Category: Maharashtra

  • सावधान ! लंपी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविणाऱ्यावर होणार कठोर कारवाई

    हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लंपीरोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.

    सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, “लंपी चर्मरोग आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगर परिषद अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) इ. चा वापर करून जनजागृती करावी अशा सूचना पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी-अधिकारी यांना दिल्या.

    खासगी सेवादात्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

    लंपी आजारावर उपयुक्त असणाऱ्या औषधींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लंपी चर्म आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासीता छात्र (ईंटर्नीज) यांना प्रति लसमात्रा रु.3 प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. सर्व खासगी सेवादात्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविणेचे श्री.सिंह यांनी आवाहन केले आहे.

    ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी

    शासकीय पशुवैद्यकांनी तसेच खाजगी पशुवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत तक्रार असल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. पशुपालकांनी अशी तक्रार विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ वर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करावी अशा सूचनाही यावेळी त्यांनी यावेळी दिल्या.

  • लम्पीला रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश




    लम्पीला रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांना होणाऱ्या लंपी या साथीच्या रोगाचा फैलाव राज्यात वेगाने होत आहे. महाराष्ट्रात या रोगाचा होणार फैलाव बघता प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाबाबत मोठी घोषणा केली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाला रोखण्यासाठी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासोबत, लम्पी स्कीन आजारांमुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

    टास्क फोर्सची स्थापना

    राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यांमध्ये या रोगाचा फैलाव झाला आहे. राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापन करण्यात आील आहे. लम्पी रोग अटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस हे टास्क फोर्स करणार आहे.

    जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर

    दरम्यान, औरंगाबादमधील विनोद पाटील यांनी लम्पी स्कीन आजाराचा धोका ओळखून क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी केली होती. याचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी काल (१६) क्वारंटाईन सेंटर उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, लम्पी रोग राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झालेली आहे. त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे.

     

    error: Content is protected !!





  • Establishment of Coordinating Cell in Ministry




    lumpy : Establishment of Coordinating Cell in Ministry











































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंबी रोगाविषयी संपर्क साधण्यासाठी मंत्रालयात समन्वय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. (02 2 – 28 45 13 2) या दूरध्वनी क्रमांकावर पशुपालकांनी संपर्क साधावा असावाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे पी गुप्ता यांनी केला आहे.

    राज्यात लंपी चर्म रोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण करणे, बाधित पशुधनावर औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. तथापि काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच शेतकरी पशु पालकांना संपर्क साधता यावा व क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयात रूम नंबर 520 पाचवा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरू करण्यात आला आहे.

    राज्यातील चर्म रोगाचा वेळोवेळी आढावा घेणे, या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेला मार्गदर्शन करणे, उपाययोजनांबाबत राज्य शासनाला शिफारस करणे, इत्यादींसाठी पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यालयाचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये तज्ञ व्यक्ती आणि शास्त्रज्ञांचा समावेश देखील करण्यात आला आहे.

    error: Content is protected !!





  • Lumpy : एप्रिलमध्ये नोंदवलेली पहिली केस, आतापर्यंत 67 हजार गुरे मरण पावली, जाणून घ्या 10 मुद्दे

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशात नवी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनानंतर लंपी (Lumpy) त्वचेचा आजार देशात मोठी महामारी बनण्याच्या मार्गावर आहे. या आजारामुळे देशात मोठ्या प्रमाणात गुरांच्या मृत्यूची प्रकरणे समोर येत आहेत.वास्तविक हा विषाणू Poxviridae कुटुंबातील Capripoxvirus वंशाचा आहे. 22 एप्रिल रोजी या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून या आजाराने 67 हजार गुरांचा मृत्यू झाला आहे. या आजाराशी संबंधित अपडेट्स 10 पॉइंट्समध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

    १)लम्पी स्किन डिसीज आतापर्यंत देशातील १२ हून अधिक राज्यांमध्ये पसरला आहे. ज्या अंतर्गत 16 लाखांहून अधिक गुरांना या विषाणूची लागण झाली आहे. हा विषाणू प्रामुख्याने गायींना आपल्या कवेत घेत आहे.

    २)लम्पी त्वचा रोग रक्त खाणाऱ्या कीटकांमुळे पसरतो. यामध्ये डास आणि माशांच्या काही प्रजातींचा समावेश आहे. त्याच वेळी, दूषित खाद्य आणि पाण्यामुळे लम्पी त्वचा रोग देखील पसरू शकतो.

    ३)लम्पी स्किन डिसीजची मुख्य लक्षणे म्हणजे ताप आणि त्वचेवर गुठळ्या येणे. काहीवेळा त्वचेच्या गुठळ्या खूप वेदनादायक होतात, त्यातून रक्त बाहेर येऊ लागते. रोगाच्या गंभीर प्रकरणांमध्ये, गुरेढोरे देखील मरू शकतात.

    ४)ज्या गुरांना एकदाही या विषाणूची झळ बसली नाही, अशा गुरांसाठी लम्पी स्किन डिसीज धोकादायक असल्याचे सांगितले जाते. खरं तर हा नवीन व्हायरस नाही. यापूर्वीही हा विषाणू गुरांना आपल्या कवेत घेत आहे. पण, यावेळी त्याचा प्रसार खूप वेगाने झाला आहे.

    ५)22 एप्रिल रोजी गुजरातमधील कच्छमधून लम्पी स्किन डिसीजचा पहिला केस समोर आला होता. यानंतर राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये त्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

    ६)गुरांच्या त्वचेच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी, गुरांना शासनाकडून लसीकरण केले जात आहे. ज्या अंतर्गत गुरांना पॉक्स  (Lumpy) देण्यात येत आहे. लम्पी स्किन डिसीजमध्ये ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा केंद्राने केला आहे.

    ७)लम्पी स्किन डिसीजचा सामना करण्यासाठी स्वदेशी लस ‘Lumpi-ProVacInd’ देखील विकसित केली जात आहे. मात्र, या लसीचा व्यावहारिक वापर अद्याप सुरू झालेला नाही.

    ८)देशातील दोन कंपन्या लम्पी स्किन डिसीजसाठी स्वदेशी लस बनवत आहेत. 2 ते 3 महिन्यांत या लसी तयार होतील अशी अपेक्षा आहे. ते वापरले जाऊ शकते.

    ९)लम्पी स्किन डिसीजचा प्रसार पाहता राजस्थानसह इतर अनेक जिल्ह्यांनी याला महामारी घोषित करण्याची मागणी केली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे.

    १०)लम्पी स्किन (Lumpy) डिसीजचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुरू आहेत. त्याच वेळी, त्याचा प्रसार पाहता, ते मानवांसाठी देखील धोकादायक असेल असे बोलले जात . हे पाहता या विषाणूपासून मानवाला कोणताही धोका नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

  • केंद्र सरकारने लंपी त्वचा रोगाला महामारी घोषित करावे, सीएम गेहलोत यांचे मोदींना पत्र

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानांना गायींमध्ये पसरणाऱ्या लंपी त्वचेच्या आजाराला महामारी म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, महामारी घोषित केल्याने या रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि पशुधन वाचवण्यासाठी वैद्यकीय आणि वाहतूक यासारख्या सुविधा मजबूत करण्यात मदत होईल.

    मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राजस्थान व्यतिरिक्त 13 राज्यांमध्ये हा आजार पसरला आहे. मात्र, या आजाराचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे.राजस्थान सरकार हा आजार रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या संदर्भात आवश्यकतेनुसार जलद प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय पशू वाहतूक, गुरांचा हाट, पशु मेळा यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय राज्यासाठी पुरेशा लसी मिळण्याची मागणी केली.

    दरम्यान राजस्थान राज्यात 16.22 लाख लसी उपलब्ध आहेत, त्यापैकी 12.32 लाख गोवंशीय प्राण्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच 11.59 लाख जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. रोगग्रस्त भागात रोग सर्वेक्षण, रोग निदान व उपचारासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त वाहने भाड्याने घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  • मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं तरी ते फक्त दही हंडीच फोडतायेत, राजू शेट्टींचा एकनाथ शिंदेंना टोला

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणाचा दर्जा रसातळाला गेला आहे. सर्वसामान्य माणसाला देखील याची किळस येऊ लागली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं, पण ते फक्त दही हंडीच फोडत असल्याचि टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

    पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या दोन महिन्यात राज्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे. जनावरांवर लम्पीसारखा आजार आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन यंत्रणा कामाला लावण्याची जवाबदारी पालकमंत्र्यांची असते. मात्र, जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री मिळाले नाहीत. यामुळं या सरकारचे अस्तित्व शून्य झाले असल्याचे शेट्टी म्हणाले.

    एवढा मोठा पाऊस पडला, जमिनी वाहून गेल्या, शेती पिकं वाया गेली. तरी महसूल खात्यान घरात बसून पंचनामे केले. कृषी अधिकारी शिवारात फिरकले नाहीत याचा हा परिणाम आहे. त्यांना जाब विचारणार कोण. अजूनही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. पालकमंत्रीच नाहीतर आढावा कोण घेणार? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

    मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं, पण ते फक्त दही हंडीच फोडत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. गणपतीच्या काळात घरा घरात जाऊन दर्शन घेत राहिले. मुख्यमंत्र्यांनी धार्मिक असावं, उत्सव साजरा करावा, पण उत्सव साजरा करण्यापूर्वी महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची आपल्यावर जबाबदारी आहे याचं भान ठेवलं पाहिजे असेही शेट्टी यावेळी म्हणाले.

  • Facts About Lumpy Disease, In Maharashtra

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान आणि हरियाणा राज्यात पशुपालकांना नाकीनऊ आणणाऱ्या लंपी (Lumpy) या त्वचारोगाचा महाराष्ट्रातही फैलाव होत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये देखील घबराहट निर्माण झाली आहे. वाढत्या प्रादुर्भावाबरोबर या रोगाला घेऊन काही अफवाही पसरत आहेत. राजस्थानातील अनेक गावांमध्ये तर नागरिकांनी दूध पिणेच बंद केले आहे. दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा आता पसरत आहे. परिणामी शहरी भागातील दूध पुरवठ्यावर देखील याचा परिणाम झाला आहे. मात्र, लम्पीग्रस्त जनावरांच्या दूधापासूनही माणसांना कोणताही धोका नाही. पण कच्चं दूध न पिता नेहमी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.

    लम्पी हा एक त्वचा रोग असून यामुळे जनावरांचे डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होते. विशेष म्हणजे गायी आणि म्हशीमध्येच या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला असला तरी दूध उकळून पिल्यावर कोणताही धोका राहणार नाही.

    धार काढताना काळजी घ्या

    लम्पी स्कीन हा संसर्गजन्य रोग असला तरी त्याचा माणसांना काही धोका नाही. मात्र, लम्पीग्रस्त (Lumpy) जनावराची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. शिवाय या जनावरांच्या दूधापासूनही काही धोका नाही. पण अशा जनावरांचे दूध उकळून पिले तर अधिक चांगले असा सल्ला पशूसंवर्धन विभागाने दिला आहे.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची (Lumpy) आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

     

  • लंपी चर्म रोगाचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही : आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

    हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी चर्म रोगाच्या नियंत्रणासाठी १० लाख लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नसल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह
    यांनी सांगितले.

    समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर कारवाई

    पशुसंवर्धन आयुक्त सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, राज्यात लंपी चर्म रोगाचा झपाट्याने प्रसार होतो आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. तसेच दूध हे मानवी आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे कांही समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर शासकीय कार्यवाही केली जाईल.

    मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी

    या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिका-यांनी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी. जनजागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही (सोशल मिडियाचाही वापर करावा. लंपी आजारावर उपयुक्त असणा-या लस व औषधींची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून करावी. लंपी चर्म आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्यातून लसीकरण मोहीम घ्यावी. त्यासाठी मानधन तत्वावर त्यांच्या सेवा घ्याव्यात अशा सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.

    औषधांची फवारणी करावी

    हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने पशुसंवर्धन विभागाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आणि जिल्हा परिषद सेस यातून औषधे व इतर बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयी श्री सिंह यांनी सांगितले.

    नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित

    शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अधिसूचना प्रसिद्ध करून त्याअन्वयेप्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ (२००९ चा २७) याची कलमे (६), (७), (११), (१२) व (१३) या दूद्व्यारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, संपूर्ण महाराष्ट्र राज्य लंपी चर्म रोगाच्या बाबतीत “नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार गो व म्हैस प्रजातीची नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तसेच गो व म्हैस प्रजातीचा बाजार भरविणे, शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्रदर्शने इ. बाबीस मनाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

    घाबरू नका काळजी घ्या

    सिंह यांनी सांगितले की,हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात दि. ९.०९.२०२२ पर्यंत ७०,१८१ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान मध्ये ४५०६३, पंजाबमध्ये १६८६६, गुजरात मध्ये ५३४४ व हरियानामध्ये १८१० जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमांमधून प्रसारित होणाच्या बातम्यांमुळे पशुपालकांमध्ये अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही, परंतु आवश्यक खबरदारी घ्यावी, असे सिंह यांनी पशुपालकांना आवाहन केले आहे.

    त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो

    लंपी चर्म रोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये, तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.