Category: Farmers

  • नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा ; पाथरी वकील संघाची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता . प्रतिनिधी

    परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यासह पाथरी तालुक्यात सोयाबीन कापूस या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट पिक विमा देत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पाथरी वकील संघाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे .या संदर्भात बुधवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

    पाथरी वकील संघाच्या वतीने बुधवार 19 ऑक्टोबर रोजी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे यामध्ये म्हटले आहे की ,मागील काही दिवसापासून परभणी जिल्हा व पाथरी तालुक्यात परतीच्या पावसाने सोयाबीन कापूस या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे व रब्बी पेरणीचा हंगाम सुरू झाला असल्यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी पाथरी तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी केली आहे . यावेळी मागील 5 दिवसापासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकरी बांधवांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात सोबतच या आंदोलनास पाठिंबा असल्याचे ही दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे .

    यावेळी निवेदनावर पाथरी वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट बी . इ . दाभाडे , सचिव एडवोकेट बी .एल .रोकडे ,एडवोकेट व्ही . एस .गात ,एडवोकेट डी .बी . निसरगंध ,एडवोकेट डी . टी . मगर ,एडवोकेट बी .पी . चव्हाण , ऍड. आर . व्ही .गिराम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  • पिकविमा ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शिवसेनेचा पाथरीत रास्तारोको; राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ व पिकविमा मागणीसाठी परभणी जिल्ह्यात बुधवारी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परभणीत आंदोलनाचे नेतृत्व करत असताना परभणीचे आ.राहुल पाटील यांनी जिल्ह्यात जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत पिक विमा देण्यात येणार नाही तोपर्यंत विधानसभेचे सत्र सुरू होऊ देणार नाही ! असा इशारा दिला आहे .

    जिल्ह्यातील पाथरी शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर सेलू कॉर्नर येथे 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान रास्ता रोको करण्यात आला .यावेळी माजलगाव , सेलू परभणी कडे जाणारी वाहतुक ठप्प झाली होती . सेलू कॉर्नर परिसर शिवसैनिकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करून दणाणून सोडले होते. सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर तहसील समोर ओला दुष्काळ व पिक विमा मागणीसाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणकर्त्यांची भेट घेत यावेळी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

    दरम्यान प्रशासनाकडून आंदोलन ठिकाणी जात नायब तहसीलदार एस.बी कट्टे यांनी मागण्याचे निवेदन स्विकारले . पोलीसांकडून मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. यावेळी आंदोलनामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे , मा . जि.प सदस्य माणिकअप्पा घुंबरे , रंगनाथ वाकणकर , उपतालुका प्रमुख रावसाहेब निकम , बालासाहेब शिंदे ,सत्यनारायण घाटूळ , माऊली गलबे , अनंता नेब , शरद कोल्हे , ज्ञानेश्वर शिंदे , रणजित गिराम,

    तुकाराम हारकळ , रामचंद्र आम्ले , पांडूरंग शिंदे , अविराज टाकळकर , सिध्देश्वर इंगळे , राजु नवघरे , कृष्णा शिंदे , किसन रणेर , सुरेश नखाते , सुर्यकांत नाईकवाडे , प्रमोद चाफेकर , दिपक कटारे , राधे गिराम, प्रताप शिंदे , जयराम नवले , सुंदर दिवटे , भारत मस्के आदी शिवसेना ( ठाकरे गट) , युवासेना पदाधिकारी यांच्या सह तालुक्यातील शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते .

  • PM Kisan : जर 12वा हप्ता अद्याप खात्यात आला नसेल, तर येथे तपासा डिटेल्स

    हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा 12वा हप्ता जारी केला. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000-2000 रुपये गेले. विशेष बाब म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 2000-2000 रुपयांच्या स्वरूपात 16,000 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत.

    खात्यात किती रक्कम जमा झाली याची माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे मिळाली असती. ज्या शेतकर्‍यांना अद्याप रक्कम जमा झाल्याचा मेसेज आला नसेल, तर ते त्यांचे खाते तपासून (PM Kisan) माहिती घेऊ शकतात. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

    १) खात्यात पैसे आले आहेत की नाही याची माहिती मिळविण्यासाठी, शेतकऱ्यांना प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.

    २)येथे तुम्हाला उजव्या बाजूला Farmers Corner पर्याय दिसेल.

    ३)त्यानंतर त्या विभागात जाऊन Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

    ४)नवीन पेजवर लाभार्थीला आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांकाचा पर्याय निवडावा लागेल. या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता. (PM Kisan)

    ५)त्यानंतर Get Data वर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर, लाभार्थीच्या सर्व हप्त्यांची स्थिती उघड होईल.

    ६)तुम्हाला FTO is generated and Payment confirmation is pending असे दिसल्यास याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया केली जात आहे.

    केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले आहे आणि त्यानंतरही त्यांना हप्ता मिळाला नाही, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या क्रमांकांवर फोन करून माहिती मिळवू शकता.

    पीएम किसान लँडलाइन क्रमांक- 011—23381092, 23382401

    पीएम किसानची नवीन हेल्पलाइन- 011-24300606

    पीएम किसान टोल फ्री क्रमांक- 18001155266

    पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक- 155261

    पीएम किसानची दुसरी हेल्पलाइन आहे- 0120-6025109

  • अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पाथरी तहसील कार्यालयासमोर उपोषण; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता प्रतिनिधी

    शुक्रवारी दिवसभर झालेल्या अतिवृष्टी मुळे खरिपातील सोयाबीन ,कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा व खरीपातील काढणी चालू असलेल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान व पिक विमा देण्यात यावा या मागणीसाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर शनिवार 15 ऑक्टोबर पासून तालुक्यातील शेतकऱ्यांसह युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवासेना यांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

    मागील काही दिवसापासून पाथरी तालुक्यातील शेत शिवारात झालेल्या परतीच्या पावसाने खरीपातील काढणी चालू असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .त्यात शुक्रवारी दिवसभर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला .त्यामुळे पाथरी तालुक्यातील चारही महसूल मंडळातील शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते . यामध्ये खरीपात काढणी सुरु असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे . यासंदर्भात शनिवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी महसुल प्रशासनाला शेतकऱ्यांसह युवक काँग्रेस , राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवासेना ( ठाकरे गट ) यांनी ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे ,निकष न लावता थेट हेक्टरी १ लाख रुपये मदत जाहीर अशी निवेदनातुन मागणी केली आहे . सोबतच मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षीय कार्यकर्त्यांसह स्थानिक अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आता तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत . मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची भुमिका यावेळी उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

    यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसापासुन पाथरी तालुक्यातील सर्व मंडळात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे . त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही . या आसमानी संकटातुन शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनानी पिक विमा व ओला दुष्काळ तात्काळ जाहिर करुण हेक्टरी 1 लाख मदत जाहिर करावी . सदरील मदत कोणतेही निकष व पंचनामे न करता जाहिर करत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी .अशी मागणी केली आहे. जोपर्यंत ही मदत शासन जाहिर करत नाही तो पर्यंत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीणे शनिवार १५ ऑक्टोबर पासुन उपोषन करण्यात येणार आहे असा इशारा यावेळी देण्यात आला आहे .

    उपोषण स्थळी तालुक्यातील शेतकरी यांच्यासह युवा सेनेचे पांडुरंग शिंदे, युवक काँग्रेसचे महेश कोल्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विष्णू काळे, संदीप टेंगसे, माजी पं.स.सभापती राजेश ढगे, माणिकअप्पा घुंबरे ,अमोल भाले पाटील, सुनील पितळे, शरद कोल्हे, ज्ञानेश्वर शिंदे, परमेश्वर नवले, राजु नवघरे, सुर्यकांत नाईकवाडे, पांडूरंग सोनवण, अविराज टाकळकर, प्रताप शिंदे, ऍड बी .जी . गायकवाड, अमृत अडसकर, सिध्देश्वर इंगळे, ऋषीकेश नाईक, महारुद्र वाकणकर, कृष्णा गलबे,आदी शेतकरी मोठ्या संख्येने साखळी पद्धतीने उपोषण करणार आहेत .

  • नांदेड जिल्ह्यात आत्महत्येचा आलेख वाढला, अवघ्या दोन महिन्यात 26 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात दररोज शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. मात्र मराठवाड्यात सध्या शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, एकट्या नांदेड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुपटीने वाढल्या आहेत. संततधार पावसामुळे या भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे. अधिकृत अंदाजानुसार, नांदेडमधील आत्महत्यांची संख्या जुलैमधील आठवरून ऑगस्टमध्ये 26 वर पोहोचली.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये जिल्ह्यातून ऑगस्टपर्यंत एकूण 93 शेतकरी आत्महत्या झाल्या. आणि अधिकाऱ्यांनी यापैकी ६३ जणांना एक लाख रुपयांच्या भरपाईसाठी पात्र मानले. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यात 119 शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. त्यापैकी केवळ 65 शेतकरी कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाली. आतापर्यंत एकट्या मराठवाड्यातील ६६१ शेतकऱ्यांनी जीव दिला आहे. त्यापैकी सुमारे 485 जणांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली आहे. अवाढव्य कर्ज तसेच खराब हवामानामुळे होणारे अतोनात नुकसान यामुळे शेतकऱ्यांना असे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे.

    3,652,872 हेक्टर जमीन खराब 

    नांदेडच्या सिरंजनी गावचे प्रमुख पवन करेवाड म्हणाले की, या वर्षी पावसाने गाव आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सुमारे 20 टक्के शेतकऱ्यांची शेतजमीन पूर्णपणे वाहून गेली आहे. जुलैच्या पहिल्या पावसानंतर काही शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या आकडेवारीनुसार, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 3,652,872 हेक्टर जमीन खराब झाली आहे. शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, खराब हवामानामुळे शेतीच्या नुकसानीसोबतच परिस्थिती बिकट झाली आहे.

    13,200 प्रति हेक्टर रु.च्या रकमेचा हक्क 

    माझी पाच एकर जमीन सोयाबीन, कापूस वाहून गेल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले. नांदेडमधील हिमायतनगर येथील शेतकरी किरण गाडे यांनी सांगितले की, मी झाडे लावू किंवा माती तयार करू शकेन अशी शक्यता नाही. ते म्हणाले की, संपूर्ण मातीची झीज झाली असून येत्या हंगामासाठी सुपीकता आणि शेतजमिनी पूर्ववत करणे कठीण होणार आहे. गाडे यांनी त्यांच्या पिकावर 80 हजार रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती. गतवर्षी जेवढे पीक काढले जाईल, त्यांच्याकडून मला खूप आशा असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, जमिनीचे नुकसान झाले असले तरी मला राज्य सरकारकडून मदत म्हणून 13,200 रुपये प्रति हेक्टर रक्कम मिळण्यास पात्र आहे.

    नुकसान भरून काढण्यासाठी कोणतीही तरतूद नाही

    महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या प्रमाणात नुकसान भरून काढण्याची कोणतीही तरतूद नाही. सध्या शेतकऱ्यांच्या पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले तरच ते आर्थिक भरपाई मिळण्यास पात्र आहेत. त्याच वेळी, ज्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे संपूर्ण नुकसान झाले आहे त्यांना भरपाई लागू आहे. पण एवढी मर्यादित मदत आणि बिघडलेली परिस्थिती हे देखील शेतकऱ्यांना आत्महत्येकडे ढकलण्याचे कारण आहे.

    अडीच एकर जमिनीवर केलेली सोयाबीनची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली

    सरकारी नोंदीनुसार, नांदेडमधील परवा गावातील राजू गोथमवाड या शेतकऱ्याने १४ जुलै रोजी आत्महत्या केली. 2021 मध्ये 2.5 एकर जमिनीवर केलेली सोयाबीनची लागवड पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. गोठमवाड यांनी एका खासगी सावकाराकडून चार टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. तोट्याबरोबर व्याज वाढले. जूनमधील पावसाने बियाणे उगवण्यास मदत केली, परंतु एक महिन्यापेक्षा जास्त काळ पाऊस न झाल्यामुळे वाढ खुंटली. पाऊस परतल्यानंतर, पिके जास्त प्रमाणात सडली. अशाप्रकारे गोथमवादने आपले जीवन संपवले. कर्ज म्हणून मागितलेले 2 लाख रुपये आपण फेडू शकत नाही हे त्याला माहीत होते.

    संदर्भ टीव्ही ९

     

     

     

     

     

  • राज्यातील ‘हा’ साखर कारखाना देणार एकरकमी FRP

    हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापुरातील शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी हंगामासाठी कारखान्याच्या परंपरेनुसार एकरकमी एफआरपी (FRP) देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व श्रीदत्त साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

    यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सभासदांच्या विश्वासास पात्र राहून आणि कामगारांच्या पाठबळावर दत्त साखर कारखान्याने चौफेर प्रगती साधली आहे. यावर्षी कारखान्याकडे पुरेसा ऊस उपलब्ध होणार असून यंदाचा गळीत हंगामात जादा क्षमतेने गाळप करण्याचा मानस आहे. ते म्हणाले, की केंद्र शासनाने हंगामापूर्वी साखर निर्यातीबाबतचे धोरण जाहीर करणे आवश्यक आहे,वार्षिक सभेत कारखान्याचा शेअर १० हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करण्याच्या ठरावास सभासदांनी मंजुरी दिली.

    पुढे बोलताना ते म्हणाले, साखरेला केंद्र शासनाने प्रति क्विंटल तीन हजार सहाशे रुपये आधारभूत किंमत ठरवावी. कारखाना कार्यक्षेत्रातील १९ गावांमधील क्षारमुक्त प्रकल्प राबविण्यात आला असून यामध्ये तीन हजार एकर जमीन टिकाऊ झाली आहे. क्षारमुक्त प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना एकरी २४ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. ऊर्जांकूर प्रकल्प हा लवकरच कर्जमुक्त होणार असून तो कारखान्याच्या मालकीचा झाल्यानंतर ऊस उत्पादक सभासदांना त्याचा लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

    दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. त्याचबरोबर या सभेत सभासदांनी विचारलेल्या लेखी स्वरूपातील प्रश्नांना व्यवस्थापनाने उत्तरे दिली. व्हाइस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिलराव यादव यांच्यासह संचालक उपस्थित होते.

  • 12th Installment Of PM Kisan Will Be Transferred Soon

    हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या पैशासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढत आहे. आतापर्यंत 12 वा हप्ता मिळालेला नाही. ऑगस्टमध्येच पैसे मिळतील, अशी आशा होती. मात्र, आता ही प्रतीक्षा जास्त काळ राहणार नाही. देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेची भेट मिळणार आहे. 2000 रुपयांचा 12 वा हप्ता 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान मिळू शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सुमारे 22 हजार कोटी रुपये एकत्रितपणे पाठवले जातील.

    पीएम किसान (PM Kisan) योजनेअंतर्गत 12 व्या हप्त्यासाठी पैसे पाठवण्याची मुदत नोव्हेंबरपर्यंत आहे. दरम्यान, पैसे कधीही पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. त्यांना कोणत्याही परिस्थितीत पैसे मिळतील. फक्त शासनाकडून जमिनीच्या नोंदींची पडताळणी केली जात आहे. केवायसी करून घेणे. जेणेकरुन जे पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळतील. जे लोक अपात्र आहेत त्यांना पैसे मिळू नयेत. महसूल विभागाचे कर्मचारी अनेक शेतकऱ्यांना फोन करून त्यांच्या जमिनीच्या नोंदींची माहिती घेत आहेत.

    राज्यांची जबाबदारी काय आहे?

    भूमी अभिलेख पडताळणीचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. कारण पीएम किसान योजनेत (PM Kisan) होत असलेली फसवणूक पाहता, शेतकरी कुटुंबांची ओळख पटवण्याची संपूर्ण जबाबदारी राज्याची असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 100 टक्के पैसे देणे हे केंद्र सरकारचे काम आहे. महसूल हा राज्याचा विषय असल्याने अर्जदार शेतकरी कोण आणि कोण नाही हे राज्य सरकार ठरवेल.

    चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलयास काय करावे ?

    ज्या अपात्र लोकांनी पैसे घेतले आहेत त्यांना ती रक्कम सरकारला परत करावी लागेल, असा सरकारचा हेतू स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही आयकरदाते किंवा पेन्शनधारक असाल तर ते पैसे परत करा. अन्यथा सरकार तुम्हाला नोटीस पाठवेल. पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या पोर्टलवर पैसे परत करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तुम्ही केंद्र सरकारच्या पोर्टलवरूनही (https://bharatkosh.gov.in/) परत येऊ शकता. यासाठी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचीही मदत घेता येईल.

     

  • योगेश्वरी कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही; अखील भारतीय किसान सभेचे आमरण उपोषण सुरु




    योगेश्वरी कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही; अखील भारतीय किसान सभेचे आमरण उपोषण सुरु | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    2021-22 च्या गळीत हंगामातील ऊस बिलासाठी 17 ऑगस्ट च्या मोर्चामध्ये ठरल्या प्रमाणे व्यवहार न झाल्यामुळे सोमवार 3 ऑक्टोबर पासुन पाथरी (जि . परभणी ) येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

    2021-2022 च्या हंगामातील ऊस बिल थकबाकी व ठेकेदाराचे कमिशन डिपॉझीट व इतर मागण्यासाठी पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर कारखान्यावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता . त्यावेळी कारखाना प्रशासनाने काही लेखी अश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. पण ठरल्या प्रमाणे शेतकऱ्यांसोबत व्यवहार केलेला नाही म्हणत आता योगेश्वरी शुगर प्रशासनाच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकरी पाथरी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर
    आमरण उपोषणास बसले आहेत.

    यावेळी योगेश्वरी शुगर प्रशासनाने दिलेल्या लेखी पत्राचे उल्लंघन केल्यामुळे योगेश्वरी प्रशासनावर शेतकर्यांची फसवणुक केल्यामुळे गुन्हा दाखल करावा अशी उपोषण कर्त्यांची मागणी आहे. कॉ. दिपक लिपणे कॉ. भागवत कोल्हे कॉ. भागवत शिंदे ,कॉ . गोकुळ शिंदे, काँ . सुभाष नखाते यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपोषणाला बसले आहेत .

    error: Content is protected !!





  • आज उडिदाला मिळाला कमाल 10 हजार 100 रुपयांचा कमाल भाव




    आज उडिदाला मिळाला कमाल 10 हजार 100 रुपयांचा कमाल भाव | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उडीद बाजारभावानुसार आज मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं उडदाला सर्वाधिक दहा हजार शंभर रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

    आज मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 15 क्विंटल काळ्या उडदाची आवक झाली याकरिता किमान भाव 6200 कमाल भाव दहा हजार शंभर आणि सर्वसाधारण भाव 7150 इतका मिळाला.

    आवके बाबतीत बोलायचं झाल्यास आज सर्वाधिक आवक ही दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 1534 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 6300, कमाल भाव 7845 आणि सर्वसाधारण भाव सात हजार 75 रुपये इतका मिळालाय.

    आजचे उडीद बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    24/09/2022
    पुणे क्विंटल 3 8000 9100 8550
    कन्न्ड क्विंटल 1 5000 5600 5100
    नांदूरा क्विंटल 25 7300 8975 8975
    भंडारा हिरवा क्विंटल 1 5000 5000 5000
    बीड हायब्रीड क्विंटल 145 4000 7400 6537
    लातूर काळा क्विंटल 1349 5000 7640 7260
    जालना काळा क्विंटल 77 4000 7400 6515
    अकोला काळा क्विंटल 44 3000 8305 6095
    जळगाव काळा क्विंटल 37 7200 7700 7500
    मालेगाव काळा क्विंटल 3 8400 8750 8470
    चिखली काळा क्विंटल 30 6001 9001 7501
    अक्कलकोट काळा क्विंटल 1100 6000 7450 6800
    वाशीम काळा क्विंटल 60 5500 6980 6500
    भोकरदन काळा क्विंटल 5 5500 5700 5600
    हिंगोली काळा क्विंटल 13 5150 6620 5885
    मलकापूर काळा क्विंटल 15 6200 10100 7150
    शेवगाव काळा क्विंटल 22 4600 6000 6000
    शेवगाव – भोदेगाव काळा क्विंटल 4 6500 6500 6500
    देउळगाव राजा काळा क्विंटल 5 4500 7000 6500
    वडूज काळा क्विंटल 50 6400 6500 6450
    औराद शहाजानी काळा क्विंटल 15 5300 7155 6227
    तुळजापूर काळा क्विंटल 140 6000 7100 6800
    दुधणी काळा क्विंटल 1534 6300 7845 7075
    अमरावती लोकल क्विंटल 3 3500 5500 4500
    सांगली लोकल क्विंटल 100 6600 7100 6850
    माजलगाव लोकल क्विंटल 6 4500 6600 6500
    जामखेड लोकल क्विंटल 1441 5500 6800 6150
    परांडा लोकल क्विंटल 131 6650 7000 6950
    सोलापूर मोगलाई क्विंटल 480 4500 7140 6000

    error: Content is protected !!





  • मान्सून निरोप घेणार! शेतकऱ्यांनी काय करावे नियोजन ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार असल्याची माहिती दिली आहे. मान्सून वेळेत परतत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता नेमकी कोणती कामं करावीत. पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं यासंदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

    कांद्याची लागवड :

    साधारणात: बियाणे टाकल्यापासून 45 दिवसांमध्ये कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार होता. त्यामुळं आता कांद्याचे बी टाकले तरी चालेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

    द्राक्ष आणि डाळिंब छाटणी

    द्राक्ष बागेची छाटणी शेतकऱ्यांनी केली तरी चालेल. छाटणी करण्यास अडचण काही नाही. कारण, सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस निरोप घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरुवात केली तरी चालेत. त्याचबरोबर डाळींबाची पानगळणी केली तरी चालेल. कारण आता जर पानाची छाटणी सुरु केली तर मार्च ते एप्रिलपर्यंत पिक बाजारात येईल. ‘हस्त बहार’ नियोजन करण्यास सध्याचा काळ योग्य जाणवत आहे.

    खरीपातील पिकांची काढणी

    खरीपातील आगाप मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये ही पिके परतणीच्या स्टेजमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्या काढणीच्या तसेच पशुधनासाठीच्या मुरघास प्रक्रिया आणि साठवणीच्या नियोजनासाठीचा वातावरणाच्या नजरेतून सध्याचा काळ योग्य जाणवत आहे. त्याचे योग्य ते नियोजन करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात करावी सोयाबीन आणि बाजरीचे पिक काढणी करण्याच्या स्टेजमध्ये आहे. त्यासाठी पूर्वनियोजन करावे लागते. विशेषत: मजूर लावून करायची असेल तर त्याचे नियोजन मशीननं काढणी करायची असेल तर त्याचे शेतकऱ्यांनी आत्ताच नियोजन करावं

    मुरघास तयार करण्यासाठी मकेची काढणी करावी

    आगाप मका आता काडणी करायला सुरुवात केली तरी चालेल. ज्या शेतकऱ्यांना मुरघास तयार करायचा आहे, असा शेतकऱ्यांनी मकेची तोडणी करावी असे खुळे यांनी सांगितले आहे. तर बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ही पिकं 15 ऑक्टोबरच्यानंतर काढणीसाठी येणार आहेत, त्यादृष्टीनं शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नियोजन करावे.

    संदर्भ : एबीपी माझा