Category: Farmer

  • शेतकरी का करीत आहेत स्वतःच्याच शेतातील पिके नष्ट ? रोष कृषी विभागावर

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पीक धोक्यात आले आहे. सुरुवातीला पाऊस न पडल्याने जूनमध्ये जुलै महिन्यात पेरण्या झाल्या. त्यामुळे पेरणीसह सुरू झालेला पाऊस जवळपास महिनाभर सुरूच आहे. खरिपातील या नैसर्गिक संकटातून सोयाबीन, उडीद, मूग ही पिके सावरत असतानाच आता या पिकांवर आर्मीवर्म कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील पिकांवर फॉल आर्मीवॉर्म किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी सध्या संकटात सापडला आहे. कृषी विभागाकडून मदत न मिळाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

    हा धोका फळधारणेच्या वेळी निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पिके उपटून टाकावी लागत आहेत. सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्याने मराठवाड्यात तसेच विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. दरम्यान पावसाचीही शक्यता होती. आता हवामान मोकळे झाल्याने सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात खरीप हंगामात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून हे पीकही धोक्यात आले आहे.

    आर्मीवर्म किडीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त

    पिके बहरात असताना या फॉल आर्मीवॉर्मचा प्रादुर्भाव वाढत आहे. या अळीचा थेट प्रादुर्भाव पिकांच्या पानांवर होतो आणि फळांच्या उत्पादनावरही परिणाम होतो. केवळ सोयाबीनच नाही तर तूर, उडीद, मूग या पिकांचीही हीच स्थिती आहे. एकदा अळीचा प्रादुर्भाव झाला की तो झपाट्याने पसरतो. त्यामुळे वेळीच योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे मदतीचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात आजकाल अनेक जिल्ह्यांतील शेतकरी पिकांवरील कीड, रोगांमुळे त्रस्त आहेत. पिकांवर महागडी औषधे फवारूनही कोणताही परिणाम होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खर्चात वाढच होत आहे.

    शेतकऱ्यांनी कृषी विभागावर केला आरोप 

    हंगामाच्या सुरुवातीला कृषी विभागाकडून उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन केले जाते, असे शेतकरी सांगतात. परंतु, गरजेच्या वेळी कृषी अधिकारी शेतकऱ्यांकडे जात नाहीत. आता निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि रोग व किडींचा वाढता प्रादुर्भाव पाहता शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून दिलासा देणे हे कृषी विभागाचे काम होते. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे उत्पादन कसे वाढणार? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

     

     

  • सोयाबीनला फूल ना शेंगा, नुकसान भरपाई कधी देणार? शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात




    सोयाबीनला फूल ना शेंगा, नुकसान भरपाई कधी देणार? शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात | Hello Krushi







































    हॅलो कृषी ऑनलाईन : उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी शिवारात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीमुळं यंदा सोयाबीन पिक संकटात सापडले आहे. सुरुवातीलाच अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या हल्ल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. फुले लागण्याच्या अवस्थेतच चार-चार वेळा फवारण्या केल्यानंतरही पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

    त्यामुळं कोवळ्या शेंगा अळ्यांनी फस्त केल्या आहेत. त्यामुळं सोयाबीन पीक हातून गेल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळं नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी येथील शेतकर्‍यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कैफियत मांडली. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन दिले.

    तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

    अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश शासनाने दिलेले असताना अद्याप महसूल प्रशासनातील एकही व्यक्ती सुर्डी शिवारात फिरकलेली नाही. तलाठी, मंडळ अधिकार्‍यांशी संपर्क साधून नुकसानीची पाहणी करण्याची विनंती केल्यानंतरही कोणी दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळं संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. शिवारातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामे करुन तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या निवेदनात शेतकर्‍यांनी केली आहे.

     

     

    error: Content is protected !!





  • डंख मरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव ? कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : आळीच्या डंखाने शेतकऱ्याला दवाखान्यात भरती करण्याची घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिराळा परिसरात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यातच समाज माध्यमांवर या अळीबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या. या आळीचा पिकांसाठी धोकादायक आहे का ? अळीने डंख केल्यास काय काळजी घ्यावी ? यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कार्यरत असलेले कीटक शास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे व डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी पुढील माहिती दिली आहे.

    या आळीला इंग्रजीमध्ये ‘स्लज कॅटरपिलर’ असे म्हणतात. ही एक बहुभक्षी कीड आहे. बांधावरील गवतावर, एरंडी,आंब्याच्या झाडावर, चहा , कॉफी यासारखे पिके व इतर फळ पिकावर तुरळ ठिकाणी एखादी आळी दिसून येत असते. असे असले तरी एखाद्या परिसरामध्ये ही कीड जास्त प्रमाणात आल्यास अधाशाप्रमाणे पानावरील हिरवा भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवल्याचे देखील उदाहरणे आहेत. पावसाळ्यात, पावसाळ्याच्या शेवटी, उष्ण व आर्द्र हवामानात ही अळी दिसून येते. या आळीच्या अंगावर बारीक बारीक केस असतात. त्याखाली काही विष ग्रंथी असतात व या केसातून ते विशिष्ट रसायन किंवा विष त्यांच्या स्वसंरक्षणासाठी बाहेर टाकतात. हे रसायन त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेवर चट्टे पडून अग्नी दाह होतो. ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही.

    गांधींल माशीने डंक केल्यावर दाह होतो, केसाळ आळी यांच्या संपर्कातून एलर्जी होते. त्याचप्रमाणे स्लज कॅटरपिलर या आळीच्या संपर्कात त्वचा आल्यासच अग्नी दहा होत असतो, तो शक्यतो सौम्य असतो. पण ज्या व्यक्तींना ऍलर्जी आहे किंवा दम्याचा त्रास आहे, त्या व्यक्तीमध्ये मात्र तीव्र स्वरूपाची लक्षणे पहावयाला मिळू शकतात.

    काय घ्यावी काळजी ?

    — बांधावरील गवत काढत असताना किंवा शेतातील इतर कामे करत असताना या किडीचे निरीक्षण करून ही कीड आपल्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.

    –त्याचप्रमाणे काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्या त्वचेशी या किडीचा किंवा तिच्या केसाचा संपर्क आल्यास आपण घरी वापरतो तो चिकट टेप हा दंश झाल्याच्या ठिकाणी हलक्या हाताने लावून काढून घ्यावा. त्यामुळे या अळीचे केस सहजपणे निघून जाऊन दाह कमी होण्यास मदत होते.

    — त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी दंश झाला आहे त्या ठिकाणी बर्फ लावणे व काही प्रमाणात बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट करून लावणे हे देखील फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. पण लक्षणे तीव्र असल्यास मात्र नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे योग्य राहील.

    या किडीच्या नियंत्रणासाठी विशिष्ट अशा रसायनाची किंवा कीटकनाशकाची शिफारस नसली तरी नेहमीच्या वापरातील कीटकनाशक जसे की, क्लोरोपायरीफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी),प्रोफेनोफोस (२० मिली प्रती १० लि. पाणी) ,क्वीनॉलफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी), इमामेक्टिन बेंजोएट (४ ग्रॅम प्रती १० लि. पाणी ), ५ टक्के निमार्क हे उपयुक्त ठरू शकतात. अशी माहिती आंबेजोगाई जिल्हा बीड विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र डॉ. व्ही. पी. सूर्यवशी यांनी दिली.

     

  • अनुदानित खते जादा दराने विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यास कायमस्वरूपी परवाना रद्द

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना दर्जेदार, योग्य वजनाच्या उत्कृष्ट दर्जाच्या योग्य किमतीत कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी व गुणनियंत्रणासाठी विभागस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावर ४५ भरारी पथके हंगामात नाशिक विभागात स्थापन करण्यात आली आहेत. अनुदानित खते जादा दराने विक्री केल्यास विक्रेते व कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार, असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली.

    खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचा मुबलक पुरवठा खत विक्री केंद्रापर्यंत करण्यात आला आहे. शेतक-यांनी खताच्या विशिष्ट ग्रेडचा आग्रह न धरता मृदा चाचणी परीक्षण अहवालानुसार पेरणी वा लागवड केलेल्या क्षेत्रानूसार पीकवाढीच्या अवस्थेप्रमाणे खतांची योग्य मात्रा देणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने युरिया खताचा संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने नॅनो युरिया या विद्राव्य खताच्या ग्रेडचा नव्याने समावेश केला असून पीकवाढीच्या अवस्थेत वर खते देण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. नॅनो युरियाचा जास्तीत जास्त वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

    खत विक्रेत्यांना सूचना

    –अनुदानित खतांची विक्री ई-पॉस मशिनद्वारे करणे खत विक्रेत्यांना बंधनकारक आहे.
    –रासायनिक खताच्या गोणीवरील छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करणे हा गुन्हा आहे.
    –याबाबत गुण नियंत्रण कक्षाकडे तक्रारी आल्यास संबंधित रासायनिक खत विक्रीचा परवाना अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ व खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदीनुसार कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असे सर्व रासायनिक खत परवानाधारक किरकोळ व घाऊक खत विक्रेते यांना सूचित केलेले आहे.

    नियंत्रण कक्ष व भरारी पथकाचे भ्रमणध्वनी क्रमांक

    नाशिक ८२०८६२८१६८

    जळगाव ८२०८५६१९८६

    धुळे ८४६८९०९६४१

    नंदुरबार ९५०३९३८२५३

  • जोरदार पावसामुळे पिके पुन्हा पाण्याखाली; शेतकरी चिंतेत




    जोरदार पावसामुळे पिके पुन्हा पाण्याखाली; शेतकरी चिंतेत | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या विविध भागात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. लातुरला देखील काल पावसाने झोडपून काढले. त्यामुळे लातूर आणि आसपासच्या भागातील शेतात पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे. बरेच दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या. शेतकरी पावसाची वाट पाहत होते. पण काल जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळण्याऐवजी पिके वाहून जाण्याची वेळ आली आहे.

    ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिले आहे. शिवाय इतर पिकांचे देखील मोठे निक्सन झाले आहे. औसा तालुक्यात देखील सारखीच परिस्थिती असून कमी कालावधीत झालेल्या तुफान पावसामुळे सखल भागात पाणी जमा झाले आहे. ज्या शेतीतून पाणी जाण्यास वाट नाही अशा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे.

    पुन्हा पावसाचा जोर वाढणार

    हवामान खाताना वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे तीन-चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पाचव्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

    error: Content is protected !!





  • विरोधी पक्षनेते आंबादास दानवेंचा बीड दौरा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची घेतली भेट

    हॅलो कृषी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची ते भेट घेत आहेत. आज बीड शहराजवळच्या सामनापूर येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी दानवे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताना एका तरुण शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. यावेळी बोलतांना तरुण म्हणाला की, अशा आर्थिक परिस्थितीत नोकरी नाही,कुठे काम मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील तरुण प्रचंड नैराश्यात गेले आहेत. भविष्यात आपलं काय होणार आहे हे कुणालाच काहीच कळत नाही, असे सांगताना तो ढसाढसा रडायला लागला.

    यावेळी बोलताना आंबादास दानवे म्हणाले की, राज्यात दिवसाला दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करतायत. या खोके सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यात गेल्या दोन महिन्यात जवळपास 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान आज बीड जिल्हातील समनापुर येथील नवनाथ शेळके या आत्महत्याग्रस्त शेकऱ्याच्या घरी सांत्वनपर भेट देत कुटुंबियांशी संवाद साधत प्रशासनाला लवकरात लवकर मदत देण्याचे सुचना केल्या आहेत. दिड लाख रुपयांचे कर्ज व्याजासह साडेपाच लाखांवर जाऊन पोहचले. कर्ज कसे फिटणार याची चिंता उराशी घेऊन या शेतकऱ्याने मुत्यू जवळ केला, असल्याचं दानवे म्हणाले.

    अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीं. फक्त घोषणाचा पाऊस होतोय. अतिवृष्टी, बॅंकांची थकबाकी, यंदाची खरीप व दुबार पेरणीसाठी खाजगी सावकारांकडून 15-20 टक्क्यांनी कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे खोके सरकारला हात जोडून विनंती आहे की, दिल्लीश्वरांच्या समोर लोटांगन तसेच तुमच्या सोबत आलेल्या आमदारांची नाराजी नाट्य दुर झाले असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे, अशी टीका दानवे यांनी शिंदे सरकारवर केली.

  • सप्टेंबरमध्ये ‘या’ पिकांची लागवड करा, हिवाळ्यात मिळणार बंपर नफा

    हॅलो कृषी ऑनलाईन : सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. अशा स्थितीत येत्या काही दिवसांत कडाक्याचे ऊन पडते . या बदलत्या ऋतूचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांवरही होत असल्याने सप्टेंबर महिन्यात कोणती शेती करावी, याचा सल्ला आम्ही शेतकरी बांधवांना देणार आहोत.

    सप्टेंबरमध्ये भाजीपाला व बागकाम करा

    भाजीपाला आणि बागायती पिकांसाठी सप्टेंबर हा महत्त्वाचा महिना मानला जातो. भाजीपाला पिके आणि बागकामासाठी हा महिना योग्य आहे, त्यामुळे तुम्हालाही भाजीपाला लागवड करायची असेल तर हे काम या महिन्यात पूर्ण करा. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्यांची लागवड करण्याचा सल्ला देणार आहोत, ज्याची लागवड करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. या लेखात खाली दिलेल्या भाज्या केवळ खाण्यासाठीच उत्तम नसतात, तर त्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानल्या जातात, त्यामुळे त्यांची मागणी वर्षभर बाजारात राहते.

    १) टोमॅटो

    टोमॅटो लागवडीसाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत पेरणी केली जाते, त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत त्याचे पीक तयार होते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाजारात टोमॅटोची मागणी वर्षभर सारखीच असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास लाखो रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

    २)फुलकोबी

    फुलकोबी ही अशी भाजी आहे, जी क्वचितच कोणी खात नसेल. हिवाळा आला की त्याची भाजी, पकोडे, पराठे हे प्रत्येक घरात नक्कीच खाल्ले जातात. आता लोकांनी ते सूप आणि लोणच्याच्या स्वरूपातही वापरण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच याच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांनी या महिन्यात लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. त्याची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान केली जाते. यानंतर, पेरणीनंतर सुमारे 60 ते 150 दिवसांत फुलकोबीचे पीक विक्रीसाठी तयार होते.

    ३)मिरची

    सप्टेंबर ते ऑक्टोबर हे महिने मिरची लागवडीसाठी सर्वात योग्य मानले जातात. आता वर्षभर लागवड केली जात असली तरी. अशा परिस्थितीत प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या मिरचीची लागवड करून शेतकरी बांधव १४० ते १८० दिवसांत त्यातून नफा मिळवू शकतात.लाल मिरची, हिरवी मिरची, मोठी मिरची आणि बरेच काही मिरच्यांचे अनेक प्रकार. या सर्व वाणांची खास गोष्ट म्हणजे याचा वापर प्रत्येक घरात दररोज केला जातो, कधी लोणच्याच्या स्वरूपात, कधी कोशिंबीरच्या स्वरूपात तर कधी भाजीला तिखटपणा आणण्यासाठी दररोज वापरला जातो, त्यामुळे शेतकरी त्याची लागवड करतात.

    ४)कोबी

    सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी कोबीची लागवड करू शकतात. त्याची पेरणी बेड तयार करून केली जाते. विविध जातींपासून २ ते ४ महिन्यांत उत्पन्न देते. फक्त 60 दिवसांनंतर, तुम्ही त्याचे पीक बाजारात नेऊन विकू शकता. त्यामुळे हिवाळ्यात शेतकऱ्यांना चांगला नफा मिळावा यासाठी सप्टेंबर महिन्यात लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांनी दिला आहे. ही एक भाजी आहे जी अनेक गोष्टींमध्ये कच्ची देखील वापरली जाते.

    ५)गाजर

    गाजराची लागवड ऑगस्टच्या अखेरीस सुरू होऊन नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत केली जाते. अशा परिस्थितीत, सप्टेंबर नुकताच सुरू झाला आहे, त्यामुळे त्याच्या लागवडीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. आता पेरणी केली तर ३ ते ४ महिन्यांनी उत्पादन घेता येईल. सफरचंद गाजरात इतके पौष्टिक तत्व असते, ही म्हण तुम्हीही ऐकली असेल. होय, गाजर हे भारतातील प्रमुख भाजीपाला पिकांपैकी एक आहे, कारण ते केवळ बनवूनच नव्हे तर कच्चे देखील वापरले जाते. याच्या मदतीने लोणची, हलवा, सॅलडसह अनेक गोष्टी बनवल्या जातात. थंडीच्या मोसमात गाजराच्या हलव्याची सर्वाधिक चर्चा होते. थंडीचा हंगाम सुरू होताच त्याची मागणी गगनाला भिडू लागते. यासोबतच हे डाएट करणाऱ्या लोकांमध्येही खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना नफ्याची दारे खुली होतील.

     

     

  • बीड जिल्ह्यात गोगलगायींनंतर आता घोणस अळीचे संकट ; परिणाम केवळ पिकांवर नाही तर शेतकऱ्यांवर सुद्धा

    हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाल्यानंतर बीड जिल्ह्यात गोगलगायींच्या प्रदूरभावामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता आणखी एक नवे संकट बीड मधल्या शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आता बीड मध्ये घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव होतो आहे. महत्वाचे म्हणजे या अळीचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होताना पहायला मिळत आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आहे की, बीड जिल्ह्यतल्या आष्टी तालुक्यातल्या शिराळा गावात घोणस आळी चावल्यामुळे शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे. घोणस नावाची एक अळी जी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. घोणस नावाची विषारी अळी अंगावर पडून तिने चावा घेतल्यानं असह्य वेदना झाल्यानं तीन शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली आहे. यामुळं शेतकरी वर्गाच्या मनात धडकी भरली आहे. हा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील शिराळा गावात उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी दिली आहे.

    काय कराल उपाय ?

    –ही अळी म्हणजे कोणत्याही पिकावरील किड नाही तर एक रानटी गवतावरील अळी आहे.
    –जास्त प्रमाणात जर या अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर क्लोरोसायफर फवारणं गरजेचं असल्याची माहिती देखील गोरख तरटे यांनी दिली.
    –परंतू जास्त प्रमाणात प्रादुर्भाव नसेल तर काही फवारण्याची गरज नाही.
    — शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी म्हणून अळीपासून संरक्षण करण्यासाठी फुल कपडे घालणे गरजेचे आहे.
    — ही अळी शरीरावर येऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केलं आहे.

    अळी चावल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात ?

    –घोणस अळीने चावा घेतल्यास असाह्य वेदना होतात
    — उलट्या होतात.

    दरम्यान, जिथे ही अळी आढळली तिथे जाऊन कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे.

  • ‘… माझ्याकडून त्यांना 2 घरं, आजच भूमीपूजन’, मेळघाटात अब्दुल सत्तारांची क्विक ऍक्शन ; वाचा नेमकं काय घडलं ?




    ‘… माझ्याकडून त्यांना 2 घरं, आजच भूमीपूजन’, मेळघाटात अब्दुल सत्तारांची क्विक ऍक्शन ; वाचा नेमकं काय घडलं ? | Hello Krushi









































    हॅलो कृषी ऑनलाईन : राजकीय डायलॉगबाजीसाठी प्रसिद्ध असलेले अब्दुल सत्तार यांनी सध्या शिंदे सरकारच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाला आजच सुरुवात करण्यात आली असून काल रात्री कृषी मंत्र्यांनी तिथल्या शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम केला होता. दरम्यान राज्यभरात काल पावसाने हजेरी लावली. सत्तार ज्या शेतकऱ्यांच्या घरी थांबले होते तिथे पाणी गळत होते. त्यानंतर सत्तारांनी तत्काळ… माझ्याकडून या दोन्ही शेतकऱ्यांना चांगली घरं बांधून मिळतील, असं आश्वासन दिलं.

    केवळ आश्वासन देऊन ते थांबले नाहीत तर आज गुरुवारी सकाळी लगेच जमिनीचं मोजमाप सुरु झालं आणि त्याचं भूमीपूजन करणार असल्याचंही सत्तारांनी जाहीर केलं.. त्यामुळे मेळघाटात कृषीमंत्र्यांच्या दौऱ्याची सध्या चांगलीच हवा झाली आहे.

    बुधवारी रात्री ते अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाटमधील साद्राबाडी या गावात पोहोचले. येथील चुन्नीलाल पटेल यांच्या घरी त्यांनी अत्यंत साधेपणाने रानभाजी आणि भाकरीचा आस्वाद लुटला. तर सुनील धांडे यांच्या घरी मुक्काम केला. शैलेंद्र सावलकर यांच्याही घरी त्यांनी भेट दिली. सुनील धांडे आणि शैलेंद्र सावलकर यांची घरं रात्री गळत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना माझ्याकडून घरं बांधून देणार, असं आश्वासन सत्तारांनी दिलं. आज त्याचं भूमीपूजनही होणार आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नाला देखील येणार असल्याचं सत्तारांनी सांगितलं.

     

    error: Content is protected !!





  • खत न मिळाल्याने शेतकरी नाराज, कृषी सल्लागाराला बांधले खांबाला

    हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे युग हे सोशल मीडियाचे युग असून दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील असून खते न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी कृषी सल्लागाराला खांबाला बांधले. हा व्हिडिओ एनडीटीव्हीच्या पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

    व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, खांबाला बांधलेली व्यक्ती फोनवर कोणाशी तरी आपली स्थिती शेअर करत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार खतांच्या काळाबाजारामुळे नाराज होऊन शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. देशात सध्या खरीप हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खतांची गरज मोठ्या प्रमाणावर आहे.

    व्हायरल व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत, आतापर्यंत 34 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि लोक खूप कमेंट करत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले आहे की – बिहारची ही रोजची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याबद्दलचा त्यांचा संताप न्याय्य आहे.