Category: बातम्या

  • विरोधी पक्षनेते आंबादास दानवेंचा बीड दौरा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची घेतली भेट

    हॅलो कृषी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची ते भेट घेत आहेत. आज बीड शहराजवळच्या सामनापूर येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी दानवे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताना एका तरुण शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. यावेळी बोलतांना तरुण म्हणाला की, अशा आर्थिक परिस्थितीत नोकरी नाही,कुठे काम मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील तरुण प्रचंड नैराश्यात गेले आहेत. भविष्यात आपलं काय होणार आहे हे कुणालाच काहीच कळत नाही, असे सांगताना तो ढसाढसा रडायला लागला.

    यावेळी बोलताना आंबादास दानवे म्हणाले की, राज्यात दिवसाला दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करतायत. या खोके सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यात गेल्या दोन महिन्यात जवळपास 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान आज बीड जिल्हातील समनापुर येथील नवनाथ शेळके या आत्महत्याग्रस्त शेकऱ्याच्या घरी सांत्वनपर भेट देत कुटुंबियांशी संवाद साधत प्रशासनाला लवकरात लवकर मदत देण्याचे सुचना केल्या आहेत. दिड लाख रुपयांचे कर्ज व्याजासह साडेपाच लाखांवर जाऊन पोहचले. कर्ज कसे फिटणार याची चिंता उराशी घेऊन या शेतकऱ्याने मुत्यू जवळ केला, असल्याचं दानवे म्हणाले.

    अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीं. फक्त घोषणाचा पाऊस होतोय. अतिवृष्टी, बॅंकांची थकबाकी, यंदाची खरीप व दुबार पेरणीसाठी खाजगी सावकारांकडून 15-20 टक्क्यांनी कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे खोके सरकारला हात जोडून विनंती आहे की, दिल्लीश्वरांच्या समोर लोटांगन तसेच तुमच्या सोबत आलेल्या आमदारांची नाराजी नाट्य दुर झाले असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे, अशी टीका दानवे यांनी शिंदे सरकारवर केली.

  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, यावर्षी गळीत हंगाम लवकर सुरु होणार

    हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. यंदाच्या वर्षी उसाचे गाळप १ ऑक्टोबर पासूनच सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

    याबाबत बोलताना अतुल सावे म्हणाले की, मागच्या वर्षी ऊस गाळप हंगाम संपल्यावर सुद्धा अनेक शेतकऱ्यांकडे ऊस शिल्लक होता. त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती उद्भवणारा नाही यासाठी लवकरच ऊस गाळप हंगाम सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 सप्टेंबरला याबाबत एक बैठक घेऊन 1 ऑक्टोबरपासून गाळप सुरु करण्याचं ठरलं आहे. पंधरा दिवस अगोदरच गाळप सुरु केल्यास शेवटच्या टप्प्यात ऊस उरणार नाही असं सावे म्हणाले. सोबतच यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आणि सरकारला सुद्धा नुकसानभरपाई देण्याची गरज पडणार नाही असेही सावे म्हणाले आहेत.

    पुढे बोलताना ते म्हणाले, यावर्षी आम्ही एक नवीन मोबाईल ॲप तयार केला आहे. ज्यात शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. यावेळी नोंदणी करतांना शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या कारखान्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. सोबतच दोन कारखान्यात नोंदणी करता येणार असून, ज्यात आपला ऊसाची क्वालिटी काय आहे, आपला ऊस कधी लागलेला आहे, त्यानुसार ॲपच्या माध्यमातून ऊस कारखान्यात पाठवता येणार, असल्याचं सावे म्हणाले.

     

     

  • बीड जिल्ह्यात गोगलगायींनंतर आता घोणस अळीचे संकट ; परिणाम केवळ पिकांवर नाही तर शेतकऱ्यांवर सुद्धा

    हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाल्यानंतर बीड जिल्ह्यात गोगलगायींच्या प्रदूरभावामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता आणखी एक नवे संकट बीड मधल्या शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आता बीड मध्ये घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव होतो आहे. महत्वाचे म्हणजे या अळीचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होताना पहायला मिळत आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आहे की, बीड जिल्ह्यतल्या आष्टी तालुक्यातल्या शिराळा गावात घोणस आळी चावल्यामुळे शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे. घोणस नावाची एक अळी जी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. घोणस नावाची विषारी अळी अंगावर पडून तिने चावा घेतल्यानं असह्य वेदना झाल्यानं तीन शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली आहे. यामुळं शेतकरी वर्गाच्या मनात धडकी भरली आहे. हा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील शिराळा गावात उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी दिली आहे.

    काय कराल उपाय ?

    –ही अळी म्हणजे कोणत्याही पिकावरील किड नाही तर एक रानटी गवतावरील अळी आहे.
    –जास्त प्रमाणात जर या अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर क्लोरोसायफर फवारणं गरजेचं असल्याची माहिती देखील गोरख तरटे यांनी दिली.
    –परंतू जास्त प्रमाणात प्रादुर्भाव नसेल तर काही फवारण्याची गरज नाही.
    — शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी म्हणून अळीपासून संरक्षण करण्यासाठी फुल कपडे घालणे गरजेचे आहे.
    — ही अळी शरीरावर येऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केलं आहे.

    अळी चावल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात ?

    –घोणस अळीने चावा घेतल्यास असाह्य वेदना होतात
    — उलट्या होतात.

    दरम्यान, जिथे ही अळी आढळली तिथे जाऊन कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे.

  • शेतकरी नारळाच्या झाडांचा विमा केवळ 25% खर्चात काढू शकतात : कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

    हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात नारळाचे उत्पादन वाढवायचे आहे. गुजरातमधील जुनागढ येथे नारळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिषदेत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, देशात नारळाची लागवड वाढली पाहिजे, ही पंतप्रधानांची इच्छा आहे, त्यासाठी ते देशातील प्रक्रिया युनिट्स आणि उत्पादनांची निर्यात वाढवण्याची सतत मागणी करत असतात.

    ते म्हणाले की, सामान्य शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच म्हणून उपलब्ध असलेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेप्रमाणेच नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण आहे, ज्यामध्ये केंद्र, राज्य आणि शेतकरी यांचा विमा हप्ता 50, 25 आणि 25 च्या प्रमाणात आहे. अनुक्रमे टक्के, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा.

    शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येईल

    संपूर्ण जगाला भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची विश्वासार्हता वाढवली आहे, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ते गाव-गरीब-शेतकरी कधीच विसरत नाहीत, गरिबांची ताकद वाढली तर देशाची ताकद वाढेल, खेड्यांमध्ये विकास झाला तर देशात विकास होईल आणि समृद्धी आली तर देशाचा विकास होईल. शेतकऱ्यांची घरे, तर भारत माता समृद्ध होईल, हे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान सातत्याने प्रयत्न करत आहेत.

    शेतकऱ्यांचे उत्पन्न दहापटीने वाढले

    कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, देशात लाखो शेतकरी आहेत ज्यांचे उत्पन्न दुप्पट ते दहा पटीने वाढले आहे. यासंदर्भात त्यांनी काश्मीरमधील भगवा उत्पादक शेतकऱ्यांचे उदाहरण देत सांगितले की, तेथे केशर पार्कच्या विकासामुळे एक ते दोन लाख रुपयांपर्यंत भाव वाढला आहे. किलो मिळवा. आझादीच्या अमृत महोत्सवादरम्यान, भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) अशा 75 हजार शेतकर्‍यांचे दस्तऐवजीकरण केले आहे, ज्यामध्ये या शेतकर्‍यांनी त्यांचे उत्पन्न कसे वाढले आहे हे सांगितले आहे.

     

     

  • परभणीत पावसाची दडी, सोयाबीन वाळून चालल्याने शेतकरी चिंतेत

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यात मागच्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याविना सोयाबीन वाळू लागले आहे. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पीक असल्यामुळे आणि नेमके याच वेळी पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहे.

    सुरुवातीच्या काळात सर्वत्र जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळं सोयाबीन पिक पिवळे पडले होतो. मात्र, शेतकऱ्यांनी विविध फवारण्या करुन पिक कसेबसे वाचवले होते. मात्र, मागच्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसानं उघडीप दिल्यानं शेंगा भरण्याच्या मोसमातच सोयाबीन वळून जात आहे. तर इतर पिकंही कोमेजली आहेत.

    शासनाकडून मदतीची मागणी

    गेल्या महिनाभरापासून पाऊस नाही, सुरुवातीला मोठा पाऊस झाला. त्यामुळ सोयाबीन पिवळं पडलं होते. मात्र अनेक फवारण्या केल्यावर कसेबसे सोयाबीन वाचले होते. मात्र, आता पाण्याची गरज असताना पाऊस पडत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आम्ही एकरी सोयाबीनला 20 हजार रुपयांचा खर्च केला आहे. शासनानं आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पीक विमा द्यावा. हेक्टरी 50 हजार रुपयांची दत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • उडीदाचे भाव तेजीत; सरकार करणार आयात उडिदाची खरेदी; फायदा कुणाचा ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशात उडिदाला चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे उडीद डाळीचे दर देखील तेजीत आहेत. पुढील काळात देखील उडिदाचे भाव चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार नाफेडमार्फत आयात उडिदाची खरेदी करणार आहे.

    पुढील दोन महिने सणांचे आहेत. उडदाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारला दर नियंत्रणासाठी उडीद पुरवठा करणं गरजेचं आहे. मात्र सरकारकडे उडदाचा केवळ ३५ हजार टन बफर स्टाॅक आहे. त्यातच सध्या देशात उडदाची आवक बाजारात वाढलेली नाही. त्यामुळं केंद्र सरकारने नाफेडला व्यापाऱ्यांकडून आयात उडदाची खरेदी करण्यास सांगितले आहे. त्यासाठी निविदाही मागवल्या आहेत. मात्र त्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा न काढता आयातदारांकडून निविदा मागवल्या आहेत. नाफेड २५ हजार ते ३५ हजार टन आयात उडीद खरेदी करण्याची शक्यता आहे. रोज २ हजार टन उडदाची खरेदी होईल. नाफेड आयात मालाची पहिल्यांदाच खरेदी करत नाही. यापुर्वी तीन वेळा नाफेडने अशी खरेदी केली आहे.

    आयात उडीद महाग

    सध्या आयात उडदाचे दर ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. जो व्यापारी कमी किमतीत उडीद देईल, त्याच्याकडून नाफेड खरेदी करणार आहे. पण कोणता व्यापारी चालू बाजारभावापेक्षा कमी दरात नाफेडला उडीद देईल? म्हणजेच आयात उडीद जास्त दरानेच खरेदी करावा लागेल. त्यासाठी सरकारला जास्त पैसा मोजावा लागेल.

    सरकारने शेतकऱ्यांचा माल बाजारात आला तेव्हा खरेदी केली असती तर ही वेळ आली नसती. उडीद आवकेच्या ऐन हंगामात नाफेड खरेदीत नसल्यानं खुल्या बाजारात शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांपेक्षाही कमी दर मिळाला. नाफेडने या काळात खेरदी केली असती तर शेतकऱ्यांनाही किमान हमीभाव मिळाला असता, आणि सरकारलाही ६ हजार ३०० रुपये क्विंटलने उडीद खरेदी करता आला असता.

    विदेशातील शेतकरी, व्यापाऱ्यांना फायदा

    देशातील उत्पादन कमी झाल्यानंतरही सरकारने हमीभाव खरेदीचा आधार दिला नाही. त्यामुळं यंदा शेतकरी पर्यायी पिकांकडे वळाले आहेत. परिणामी चालू हंगामात लागवड कमी झाली. सरकारवर आयात उडीद खरेदी करण्याची वेळ आली. त्याऐवजी सरकारने खरेदीत उतरून बाजाराला आधार दिला असता तर उत्पादन कमी राहिल्यानं खुल्या बाजारातही दर सुधारले असते. पण असं झालं नाही. सरकारनं देशातील शेतकऱ्यांचं भलं करण्याऐवजी म्यानमारमधील व्यापारी आणि शेतकऱ्यांचचं भलं करण्याचं ठरवलंय की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

    संदर्भ : ऍग्रोवन

  • शेतकऱ्यांना फटका ! बटाटा आणि टोमॅटोच्या दरात मोठी घसरण

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, जून महिन्यात टोमॅटोला प्रति किलो ८० ते १०० रुपयांचा भाव मिळत होता मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो आता १५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. बटाट्याच्या दरात 30 टक्क्यांची तर टोमॅटोच्या दरात 20 टक्क्यांची घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

    दुसरीकडे बटाट्याची देखील अशीच काहीशी अवस्था आहे. पंधरवड्यापूर्वी घाऊक बाजारात एक किलो बटाट्याची किंमत 20 रुपये होती. ती आता 14 ते 16 रुपये प्रति किलोपर्यंत घसरल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. किंमती कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावरही जाणवत आहे. तिथे किंमती 25 ते 30 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

    यामुळे उतरले दर

    सध्या बटाट्याच्या दरात 30 टक्क्यांची तर टोमॅटोच्या दरात 20 टक्क्यांची घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. दर कमी झाल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बटाटा व्यापाऱ्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेने पीक रोखून धरले होते, परंतू, तसे झाले नाही. व्यापाऱ्यांना साठा सोडण्यास भाग पाडले आहे. त्यामुळं किमतींवर परिणाम झाला आहे. तर यावर्षी टोमॅटोचं उत्पादन चांगले झाले असताना दर खाली आले आहेत. बटाटा आणि टोमॅटोच्या पुरवठ्यात वाढ झाली आहे. पुरवठा सुधारल्यानं किंमती घसरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, किंमती आणखी वाढतील असे वाटल्यानं व्यापाऱ्यांनी स्टॉक रोखून धरला होता. मात्र, अलीकडच्या काही महिन्यांत बटाट्याचे भाव स्थिर राहिले होते. त्यामुळं किंमती आणखी वाढणार नाहीत, असे समजल्यानेच व्यापाऱ्यांनी बटाटा विक्रीसाठी बाहेर काढला आहे.

    आजचे टोमॅटो बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    01/09/2022
    कोल्हापूर क्विंटल 220 500 1700 1100
    खेड-चाकण क्विंटल 308 600 1000 800
    श्रीरामपूर क्विंटल 26 1000 1200 1100
    सातारा क्विंटल 90 800 1300 1000
    मंगळवेढा क्विंटल 123 100 900 600
    राहता क्विंटल 28 1000 1500 1200
    कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 18 1560 2000 1830
    पुणे लोकल क्विंटल 1962 500 1200 850
    पुणे- खडकी लोकल क्विंटल 17 800 1400 1100
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 24 800 1200 1000
    पुणे-मोशी लोकल क्विंटल 325 800 1200 1000
    नागपूर लोकल क्विंटल 700 2000 2200 2150
    चांदवड लोकल क्विंटल 14 350 1000 700
    वाई लोकल क्विंटल 60 500 1300 900
    कामठी लोकल क्विंटल 24 1500 2000 1800
    सोलापूर वैशाली क्विंटल 760 100 1000 500
    जळगाव वैशाली क्विंटल 35 700 1000 800
    नागपूर वैशाली क्विंटल 700 1700 2000 1875
    भुसावळ वैशाली क्विंटल 34 1000 1000 1000

    आजचे बटाटा बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    01/09/2022
    जळगाव क्विंटल 200 1300 1900 1700
    चंद्रपूर – गंजवड क्विंटल 180 1600 2000 1800
    खेड-चाकण क्विंटल 800 1700 2200 2000
    श्रीरामपूर क्विंटल 197 1700 2100 1900
    राहता क्विंटल 65 2000 2200 2100
    सोलापूर लोकल क्विंटल 1277 800 2450 1500
    सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 641 1800 2300 2050
    पुणे लोकल क्विंटल 6027 1700 2200 1950
    पुणे- खडकी लोकल क्विंटल 7 1400 1600 1500
    पुणे-मोशी लोकल क्विंटल 624 1300 1800 1550
    नागपूर लोकल क्विंटल 2100 1500 1800 1725
    वाई लोकल क्विंटल 20 2000 2200 2100
    कामठी लोकल क्विंटल 19 2000 2500 2400

  • खुशखबर ! जळगावात कापसाच्या मुहुर्तालाच मिळाला 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर




    खुशखबर ! जळगावात कापसाच्या मुहुर्तालाच मिळाला 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यंदाच्या खरिपात देखील कापसाची चांगली लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.अशातच कापूस उत्पदक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. जळगावातल्या बोदवड बाजारपेठ मध्ये कापसाला मुहुर्तालाच 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

    केळीनंतर जळगावात कापसाचेही चांगले उत्पादन घेतले जाते. जळगावातील बोदवड इथेही खरेदीचा मुहूर्त करण्यात आला. यावेळी सातगाव डोंगरी बाजार पेठेत विक्रमी असा सोळा हजार रुपये प्रति क्विंटल भाव काढण्यात आला आहे. मात्र, केवळ 67 किलो कापूस या ठिकाणी खरेदी करण्यात आला. सोळा हजार हा भाव कायम राहणार नसला तरी दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव हा कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान आहे.
    कापूस खरेदीचा हंगाम अजून सुरु व्हायचा असला तरी अनंत चतुर्थी निमित्ताने कापूस खरेदी करण्याची खानदेशात परंपरा आहे. या परंपरेनुसार काल (31 ऑगस्ट) धरणगाव जिनिंग असो तर्फे कापूस खरेदी मुहूर्त करण्यात आला.

    कोणत्या बाजारपेठेत किती दर मिळाला

    बोदवड बाजारपेठ: 16000 रुपये
    सातगाव डोंगरी : 14 हजार 772 रुपये
    बाळद : 11 हजार 551 रुपये
    धरणगाव : 11 हजार 153 रुपये
    कासोदा : 11011 रुपये
    कजगाव : 11000 रुपये

     

    error: Content is protected !!





  • ‘… माझ्याकडून त्यांना 2 घरं, आजच भूमीपूजन’, मेळघाटात अब्दुल सत्तारांची क्विक ऍक्शन ; वाचा नेमकं काय घडलं ?




    ‘… माझ्याकडून त्यांना 2 घरं, आजच भूमीपूजन’, मेळघाटात अब्दुल सत्तारांची क्विक ऍक्शन ; वाचा नेमकं काय घडलं ? | Hello Krushi









































    हॅलो कृषी ऑनलाईन : राजकीय डायलॉगबाजीसाठी प्रसिद्ध असलेले अब्दुल सत्तार यांनी सध्या शिंदे सरकारच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाला आजच सुरुवात करण्यात आली असून काल रात्री कृषी मंत्र्यांनी तिथल्या शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम केला होता. दरम्यान राज्यभरात काल पावसाने हजेरी लावली. सत्तार ज्या शेतकऱ्यांच्या घरी थांबले होते तिथे पाणी गळत होते. त्यानंतर सत्तारांनी तत्काळ… माझ्याकडून या दोन्ही शेतकऱ्यांना चांगली घरं बांधून मिळतील, असं आश्वासन दिलं.

    केवळ आश्वासन देऊन ते थांबले नाहीत तर आज गुरुवारी सकाळी लगेच जमिनीचं मोजमाप सुरु झालं आणि त्याचं भूमीपूजन करणार असल्याचंही सत्तारांनी जाहीर केलं.. त्यामुळे मेळघाटात कृषीमंत्र्यांच्या दौऱ्याची सध्या चांगलीच हवा झाली आहे.

    बुधवारी रात्री ते अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाटमधील साद्राबाडी या गावात पोहोचले. येथील चुन्नीलाल पटेल यांच्या घरी त्यांनी अत्यंत साधेपणाने रानभाजी आणि भाकरीचा आस्वाद लुटला. तर सुनील धांडे यांच्या घरी मुक्काम केला. शैलेंद्र सावलकर यांच्याही घरी त्यांनी भेट दिली. सुनील धांडे आणि शैलेंद्र सावलकर यांची घरं रात्री गळत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना माझ्याकडून घरं बांधून देणार, असं आश्वासन सत्तारांनी दिलं. आज त्याचं भूमीपूजनही होणार आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नाला देखील येणार असल्याचं सत्तारांनी सांगितलं.

     

    error: Content is protected !!





  • ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाला मेळघाटातून सुरुवात ; कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घोषणा केलेल्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाची सूरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरुवात अमरावती येथील साद्राबाडी या गावापासून करण्यात आली आहे. काल पासूनच कृषिमंत्री आणि अधिकारी या गावात दाखल झाले.

    काल रात्रीच्या वेळी साद्राबाडी गावातील शेतकरी शैलेंद्र सालकर यांच्याकडे कृषी मंत्री अब्दुल सत्तार मुक्कामी राहिले होते. कृषिमंत्री गावात पोहचल्यानंतरण या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. आज मेळघाटातील साद्राबाडी या गावातून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. आज दिवसभर सत्तार हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी हे संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणार आहेत. तसेच प्रत्येकांच्या अडचणी समजून घेणार आहेत.

    योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत

    यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की , मी इथे आल्यापासून शेतकऱ्यांची दिनचर्या, त्यांची दैनंदिनी, त्यांच्या अडचणी समजून घेण्याच्या प्रयत्न करीत आहे. इथे आल्यानंतर लक्षात आले की, सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचतच नाही. अनेक योजनांचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. आज दिवसभर अधिकारी येतील त्यांच्या अडचणी त्या अडचणींवर उपाय कसे काढता येईल हे पाहणार आहोत. १०० दिवसाच्या या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. आय ए एस आणि इतर अधिकारी राज्यातल्या शेतकऱ्यांच्याकडे जातील. पूर्ण डेटा जमा करतील शेतकऱ्यांच्या एक दिवसाच्या उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोगा मंडला जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाय काढला जाईल असे सत्तार म्हणाले.

    असा असेल आजचा कार्यक्रम

    कृषीमंत्री सत्तार हे आज सकाळी दत्तात्रय पटेल यांच्यासोबत शेतात जातील. तिथे सोयाबीन फवारणी होईल आणि त्यांच्याशी चर्चा करतील. त्यांनतर बाजूलाच असलेल्या राजेश डावलकर यांच्या शेतात कापूस डवरणी/फवारणी होईल. नंतर बाबूलाल जावरकर यांच्या शेतात विद्युत पंप दिले त्याची पाहणी आणि सोयाबीन फवारणी होईल. तिथून ते किशोरीलाल धांडे यांच्या शेतात जाऊन त्यांच्या शेतात असलेल्या संत्रा बागेची पाहणी आणि संत्र्याची छाटणी, खत देणे, फवारणी होऊ शकते. त्यांनतर नंदलाल बेठेकर यांना विहीर दिली त्याची पाहणी करतील. तिथून अशोक पटेल यांच्या शेतात ठिंबक संच पाहणी करणार आणि रामगोपाल भिलावेकर यांच्या शेतात तुषार संच पाहणी. आणि मग बाटु धांडे यांच्या शेतात रोटावेटरची पाहणी आणि नथु गाडगे यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील आणि मग पुरुष बचत गट यांची अवजार बँक पाहणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार करणार आहेत.