Category: Farmer

  • जाणून घेऊया; बुरशीनाशके आणि त्यांची बाजारातील नावे

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    शेतामध्ये पिकांवर फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणारी विविध प्रकारची बुरशीनाशके आपण कृषी केंद्रावरून विकत घेत असतो परंतु आपल्याला बुरशीनाशकात हवे असणारे समाविष्ठ घटक आणि बाजारात विक्री होणारे ट्रेड नाव यात फरक असतो त्यामुळे तुम्हाला हवे असणाऱ्या घटकाचे बुरशीनाशक बाजारात कोणत्या नावाने मिळते याची माहीती खास तुमच्यासाठी

    कार्बेडेंझीम ५० टक्के – बाविस्टिन,धानुस्टिन
    मॅन्कोझेब ७५ टक्के – डायथेन एम-४५,युथेन एम-४५, मॅकोबन एम-४५
    कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के – ब्लू कॉपर,ब्लिटॉक्स,धानूकॉप

    एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – ॲमिस्टार टॉप, गोडीवा सुपर,
    प्रोपीकोनॅझोल २५ टक्के – टिल्ट, विजेता, प्रोपार, बंपर
    क्लोरथॅलोनील ७५ टक्के – कवच, जटायू, इशान, सिनेट

  • सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार




    सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    खरिपात पेरणी केलेल्या सोयाबीनच्या तब्बल १० बॅगला पेरणी केल्यानंतर ३ महिण्याचा अवधी होऊनही शेंगा न लागल्या नसल्याने एका शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असुन बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या झुवळा झुटा येथील शेतकर्‍याने प्रशासनाकडे तक्रार करत आता नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे.

    तालुक्यातील जवळा झुटा येथील राजेंद्र सुरेशराव जवळेकर असे फसवणुक झालेल्या शेतकर्याचे नाव असून त्यांनी जवळा झुटा येथील गट क्र . 19 मधील जमीनीमध्ये पाथरी येथील एका कृषी केंद्रावरुन खरेदी केलेले. ग्रीन गोल्ड सिडस या कंपनीचे 10 बॅग सोयाबीन बियाणे खरीप हंगामात पेरले होते.

    मात्र सदरील बियाणे पेरणी करून तीन महिने उलटले असून सोयाबीनची फक्त वाढ झालेली असुन अद्यापही या पिकाला शेंग अथवा कसल्याही प्रकारचा माल लागलेला नाही. याप्रकरणी आता या शेतकऱ्याने तक्रारीसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली असून पिकाची पाहणी करुन संबंधित कंपनी विरुद्ध कार्यवाही करुन पिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

    error: Content is protected !!





  • जाणून घ्या काय आहे शेतमाल तारण कर्ज योजना ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : धान्याच्या काढणीनंतर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे शेतमालास योग्य भाव मिळत नाही. गोदाम व धान्य साठवणुकीच्या अपुऱ्या सुविधा व शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी एकाच वेळी शेतमाल मोठ्या प्रमाणात बाजारात येत असतो. त्यामुळे शेतमालाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असते.

    हा शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून कृषि पणन मंडळ सन १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.

    शेतमालाच्या काढणे हंगामात उतरत्या भावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवत आहे

    योजनेचे स्वरूप

    १) काढणी हंगामात शेतकऱ्यास आलेली आर्थिक निकड विचारात घेऊन या गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
    या योजनेमध्ये तूर मूग उडीद सोयाबीन सूर्यफूल हरभरा भात करडई ज्वारी बाजरी गहू मका बेदाणे काजू बी हळद सुपारी व वाघ्या घेवडा(राजमा) या शेतमालाचा समावेश आहे.

    २)शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामा तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत सहा टक्के व्याजदरांना सहा महिने कालावधीसाठी कर्ज त्वरित उपलब्ध होते.

    ३) बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतकऱ्यांचे शेतमालासाठी गोदाम भाडे विमा देखरेख खर्च अधिक खर्चाची जबाबदारी बाजार समितीवर असल्याने शेतकऱ्यांना भुरदंड बसत नाही.

    ४)सहा महिन्याच्या आत कर्ज परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याज सवलत मिळते

    ५) स्वनिधीतून तारण कर्ज राबवणाऱ्या बाजार समित्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रकमेवर तीन टक्के व्याज सवलत तसेच अनुदान स्वरूपात मिळते.

    ६) योजना राबवण्यासाठी सुवनिधी नसलेल्या बाजार समित्यांना पण मंडळाकडून पाच लाख अग्रीम उपलब्ध होतात.

    ७) केंद्रीय राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील शेतकऱ्यांच्या मालाच्या वखार पावतीवर तारण कर्ज उपलब्ध होते

    कुठे कराल संपर्क

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच कृषी पणन मंडळाची विभागीय कार्यालय येरवडा पुणे 6 येथे प्रत्यक्ष भेट द्या

    [email protected] या संकेतस्थळाला भेट द्या.

     

  • सहकारी बँकांच्या अनुदानात अर्धा टक्का कपात; अनेक शेतकरी व्याज सवलत योजनेतून अपात्र

    हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. जिल्हा बँकांना देण्यात येणाऱ्या व्याज सवलत योजनेत केंद्र सरकारकडून कपात केली आहे. त्यामुळे आता दोन टक्क्यांऐवजी दीड टक्के एवढेच व्याज केंद्राकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना मिळणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे बँकेला अल्पमुदत पीककर्ज वाटपात अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेला अनेक शेतकरी अपात्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात पुण्यातल्या अडीच लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसू शकतो.

    नक्की काय झाला बदल ?

    प्राथमिक शेती संस्थांचे थेट सभासदांना बँकेमार्फत तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा करण्यात येत आहे. हे कर्ज सहा टक्के व्याजदराने देणे जिल्हा बँकांना शासन निकषानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून २.५ टक्के आणि केंद्र शासनाकडून दोन टक्के व्याज परतावा, असा एकूण ४.५ टक्के व्याज परतावा बँकेला प्राप्त होतो. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करू शकत होत्या. मात्र, नाबार्डने चालू वर्षी ८ सप्टेंबरमध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार केंद्र शासनाकडून बँकेला दोन टक्क्यांऐवजी चालू आर्थिक वर्षात आणि २०२३-२४ या वर्षाकरिता १.५ टक्के एवढेच व्याज अनुदान म्हणून बँकेला प्राप्त होणार आहे, असे म्हटले आहे.

    राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख अल्पमुदत पीककर्ज व्याज सवलत योजनेनुसार नियमित परतफेड करणाऱ्या सभासदाला बँकेमार्फत कमाल सहा टक्के व्याजदर आकारणी बंधनकारक आहे. केंद्र शासनाच्या पत्रानुसार दोन टक्क्यांऐवजी दीड टक्का व्याज परतावा बँकेला देण्याचे सूचित केल्याने बँकेला तोटा होणार आहे. जर बँकेने संस्थेला ०.५ टक्के व्याजदर वाढवला आणि संस्थेने त्यांच्या सभासदांना त्याप्रमाणातच ०.५ टक्के व्याजदर वाढविल्यास अंतिम सभासदाला व्याजदर हा ६.५ टक्के एवढा होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील नियमित पीककर्ज घेणारे दोन लाख ते अडीच लाख शेतकरी हे राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेला पात्र होऊ शकणार नाहीत असे झाल्यास केंद्राच्या या निर्णयाचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे.

    केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी निर्णय

    केंद्र सरकारने नाबार्डच्या खांद्यावर बंदूक ठेवून परत एकदा शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकांना जो दोन टक्के व्यास अनुदान परतावा मिळत होता त्यामध्ये अर्धा टक्के कपात करण्याचा निर्णय नाबार्ड करून घेण्यात आला. को-ऑपरेटिव बँकांमधून पीक कर्ज उचलणाऱ्या करोडो शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे. महाराष्ट्रात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना जी आहे. ती राज्यात राबवली जाते या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्याची खेळी करत आहे.

    पुणे, सांगली, जळगाव, लातूर यासारख्या जिल्हा बँकांमधून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने तीन लाखांपर्यंत कर्ज मिळतं मात्र या नव्या निर्णयामुळे बँकांचा तोटा वाढणार आहे. शेतकऱ्यांकडून सोसायटी आणि बँका जे कर्ज केंद्र सरकारकडून अर्धा टक्के व्याजाची कपात केली आहे ते भरून काढण्याचा प्रयत्न करतील म्हणजेच याचा थेट फटका हा शेवटी शेतकऱ्यालाच बसणार आहे. महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती बँका या शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा आहेत. महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे अशा वेळेला शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची मोठी गरज असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्र सरकारने केला आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रवक्ता हणमंत पवार यांनी दिली आहे.

  • शेटफळच्या शेतकऱ्याचा पेरू केरळच्या बाजारात, दोन‌ एकरात तेवीस लाखांचे उत्पन्न

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेटफळ ता करमाळा येथील दत्तात्रय लबडे या शेतकऱ्याच्या पेरूला केरळमधील बाजारपेठेत पंचाऐंशी रूपये किलोचा दर मिळत असून यावर्षी त्यांना दोन एकर पेरू पासुन सतरा लाख रूपयांपेक्षा जादा उत्पन्न अपेक्षित आहे.

    करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील शेतकरी आपल्या शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. येथील दत्तात्रय रामदास लबडे यांनी चार वर्षांपूर्वी आपल्या शेतामध्ये मध्यप्रदेशातील नर्सरीमधून रोपे आणून दोन एकर व्ही.एन.आर जातीच्या पेरूची लागवड केली आहे. आतापर्यंत त्यांनी भरघोस उत्पादन मिळवत दोन पिके घेतली आहेत. सध्या त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या बागेतील पेरूची काढणी सुरू केली असून दोन एकरामध्ये 20 टन पेरूची विक्री करत आतापर्यंत सरासरी सत्तर रूपयाचा दर मिळवत चौदा लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी दहा टनापर्यंत उत्पादन अपेक्षित असून सध्या त्यांचा पेरूला केरळ येथील बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने ते एका व्यापाऱ्याच्या मध्यस्थीने पेरू केरळ येथील बाजारपेठेत पाठवत आहेत.

    केरळला सध्या प्रतिकिलो 85 रुपये प्रमाणे दर मिळत आहे. या वर्षी त्यांना दोन एकर पेरू पिकापासून तेवीस लाखापेक्षा जादा रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. प्रगतशील बागातदार म्हणून ओळख असलेल्या दत्तात्रेय लबडे यांनी आजपर्यंत आपल्या शेतात ऊस केळी कलिंगड शतावरी याचे भरघोस उत्पादन घेतले आहे. सध्या गावातील शेतकरी गटशेतीच्या माध्यमातून केळीबरोबरच पेरू पिकाचाही प्रयोग करत आहेत. आतापर्यंत पुणे मुंबई दिल्ली बाजारपेठेत या गावातील पेरू पाठवला जात होता परंतु लबडे यांनी प्रथमच यावर्षी केरळ राज्यांमध्ये आपला पेरू पाठवण्यास सुरुवात केली असून त्यांना दरही चांगला मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

    त्यांना या पिकाच्या संदर्भात पोपट मांजरे रोहित लबडे विजय लबडे यांचेबरोबरच इतर प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले आहे. पेरू बागेत केलेल्या योग्य नियोजनामुळे मिलीभग सारख्या रोगांपासून त्यांची बाग दुर ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे. फळ खराब होऊ नये म्हणून त्यांनी क्रॉप कव्हर व प्लॅस्टिक बॅगचा वापर केला आहे यामुळे कोणत्याही रोगापासून पेरूचे संरक्षण तर झालेच असून पिकाचा गुणवत्ता व दर्जा हे चांगला राखण्यात त्यांना यश मिळाले आहे सध्या त्यांची पेरू शेती या परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असून आपल्या शेतीमध्ये माहितीसाठी आलेल्या इतर शेतकऱ्यांना ते आवर्जून या पिकातील बारकावे समजावून सांगत सांगतात.

    दत्तात्रेय लबडे सांगतात ,माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये मी पेरूचे पीक घेतले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे उत्पादन चांगले मिळूनही माझ्यासह अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही यामुळे वेगळे पीक घेण्यात आपण चुकलो तर नाहीना अशी शंका येत होती मात्र यावर्षी दरही चांगला मिळत असल्याने जादा उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

  • उद्यापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे; पहा कोणत्या जिल्ह्याला शासनाची किती मदत ?




    उद्यापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे; पहा कोणत्या जिल्ह्याला शासनाची किती मदत ? | Hello Krushi












































    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे सरकारने नव्या निकषांसह अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले. सरकारने राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागासाठी 3 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यापैकी मराठवाडा विभागाकरिता 1106 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत

    मराठवाड्याला मिळालेल्या मदतीचे वितरण उद्यापासून म्हणजेच गुरुवार (22) पासून केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख 81 हजार 761.18 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जालना,परभणी, हिंगोली,नांदेड, लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे.

    दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. विशेष औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र असे असतानाही औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    कोणत्या जिल्ह्याला किती मदत ?

    जिल्हा  बाधित शेतकरी  बाधित क्षेत्र  अनुदान 
    जालना  6898 2311.79 हेक्टर  3 कोटी 71 लाख 84 हजार 
    परभणी  1557 1179 हेक्टर 1 कोटी 60 लाख 34 हजार 
    हिंगोली  133970 113620 हेक्टर 157 कोटी 4 लाख 52 हजार 
    नांदेड  741946 527491 हेक्टर 717 कोटी 88 लाख 92 हजार 
    लातूर  49160 27425.37 हेक्टर 37 कोटी 30 लाख 83 हजार 
    उस्मानाबाद  75739 66723.20 हेक्टर 90 कोटी 74 लाख 36 हजार 

    error: Content is protected !!





  • हिंगोली जिल्ह्यातील संपावर असेलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध




    हिंगोली जिल्ह्यातील संपावर असेलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यतल्या अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा अटक बसला आहे. त्यामुळे ऐन खरिपात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्हा देखील याला अपवाद नाही. या जिल्ह्यात जूलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर राज्यशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. काही भागात मदत मिळवायला सुरुवातही झाली आहे. मात्र हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना अद्यापही मदत मिळाली नाही. याच कारणामुळे मागच्या ६ दिवसांपासून गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. मात्र आज शेतकऱ्यांमध्ये संताप वाढलेला दिसून आला शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध केला.

    हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या तीन मंडळांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावं लागलं आहे. पावसामुळे प्रत्यक्षात पिकांचे मोठं नुकसान झालं असताना प्रशासनाने मात्र इथे अतिवृष्टी झाली नसल्याचा दावा केलाय. त्यामुळे या भागातील जवळपास 40 ते 45 गावातील शेतकऱ्यांना शासनापासून मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहावं लागलं आहे.

    त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. आज येथील शेतकऱ्यांचा आक्रमक रूप पाहायला मिळालं शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला सेनगाव तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तात्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांचे यादीत समावेश करावा आणि तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

    error: Content is protected !!





  • PM Kisan : शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची का पाहावी लागतीये वाट ? कधीपर्यंत येईल हप्ता ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : यावेळी केंद्र सरकारची सर्वात मोठी शेतकरी योजना पीएम किसान (PM Kisan) योजनेचे पैसे मिळण्यास आणखी विलंब होऊ शकतो. केंद्र सरकार सध्या लाभार्थ्यांच्या माहितीशी जमिनीच्या नोंदी जुळवत आहे. जमिनीच्या नोंदींची पडताळणी सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे हस्तांतरित केले जातील. या संदर्भात, मंत्रालयाने राज्यांमधील पीएम किसानच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामाला गती देण्यास सांगितले आहे. हे काम 25 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर पैसे ट्रान्सफर केले जातील.

    ऑगस्ट महिन्यापासून शेतकरी पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेशी संबंधित कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 12 व्या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असतील. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत कधीही पैसे पाठवता येतील. 15 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना 2000-2000 रुपयांचा हप्ता मिळणे अपेक्षित आहे.

    का होत आहे पडताळणी ?

    पीएम किसान (PM Kisan) योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाली तेव्हा सरकारने घाईघाईने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पैसे  देण्याचे लक्ष्य ठेवले होते. कारण २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. मात्र निवडणुका संपल्यानंतर आधार अनिवार्य करण्यात आले. असे असतानाही काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला. ज्यांना सरकारने अपात्र शेतकरी म्हटले. त्यामुळे आता अनेक पातळ्यांवर शेतकऱ्यांची पडताळणी केली जात आहे. अशा एकूण 54 लाख अपात्र शेतकऱ्यांनी 4300 कोटी रुपयांचा लाभ घेतला. पण, आता त्यांच्यापासून सावरणे कठीण झाले आहे.

    अपात्र शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला

    अशा परिस्थितीत, आता सरकार केवळ लाभार्थींचे ई-केवायसीच (PM Kisan) करत नाही, तर जमिनीच्या नोंदी त्यांच्या दिलेल्या नोंदीशी जुळवून घेत आहेत. अधिकाधिक शेतकर्‍यांचा डेटा बरोबर असावा आणि त्यांना भविष्यातही पैसे मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, हा सरकारचा हेतू आहे. कोणत्याही परिस्थितीत हा पैसा अपात्रांच्या हातात जाऊ नये, तर एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये, अशी सरकारची इच्छा आहे.

     

     

     

  • मुख्यमंत्री साहेब आम्ही महाराष्ट्रात राहतो का.. बिहारमध्ये…? शेतकऱ्याने रक्ताने लिहिले पत्र, मागितली भरपाई

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत 15 सप्टेंबरपासून मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, दुसरीकडे असे अनेक जिल्हे आणि असे अनेक तालुके आहेत, ज्यांना पंचनामा करण्यापासून दूर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. अशा परिस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ज्यात शेतकऱ्याला नुकसान भरपाईच्या प्रक्रियेपासून दूर ठेवल्याचा सवाल केला आहे.

    शेतकऱ्याने रक्ताने लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे की ते महाराष्ट्रात राहतात की बिहारमध्ये? शेतकरी पुढे म्हणाले की, आम्ही सुद्धा महाराष्ट्रात राहत असून आमच्या तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, आम्हालाही मदतीची गरज आहे.शेतकऱ्याने मागणी केली आहे.

    शेतकरी दु:खी आहेत

    यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नाल्यांचे व नद्यांचे पाणी शेतात शिरल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवीन सरकार पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र, सेनगाव तालुक्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

    सेनगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांचे पंचनामे भरण्यात आले. अतिवृष्टीग्रस्तांना 32 कोटी 23 लाख 47 हजार 200 रुपयांची मदत वाटप करण्यात येणार असल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले. मात्र, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, आजेगाव, बाभूळगाव, पुसेगाव या चार मंडळांना अतिवृष्टीतून वगळण्यात आले असून, पंचनामा झाला नाही. अशा स्थितीत येथील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

    काय आहे पत्रात ?

    मा. मुख्यमंत्री महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब,

    विषय:-आम्ही महाराष्ट्रात राहतो का.. बिहारमध्ये…? अतिवृष्टीतून वगळ्याल्या प्रकरणी…

    सेनगाव तालुक्यात पेरण्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक शेतकरी देशोधडीला लागले. सगळे राजकारणात गुंतले होते. सोबत कृषी विभागालाही विसर पडला..

    सेनगाव तालुक्यातील शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना आपण अनेक मंडळे नाकारली. तालुक्यात सर्व दूर पाऊस असताना आपण तीन मंडळे अतिवृष्टीतून नाकारली. मग आम्ही महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये राहतो का.?

    साहेब, अधिवेशनात घोषणा केली.. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.. मग हे काय खाजगी कंपनीने नाकी नऊ आणले? जगायचे कसे ते सांगा..

    अन्यथा अंगात राहिलेल्या बाकी रक्ताने अभिषेक करून आम्ही आमचे जीव सोडून देऊ.. अनुदान द्या..

     

  • अंगावर वीज पडून दोन शेतकरी जखमी तर एकाचा जागीच मृत्यू

    हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून राज्यातल्या विविध भागात विजांसह पाऊस पडतो आहे. दरम्यान औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंगावर वीज पडल्यामुळे दोघे शेतकरी जखमी झाले असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की. ही घटना औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात घडली आहे. नादरपूर शिवारातील गट न. 447 मध्ये गुरं चारून परतताना नामदेव शेनफडू निकम यांच्या अंगावर वीज पडली. त्यामुळे त्यांचे जागीच मृत्यू झाला. सोबतच त्यांच्या बाजूला असलेले प्रकाश निकम आणि दिपक निकम यांच्या अंगावर देखील विज कोसळल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर पिशोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. नामदेव निकम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

    दरम्यान एकाच गावातील तिघांच्या अंगावर वीज पडल्याने नादरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच तिघांपैकी नामदेव शेनफडू निकम यांचे मृत्यू झाल्याने गावात शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे. नामदेव यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनाने निकम कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.