Category: सरकारी योजना

  • PM Kisan : योजनेसंदर्भांत वाचा महत्वाची अपडेट; अन्यथा मिळणार नाहीत योजनेचे पैसे

    हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे पीएम किसान (PM Kisan)  योजना होय. देशभरातील शेतकरी या योजनेच्या १२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना केंद्र सरकारने या योजनेत पारदर्शकता यावी याकरिता इ के वाय सी करणे बंधनकारक केले आहे. इ केवाय सी करण्याची अंतिम मुदत् 31 ऑगस्ट 2022 आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे. अन्यथा या योज़नेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत.

    सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी (PM Kisan)  प्रक्रिया 31 ऑगस्ट 2022 पर्यंत कण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर मुदतीत ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थीस पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही.

    तरी सर्व लाभार्थी यांनी www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल ऍप मध्ये OTP द्वारे मोफत e -KYC करता येईल(सोबत लिंक दिली आहे) किंवा नजिकच्या CSC केंद्राशी संपर्क साधुन आपली e-KYC तात्काळ करुन घ्यावी. अधिक माहितीसाठी (PM Kisan) कृषी विभागातील कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा. सोबत e-KYC करण्यासाठी लिंक दिलेली आहे.

    https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx

  • PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

    हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे पीएम किसान योजना होय. आता शेतकरी या योजनेच्या १२ हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या ई-केवायसीचे काम 100 टक्के पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत ही विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून गाव पातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क करणे तसेच विशेष शिबीरे घेण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

    ई-केवायसी करणे अनिवार्य

    –प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.
    –या योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मोहिमेद्वारे ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची माहिती संबंधित गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येणार आहे.
    –ग्रामपंचायत कार्यालय, चावडी, तलाठी कार्यालय, विकास संस्था, बँक, पतसंस्था यांच्या नोटीस फलकावरही तत्काळ लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
    — दवंडी देऊनही याबाबतची माहिती देण्यात येणार आहे.
    –ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच यांच्यामार्फत प्रलंबित यादीतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क करुन ई-केवायसीचे महत्व आणि कार्यपद्धती समजावण्यात येणार आहे.
    –मोबाईलद्वारे प्रक्रीया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.
    –तसेच नजिकच्या काळात सरकार सेवा केंद्रावरही याद्या उपलब्ध करुन देऊन त्याठिकाणी ई-केवासी पूर्ण करण्याचे काम करेल अशी माहितीही देण्यात आले आहे.

    ई-केवायसी प्रकरणी संनियंत्रणासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या नेमण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यकांना संबंधित गावात ई-केवायसीसाठी 29, 30 व 31 ऑगस्ट रोजी विशेष शिबीरे घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या तिनही दिवशी संनियंत्रण अधिकाऱ्यांनी गावांमध्ये उपस्थित राहून ई-केवायसीचे काम 100 टक्के पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

     

  • 2022-23 चालू योजना ! औषधे, तणनाशके, जिप्सम, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण याकरिता मिळेल ५० टक्के अनुदान





    2022-23 चालू योजना ! औषधे, तणनाशके, जिप्सम, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण याकरिता मिळेल ५० टक्के अनुदान | Hello Krushi






























    error: Content is protected !!

  • शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना; मानधन 65 हजार रुपये, अंतिम मुदत 22 ऑगस्ट, जाणून घ्या सर्व माहिती





    शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना; मानधन 65 हजार रुपये, अंतिम मुदत 22 ऑगस्ट, जाणून घ्या सर्व माहिती | Hello Krushi


































    error: Content is protected !!

  • Discount To The Beneficiaries Of PM Kisan Yojana





    Discount To The Beneficiaries Of PM Kisan Yojana































    error: Content is protected !!

  • Special Campaign Under The Scheme





    PM Kisan : Special Campaign Under The Scheme






























    error: Content is protected !!

  • सातबारा होणार हायटेक ! मिळणार विशेष क्यूआर कोड आणि आयडी नंबर





    सातबारा होणार हायटेक ! मिळणार विशेष क्यूआर कोड आणि आयडी नंबर | Hello Krushi
































    error: Content is protected !!