Category: Maharashtra

  • कधीपर्यंत कराल रब्बी भुईमुगाची पेरणी? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरिपाच्या पिकांची काढणीची वेळ जवळ आली असून लवकरच काढणी पूर्ण होईल. काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी जमीन तयार केली जात आहे. जर तुम्ही यंदाच्या रब्बी हंगामात भुईमुगाची लागवड करणार असाल तर ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. आजच्या लेखात रब्बी भुईमूग लागवडीविषयी जाणून घेऊया…

    रब्बी भुईमूग पिकाची पेरणी 30 सप्टेंबर पर्यंत करावी अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिली आहे.

    भुईमूग लागवडीसाठी जमीन

    भुईमूग लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, मऊ, भुसभुशीत, वाळूमिश्रित व सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडावी. अशा जमिनीत आऱ्या सहज जाऊन शेंगा चांगल्या पोसतात. जमिनीमध्ये हवा खेळती राहून, मुळांना भरपूर हवा मिळते. मुळावरील नत्रांच्या गाठींची वाढ होते. भारी चिकण मातीच्या जमिनी ओलसरपणा कमी झाल्यावर कडक होतात. तसेच काढणीच्या वेळी शेंगा जमिनीत राहण्याची शक्‍यता असते. अशा जमिनीत भुईमुगाची लागवड करू नये.

    पेरणी

    रब्बी हंगामात भुईमुगाची १५ डिसेम्बर पूर्वी करावी. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.

    वाण

    लागवडीसाठी एस.बी. – ११, टी.ए.जी. – २४, टी.जी. – २६ या जातींचे हेक्‍टरी १०० किलो बियाणे लागते. तर फुले प्रगती, फुले व्यास, फुले उनप, जे.एल. – ५०१, फुले भारती या जातींचे हेक्‍टरी १२० ते १२५ किलो बियाणे लागते.

    बेजप्रक्रिया

    पेरणीपुर्वी प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून त्वरित पेरावे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. जमीन ओलवून नंतर वापशावर पाभरीने अथवा टोकण पद्धतीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागून उगवण चांगली होते.

  • जाणून घ्या ‘लंपी’च्या प्रसाराबद्दल महत्वाची माहिती

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो राज्यातील जवळपास ३० जिल्ह्यांमध्ये लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रोगाच्या प्रसारासाठी कीटक हे मुख्य कारणीभूत आहेत. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. पशुधन व्यवस्थापनाबाबतची ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समिती यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

    –गोवंशीय पशुधनामध्ये सध्या लम्पी स्कीन डीसीज होत आहे. यांचा प्रसार अनेक मार्गापैकी एक म्हणजे किटकवर्गीय चावणाऱ्या माशांमार्फत होतो. त्या किटकवर्गीय माशा व त्यांचे नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल ? जाणून घेऊया

    किटकवर्गीय माशा : यामध्ये सर्वात जास्त हिमॅटोबीया प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमोक्षीस, क्यूलिफॉईडस आणि डास, या सर्व प्रजातीच्या माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन डिसीजचे विषाणू यांत्रीक पध्दतीने प्रसारीत करतात.

    1)हिमॅटोबीया : ही माशी पशुधनास अठ्ठेचाळीस वेळेस चावे व टाकलेल्या ताज्या शेणावरती अंडी घालते.

    अ) शेणाची योग्य विल्हेवाट लावणे व शेणाचा खड्डा पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित करणे.
    ब) पशुधनाच्या शरीरावर वनस्पतीजन्य अथवा रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणे.

    2)टॅबॅनस : ही माशी आकाराने मोठी असून गाय/म्हैस यांना प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व त्याजागी रक्त वाहते.

    अ) पशुधनास प्रखर सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत) चरावयास सोडू नये व गोठयात ठेवावे.

    3)स्टोमोक्सीस : या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवरती आपली अंडी घालतात.

    अ) गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये टाकावी.
    ब) या माशा देखील प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या वेळा सोडून पशुधनास चरावयास सोडावे.

     

  • Lumpy : लम्पी संक्रमित गायींचे दूध मानवांसाठी धोकादायक आहे का ? दुधातील विषाणू कसे नष्ट करायचे ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी स्किन (Lumpy) व्हायरसने गायींच्या मृत्यूने कहर केला आहे. एका सर्वेक्षणानुसार देशभरात आतापर्यंत सुमारे ७० हजार गायींचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लम्पी व्हायरसमुळे अनेक भागात दुधाच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये या विषाणूचे लसीकरण सुरू झाले आहे. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊया की लंपी संसर्ग झालेल्या गायींच्या दुधाचे सेवन मानवांसाठी कसे आहे.

    दुधावर लम्पी विषाणूचा प्रभाव

    लखनौ विभागाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, गायींच्या दुधात लम्पी (Lumpy) विषाणूचा प्रभाव निश्चितपणे दिसून येतो. परंतु ते दुधापासून दूर केले जाऊ शकते. दूध काढल्यानंतर प्रथम दूध चांगले उकळून घ्यावे व नंतर ते स्वच्छ भांड्यात ठेवावे. असे केल्याने विषाणू दुधातच नष्ट होतात. यानंतरच तुम्ही गायीचे दूध वापरू शकता.

    लक्षात ठेवा की विषाणूची लागण झालेल्या गायींच्या वासरांना दूर ठेवा. कारण गाईच्या दुधापासून वासरे या विषाणूचे बळी ठरू शकतात. तसे, आजपर्यंत देशातील मानवांमध्ये लम्पी व्हायरसचा कोणताही प्रभाव दिसून आलेला नाही, परंतु तरीही वैज्ञानिकांनी ते टाळण्याचा सल्ला दिला आहे.

    दूध कमी होणे

    व्हायरसमुळे गायीचे दूध कमी होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम दूध (Lumpy) व्यवसायावर होत आहे. राजस्थानमध्ये दुधाचे प्रमाण दररोज ३ ते ४ लाख लिटर कमी होत आहे. एवढेच नाही तर इतर राज्यांतही गाईच्या दुधाची स्थिती अशीच आहे. अशा परिस्थितीत, सरकारने सर्व पशुपालकांना त्यांच्या गायींना या विषाणूपासून वाचवण्यासाठी काउ पॉक्स लस घेण्यास सांगितले आहे. ही लस प्रथम शेळ्यांमध्ये वापरली गेली. जेणेकरून त्यांना विषाणूचा संसर्ग टाळता येईल.

     

     

     

     

  • सणासुदीमुळे झेंडूला मिळतोय चांगला दर

    हॅलो कृषी ऑनलाईन : गणेशोत्सवानंतर आता नवरात्र सुरु झाल्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली असून इतर फुलांसह झेंडूला देखील राज्यभरात चांगला दर मिळतो आहे. विशेषतः दसऱ्याला झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा आहे.

    पावसामुळे झेंडू पिकाला फटका

    नुकत्याच झालेल्या पावसानं झेंडूच्या फुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळं झेंडूची आवक मर्यादीत होतेय. सध्या झेंडूला प्रतिक्विंटल ४ हजार ते ७ हजार रुपयांचा दर मिळतोय. दसऱ्याच्या काळात झेंडूला मागणी वाढून दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज फूल व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

    पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक २६ रोजी झेंडूची ९६० क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 2000, कमाल भाव 5000, तर सर्वसाधारण भाव 3500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

    पुणे बाजार समितीतील झेंडू भाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    26/09/2022
    पुणे लोकल क्विंटल 960 2000 5000 3500
    25/09/2022
    पुणे लोकल क्विंटल 503 2000 5000 3500
    24/09/2022
    पुणे लोकल क्विंटल 417 2000 4000 3000
    23/09/2022
    पुणे लोकल क्विंटल 333 1000 4000 2500
    22/09/2022
    पुणे लोकल क्विंटल 182 2000 4000 3000

  • All About Carrot Farming In Maharashtra

    हॅलो कृषी ऑनलाईन : गाजराचा (Carrot Farming) वापर भाज्या, कोशिंबीर, हलवा, लोणचे इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. पावसाळा संपणार आहे. अशा परिस्थितीत हिवाळा येताच बाजारात गाजराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. बाजारपेठेतील चांगली मागणी पाहता तुम्ही गाजर पिकवूनही बंपर कमवू शकता. गाजर ही “वार्षिक” किंवा “द्विवार्षिक” औषधी वनस्पती आहेत जी Umbelliferae कुटुंबातील आहेत. हे व्हिटॅमिन ए चा उत्तम स्रोत आहे. गाजर हे भारतातील मुख्य भाजीपाला पीक आहे. हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि उत्तर प्रदेश ही गाजर पिकवणारी प्रमुख राज्ये आहेत.

    गाजर शेती

    गाजराच्या चांगल्या उत्पादनासाठी (Carrot Farming) मातीचा pH 5.5 ते 7 च्या दरम्यान असावा. जमीन चांगली नांगरून जमीन तण व गुठळ्यांपासून मुक्त करा. जमीन तयार करताना चांगले कुजलेले शेण 10 टन प्रति एकर टाका आणि जमिनीत चांगले मिसळा.

    गाजर पेरणीची वेळ

    ऑगस्ट-सप्टेंबर हा स्थानिक वाणांच्या गाजरांच्या (Carrot Farming) पेरणीसाठी सर्वोत्तम काळ आहे, तर ऑक्टोबर-नोव्हेंबर हा युरोपियन वाणांसाठी योग्य आहे. यासोबतच गाजराचे पीक किमान ९० दिवसांत तयार होते.

    गाजर कसे पेरायचे

    गाजराच्या (Carrot Farming) चांगल्या उत्पादनासाठी बियाणे 1.5 सेमी खोलीवर पेरावे. ओळीपासून ओळीतील अंतर 45 सेमी आणि रोप ते रोप अंतर 7.5 सेमी ठेवा. पेरणीसाठी डाबलिंग पद्धत वापरा आणि प्रसारण पद्धत देखील वापरू शकता. यासोबतच एका एकरात पेरणीसाठी ४ ते ५ किलो बियाणे पुरेसे आहे. लक्षात ठेवा की पेरणीपूर्वी बियाणे 12-24 तास पाण्यात भिजवावे, कारण अंकुरलेले बियाणे चांगले उत्पादन देतात.

    गाजर शेतीचे सिंचन

    पेरणीनंतर पहिले पाणी द्यावे, त्यामुळे उगवण चांगली होण्यास मदत होईल. जमिनीचा प्रकार आणि हवामानानुसार उर्वरित सिंचन उन्हाळ्यात 6-7 दिवसांनी आणि हिवाळ्यात 10-12 दिवसांनी द्यावे. एकंदरीत गाजराला (Carrot Farming) तीन ते चार पाणी द्यावे लागते. जास्त सिंचन टाळा, कारण यामुळे मुळांचा आकार विकृत होईल. काढणीच्या दोन ते तीन आठवडे आधी पाणी देणे बंद करा, यामुळे गाजराची गोडी आणि चव वाढेल.

    गाजर काढणी

    गाजराच्या विविधतेनुसार पेरणीनंतर 90-100 दिवसांत गाजर काढणीसाठी तयार होते. गाजराचे रोप उपटून हाताने कापणी केली जाते. गाजराची पाने उपटल्यानंतर त्यांची पाने काढून टाका. त्यानंतर गाजर धुवून घ्या. जेणेकरून त्यात असलेली माती गाजरापासून वेगळी होते.

    कापणी नंतर गाजर

    काढणीनंतर गाजरांची आकारानुसार प्रतवारी केली जाते. ते नंतर गोणी किंवा टोपल्यांमध्ये पॅक केले जातात. त्यानंतर तुमची गाजर बाजारात विक्रीसाठी तयार होईल.

     

  • सहकारी बँकांच्या अनुदानात अर्धा टक्का कपात; अनेक शेतकरी व्याज सवलत योजनेतून अपात्र

    हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. जिल्हा बँकांना देण्यात येणाऱ्या व्याज सवलत योजनेत केंद्र सरकारकडून कपात केली आहे. त्यामुळे आता दोन टक्क्यांऐवजी दीड टक्के एवढेच व्याज केंद्राकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना मिळणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे बँकेला अल्पमुदत पीककर्ज वाटपात अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेला अनेक शेतकरी अपात्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात पुण्यातल्या अडीच लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसू शकतो.

    नक्की काय झाला बदल ?

    प्राथमिक शेती संस्थांचे थेट सभासदांना बँकेमार्फत तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा करण्यात येत आहे. हे कर्ज सहा टक्के व्याजदराने देणे जिल्हा बँकांना शासन निकषानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून २.५ टक्के आणि केंद्र शासनाकडून दोन टक्के व्याज परतावा, असा एकूण ४.५ टक्के व्याज परतावा बँकेला प्राप्त होतो. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करू शकत होत्या. मात्र, नाबार्डने चालू वर्षी ८ सप्टेंबरमध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार केंद्र शासनाकडून बँकेला दोन टक्क्यांऐवजी चालू आर्थिक वर्षात आणि २०२३-२४ या वर्षाकरिता १.५ टक्के एवढेच व्याज अनुदान म्हणून बँकेला प्राप्त होणार आहे, असे म्हटले आहे.

    राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख अल्पमुदत पीककर्ज व्याज सवलत योजनेनुसार नियमित परतफेड करणाऱ्या सभासदाला बँकेमार्फत कमाल सहा टक्के व्याजदर आकारणी बंधनकारक आहे. केंद्र शासनाच्या पत्रानुसार दोन टक्क्यांऐवजी दीड टक्का व्याज परतावा बँकेला देण्याचे सूचित केल्याने बँकेला तोटा होणार आहे. जर बँकेने संस्थेला ०.५ टक्के व्याजदर वाढवला आणि संस्थेने त्यांच्या सभासदांना त्याप्रमाणातच ०.५ टक्के व्याजदर वाढविल्यास अंतिम सभासदाला व्याजदर हा ६.५ टक्के एवढा होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील नियमित पीककर्ज घेणारे दोन लाख ते अडीच लाख शेतकरी हे राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेला पात्र होऊ शकणार नाहीत असे झाल्यास केंद्राच्या या निर्णयाचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे.

    केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी निर्णय

    केंद्र सरकारने नाबार्डच्या खांद्यावर बंदूक ठेवून परत एकदा शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकांना जो दोन टक्के व्यास अनुदान परतावा मिळत होता त्यामध्ये अर्धा टक्के कपात करण्याचा निर्णय नाबार्ड करून घेण्यात आला. को-ऑपरेटिव बँकांमधून पीक कर्ज उचलणाऱ्या करोडो शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे. महाराष्ट्रात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना जी आहे. ती राज्यात राबवली जाते या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्याची खेळी करत आहे.

    पुणे, सांगली, जळगाव, लातूर यासारख्या जिल्हा बँकांमधून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने तीन लाखांपर्यंत कर्ज मिळतं मात्र या नव्या निर्णयामुळे बँकांचा तोटा वाढणार आहे. शेतकऱ्यांकडून सोसायटी आणि बँका जे कर्ज केंद्र सरकारकडून अर्धा टक्के व्याजाची कपात केली आहे ते भरून काढण्याचा प्रयत्न करतील म्हणजेच याचा थेट फटका हा शेवटी शेतकऱ्यालाच बसणार आहे. महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती बँका या शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा आहेत. महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे अशा वेळेला शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची मोठी गरज असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्र सरकारने केला आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रवक्ता हणमंत पवार यांनी दिली आहे.

  • ‘लंपी’ चा प्रसार करणाऱ्या कीटकांपासून कशी कराल सुटका ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो आहे. या रोगाचा प्रसार हा मुख्यतः कीटकांमार्फत होतो. मात्र या कीटकांना रोखण्याच्या उपाययोजना जाणून घेऊयात …

    लम्पी स्कीन रोग याचा प्रसार हा अनेक मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा या एक प्रमुख होय. यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही प्रजातींचे गोचीडे यांचा समावेश होतो.

    1.पशुधनास प्रखर उन्हाच्या वेळेस चारावयास सोडू नये (सकाळी 10 ते 17 पर्यंत गोठयात ठेवावे)
    2. शेणाचा उकिरडा/खड्डा शेण टाकल्यानंतर पॉलिथीन/ताडपत्रीने झाकून टाकावा.
    3. गोठयात स्वच्छता ठेवावी.
    4.पशुधनाच्या शरीरावर कमीत कमी एक आठवडयाच्या अंतराने 5% निम सिड कर्नल एक्सट्रक्ट (निम अर्क) (NSKE) अथवा वनस्पतीजन्य 10 मिली निम तेल + 10 मिली निलगीरी तेल + 10 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम अंगाचा साबण + 1 लिटर पाणी हे द्रावण फवारावे.
    5. गोठयाची स्वच्छता करून गोचीडाची अंडी गोळा करून शेकोटीमध्ये जाळावी.
    6. आजार सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.
    7. रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पशुधनास लसीकरण करून घ्यावे.

    देशातील 18.5 लाख गुरांना लंपीची लागण

    सध्या देशातील 15 हून अधिक राज्यांतून लंपी त्वचेच्या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत देशभरात सुमारे 18.5 लाख गुरांना चर्मरोगाची लागण झाली आहे. त्यापैकी 12.5 लाख प्रकरणे एकट्या राजस्थानमधून नोंदवली गेली आहेत.

    23 एप्रिल रोजी पहिले प्रकरण उघडकीस आले

    लंपी त्वचा रोग देशभरात झपाट्याने पसरला आहे. उदाहरणार्थ, शून्य प्रकरणांपासून ते जवळजवळ (Lumpy) दशलक्ष प्रकरणांपर्यंतचा प्रवास 5 महिन्यांत व्हायरसने कव्हर केला आहे, जो चिंताजनक आहे. खरं तर, 23 एप्रिल रोजी लंपी त्वचेच्या आजाराची पहिली केस नोंदवली गेली होती, ज्या दरम्यान गुजरातमधील कच्छमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर अनेक राज्यांतील गुरांना ढेकूण त्वचारोगाने ग्रासले. ढेकूळ त्वचारोगाचा झपाट्याने होणारा प्रसार हा चिंतेचा विषय आहे.

    75000 हून अधिक गुरांचा मृत्यू

    आत्तापर्यंत 75000 हून अधिक गुरे लंपी त्वचेच्या (Lumpy) आजाराने दगावली आहेत. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे राजस्थानमधूनच नोंदवली गेली आहेत. यानंतर पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, झारखंड या राज्यांमध्ये गुरांच्या त्वचेच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याचा सर्वाधिक फटका गाईंना बसला आहे.

  • राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; भावही नाही, साठवणुकीचा कांदाही सडू लागलाय…

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या वाढत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याचे दर घसरत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना 8 ते 10 रुपये किलोने कांदा विकावा लागत आहे. एकीकडे भाव कमी मिळत आहेत तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी एप्रिलपासून भाव वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा आता ३० ते ४० टक्के सडला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान सोसावे लागत आहे.

    महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे सांगतात की, यंदा नाफेडने सुरुवातीपासूनच चुकीच्या पद्धतीने खरेदी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी दराने खरेदी केली. यंदा नाफेडने 9 ते 12 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

    शेतकऱ्यांमधून नाफेडवर नाराजी

    नाफेडने यंदा चुकीच्या पद्धतीने खरेदी केल्याचे संस्थेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांचे म्हणणे आहे. कारण यावेळी नाफेडने मंडईतून खरेदी न करता फेडरेशन ऑफ फार्मर प्रोड्युसर कंपनीला खरेदीचे अधिकार दिले होते. त्यामुळेही शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. नाफेडने यावर्षी जी खरेदी केली ती शेतकऱ्यांच्या हिताची नव्हती, असे दिघोळे यांचे म्हणणे आहे.

    सरकारने कांद्याच्या निर्यातीकडे लक्ष दिले नाही

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करण्याची विनंती केली होती. नाफेडने यापूर्वीच २ लाख ३८ हजार टन कांदा खरेदी केला आहे. त्यात 2 लाख टनांनी वाढ करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

    मात्र, नाफेडचे खरेदीचे धोरण चुकीचे असल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांचे म्हणणे आहे. गतवर्षी २३ ते २४ रुपये किलो दराने कांदा खरेदी केला होता, मग यंदा केवळ ९ ते १२ रुपये भाव कसा दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कांदा निर्यातीवर भर द्यायला हवा होता. मात्र सरकारने तसे केले नाही.

    काय आहे शेतकऱ्यांचे म्हणणे ?

    भरत दिघोळे यांनी सांगितले की, कांद्याच्या निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे यंदा कांद्याचे दर खूपच कमी आहेत. उत्पादन जास्त आहे असे सरकार म्हणत असताना निर्यात जास्त व्हायला हवी होती. पण असे झाले नाही. फारशी निर्यात होऊ शकली नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून कांद्याच्या निर्यातीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना भावाच्या बाबतीत दिलासा मिळेल, अशी मागणी संघटनेने राज्य सरकारला पत्र लिहून केली होती. याशिवाय कांद्याला किमान आधारभूत किंमतीखाली आणण्याची मागणीही संघटनेने केली असून, त्यावर शेतकऱ्यांचा नफा खर्चानुसार ठरवून द्यावा अशी मागणी केली होती.

     

     

  • Lumpy : ‘लम्‍पी’ त्वचारोगामुळे राज्यात 271 जनावरांचा मृत्यू

    हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये होणाऱ्या लंपी या त्वचारोगाचा (Lumpy) मोठ्या प्रमाणात फैलाव राज्यात होताना दिसत आहे. दिनांक १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यापैकी २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर या रोगातून ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. याबाबतची माहिती माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.

    २५ लाख लस मात्रा उपलब्ध

    सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘लम्पी स्कीन (Lumpy) आजाराने राज्यभरात सोमवार अखेर २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजार २९१ जनावरे आजारमुक्त झाली आहेत,’’ अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. तर ‘‘तातडीच्या लसीकरणासाठी २५ लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. या विविध जिल्ह्यांमधील प्रादर्भावाचे प्रमाण पाहून वितरित केल्या जातील,’’ असेही त्यांनी सांगितले.

    २७१ पशुधन दगावले

    सिंह म्हणाले, ‘‘ राज्यातील २७ जिल्ह्यांमधील १ हजार १०८ गावांत ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. उर्वरित जनावरांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २७१ पशुधन मृत झाले आहे. तर तातडीच्या लसीकरणासाठी विविध जिल्ह्यांमध्ये ४९ लाख ८३ लाख लशींच्या मात्रा उपलब्ध आहेत. यापैकी बाधित क्षेत्राच्या ५ कि.मी. परिघातील १ हजार १०८ गावांतील १६ लाख ४५ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.’’

    मुंबई नियंत्रित क्षेत्र जाहीर

    ‘लम्पी स्कीन’च्या (Lumpy) प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबई हे ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही मुंबई पोलिसांनी दिला आहे.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

     लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • महत्वाची बातमी ! ऊस वाहतुकीसाठी बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून यावर्षीच्या ऑक्टोबर मध्ये सुरु होणाऱ्या गाळप हंगामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना लसीकरण करणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भांत बैल घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या याद्या सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

    राज्यात ऊस गाळपासाठी हार्वेस्टर, वाहतुकीकरिता ट्रॉली यांचा वापर वाढला असला तरी अद्यापही बैलगाडी द्वारे उसाची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. ‘लम्पी स्कीन’ रोगाचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये दिसून आल्यामुळे सर्वच साखर कारखान्यांमधील कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक व शेती अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. आपापल्या साखर कारखान्याकडे बाहेरच्या जिल्ह्यातून बैलगाडीकरीता बैल घेऊन येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या नावांची गावनिहाय यादी अद्ययावत करा. ही यादी तातडीने संबंधित मजूर ज्या जिल्ह्यातून येणार आहेत त्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त पाठवा,” अशा सूचना आयुक्तांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत.

    याबाबत बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की , “राज्याचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. त्यासाठी नेहमीप्रमाणे हजारो बैल विविध कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येतील. ‘लम्पी स्कीन’च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जनावराचे आरोग्यविषयक नियोजन महत्त्वाचे राहील. त्यामुळे कारखान्यांकडे बैल घेऊन येणाऱ्या मजुरांची यादी संबंधित जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना आम्ही राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दिल्या आहेत. यामुळे लम्पी स्कीन रोग प्रतिबंधक लसीकरण काटेकोरपणे राबविण्यास मदत मिळेल.”

    १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार यंदाचा गाळप हंगाम

    दरम्यान यंदाचा गाळप हंगाम हा येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याची माहिती आहे . याबाबतची घोषणा मुक्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (१९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर देण्यात आली. त्यामुळे गाळप हंगाम सुरु होण्याच्या तसेच लंपीच्या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.