सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    खरिपात पेरणी केलेल्या सोयाबीनच्या तब्बल १० बॅगला पेरणी केल्यानंतर ३ महिण्याचा अवधी होऊनही शेंगा न लागल्या नसल्याने एका शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असुन बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या झुवळा झुटा येथील शेतकर्‍याने प्रशासनाकडे तक्रार करत आता नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे.

    तालुक्यातील जवळा झुटा येथील राजेंद्र सुरेशराव जवळेकर असे फसवणुक झालेल्या शेतकर्याचे नाव असून त्यांनी जवळा झुटा येथील गट क्र . 19 मधील जमीनीमध्ये पाथरी येथील एका कृषी केंद्रावरुन खरेदी केलेले. ग्रीन गोल्ड सिडस या कंपनीचे 10 बॅग सोयाबीन बियाणे खरीप हंगामात पेरले होते.

    मात्र सदरील बियाणे पेरणी करून तीन महिने उलटले असून सोयाबीनची फक्त वाढ झालेली असुन अद्यापही या पिकाला शेंग अथवा कसल्याही प्रकारचा माल लागलेला नाही. याप्रकरणी आता या शेतकऱ्याने तक्रारीसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली असून पिकाची पाहणी करुन संबंधित कंपनी विरुद्ध कार्यवाही करुन पिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

    error: Content is protected !!





  • प्रादुर्भाव झालेल्या पशुधनांसाठी विलगीकरण कक्ष उभारा : बच्चू कडू

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. एवढेच नाही तर यामुळे पशुधनाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पशुपालक चिंतेत आहेत. दरम्यान या आजाराच्या नियंत्रणासाठी विलगीकरण कक्ष तयार करून प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना औषध उपचार करण्याकरिता तेथे एकत्रित ठेवण्याबाबतचे पत्र अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

    राज्यामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रसार वाढता असून त्यामध्ये पशुपालकांच्या घरी जाऊन पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी औषधोपचार करीत आहेत. परंतु पशुसंवर्धन खात्यामध्ये मनुष्यबळ कमी असल्याने यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. औषधोपचार न मिळाल्याने राज्यात जनावर दगावत आहेत.त्या पार्श्वभूमीवर छावणी योजनेच्या धर्तीवर विलगीकरण कक्षाची स्थापना करावी, अशा सूचना आमदार बच्चू कडू यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी पर्याप्त जागा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी तयारी करून छावण्यांची उभारणी करावी.

    येथे गोवंशीय पशू एकत्रित ठेवल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आजारी जनावरांवर उपचार करणे व आवश्यकतेनुसार उत्तरीय तपासणीसाठी नमुना गोळा करणे, मृत पशूंची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, पशुपालकांनी पशूची काळजी घरीच घ्यावी.अत्यावश्यक औषधी शासन स्तरावर खरेदी करता येत नाही. परंतु पशूंना वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहेत त्या औषधी आम्ही खरेदी करून पशुपालकांना उपलब्ध करून देत आहोत. आजारी पशूंचे विलगीकरण करणे ही बाब नवीन आहे.

    तरीसुद्धा प्रायोगिक तत्त्वावर चांदूरबाजार, अचलपूर येथे हा प्रयोग करणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास गाडे यांनी देखील लम्पी स्कीचा प्रादुर्भाव असलेल्या भागात चारा छावण्यांच्या धर्तीवर विलगीकरण छावण्या उभारण्याची गरज व्यक्त केली आहे.