Category: Beed News

  • पीक विम्यासाठी माजलगावातील शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री सावेंचा ताफा





    पीक विम्यासाठी माजलगावातील शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री सावेंचा ताफा | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. ऐन दीपावली तोंडावर असताना शेतकऱ्यांचे पीक वाया गेल्यामुळे सण साजरा करायला पैसे नाहीत अशी अवस्था आहे. सरकार मदत करेल अशी आशा आहे मात्र अद्यापही पंचनामे देखील झाले नाहीत. अशात बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे माजलगावचा दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान शेतकरी संघर्ष समितीनं त्यांचा ताफा अडवल्याची घटना घडली. अचानक ताफा अडवल्यानं शेतकरी आणि पोलिसांमध्ये थोडा काळ तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

    शेतकरी संघर्ष समितीने अडवला ताफा

    परतीच्या पावसानं बीड जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे तर सोडा मात्र पीक विम्याची अग्रीम रक्कम देखील मिळाली नसल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत. पालकमंत्री अतुल सावे हे माजलगावचा दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान शेतकरी संघर्ष समितीने त्यांचा ताफा अडवल्याचा प्रकार घडला. अचानक ताफा अडवल्यानं शेतकरी आणि पोलिसांत थोडा काळ तणाव निर्माण झाला होता. ओल्या दुष्काळाची जिल्ह्यावर गडद छाया असतानाच पालकमंत्री अतुल सावे मात्र बीडचं पालकत्व स्वीकारल्यानंतर केवळ दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यात आले आहेत. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

    error: Content is protected !!





  • मुसळधार पावसामुळे 4 हजार कोंबड्या पाण्यात बुडाल्या, महिला शेतकऱ्याने रडत रडत सांगितली व्यथा

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील तयार पिके नष्ट होत आहेत. त्याचवेळी बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय पावसामुळे जनावरेही मरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या.

    पावसामुळे पोल्ट्री फर्मचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पावसामुळे पोल्ट्रीमध्ये तुडुंब पाणी भरल्याने ४ हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्याचे पीडित शेतकरी खंडू झगडे यांनी सांगितले. आता फक्त काही 100 कोंबड्या उरल्या आहेत. याशिवाय कोंबड्यांना खाण्यासाठी 95 पोत्यांमध्ये भरलेले धान्यही पावसाच्या पाण्याने वाहून गेले. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

    महिला शेतकऱ्याने तिचा त्रास कथन केला

    जिल्ह्यातील महिला शेतकरी कुसुमबाई झगडे म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे आमच्या म्हशी, शेळ्या, कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या. यामध्ये आपण खूप काही गमावले आहे. अगोदरच आमची गुरे लंपी त्वचेच्या आजाराने मरत आहेत आणि आता उरलेली जनावरे अवकाळी पावसामुळे मरत आहेत. असे घर चालते. आमची आर्थिक स्थिती बिकट झाली. अतिवृष्टीमुळे पिकांबरोबरच जनावरेही पाण्यात बुडाली होती.

    पिकांचे अधिक नुकसान

    राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कापूस पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांची काढणी सुरू आहे. अशा स्थितीत परतीच्या पावसाने तयार पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे शेतकरी सांगतात.राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली असली, तरी ती किती दिवस शेतकऱ्यांच्या हाती येईल, याची कल्पना नाही. महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

    त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत शेतात उभे राहून राज्य सरकारचा निषेध केला. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सर्वाधिक सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.

     

     

     

     

  • विरोधी पक्षनेते आंबादास दानवेंचा बीड दौरा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची घेतली भेट

    हॅलो कृषी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची ते भेट घेत आहेत. आज बीड शहराजवळच्या सामनापूर येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी दानवे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताना एका तरुण शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. यावेळी बोलतांना तरुण म्हणाला की, अशा आर्थिक परिस्थितीत नोकरी नाही,कुठे काम मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील तरुण प्रचंड नैराश्यात गेले आहेत. भविष्यात आपलं काय होणार आहे हे कुणालाच काहीच कळत नाही, असे सांगताना तो ढसाढसा रडायला लागला.

    यावेळी बोलताना आंबादास दानवे म्हणाले की, राज्यात दिवसाला दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करतायत. या खोके सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यात गेल्या दोन महिन्यात जवळपास 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान आज बीड जिल्हातील समनापुर येथील नवनाथ शेळके या आत्महत्याग्रस्त शेकऱ्याच्या घरी सांत्वनपर भेट देत कुटुंबियांशी संवाद साधत प्रशासनाला लवकरात लवकर मदत देण्याचे सुचना केल्या आहेत. दिड लाख रुपयांचे कर्ज व्याजासह साडेपाच लाखांवर जाऊन पोहचले. कर्ज कसे फिटणार याची चिंता उराशी घेऊन या शेतकऱ्याने मुत्यू जवळ केला, असल्याचं दानवे म्हणाले.

    अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीं. फक्त घोषणाचा पाऊस होतोय. अतिवृष्टी, बॅंकांची थकबाकी, यंदाची खरीप व दुबार पेरणीसाठी खाजगी सावकारांकडून 15-20 टक्क्यांनी कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे खोके सरकारला हात जोडून विनंती आहे की, दिल्लीश्वरांच्या समोर लोटांगन तसेच तुमच्या सोबत आलेल्या आमदारांची नाराजी नाट्य दुर झाले असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे, अशी टीका दानवे यांनी शिंदे सरकारवर केली.

  • बीड जिल्ह्यात गोगलगायींनंतर आता घोणस अळीचे संकट ; परिणाम केवळ पिकांवर नाही तर शेतकऱ्यांवर सुद्धा

    हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाल्यानंतर बीड जिल्ह्यात गोगलगायींच्या प्रदूरभावामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता आणखी एक नवे संकट बीड मधल्या शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आता बीड मध्ये घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव होतो आहे. महत्वाचे म्हणजे या अळीचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होताना पहायला मिळत आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आहे की, बीड जिल्ह्यतल्या आष्टी तालुक्यातल्या शिराळा गावात घोणस आळी चावल्यामुळे शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे. घोणस नावाची एक अळी जी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. घोणस नावाची विषारी अळी अंगावर पडून तिने चावा घेतल्यानं असह्य वेदना झाल्यानं तीन शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली आहे. यामुळं शेतकरी वर्गाच्या मनात धडकी भरली आहे. हा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील शिराळा गावात उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी दिली आहे.

    काय कराल उपाय ?

    –ही अळी म्हणजे कोणत्याही पिकावरील किड नाही तर एक रानटी गवतावरील अळी आहे.
    –जास्त प्रमाणात जर या अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर क्लोरोसायफर फवारणं गरजेचं असल्याची माहिती देखील गोरख तरटे यांनी दिली.
    –परंतू जास्त प्रमाणात प्रादुर्भाव नसेल तर काही फवारण्याची गरज नाही.
    — शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी म्हणून अळीपासून संरक्षण करण्यासाठी फुल कपडे घालणे गरजेचे आहे.
    — ही अळी शरीरावर येऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केलं आहे.

    अळी चावल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात ?

    –घोणस अळीने चावा घेतल्यास असाह्य वेदना होतात
    — उलट्या होतात.

    दरम्यान, जिथे ही अळी आढळली तिथे जाऊन कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे.