Category: Animal Husbandry

  • Following These 10 Breeds Of Cattles

    हॅलो कृषी ऑनलाईन : नोकरीचा काही भरवसा नाही त्यामुळे सध्या लोक शेती आणि पशुपालन (Animal Husbandry) यामध्ये आपले नशीब आजमावताना पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत पैसा मिळवण्यासाठी पशुपालन हा एकमेव चांगला पर्याय आहे. ज्यामुळे तुम्हाला 12 महिने चांगली कमाई मिळेल. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला शेळी, म्हैस आणि गाय यांसारख्या प्राण्यांच्या (Cattle Breeds) अशा जातींची (Top Animals Breeds) नावे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला नफा कमावता येईल या सर्व जाती भारतातील इतर प्रांतात आढळतात…

    १) सर्वप्रथम आपण शेळींच्या जातींबद्दल बोलू कारण आपल्या देशात शेळीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते.यावर शासनाकडून अनेक योजना आणि अनुदानही दिले जाते. पशुपालक शेळीच्या दुधापासून तसेच त्याच्या मांसापासून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या जातींबद्दल.
    जमुनापुरी

    शेळीच्या जाती : ब्लॅक बेंगाल, बारबरी,बीटल,सिरोही,अत्तापडी काला,चंगथगी,चेगु,गड्डी,गंजम

    २)म्हैस पालन, पशुपालक शेतकऱ्यांचे आवडते पालन, दुसऱ्या क्रमांकावर येते, कमी गुंतवणुकीतच त्याचा भरपूर फायदा होतो. कारण म्हशीचे दूध भरपूर विकले जाते. काळाच्या ओघात दुधाची मागणी मोठ्या (Top Animals Breeds) प्रमाणात वाढत आहे. कारण याच्या दुधात फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. याशिवाय त्याच्या दुधापासून दही, चीज, मलई इ. दूध कंपन्याही म्हशीचे (Buffalo Breeds) दूध अधिक प्रमाणात पशुपालकांकडून खरेदी करतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या म्हशीच्या जाती पशुपालकांसाठी फायदेशीर आहेत….

    म्हैशीच्या जाती : मुर्रा,सुरती,जाफराबादी,मेहसाना,भदावरी,गोदावरी,नागपुरी,सांभलपुरी,तराई,टोड़ा,साथकनारा

    ३)शेवटी गाईंचे संगोपन होते जे पशुपालक मोठ्या संख्येने करतात. कारण गरोदर महिला आणि नवजात बालकांसाठी गाईचे दूध अत्यंत गुणकारी आहे.डॉक्टर देखील फक्त गाईचे दूध पिण्याची शिफारस (Top Animals Breeds) करतात. त्याच्या दुधापासून अनेक प्रकारची उत्पादनेही तयार केली जातात. चला तर मग जाणून घेऊया अशा परिस्थितीत कोणत्या गायींचे पालन करावे.

    गायीच्या जाती (Cow Breeds) : साहिवाल गाय,रेड सिंधी गाय,कांकरेज गाय,मालवी गाय,नागौरी गाय,थारपारकर गाय,पोंवर गाय,भगनाड़ी गाय,दज्जल गाय,गावलाव गाय हरियाना गाय,अंगोल या नीलोर गाय, राठी गाय,गीर गाय,देवनी गाय, नीमाड़ी गाय

     

     

  • हिरव्या चाऱ्याच्या संकटाला तोंड देण्यासाठी ‘अझोला’ ठरू शकतो चांगला पर्याय, वाढते दुधाचे उत्पादन

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागातील पशुपालक चारा टंचाई आणि महागाईशी झुंज देत आहेत. उशिरा झालेला पाऊस आणि त्यानंतर मुसळधार पाऊस यामुळे हे संकट अधिकच गडद झाले आहे. काही राज्यांमध्ये शेतकरी भाताचा पेंढा बनवून त्यांच्या जनावरांना चाराही घालतात, पण तेही अतिवृष्टीमुळे कुजले आहे. ज्या राज्यांमध्ये चाऱ्याचे संकट आहे, त्या राज्यात अझोलाचा वापर पशुसंवर्धनाच्या कामात करता येईल, असे कृषी शास्त्रज्ञ सांगतात.

    ज्या राज्यांमध्ये हिरव्या चाऱ्याचे संकट आहे अशा राज्यांतील पशुपालक शेतकरी अधिकतर अझोला वापरतात. हे पाण्यात आढळते आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे दुधाचे प्रमाण वाढते. म्हणजेच महागडा हिरवा चारा विकत घेऊन पोसणाऱ्या पशुपालकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. अझोला पशुपालनासाठी अमृत आहे असे म्हणतात.

    अझोला म्हणजे काय?

    अझोला ही पोषक तत्वांनी युक्त जलचर वनस्पती आहे. त्याच्या पानांमध्ये हिरवे शेवाळ आढळते. पशुखाद्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तयार करण्यासाठी जास्त जागा लागत नाही. तुम्ही 95 टक्के अझोला पाण्यातून बाहेर काढता आणि दुसऱ्या दिवशी तो पुन्हा 100 टक्के जागा व्यापेल. म्हणजे ते तयार होईल. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढू शकते.

    अझोलाची निर्मिती कशी होते?

    ज्या पशुपालकांना अजोलाचे उत्पादन करायचे आहे ते विटांनी वेढून प्लास्टिक वापरून डबक्याप्रमाणे हाऊज तयार करतात आणि त्यामध्ये पाणी सोडून अझोलाचे वनस्पती सोडतात. अजोलाला जमिनीच्या पृष्ठभागापासून पाच ते 10 सेमी पाण्याची पातळी आवश्यक असते. यासाठी तापमान 25-30 अंश असावे. पर्यावरण आणि हवामानाचा अझोला उत्पादनावर विशेष परिणाम होत नसल्यामुळे, ते देशातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये घेतले जाऊ शकते.

    किती प्रथिने आढळतात

    दुभत्या जनावरांच्या पोषण आणि आरोग्यासाठी हिरवा चारा हा महत्त्वाचा स्रोत असल्याचे कृषी शास्त्रज्ञ सांगतात. मात्र हिरव्या चाऱ्याचा प्रश्न बिकट आहे हेही सध्याचे कटू सत्य आहे. अझोलामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असल्यामुळे ते गाई आणि म्हशींच्या वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी उपयुक्त आहे. शास्त्रज्ञांच्या मते, जनावरांच्या चाऱ्यात मिसळण्यापूर्वी ते चांगले धुवावे. यामध्ये 25 ते 30 टक्के प्रथिने असतात. असा दावा केला जातो की प्रति किलोग्रॅम अझोला तयार करण्यासाठी 1 रुपये पेक्षा कमी खर्च येतो.

     

     

     

     

     

  • Facts About Lumpy Disease, In Maharashtra

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान आणि हरियाणा राज्यात पशुपालकांना नाकीनऊ आणणाऱ्या लंपी (Lumpy) या त्वचारोगाचा महाराष्ट्रातही फैलाव होत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये देखील घबराहट निर्माण झाली आहे. वाढत्या प्रादुर्भावाबरोबर या रोगाला घेऊन काही अफवाही पसरत आहेत. राजस्थानातील अनेक गावांमध्ये तर नागरिकांनी दूध पिणेच बंद केले आहे. दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा आता पसरत आहे. परिणामी शहरी भागातील दूध पुरवठ्यावर देखील याचा परिणाम झाला आहे. मात्र, लम्पीग्रस्त जनावरांच्या दूधापासूनही माणसांना कोणताही धोका नाही. पण कच्चं दूध न पिता नेहमी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.

    लम्पी हा एक त्वचा रोग असून यामुळे जनावरांचे डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होते. विशेष म्हणजे गायी आणि म्हशीमध्येच या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला असला तरी दूध उकळून पिल्यावर कोणताही धोका राहणार नाही.

    धार काढताना काळजी घ्या

    लम्पी स्कीन हा संसर्गजन्य रोग असला तरी त्याचा माणसांना काही धोका नाही. मात्र, लम्पीग्रस्त (Lumpy) जनावराची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. शिवाय या जनावरांच्या दूधापासूनही काही धोका नाही. पण अशा जनावरांचे दूध उकळून पिले तर अधिक चांगले असा सल्ला पशूसंवर्धन विभागाने दिला आहे.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची (Lumpy) आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

     

  • लंपीला अटकाव करण्यासाठी बैलगाडा शर्यतीलाही बंदी घातली पाहिजे : माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, कराड

    राजस्थान, हरियाणा, राज्यात धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातही लंपीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. सातारा जिल्ह्यातही लंपी चा प्रादुर्भाव झाला असून एकाच जनावराचा मृत्यू देखील झाला आहे. याचा संदर्भात कराड येथील शासकीय विश्रामगृह पाळीव जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी स्किन’ या संसर्गजन्य रोगाच्या उपाययोजनां संदर्भात पशुसंवर्धन विभागाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना लम्पी स्किन आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी बैलगाडी शर्यतींलाही बंदी घातली पाहिजे, अशी मागणी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

    याबाबत बोलताना पाटील म्हणाले, लम्पी स्किनचा खिलारे गाई, खिलार बैल यांच्यावर जास्त परिणाम होतो, त्यांना पहिले लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे सध्या जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. बैलगाडी शर्यंतींना परवानगी मिळाल्याने सध्या मोठ्या प्रमाणावर खिलार जातीच्या बैलाच्या शर्यंती होत आहेत. तेव्हा शर्यंतीमुळे जनावरे एकत्रित येण्याचे मोठे प्रमाण बैलगाडी शर्यंतीमुळे होत आहे. तेव्हा लम्पी स्किन आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी बैलगाडी शर्यतींही बंदी घातली पाहिजे, अशी मागणी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

    या संसर्गजन्य रोगविषयी लोकांमध्ये जनजागृती करणे गरजचे आहे, त्यासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या गावी शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यावंर जाऊन आवश्यकत्या उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशा सूचना आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केल्या.

    त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीस कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.अनिल देशपांडे, सहाय्यक आयुक्त लघु पशुचिकित्सालय कराड डॉ. बी. डी. बोर्डे, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती कराड डॉ. दुर्गदास उंडेगांवकर, सर्व पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक उपस्थित होते.

  • सातारा जिल्ह्यात लंम्पीचा प्रादुर्भाव; तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या मंत्री देसाईंच्या सूचना

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सातारा

    लंम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. हा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लंम्पी चर्म रोग प्रादूर्भावाची सद्यस्थितीचा आढावा श्री. देसाई यांनी मंत्रालय, मुंबई येथून दूरदृश्यप्रणाली द्वारे घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (दूरदृश्यप्रणाली द्वारे), सातारा जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    देसाई म्हणाले, लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिसरातील पशुधनास तातडीने लसीकरण करावे. ज्या गावांमधील पशुधनास लंम्पी आजारची लागण झाल्याचे समजतात तात्काळ भेट देवून पशुधनास उपचार करावे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने सज्ज रहावे. लंम्पी आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाकडूनही मदत केली जाईल. जिल्ह्यातील पशुपालकांनी पशुधनास लंम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून औषधोपचार करावेत, असेही आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी केले. जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यात लंम्पी चर्म रोगाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

    जिल्ह्यात 46 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून त्यापैकी 17 हजार 241 लसमात्रांचा वापर करुन पशुधनास लसीकरण करण्यात आले. 26 हजार 659 लसमात्रा शिल्लक असून त्याद्वारे लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे. तसेच पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडे 2 लाख लसमात्रांची मागणी करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी बैठकीत सांगितले.