Category: Farmer

  • ओला दुष्काळ जाहीर करा, मागणीसाठी शेतकरी संघटनाची आज ऑनलाईन मोहीम

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. अद्यापही शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी सोशल मीडियावर ऑनलाईन ट्रेंड मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मुलं, बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विविध संघटनांनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.

    या काळात सोशल मीडियावर ट्रेंड

    सरकारने या संकट काळात पुरेशा उपाययोजना कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांनी आज (27 ऑक्टोबर) ऑनलाईन ट्रेंड आयोजित केला आहे. ओला दुष्काळ व त्या संबंधीच्या मागण्यांची पोस्टर्स व पोस्ट आज सकाळी 11 ते रात्री 11 या काळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करून समाजात या प्रश्नांबाबत जागृती निर्माण करणे, सरकारला या बाबतच्या मागण्या मान्य करायला भाग पाडणे असा या ऑनलाईन ट्रेंडचा उद्देश आहे.

    काय आहेत नेमक्या मागण्या

    –किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या भ्रातृभावी संघटनांनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा दिला आहे.
    –राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, खरीपाचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये मदत करावी व अग्रीमसह शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी या मागण्या ऑनलाईन ट्रेंडच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
    — विविध शेतकरी संघटना, शेतमजूर व कामगार संघटना, विद्यार्थी, युवक व महिला संघटना या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.

    राज्य सरकारनं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी किसान सभेनं केली आहे. यासाठी उद्या दिवसभर ओला दुष्काळप्रश्नी ऑनलाईन ट्रेंडची मोहिम चालवली जाणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन अजित नवले यांनी केलं आहे.

     

  • E-Peek Pahani : E-Peek Pahani Canceled Temporarily





    E-Peek Pahani : E-Peek Pahani Canceled Temporarily









































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनामासाठी असलेली ई- पीक (E-Peek Pahani) पाहणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंचनामे करताना येणारी ही अडचण दूर होत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान ही अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे स्थानिक पातळीवर तलाठी कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करावे लागतील मात्र कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही हीच सरकारची भूमिका असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

    राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. तसेच शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी ई-पीक (E-Peek Pahani) पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवावा लागतो. ॲपद्वारे पीक नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना मदत होते. ही नोंदणी शेतकऱ्यांनी स्वत:हून करायची आहे. ही नोंदणी थेट लाभाच्या योजनेसाठी आवश्यक आहे. अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यासह अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंद करणे गरेजेचे आहे.

    यापूर्वी केंद्र सरकारने पीक विमा (E-Peek Pahani) कंपनी सुरु करुन योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी केली होती. याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र नंतर यामध्ये खासगी कंपन्याचा शिरकाव कसा झाला याची चौकशी आपण करणार आहे. शिवाय शेतकऱ्यांची आणि सरकारची होणारी लूट आणि फसवणूक थांबवण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन पीक विमा योजनेत अमूलाग्र बदल करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.

    error: Content is protected !!





  • राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही? कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

    हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेत्यांसह इतर राजकीय व्यक्तींनी तसेच शेकरी संघटनांनी देखील राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही याबाबत माहिती दिली आहे. राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. पण ज्या भागामध्ये नुकसान झालं आहे, त्या भागाचे पंचनामे केल्यावरच आपल्याला किती नुकसान झालं ते समजेल असेही सत्तार म्हणाले.

    याबाबतीत पुढे बोलताना सत्तार म्हणाले, परतीचा पाऊस हा काही पहिल्या वर्षी झाला असे नाही. प्रत्येक वेळी तो पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही असेही सत्तार म्हणाले. जिथे जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतची माहिती आमच्याकडे येत आहे. त्या नुकसानीचा आकडा लकरच कळेल. त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असे सत्तार म्हणाले. प्रत्येक वेळी कृषी विभागाची मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होते. साडेपाच हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारनं आतापर्यंत दिली आहे. पुढच्या काळातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याचे सत्तार म्हणाले.

    शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

    विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाही. पण ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे तो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही नाही याची दक्षता कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी घेतील असे सत्तार म्हणाले. पंचनामा करण्याचे तत्काळ आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पण वस्तुनिष्ठ पंचनामे होत नाहीत तोपर्यंत अंतिम नुकसानीचा आकडा येणार नाही असे सत्तार म्हणाले.

    पहिल्या नुकसानीचे तीन हजार 500 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. 600 कोटी रुपये नंतर दिले त्यानंतर गोगलयीनं नुकसान झालेल्या क्षेत्राला देखील मदत दिली असल्याचे सत्तार म्हणाले. गेल्या 25 वर्षात तत्काळ मदत देण्याच काम पहिल्यांदाच झालं असल्याचे सत्तार म्हणाले. विरोधी पक्षाला फक्त विरोधच करायचा आहे. शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आत्महत्येसारखं पाऊस उचलू नका. हा अंतिम पर्याय नसल्याचे सत्तार यावेळी म्हणाले.

  • ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्या ; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

    हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार परतीचा पाऊस सुरु असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे.

    काय आहे पत्रात ?

    ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि शेतकरी बांधवाना दिलासा द्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

    पंचनामे नीट होतील हे पहावं

    सरकारने पंचनामाचे आदेश दिलेले आहेत पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनामाचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्ध पातळीवर आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रति हेक्‍टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा.

    शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाने साजरी होऊ द्या

    दिवाळी हा आनंदाचा सण म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकट काळानंतर शेतकरी ही दिवाळी धुमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार अशावेळी त्यांना दिलासा देऊन त्यांची ही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे सरकारने कटाक्षाने लक्ष द्यावे अशी ही नम्र विनंती.

    अशा आशयाचा पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिला आहे.

  • कुरघोड्या बंद करा, न्याय देता का नाही ? कधी भेटू ? जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर




    कुरघोड्या बंद करा, न्याय देता का नाही ? कधी भेटू ? जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. आधी जुलै मध्ये झालेली अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे शेतकरी कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी शासनाच्या मदतीकडे शेतकरी डोळे लाऊन बसला असताना सत्ताधारी मात्र राजकारणात व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पहिला जातोय का ? असा सवाल निर्मण होता असून सध्याच्या परिस्थितीमुळे व्यथित झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क पोस्टर लावून सरकार विरोधात रोष व्यक्त केला आहे. हे अनोखे पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

    संकटांनी घेरलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ग्राम अंचळ येथील दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखडे यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आपली व्यथा मांडणारं पोस्टर लावलं आहे. “आमची सहनशिलता संपली आहे. उखाळ्या, पाखाळ्या, कुरघोड्या बंद करा, शेतकऱ्यांना भिक नको, कुत्रे आवरा, रक्षकच झाले भक्षक, वाशिम जिल्ह्यातील भ्रष्टाचारी प्रशासनाचा नंगानाच बंद करा” अशी वाक्ये लिहून पोस्टर च्या माध्यमातून राज्यकर्ते आणी प्रशासनाला जागं करण्यासाठी लक्षवेधी पोस्टर आंदोलन केलं आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो देखील लावले आहेत.

    दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखडे हे आपली शेतजमिन मिळवण्यासाठी गेल्या बारा वर्षापासून लोकशाही व्यवस्थेनुसार प्रशासनाशी लढत आहेत. आपल्याकडं प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, आपल्याला न्याय मिळावा या हेतूने वानखडे यांनी पोस्टरच्या माध्यमातून अनोख्या पध्दतीचं आंदोलन केलं आहे. शिवाय दिवाळी सण तोंडावर आला असताना देखील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकराची मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रशांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पोस्टर लावल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी विनंती त्यांनी केली. शेतकऱ्याची दखल कोणाही घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

     

    error: Content is protected !!





  • 13 महिन्यांत तयार होतात टिश्यू कल्चर केळी, मिळेल एक एकरात लाखांचे उत्पन्न, जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जळगाव म्हणजे केळीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बहुतांश शेतकरी टिश्यू कल्चर पद्धतीने केळी लागवड करतात. त्यामुळे केळी उत्पादनातून फायदा होत असल्याचे इथले शेतकरी सांगतात. शिवाय बिहार राज्य टिश्यू कल्चर पद्धतीने केली लागवड करण्यासाठी पोत्साहन देते. या पद्धतीची खासियत म्हणजे त्याची रोपे थोड्याच वेळात फळ देण्यास तयार होतात. तसेच या केळीचा दर्जाही सामान्य केळीपेक्षा चांगला आहे.

    झाडे परिपक्व होण्यासाठी 16 ते 17 महिने लागतात

    देशात केळीच्या ५०० हून अधिक प्रजाती आहेत. या टिश्यू कल्चरमध्ये केळी हे शेतकऱ्यांसाठी सर्वात फायदेशीर फळ आहे. याच्या रोपाला १३ ते १५ महिन्यांत फळे येतात. तर इतर प्रजातींच्या केळीची रोपे पक्व होण्यासाठी १६ ते १७ महिने लागतात. शेतकऱ्यांनी टिश्यू कल्चर केळीची लागवड केल्यास ते २४ ते २५ महिन्यांत दोन पिके घेऊ शकतात. टिश्यू कल्चर केळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यापासून तयार केलेल्या झाडांपासून ३० ते ३५ किलो केळी प्रति रोप मिळते.
    ही झाडे निरोगी व रोगमुक्त आहेत. फुलणे, फळधारणा आणि कापणी एकाच वेळी सर्व वनस्पतींमध्ये होते.

    जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर

    टिश्यू कल्चर केळी हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. शेतकऱ्यांसाठी ते खूप फायदेशीर आहे. या केळीची लागवड करून शेतकरी एकरी साडेचार लाख रुपये कमवू शकतात. या फळामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. प्रत्येक ऋतूमध्ये लोकांना ते खायला आवडते. त्यात भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यापासून आपल्या शरीराला पोषक तत्व मिळतात. पिकलेली केळी ही जीवनसत्त्वे अ, ब आणि क चा चांगला स्रोत आहे. याच्या नियमित सेवनाने अनेक आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय सांधेदुखी, उच्च रक्तदाब, अल्सर आणि किडनी विकारांशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यातही हे उपयुक्त आहे.

     

     

  • 12th Installment Of PM Kisan Coming On ‘This’ Day

    हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या पैशासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढत आहे. आतापर्यंत 12 वा हप्ता मिळालेला नाही. ऑगस्टमध्येच पैसे मिळतील, अशी आशा होती. मात्र, आता ही प्रतीक्षा जास्त काळ राहणार नाही. देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेची भेट मिळणार आहे. 2000 रुपयांचा 12 वा हप्ता १७-18 ऑक्टोबर दरम्यान मिळू शकेल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या एका ट्विटर पोस्ट मधून देण्यात आली आहे.

    पी एम किसानच्या बाराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना आता एक आनंदाची बातमी मोदी सरकारने दिली आहे. दिनांक 17 आणि 18 ऑक्टोबर 2022 रोजी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले आहे. दिल्लीतल्या आय ए आर आय पुसा नवी दिल्ली येथील ग्राउंड वर दिनांक 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी शेतकरी मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं आहे. याच दरम्यान पीएम किसान सन्मान निधीचा बारावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित केला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय स्वास्थ्य रसायन खते मंत्री मनसुख मंडविया यांची उपस्थिती असणार आहे.

    दरम्यान यंदाच्या हप्त्याला उशीर होण्याचे कारण म्हणजे फक्त (PM Kisan) शासनाकडून जमिनीच्या नोंदींची पडताळणी केली जात आहे. केवायसी करून घेणे. जेणेकरुन जे पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळतील. जे लोक अपात्र आहेत त्यांना पैसे मिळू नयेत. महसूल विभागाचे कर्मचारी अनेक शेतकऱ्यांना फोन करून त्यांच्या जमिनीच्या नोंदींची माहिती घेत आहेत.

    चुकीच्या पद्धतीने पैसे घेतल्यास काय करावे ?

    ज्या अपात्र लोकांनी पैसे घेतले आहेत त्यांना ती रक्कम सरकारला परत करावी लागेल, असा सरकारचा हेतू स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही आयकरदाते किंवा पेन्शनधारक असाल तर ते पैसे परत करा. अन्यथा सरकार तुम्हाला नोटीस पाठवेल. पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या पोर्टलवर पैसे परत करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तुम्ही केंद्र सरकारच्या पोर्टलवरूनही (https://bharatkosh.gov.in/) परत येऊ शकता. यासाठी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचीही मदत घेता येईल.

  • पावसामुळे पिकांचं झालंय नुकसान ? ताबडतोब करा विम्याचा दावा, जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून राज्यशाहीत देशभरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. तयामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांनी काळजी करू नये. त्यांना हवे असल्यास ते त्यांच्या पिकाचा विमा काढू शकतात. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकार पंतप्रधान फसल विमा योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या पिकांचा फार कमी पैशात विमा काढू शकतात. वास्तविक, विमा उतरवलेले पीक नष्ट झाल्यानंतर, विमा कंपनी त्याच्या नुकसानीची भरपाई करते.

    विमा कसा काढायचा?

    –प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या अंतर्गत पिकाचा विमा काढणे अगदी सोपे आहे. जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही तुमच्या पिकाचा विमा सहज काढू शकता.
    –जर तुम्ही कृषी कर्ज घेतले असेल तर तुम्हाला त्या बँकेकडून पीक विमाही मिळू शकतो. विशेष म्हणजे विमा काढण्यासाठी तुम्हाला अनेक कार्यालये आणि बँकांमध्ये जाण्याचीही गरज नाही.
    –फक्त बँकेतून तुम्हाला एक फॉर्म मिळेल जो भरायचा आहे. कर्ज घेताना तुम्ही बँकेला जमीन आणि इतर कागदपत्रे दिली असतीलच, त्यामुळे तुमचा विमा सहज काढला जाईल.
    –त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले नाही त्यांनाही कोणत्याही बँकेकडून हा विमा काढता येईल. आधार कार्ड, जमिनीशी संबंधित कागदपत्रे, तलाठी कडून घेतलेल्या शेतात पेरलेल्या पिकाचा तपशील आणि बँकेत मतदार कार्ड यांसारखे ओळखपत्र घेऊन शेतकरी पीक विमा काढू शकतात.

    कसे कराल क्लेम ?

    –प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन प्रकारचे विमा दावे मिळतात. अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही विम्याचा लाभ घेऊ शकता.
    –तसेच, जर कोणत्याही कारणाने पिकाचे नुकसान झाले असेल किंवा पीक सरासरीपेक्षा कमी असेल तर तुम्ही विम्याचा दावा देखील करू शकता.
    –जेव्हा सरासरी पीक कमी होते तेव्हा विमा कंपनी आपोआप शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकते. त्यासाठी शेतकऱ्याला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही.
    –तर, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झाल्यावर शेतकऱ्याला अर्ज करावा लागतो. यासोबतच शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पीक खराब झाल्याची माहिती कृषी विभागाला द्यावी.
    –यासाठी तुम्हाला फक्त एक फॉर्म भरावा लागेल. विशेष म्हणजे फॉर्ममध्ये कोणते पीक आले याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. पीक अयशस्वी का झाले?
    –पिकाची पेरणी कोणत्या क्षेत्रात झाली? याशिवाय गावाचे नाव आणि शेतीशी संबंधित माहिती द्यावी लागेल.
    –या फॉर्मसोबत पीक विमा पॉलिसीची छायाप्रतही जोडावी लागेल.

    किती मिळतो क्लेम ?

    प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी विम्याची रक्कम वेगळी आहे. सर्वाधिक कापूस पिकासाठी 36,282 रुपयांची विमा रक्कम उपलब्ध आहे. त्याचबरोबर धानासाठी 37,484 रुपयांची विमा रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तसेच बाजरी पिकासाठी 17,639 रुपये, मका पिकासाठी 18,742 रुपये आणि मूग पिकासाठी 16,497 रुपये प्रति एकर दर देण्यात आला आहे.

     

     

     

     

  • धक्कादायक ! पुढारी राजकारणात व्यस्त; गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून नाट्यमय राजकारण अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. अद्यापही राज्यातील राजकारनाचा रंग काही फिका होतांना दिसत नाही. एकीकडे मंत्री आणि राजकारणी यांच्यातली तु तू मै मै थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे मात्र राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातुन शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी उजेडात आली आहे. मागच्या ९ महिन्यात मराठवाड्यातील तब्बल 756 शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचा पाऊल उचलले आहे. शिवाय यातील 400 शेतकऱ्यांनी पावसाळ्यात म्हणजेच पीकं उगवण्याच्या हंगामात जीवन संपवलं आहे.

    मराठवाड्यला शेतकरी आत्महत्येचं ग्रहण

    सरकारकडून अनेक उपाययोजना करूनही मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या काही थांबता-थांबत नसल्याचे चित्र आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे ध्येय घेऊन सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्यातील 292 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे पिके हातून गेली आहे. सरकराने मदतीची घोषणा केली असली तरीही अनेक ठिकाणी मदत अजूनही पोहचलेली नाही. त्यामुळे हतबल झालेली शेतकरी आत्महत्या करत जीव संपवत आहे. विशेष म्हणजे ज्या सप्टेंबर महिन्यात राज्यकर्ते कोणाचा कोणता पक्ष या राजकारणात व्यस्त होते, त्यावेळी मराठवाड्यातील 90 शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

    आत्महत्या आकडेवारी ( 1 जानेवारी 2022 ते 30  सप्टेंबर 2022 )

    अ.क्र. महिना  शेतकरी आत्महत्या संख्या 
    1 जानेवारी 59
    2 फेब्रुवारी 73
    3 मार्च 101
    4 एप्रिल 47
    5 मे

    76
    6 जून 108
    7 जुलै 83
    8 ऑगस्ट 119
    9 सप्टेंबर 90
    एकूण  756

    103 प्रकरणे अपात्र ठरली…

    नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोज्यातून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर या गेल्या नऊ महिन्यांत 756 शेतकरी आत्महत्याची नोंद झाली आहे. यातील 561 प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरली असून, 103 प्रकरणे अपात्र ठरली आहे. तर 92 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक196 शेतकऱ्यांना आत्महत्या झाल्या आहेत.

    संदर्भ : एबीपी माझा

  • फुलांना मोठी मागणी, मात्र आवकेत घट

    हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे

    महाराष्ट्रात नवरात्र आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध फुलांची मागणी वाढते.फुल उत्पादकांसाठी हा एक महत्त्वाचा सण आहे.यावेळी पुण्यातील एपीएमसी मार्केटचा फुलांचा बाजार चांगलाच फुलतो. दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांकडून झेंडू, गुलाब,  पांढरा शेवन्ती मोगरा या फुलांना मागणी वाढल्याने चांगला दर मिळत आहे.

    मात्र, काही दिवसांपूर्वी नाशिक, अमरावती जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. या सणांमुळे आम्हाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी सांगतात.परंतु यंदा पावसाने सर्व आशा धुडकावून लावल्या. बाजारात फुलांना मागणी असली तरी उत्पादनात घट झाली आहे. आणि बागांमध्ये पाणी भरल्याने फुले कुजली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

    सध्या बाजारात झेंडूला 40 ते 100 रुपये किलो भाव मिळत आहे. तर भाग्यश्री गुळगुळीत 150 रुपये प्रति किलो, एस्टर 160 ते 200 रुपये प्रति किलो, त्याच मोगरा फुले 250 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. गुलाबाची 20 ते 30 रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.

    दसरा दिवाळीत झेंडू आणि इतर फुलांना मोठी मागणी असते. अशा स्थितीत पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे फुलशेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बाजारात आवक कमी आणि भाव जास्त मिळत असला तरी त्याचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना होत नाही.

    दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना फुले खरेदी-विक्रीची सुविधा सहज मिळावी, यासाठी याच बाजार समितीने पुष्पोत्सवाचे आयोजनही केले आहे.