Category: Monsoon

  • Weather Update Today Maharashtra

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. कालही मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात विजांसह परतीचा पाऊस झाला आहे. मागच्या २४ तासात पुण्यातील जुन्नर येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (२२) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

    हवामान स्थिती ?

    अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वरील प्रणालीत मिसळून गेले आहेत. पंजाब आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात (Weather Update) उत्तर अंदमान समुद्रालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. २२) ही प्रणाली आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तरेकडे वळून पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

    या भागाला आज यलो अलर्ट

    हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Update) आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाडयातील औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • Weather Update: राज्यात पावसाचा तडाखा सुरूच; आज ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अद्यापही परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि संध्याकाळनंतर गडगडाटी विजांसह पाऊस हे मागील तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागातील चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी पावसातच घालवावी लागते की काय अशी चिन्हे आहेत. तर दुसरीकडे काढणी केलेला पावसात भिजलेला सोयाबीन ,कापूस यासारखा शेतमाल सुकवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. दरम्यान आजही (२०) राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे.

    हवामान स्थिती ?

    उत्तर अरबी समुद्रापासून तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा (Weather Update) पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती, तसेच त्यापासून केरळ किनाऱ्यापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. आज (ता २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना शनिवारपर्यंत (ता. २२) आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

    आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

    दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (Weather Update) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागाला यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे.

  • Weather Update : राज्यात आजही पावसाचा अंदाज; पहा कोणत्या भागाला यलो अलर्ट

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरामध्ये सुरु असलेला पाऊस काहीसा (Weather Update) ओसरलेला दिसून येत आहे. रविवारी (ता.१६) मराठवाडा, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील सेलू, पाथरी, पूर्णा, परभणी तालुक्यांत दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस झाला. मात्र आजही राज्यात पावसाचा अंदाज कायम आहे. आज (१७) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

    हवामान स्थिती

    मध्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तर अग्नेय अरबी (Weather Update) समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. केरळच्या किनाऱ्यालगत असलेल्या प्रणाली पासून नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत उद्या (ता. १८) नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारपर्यंत (ता. २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

    आज भागाला यलो अलर्ट

    दरम्यान आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद बुलडाणा, वाशीम, यवतमाळ. या भागात हवामान (Weather Update) खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे.

     

     

  • मान्सून निरोप घेणार! शेतकऱ्यांनी काय करावे नियोजन ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार असल्याची माहिती दिली आहे. मान्सून वेळेत परतत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता नेमकी कोणती कामं करावीत. पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं यासंदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

    कांद्याची लागवड :

    साधारणात: बियाणे टाकल्यापासून 45 दिवसांमध्ये कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार होता. त्यामुळं आता कांद्याचे बी टाकले तरी चालेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

    द्राक्ष आणि डाळिंब छाटणी

    द्राक्ष बागेची छाटणी शेतकऱ्यांनी केली तरी चालेल. छाटणी करण्यास अडचण काही नाही. कारण, सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस निरोप घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरुवात केली तरी चालेत. त्याचबरोबर डाळींबाची पानगळणी केली तरी चालेल. कारण आता जर पानाची छाटणी सुरु केली तर मार्च ते एप्रिलपर्यंत पिक बाजारात येईल. ‘हस्त बहार’ नियोजन करण्यास सध्याचा काळ योग्य जाणवत आहे.

    खरीपातील पिकांची काढणी

    खरीपातील आगाप मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये ही पिके परतणीच्या स्टेजमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्या काढणीच्या तसेच पशुधनासाठीच्या मुरघास प्रक्रिया आणि साठवणीच्या नियोजनासाठीचा वातावरणाच्या नजरेतून सध्याचा काळ योग्य जाणवत आहे. त्याचे योग्य ते नियोजन करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात करावी सोयाबीन आणि बाजरीचे पिक काढणी करण्याच्या स्टेजमध्ये आहे. त्यासाठी पूर्वनियोजन करावे लागते. विशेषत: मजूर लावून करायची असेल तर त्याचे नियोजन मशीननं काढणी करायची असेल तर त्याचे शेतकऱ्यांनी आत्ताच नियोजन करावं

    मुरघास तयार करण्यासाठी मकेची काढणी करावी

    आगाप मका आता काडणी करायला सुरुवात केली तरी चालेल. ज्या शेतकऱ्यांना मुरघास तयार करायचा आहे, असा शेतकऱ्यांनी मकेची तोडणी करावी असे खुळे यांनी सांगितले आहे. तर बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ही पिकं 15 ऑक्टोबरच्यानंतर काढणीसाठी येणार आहेत, त्यादृष्टीनं शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नियोजन करावे.

    संदर्भ : एबीपी माझा

  • ऐन सणासुदीच्या काळात बिघडू शकते किचन बजेट ; आता तांदुळही महागणार… !

    हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात भाताची पेरणी कमी झाल्यामुळे भाताचे उत्पादन सुमारे 60-70 लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. उत्पादनातील या मोठ्या घसरणीच्या दरम्यान, तांदळाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र सर्वसामान्य माणसाला रोजच्या जेवणासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

    अशा स्थितीत आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर महागाईचा दबाव आणखी वाढेल. किरकोळ महागाई केवळ 7 टक्क्यांवर पोहोचली आहे. तांदूळ-गहूसारखे खाद्यपदार्थ महाग झाले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. आगामी काळातही महागाई उच्च पातळीवर राहील, असा अंदाज तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जून-सप्टेंबरमधील अनियमित पाऊस यामुळे धान पिकाची चिंता वाढली आहे.

    काय आहे तज्ञांचे मत ?

    भारताचे तांदूळ उत्पादन 2021-22 या पीक वर्षात 132.29 दशलक्ष टन होते, जे एका वर्षापूर्वी 1243.7 दशलक्ष टन होते. यंदाच्या खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन ६० ते ७० लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज अन्न मंत्रालयाने व्यक्त केला आहे. देशातील एकूण तांदूळ उत्पादनात खरीप हंगामाचा वाटा सुमारे ८५ टक्के आहे. तथापि, काही तज्ञांच्या मते, तांदूळ उत्पादनातील घट हे चिंतेचे कारण नाही कारण भारताचा आधीच अस्तित्वात असलेला साठा सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) ची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. याशिवाय तुकड तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा आणि बिगर बासमती निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे.