Category: Marathwada

  • कृषिमंत्र्यांकडून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाडयातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सत्तार यांनी दिल्या. तर पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

    यावेळी बोलतांना सत्तार म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. कृषीमंत्री या नात्याने प्रत्येक जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी मला केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये. पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेऊन त्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

    कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद तालुक्यातील दुधड, लाडसावंगी,शेकटा, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अंबडगाव, धोपटेश्वर , लालवाडी, जालना तालुक्यातील जामवाडी ,पानशेंद्रा, अंबड तालुक्यातील अंतरवाला, गोलापांगरी, वडीगोद्री, बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाडळसिंगी, जप्ती पारगाव गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

  • धक्कादायक ! पुढारी राजकारणात व्यस्त; गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून नाट्यमय राजकारण अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. अद्यापही राज्यातील राजकारनाचा रंग काही फिका होतांना दिसत नाही. एकीकडे मंत्री आणि राजकारणी यांच्यातली तु तू मै मै थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे मात्र राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातुन शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी उजेडात आली आहे. मागच्या ९ महिन्यात मराठवाड्यातील तब्बल 756 शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचा पाऊल उचलले आहे. शिवाय यातील 400 शेतकऱ्यांनी पावसाळ्यात म्हणजेच पीकं उगवण्याच्या हंगामात जीवन संपवलं आहे.

    मराठवाड्यला शेतकरी आत्महत्येचं ग्रहण

    सरकारकडून अनेक उपाययोजना करूनही मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या काही थांबता-थांबत नसल्याचे चित्र आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे ध्येय घेऊन सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्यातील 292 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे पिके हातून गेली आहे. सरकराने मदतीची घोषणा केली असली तरीही अनेक ठिकाणी मदत अजूनही पोहचलेली नाही. त्यामुळे हतबल झालेली शेतकरी आत्महत्या करत जीव संपवत आहे. विशेष म्हणजे ज्या सप्टेंबर महिन्यात राज्यकर्ते कोणाचा कोणता पक्ष या राजकारणात व्यस्त होते, त्यावेळी मराठवाड्यातील 90 शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

    आत्महत्या आकडेवारी ( 1 जानेवारी 2022 ते 30  सप्टेंबर 2022 )

    अ.क्र. महिना  शेतकरी आत्महत्या संख्या 
    1 जानेवारी 59
    2 फेब्रुवारी 73
    3 मार्च 101
    4 एप्रिल 47
    5 मे

    76
    6 जून 108
    7 जुलै 83
    8 ऑगस्ट 119
    9 सप्टेंबर 90
    एकूण  756

    103 प्रकरणे अपात्र ठरली…

    नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोज्यातून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर या गेल्या नऊ महिन्यांत 756 शेतकरी आत्महत्याची नोंद झाली आहे. यातील 561 प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरली असून, 103 प्रकरणे अपात्र ठरली आहे. तर 92 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक196 शेतकऱ्यांना आत्महत्या झाल्या आहेत.

    संदर्भ : एबीपी माझा

  • उद्यापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे; पहा कोणत्या जिल्ह्याला शासनाची किती मदत ?




    उद्यापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे; पहा कोणत्या जिल्ह्याला शासनाची किती मदत ? | Hello Krushi












































    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे सरकारने नव्या निकषांसह अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले. सरकारने राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागासाठी 3 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यापैकी मराठवाडा विभागाकरिता 1106 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत

    मराठवाड्याला मिळालेल्या मदतीचे वितरण उद्यापासून म्हणजेच गुरुवार (22) पासून केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख 81 हजार 761.18 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जालना,परभणी, हिंगोली,नांदेड, लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे.

    दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. विशेष औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र असे असतानाही औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    कोणत्या जिल्ह्याला किती मदत ?

    जिल्हा  बाधित शेतकरी  बाधित क्षेत्र  अनुदान 
    जालना  6898 2311.79 हेक्टर  3 कोटी 71 लाख 84 हजार 
    परभणी  1557 1179 हेक्टर 1 कोटी 60 लाख 34 हजार 
    हिंगोली  133970 113620 हेक्टर 157 कोटी 4 लाख 52 हजार 
    नांदेड  741946 527491 हेक्टर 717 कोटी 88 लाख 92 हजार 
    लातूर  49160 27425.37 हेक्टर 37 कोटी 30 लाख 83 हजार 
    उस्मानाबाद  75739 66723.20 हेक्टर 90 कोटी 74 लाख 36 हजार 

    error: Content is protected !!