Category: बातम्या

  • पुणे जिल्ह्यानंतर ‘या’ जिल्ह्यातील 109 जनावरांना ‘लंपी’ ची लागण

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान, गुजरात राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या लंपी या जनावरांतील त्वचा रोगाने राज्यात सुद्धा हात पाय पसरायला सुरुवाट केली आहे. सुरवातीला पुण्यातील जुन्नर येथील पशुधनाला या रोगाची बाधा झाली होती. आता अकोला जिल्ह्यात देखील या रोगाने शिरकाव केला आहे.

    अकोल्यातील मौजे निपाणा (ता. अकोला), तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यात जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १०९ जनावरांना या आजाराची लागण झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून, त्वचेचे खरड व रक्त नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

    दरम्यान, निपाणा येथील एका जनावरामध्ये ‘लम्पी’ या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवाल तपासणीनंतर सकारात्मक आला आहे. या रोगाचा प्रसार अन्य जनावरांमध्ये जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार संसर्गकेंद्रापासून १० किलोमीटर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

    आजाराची माहिती देण्यासाठी टोल फ्री नंबर जारी

    या रोगाचा फैलाव वाढल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज झाली असून पशुपालकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आजारासंबंधी माहिती देण्यासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आला आहे. यावर पशुपालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

     

  • चार एकरांवरील सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरवले रोटावेटर

    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात हवामान अतिशय लहरी राहिले. या लहरी हवामानामुळे मात्र पिकांवर रोग आणि किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वारंवार फवारण्या करूनही अपेक्षित उत्पादन न आल्यामुळे लातूर येथील औसा तालुक्यातील उजनी येथील शेतकऱ्याने चार एकरावरील सोयाबीन वर रविवारी रोटाव्हेटर फिरवले.

    अनियमित पाऊस आणि किडींचा हल्ला

    जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची समाधानकारक वाढ झाली नाही. पिके पिवळी पडली. त्यात गोगलगायीने पिकावर केलेला हल्ला त्यासोबतच खोडअळी, हळद्या आदींसारख्या संकटामुळे सोयाबीन पिकाचे या वेळी मोठे नुकसान झाले आहे. सुरुवातीला जून महिन्यात पावसाचा खंड पडला. जुलै महिन्यात पाऊस झाला. त्यामुळे या महिन्यात चार एकरांवर सोयाबीन पिकाची पेरणी केली. परंतु या महिन्यात सुरू झालेला संततधार पाऊस ऑगस्ट महिन्यापर्यंत थांबलाच नाही. परिणामी, पावसाने उघडीप न दिल्यामुळे नुकतीच उगवण झालेल्या कोवळ्या पिकांना हा पाऊस सोसला नाही आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले.

    सततच्या ओलीमुळे पिकांची वाढ झाली नाही. पिके पिवळी पडली. त्यानंतर आश्‍चर्यकारकपणे गोगलगायीने पिकावर हल्ला केला आणि बहुतांश पीक त्यांनी फस्त केले. एवढेच नाही तर उर्वरित पिकावर खोडअळी, हळद्या यांसारख्या रोगांची लागण झाली. या पार्श्‍वभूमीवर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याने वैतागून शेतकरी संतोष ढासले यांनी चार एकर वरील सोयाबीनवर रोटाव्हेटर फिरवून पीक नष्ट केले.

     

  • कृषी विभाग कापूस मूल्य साखळी विकास व उत्पादकता वाढ प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण शिबिर

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    कृषी विभागाच्या कापूस मूल्य साखळी विकास व उत्पादकता वाढ प्रकल्पाअंतर्गत पाथरी तालुक्यातील वडी येथे 30 ऑगस्ट रोजी शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

    या प्रशिक्षणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कीटक शास्त्रज्ञ डॉ . पी . आर . झंवर उपस्थित होते. याप्रसंगी पाथरी तालुका कृषी अधिकारी व्ही .एस . नांदे ,डॉक्टर एस एस शिंदे , कृषी पर्यवेक्षक बी यु शिंदे ,कृषी सहाय्यक एस डी चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर झंवर म्हणाले की ,शेतकऱ्यांना नेहमी भेडसावणाऱ्या कापूस पिकावरील बोंड आळी संदर्भात कामगंध सापळे योग्य पद्धतीने लावल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होतो.

    यावेळी नांदेड कृषी अधिकारी नांदे यांनी कापूस मूल्य साखळी साठी उपस्थित शेतकऱ्यांना महत्त्व विशद करून सांगितले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामदास कुटे , सुरेश कुटे , प्रवीण शिंदे ,प्रताप शिंदे आदींनी परिश्रम घेतले .

  • खत न मिळाल्याने शेतकरी नाराज, कृषी सल्लागाराला बांधले खांबाला

    हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे युग हे सोशल मीडियाचे युग असून दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील असून खते न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी कृषी सल्लागाराला खांबाला बांधले. हा व्हिडिओ एनडीटीव्हीच्या पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

    व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, खांबाला बांधलेली व्यक्ती फोनवर कोणाशी तरी आपली स्थिती शेअर करत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार खतांच्या काळाबाजारामुळे नाराज होऊन शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. देशात सध्या खरीप हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खतांची गरज मोठ्या प्रमाणावर आहे.

    व्हायरल व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत, आतापर्यंत 34 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि लोक खूप कमेंट करत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले आहे की – बिहारची ही रोजची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याबद्दलचा त्यांचा संताप न्याय्य आहे.

  • साखर कारखान्याचे खेटे मारणे बंद; शेतकऱ्यांना गाव शिवारात बसून करता येणार उसाची नोंदणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणीसाठी साखर कारखान्यांकडे खेट्या मारण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. शेतकऱ्यांना गावशिवारात बसून ऊस नोंदविण्यासाठी शासनाने ‘महाऊस नोंदणी’ मोबाईल ऍप चालू केले आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सोमवारी (२९) साखर आयुक्तालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या अॅप्लिकेशनचा प्रारंभ झाला.

    यावेळी बोलताना साखर आयुक्त म्हणाले की, ‘‘महाऊस नोंदणी अॅप्लिकेशनमुळे राज्यातील शेतकऱ्यांना नोंदणीचे पूर्ण स्वातंत्र्य प्रथमच मिळत आहे. ४० लाख शेतकरी या उपक्रमात आणले गेले आहेत. शेतकऱ्याने एकदा नोंदणी करताच त्याचा ऊस कापून नेण्याची सक्ती आम्ही करणार आहोत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस बिननोंदणीचा किंवा बिगरकापणीचा राहणार नाही.’’

    सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर संचालक उत्तम इंदलकर व यशवंत गिरी, सहसंचालक पांडुरंग शेळके, मंगेश तिटकारे व राजेश सुरवसे उपस्थित होते. ‘‘काही कारखाने ऊस नोंदी करीत नाहीत. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी आमच्याकडे येतात. आम्हाला मध्यस्थी करून नोंदी करून घ्याव्या लागतात. त्यामुळे या समस्येची जाणीव मला आहे. आता थेट अॅप उपलब्ध झाल्यामुळे ही समस्या कायमची दूर होईल. या प्रणालीत काही अडचणी सुरुवातीला येऊ शकतात. मात्र, त्या दूर केल्या जातील,’’ असे सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    अशी करा मोबाईलवर ऊस नोंदणी

    1)सर्वप्रथम गुगल प्लेस्टोअरमधून ‘महाऊस नोंदणी’ (Maha Us Nondani) नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे.

    2)क्यूआर कोड स्कॅन केल्यास थेट डाऊनलोड करण्याची सुविधा आहे.

    3)अॅप डाऊनलोड होताच ‘ऊस क्षेत्राची माहिती भरा’ या ठिकाणी बटण दाबावे. त्यानंतर ‘ऊस क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती’ असा भाग दिसू लागेल. त्यामध्ये आपला भ्रमणध्वनी, आधार क्रमांक, पूर्ण नाव टाकावे. त्यानंतर ‘पुढे’ असे बटण दाबावे.

    4)त्यानंतर ‘ऊस लागवडीची माहिती’ असा भाग दिसू लागेल. तेथे लागवडीचा प्रकार, उसाची जात, लागवड तारीख नमूद करावी. ऊस क्षेत्र गुंठ्यामध्ये भरावे. त्यानंतर ‘पुढे’ असे बटण दाबावे.

    5)‘ऊस पीक उपलब्ध माहिती कोणत्या कारखान्याला कळवू इच्छिता’ असे दिसू लागेल. तेथे तीन कारखान्यांची नावे येतील. त्यात किमान एक व कमाल तीन कारखान्यांची नावे टाकता येतील. ती नमुद करून पुन्हा त्यानंतर ‘पुढे’ असे बटण दाबावे.

    6)ही नोंद पूर्ण होताच शेतकऱ्याला ‘यानंतर आपणास धन्यवाद’ असा संदेश दिसू लागेल. त्यानंतर निवडलेले कारखाने शेतकऱ्याला स्वतःहून संपर्क साधतील.

    यानंतर ‘साखर कारखान्यातील आपली ऊस नोंद पाहण्यासाठी’ असा भाग दिसेल. त्याठिकाणी आपण साखर कारखान्यात नोंदविलेला भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. त्यानंतर ‘पुढे’ असे बटण दाबावे.

    ही नोंदणी होताच अॅपमध्ये केलेली नोंद, कारखान्याने स्वीकारलेली नोंद आणि कारखान्याने नाकारलेली नोंद अशी सर्व माहिती शेतकरी पाहू शकतील.

  • विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू




    विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळी आधीआवेशन सुरु असताना विधानभवनाच्या आवारात पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष भानुदास देशमुख (५६) यांचा जे.जे. रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील होते.

    देशमुख यांना गंभीर जखमी अवस्थेत जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर निवेदन करत असतानाच ही घटना घडली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित शेतकऱ्याने आयनॉक्सजवळ आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. तसेच तो १५ टक्के भाजला असल्याची माहिती सभागृहात दिली होती.

    मात्र, देशमुख यांनी आधीच रॉकेल ओतून घेतले होते. विधानभवनाच्या आवारात आल्यानंतर त्यांनी पेटवून घेतले. आग विझवल्यानंतर ते तळमळत पडले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. ते ४५ टक्के भाजल्याने अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

     

    error: Content is protected !!





  • साठवणूक केलेला कांदा सडतोय; कांद्याची शेती करायची की नाही ? कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याला रास्त भाव मिळत नाहीये . दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा उत्पादकांना आश्रू अनावर झाले आहेत. गतवर्षी पाऊस आणि पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला होता आणि यंदा मंडईची व्यवस्था. अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांना खर्चापेक्षा कमी दराने कांदा विकावा लागत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च 15 रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्त येत आहे, तर त्यांना सरासरी 1 ते 8 रुपयेच भाव मिळत आहे.

    उत्पादन खर्चही मिळेना

    उत्पादन खर्चही न मिळाल्याने कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे. यंदा केवळ कांद्याचेच नाही तर इतर भाज्यांचेही दर वाढले आहेत. यावेळी शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना स्वस्त दरात टोमॅटो विकावा लागत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आता कांद्याची लागवड करणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

    काय आहे शेतकऱ्यांचे म्हणणे ?

    नाशिकचे शेतकरी गणेश पाटील सांगतात की, त्यांनी उन्हाळ कांद्याची साठवणूक केली होती की काही महिन्यांनी त्यांना चांगला भाव मिळेल. मग बाजारात विक्री. परंतु, पावसामुळे साठवलेला कांदा सडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात कांदा विकावा लागत आहे. मात्र, आता काही जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात किंचित सुधारणा होत आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याची प्रतीक्षा आहे.

    शेतकऱ्यांची अडचण असेल तर त्यावर बोलले पाहिजे. एक तर कांद्याला योग्य भाव मिळत नाही आणि दुसरे म्हणजे साठवलेला कांदा आता सडत आहे. यामुळे आमचे लाखोंचे नुकसान होत आहे. दीर्घकाळ साठवलेल्या कांद्यावरही किडींचा परिणाम दिसून येत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

    राज्यातील कांदा बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    30/08/2022
    मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 9172 900 1500 1200
    कराड हालवा क्विंटल 126 200 1400 1400
    पुणे लोकल क्विंटल 8706 500 1500 1000
    पुणे- खडकी लोकल क्विंटल 11 1200 1400 1300
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 600 600 600
    पुणे-मोशी लोकल क्विंटल 206 500 1200 850
    येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 7000 200 1230 950
    लासलगाव उन्हाळी क्विंटल 18000 500 1441 1150
    मनमाड उन्हाळी क्विंटल 4000 300 1107 950
    29/08/2022
    कोल्हापूर क्विंटल 2795 500 1600 1000
    औरंगाबाद क्विंटल 1491 300 1200 750
    मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 14142 800 1500 1150
    श्रीगोंदा क्विंटल 323 1000 1550 1300
    सातारा क्विंटल 140 1000 1400 1200
    मंगळवेढा क्विंटल 147 250 1620 1260
    जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 57 200 1350 700
    कराड हालवा क्विंटल 99 500 1400 1400
    धुळे लाल क्विंटल 270 200 1200 800
    जळगाव लाल क्विंटल 575 350 1000 700
    नागपूर लाल क्विंटल 1000 1000 1500 1375
    साक्री लाल क्विंटल 34650 400 1175 850
    अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 408 100 1000 550
    सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 2686 500 1400 950
    पुणे लोकल क्विंटल 7448 600 1500 1050
    पुणे- खडकी लोकल क्विंटल 20 1200 1300 1250
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 1100 1100 1100
    पुणे-मांजरी लोकल क्विंटल 99 1100 1700 1500
    पुणे-मोशी लोकल क्विंटल 354 400 1200 800
    कामठी लोकल क्विंटल 14 1000 1600 1400
    संगमनेर नं. १ क्विंटल 3756 1200 1501 1350
    शेवगाव नं. १ क्विंटल 2406 1200 1500 1500
    कल्याण नं. १ क्विंटल 3 1000 1400 1200
    संगमनेर नं. २ क्विंटल 2253 900 1200 1050
    शेवगाव नं. २ क्विंटल 1365 900 1100 900
    संगमनेर नं. ३ क्विंटल 1096 500 900 700
    शेवगाव नं. ३ क्विंटल 960 200 800 800
    नागपूर पांढरा क्विंटल 1000 1000 1500 1375
    येवला उन्हाळी क्विंटल 17246 300 1315 950
    येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 9785 200 1167 950
    नाशिक उन्हाळी क्विंटल 4371 300 1200 1000
    लासलगाव उन्हाळी क्विंटल 26446 500 1400 1130
    लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 5850 400 1200 1050
    लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 21080 500 1431 1100
    मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 15000 300 1200 1050
    सिन्नर उन्हाळी क्विंटल 3579 100 1140 900
    सिन्नर- नांदूर शिंगोटे उन्हाळी क्विंटल 14675 150 1451 1050
    सिन्नर – नायगाव उन्हाळी क्विंटल 1500 200 1150 1050
    सिन्नर – पांढूरली उन्हाळी क्विंटल 971 100 1351 951
    सिन्नर – वडांगळी उन्हाळी क्विंटल 490 300 1280 1000
    राहूरी -वांबोरी उन्हाळी क्विंटल 12067 100 1600 900
    चाळीसगाव उन्हाळी क्विंटल 3900 200 1177 890
    चांदवड उन्हाळी क्विंटल 4200 500 1353 1050
    मनमाड उन्हाळी क्विंटल 7927 300 1305 1050
    लोणंद उन्हाळी क्विंटल 113 350 1400 1050
    सटाणा उन्हाळी क्विंटल 19210 225 1475 1100
    पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 29024 300 1740 1200
    पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 10445 400 1311 950
    दिंडोरी उन्हाळी क्विंटल 71 860 1155 1070
    वैजापूर उन्हाळी क्विंटल 6097 300 1400 1000
    देवळा उन्हाळी क्विंटल 11050 150 1285 1100
    राहता उन्हाळी क्विंटल 465 371 1260 900
    नामपूर उन्हाळी क्विंटल 18600 200 1365 1100
    नामपूर- करंजाड उन्हाळी क्विंटल 9602 200 1160 950

     

  • साखरेचं उत्पादन कमी करा, ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणारी शेती करा, नितीन गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन

    हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई येथे राष्ट्रीय सहनिर्मिती पुरस्कार २०२२ चे वितरण केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ऊस उत्पदक शेतकऱ्यांना उद्देशून गडकरींनी महत्वाचे विधान केले आहे देशातील साखरेचं अतिउत्पादन ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

    उद्योगाने साखरेचं उत्पादन कमी केले पाहिजे

    आपण पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीसाठी दरवर्षी 15 लाख कोटी रुपये खर्च करतो. त्यामुळं ऊर्जा आणि ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणारी कृषी उत्पादने घ्यायला हवीत. कृषी क्षेत्रामध्ये तशी विविधता आणण्याची गरज असल्याचं मत गडकरी याणी व्यक्त केलं. आपली 65 ते 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. आपला कृषी विकासदर केवळ 12 ते 13 टक्के आहे. ऊस उद्योग आणि शेतकरी हे आपल्या उद्योगवाढीचे इंजिन आहेत. त्यामुळं उसापासून महसूल वाढवण्यासाठी पुढील वाटचाल सहनिर्मिती असावी. उद्योगाने साखरेचं उत्पादन कमी केले पाहिजे. जास्तीत जास्त सहउत्पादनं, उपउत्पादनं घेतली पाहिजेत, भविष्यातील तंत्रज्ञानाची दृष्टी आत्मसात केली पाहिजे. नेतृत्वबळाच्या आधारावर ज्ञानाचं संपत्तीमध्ये रुपांतर केलं पाहिजे. यामुळं शेतकरी केवळ अन्न उत्पादकच नव्हे तर ऊर्जा उत्पादकही बनतील, असंही गडकरी म्हणाले.

    इथेनॉल निर्मितीवर भर दिला पहिजे

    पुढे बोलताना त्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिला ते म्हणाले, इथेनॉलची गरज खूप जास्त असल्यानं आपल्याला साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा लागेल असे गडकरी म्हणाले. गेल्या वर्षी इथेनॉल निर्मितीची क्षमता 400 कोटी लिटर इतकी होती. इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही खूप उपाय केले आहेत. बायोइथेनॉल वर चालवल्या जाणार्‍या पॉवर जनरेटरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉलची गरज भागवण्यासाठी नियोजन करण्याची उद्योगासाठी ही वेळ असल्याचं गडकरी म्हणाले. सरकारने भारतात फ्लेक्स इंजिन सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती यावेळी गडकरी यांनी उद्योग जगताला दिली. बजाज, हिरो आणि टीव्हीएस यांनी आधीच फ्लेक्स इंजिन बनवायला सुरुवात केली आहे. अनेक कार उत्पादकांनीही फ्लेक्स इंजिनवर चालणारी कार मॉडेल्स बनवण्याचे आश्वासन दिले असल्याचे गडकरींनी सांगितलं.

    ऊस तोडण्यासाठी कापणी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास वाव आहे. कापणी यंत्रे इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करू शकतात, त्यामुळे अर्थव्यवस्थेतलं एक वर्तुळ पूर्ण होणं शक्य होईल अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली. साखर उद्योगाला अनेक समस्या भेडसावत आहेत. वीज खरेदीचे दर तर्कसंगत करण्याची गरज आहे. काही राज्ये, केंद्र सरकारच्या धोरणानुसार दर देत नाहीत, हे ऊस उद्योग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसण्याचं एक कारण असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.

     

  • कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून 14 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी : कृषिमंत्री तोमर

    हॅलो कृषी ऑनलाईन : भारताची कृषी अर्थव्यवस्था खूप मजबूत असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. हे असेच चालू राहिल्यास भारत सर्वात मोठ्या संकटाचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम असेल, कारण कोविड संकटाच्या काळातही आपल्या कृषी क्षेत्राने स्वतःला सकारात्मकतेने सिद्ध केले आहे. कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्याबरोबरच त्यांच्या वाजवी किंमतीसाठी मोदी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटी रुपये दिले आहेत. त्यापैकी 14 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

    सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट (कजरी), जोधपूर येथे 4 नवीन सुविधांचे उद्घाटन करताना तोमर म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे आहे. आता त्यांनी मोठे ध्येय ठेवून उत्पादकता वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे. लागवड साहित्याची उपलब्धता वाढविण्यावर भर देत कजरी या बाबतीत पुढे गेल्यास केंद्र सरकार आपल्या स्तरावर पूर्ण सहकार्य करेल, असे सांगितले. कजरीने शुष्क प्रदेशात कृषी विकासासाठी अगणित संशोधन करून तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे आपल्या वाळवंटी भागासाठी तसेच संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे.

    अन्न निर्यातदार म्हणून भारताची ओळख

    तोमर म्हणाले की, भारत लवकरच बहुतांश कृषी उत्पादनांमध्ये प्रथम क्रमांकावर येईल. सध्या, बहुतेक कृषी उत्पादनांच्या बाबतीत भारत जगात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, शेतकऱ्यांची मेहनत, कृषी शास्त्रज्ञांचे योगदान आणि सरकारच्या धोरणांमुळे आज आपण अन्नधान्याच्या मुबलकतेसोबतच निर्यातदार देश म्हणून ओळख निर्माण केली आहे. धान्य कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे. हे क्षेत्र फायदेशीर करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

  • ‘वारणा’ आणि ‘गोकुळ’ कडून गायीच्या दूध खरेदी दरात वाढ; 1 सप्टेंबर पासून नवे दर लागू

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या वारणा आणि गोकुळ दूध समूह यांच्याकडून गायीच्या दूध दरात वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर २ रुपये दर वाढ केल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाने गाईच्या दूध खरेदी दरात एक रुपयांनी वाढ केली आहे,’’ अशी माहिती संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिली.

    म्हणून दुधाच्या दरात वाढ

    सध्याच्या परिस्थितीत पशुपालकांना पशुखाद्याच्या वाढलेल्या दराचा सामना करावा लागत आहे. याबाबत माहिती देताना डॉ. कोरे यांनी सांगितले की, ‘‘दूध उत्पादकांना वैरण टंचाईसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना आर्थिक झळ बसू नये म्हणून वारणा दूध संघाने १ सप्टेंबरपासून गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर २ रुपये प्रमाणे वाढविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता ३.५ फॅटला व ८.५ एसएनएफला तो ३२ रुपये झाला आहे.’’

    ‘‘दूध संघाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. महापूर, अवकाळी पाऊस अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. अल्पदरात पशू वैद्यकीय सेवा, विमा सुरक्षाकवच, व रेडी संगोपन यासारखे अनेक उपक्रम संघामार्फत राबविले जात आहे,’’ अशी माहिती कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली. संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकांउट्स व्यवस्थापक सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, विपणन प्रमुख अनिल हेर्ले आदी उपस्थित होते.

    तर दुसरीकडे गोकूळचा गाय दूध खरेदी दर ३. ५ फॅट व ८.५ एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर रुपये ३१ रुपये दर राहील, अशी माहिती पाटील यांनी दिली. संघाने गाय दूध खरेदी दरात वाढ चार वेळा करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येणार आहेत.