Category: CMV Disease On Banana

  • जाणून घ्या; केळी पिकातील CMV रोग नियंत्रण आणि उपाय

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या केळी पिकावर CMV (Cucumber Mosaic Virus) रोगाचा प्रादुर्भाव आहे. कारण गेल्या १५ ते २० दिवसांचे वातावरण (ढगाळ वातावरण आणि कमी सूर्यप्रकाश) हा रोग पसरवणाऱ्या किडींच्या वाढीसाठी अनुकूल असल्याने काही दिवसांपूर्वीच या रोगाचा प्रसार सुरू झाला आहे.

    रोगाच्या प्रादुर्भावाची कारणे आणि नियंत्रणाचे उपाय

    –CMV रोग ऍफिड्स, थ्रिप्स, व्हाईटफ्लाय, माश्या इत्यादींमुळे होणा-या कीटकांद्वारे गवत/वनस्पतीपासून रोपापर्यंत पसरतो.
    –सीएमव्ही रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम रोगग्रस्त केळीचे झाड खोदून नष्ट करावे.
    –केळीची बाग तणमुक्त ठेवावी – बागेतील किंवा शेतातील बांधातील सर्व तण/तण काढून टाका.
    –मिरची यांसारखी पिके/भाजीपाला यांसारखी पिके केळीच्या बागेत किंवा फळबागांमध्ये कोणत्याही वेलीच्या पिकासह लावू नका (काकडी, वाल, दोडकी, दुधीभोळा गंगाफळ, चवळी, कारले इ.).

    कसे मिळवाल नियंत्रण ?

    या रोगाच्या नियंत्रणासाठी केळीच्या झाडावर ६-७ दिवसांच्या अंतराने अशा प्रकारे फवारणी करावी, बागेच्या कुंपणावरही फवारणी करावी.
    (शोषक कीटकांच्या नियंत्रणासाठी उपलब्ध कीटकनाशके, कीटकनाशक + एसीफेट + कडुनिंब तेल वापरा)
    उदाहरणार्थ – 1) Imidacloprid- (Imida/Confidor) 15 ml किंवा
    2 – Acetamiprid – (Tatamanic) 8 ग्रॅम किंवा
    3-थिओमेथॉक्सम 25% – (ऑक्टो.रा) 10 ग्रॅम किंवा
    4 – प्रोफेनोफॉस – 20 मि.ली.
    5 – Imidacloprid-70wg (Admir) – 5 g किंवा
    6 – Fluonicamide – (Ulala) – 8 g (किंवा बाजारात उपलब्ध अनेक कंपाऊंड कीटकनाशके).

    यामध्ये एसीफेट – १५ ग्रॅम + निंबोळी तेल – ३० मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

     

     

  • केळीवर सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकऱ्याने 5 एकर बागेवर फिरवला रोटाव्हेटर




    केळीवर सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकऱ्याने 5 एकर बागेवर फिरवला रोटाव्हेटर | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी केळीला चांगला भाव मिळाला आहे. शिवाय सणासुदीमुळे केळीच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. असे असताना एका शेतकऱ्याला आपल्या तब्बल ५ एकर केळीच्या बागेवर रोटाव्हेटर फिरवण्याची नामुष्की आली आहे. होय…! नंदुरबार जिल्ह्यतील शहादा तालुक्यात केळी पिकावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांवर कष्टाने जोपासलेल्या केळीच्या बागा नष्ट करण्याची वेळ आली आहे.

    नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. मात्र यंदा बदलत्या हवामानामुळे केळी बागांवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव शेतात जनावरे सोडली आहेत. तर काहींना आपल्या बागा उपटून टाकाव्या लागत आहेत. खेडदिगर परिसरात याचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.

    शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ

    दरम्यान खेडदिगर येथील शेतकरी सुनिल पाटील यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रावरील केळीच्या बागेवर रोटावेटर फिरवला आहे. त्यांनी केळीच्या बागेसाठी आतापर्यंत केलेला साडेपाच लाखांचा खर्च वाया गेल्यानं ते कर्जबाजारी झाले आहेत. शासनानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

    error: Content is protected !!