Category: Crop Managemanet

  • सद्य स्थितीत फळबागा आणि भाजीपाल्याचे असे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या





    सद्य स्थितीत फळबागा आणि भाजीपाल्याचे असे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, परतीच्या पावसानंतर आता भाजीपाला आणि फळबागांमध्ये देखील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    फळबागेचे व्‍यवस्‍थापन

    १)संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
    २)मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत पानामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यास फवारणी न केलेल्या शेतकऱ्यांनी चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    ३)संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    ४)संत्रा/मोसंबी बागेतील रोगग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात.
    ५)डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
    ६) डाळींब बागेतील फुटवे काढावेत. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोग ग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात.
    ७)काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

    भाजीपाला

    १)पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी.
    २) मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी.
    ३)काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

    error: Content is protected !!





  • सद्य स्थितीतील कापूस आणि तूर पिकांतील रोग आणि किडींचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या





    सद्य स्थितीतील कापूस आणि तूर पिकांतील रोग आणि किडींचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाच्या उघडीपुमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाची उघडीप मिळाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र परतीच्या पावसामुळे तूर आणि कापूस पिकात रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? याची माहिती आजच्या लेखात घेऊया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्यवस्थापन

    १) कापूस

    –वेळेवर लागवड केलेल्या व वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही.
    –कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.
    — रसशोषण करणाऱ्या किडी : कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
    –गुलाबी बोंडअळी : कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून फवारावे.
    –दहिया : कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

    २) तूर

    –तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी वापसा येताच लवकरात लवकर ट्रायकोडर्मा 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावर फवारणी करावी.
    –तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

     

     

    error: Content is protected !!