Category: Parbhani

  • E-Pik Pahani By District Magistrate Aanchal Goyal

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    जिल्ह्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या पिकांची १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी (E-Pik Pahani) ई-पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशनद्वारे पिकांची नोंदी घेण्यासाठी सेलू आणि जिंतूर तालुक्यातील गावातील शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिक द्वारे कामकाजाची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या सर्वांची ई-पिक पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना ई-पिक पाहणी करण्यास प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी केले.

    यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सेलू (E-Pik Pahani) तालूक्यातील वालूर, मोरेगाव, मौ. खुपसा, हातनूर, चिखलठाणा (बु.) रायपूर या शिवारातील तर जिंतूर तालुक्यातील चारठाणा, रायखेडा, चांदज या शिवारातील पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांची ई-पिक ॲपद्वारे पाहणी व नोंद केली. तसेच उपस्थित सरपंच व शेतकरी बांधवाना संपूर्ण गावातील ई-पिक पाहणीचे काम पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले.

    यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार (E-Pik Pahani) सेलू दिनेश झांपले, तहसीलदार जिंतूर सखाराम मांडवगडे, सेलू तालुका कृषि अधिकारी जोगदंड, जिंतूर तालुका कृषि अधिकारी काळे यांच्यासह संबंधीत गावातील सरपंच, तलाठी, कृषि सहाय्यक आदींची यावेळी उपस्थिती होती.

  • परभणी अतिवृष्टीची माहीती घेतली, विषय कॅबिनेटमध्ये ठेवणार ! पालकमंत्र्यांचे शेतकऱ्यांना दुरध्वनी वरून आश्वासन

    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी

    मागील आठ दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व शुक्रवार 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर शेत शिवारात खरीपातील सोयाबीन ,कापुस पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनास निवेदन देत शनिवार 15 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी युवासेनाजिल्हाप्रमुख (शिंदे गट ) दीपक टेंगसे यांच्या मदतीने कॉन्फरन्स कॉल करत उपोषणकर्त्यांची थेट संपर्क साधला.

    यावेळी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन मायबाप सरकारने लक्ष देण्याची मागणी केली .प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचे पालकमंत्र्यांच्या कानावर घातले .दरम्यान पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मी शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात बातम्या पाहिल्या , त्यादिवशी पाहिले ,शेतकऱ्यांचे फोन आले असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात माहिती घेतली असुन उद्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये अतिवृष्टीचा विषय मांडणार असल्याने शेतकऱ्यांनी काळजी करू नये व ऊन वाऱ्यात उपोषणास न बसता लेकरा बाळांची काळजी घ्यावी. असे आवाहन यावेळी त्यांनी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना केले आहे .

    दरम्यान दुसऱ्या दिवशी भर पावसात उपोषण करते उपोषण स्थळी बसून होते . साखळी पद्धतीने या ठिकाणी शेतकरी उपोषणासाठी तालुका भरातून येत असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार यावेळी त्यांनी बोलून दाखवला आहे.

    शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पाथरी येथे चालू असलेल्या शेतकरी उपोषणाला रविवारी सायंकाळी उशिरा जिल्हा कृषी अध्यक्ष व्ही डी लोखंडे , प्रभारी तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे , तहसीलदार सुमन मोरे यांच्यासह विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींनी भेट देत उपोषण मागे घेण्याची मागणी केली परंतु मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला सांगितले आहे . यावेळी उपोषणकर्ते शेतकरी अधिकारी यांच्यात शाब्दीक चकमक झाली .

  • तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलेलं पीक पाण्यात; आम्हाला मदत द्या म्हणत शेतकऱ्यांचं शेतातच अर्धनग्न आंदोलन

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात मागच्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: नाकीनऊ आणले आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप आल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी जिल्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीन कापूस या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेता सरकारचे डोळे उघडण्यासाठी परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी चक्क पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतातच अर्धनग्न होऊन आंदोलन केले आहे. यावेळी नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    यावेळी सोयाबीनचे पूर्ण शेत जलमय झालं आहे. या कृषी प्रधान देसात शेतकरी राजा आहे, असं सांगितलं जातं की शेतकरी राजा आहे. मात्र, त्याला नावाला राजा ठेवलं आहे. पण त्याचा जगण्याचा पूर्ण अधिकार या प्रशासकीय व्यवस्थेनं हिरावला आहे. त्यामुळं आम्ही आज अर्धनग्न अवस्थेत शासनाचा निषेध करत असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

    आमचं मोठं नुकसान झालं ,मदत करा

    सोयाबीन तळहाताच्या फोडाप्रमाणं जपून काढणीला आले असताना मुसळधार पाऊस झाला अन सोयाबीन, कापसात गुडघ्याइतके पाणी साचल्यानं दोन्ही नगदी पीक हातून गेले आहे. पीक विमा कंपनीच्या छाताडावर बसा आणि मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आमची शासनानं तत्काळ दखल घ्यावी. आमच्या गावात पावसाचा अतिरेक झाला आहे. आमचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं आम्हाला मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी हीच परिस्थिती विशद केली आहे. मिरखेल येथील पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतात शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडे पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

     

     

  • योगेश्वरी कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही; अखील भारतीय किसान सभेचे आमरण उपोषण सुरु




    योगेश्वरी कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही; अखील भारतीय किसान सभेचे आमरण उपोषण सुरु | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    2021-22 च्या गळीत हंगामातील ऊस बिलासाठी 17 ऑगस्ट च्या मोर्चामध्ये ठरल्या प्रमाणे व्यवहार न झाल्यामुळे सोमवार 3 ऑक्टोबर पासुन पाथरी (जि . परभणी ) येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

    2021-2022 च्या हंगामातील ऊस बिल थकबाकी व ठेकेदाराचे कमिशन डिपॉझीट व इतर मागण्यासाठी पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर कारखान्यावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता . त्यावेळी कारखाना प्रशासनाने काही लेखी अश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. पण ठरल्या प्रमाणे शेतकऱ्यांसोबत व्यवहार केलेला नाही म्हणत आता योगेश्वरी शुगर प्रशासनाच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकरी पाथरी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर
    आमरण उपोषणास बसले आहेत.

    यावेळी योगेश्वरी शुगर प्रशासनाने दिलेल्या लेखी पत्राचे उल्लंघन केल्यामुळे योगेश्वरी प्रशासनावर शेतकर्यांची फसवणुक केल्यामुळे गुन्हा दाखल करावा अशी उपोषण कर्त्यांची मागणी आहे. कॉ. दिपक लिपणे कॉ. भागवत कोल्हे कॉ. भागवत शिंदे ,कॉ . गोकुळ शिंदे, काँ . सुभाष नखाते यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपोषणाला बसले आहेत .

    error: Content is protected !!





  • सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार




    सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    खरिपात पेरणी केलेल्या सोयाबीनच्या तब्बल १० बॅगला पेरणी केल्यानंतर ३ महिण्याचा अवधी होऊनही शेंगा न लागल्या नसल्याने एका शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असुन बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या झुवळा झुटा येथील शेतकर्‍याने प्रशासनाकडे तक्रार करत आता नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे.

    तालुक्यातील जवळा झुटा येथील राजेंद्र सुरेशराव जवळेकर असे फसवणुक झालेल्या शेतकर्याचे नाव असून त्यांनी जवळा झुटा येथील गट क्र . 19 मधील जमीनीमध्ये पाथरी येथील एका कृषी केंद्रावरुन खरेदी केलेले. ग्रीन गोल्ड सिडस या कंपनीचे 10 बॅग सोयाबीन बियाणे खरीप हंगामात पेरले होते.

    मात्र सदरील बियाणे पेरणी करून तीन महिने उलटले असून सोयाबीनची फक्त वाढ झालेली असुन अद्यापही या पिकाला शेंग अथवा कसल्याही प्रकारचा माल लागलेला नाही. याप्रकरणी आता या शेतकऱ्याने तक्रारीसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली असून पिकाची पाहणी करुन संबंधित कंपनी विरुद्ध कार्यवाही करुन पिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

    error: Content is protected !!





  • Soybean : याला म्हणतात कष्टाचं चीज ! सोयाबीन रोपाला तब्बल 417 शेंगा




    Soybean : याला म्हणतात कष्टाचं चीज ! सोयाबीन रोपाला तब्बल 417 शेंगा | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : कमी वेळात चांगले उत्पादन आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीन (Soybean) या पिकाची लागवड करतात. त्यात मागच्या दोन तीन वर्षांपासून सोयाबीनला बाजारात चांगली किंमत मिळवू लागल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल सोयाबीन लागवडीकडे आहे. यंदाच्या वर्षी देखील राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मात्र अनेक भागात पावसामुळे सोयाबीनला फटका बसला आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन वर रोग आणि किडींचा हल्ला झाला आहे. तर काही ठिकाणी शेंगाचा भरल्या नाहीत. असे असताना परभणी मधील एका शेतकऱ्याच्या शेतात एका रोपाला तब्बल ४१७ शेंगा लागल्या आहेत.

    होय …! आम्ही बोलत आहोत परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातल्या मुक्काम खोरस येथील शेतकरी गणेश रामराव दाढे (३२) या शेतकऱ्याबद्दल… खरे तर या भागात सर्रासपणे कपाशीचे पीक घेतले जाते. पण कपाशीच्या पिकाला खर्च येत असल्यामुळे यंदा दाढे यांनी सोयाबीन (Soybean) लागवड करायची ठरवली. पण ते एवढं सोपं नव्हतं. कारण या निर्णयाला घरच्या मंडळींसहित गावातील मित्रपरिवाराचाही विरोध होता. मात्र या सगळ्यांचा सल्ला झुगारत दाढे यांनी सोयाबीनचा घ्यायचे ठरवले. सुरवातीला लोक त्यांच्यावर हसत होते. मात्र त्यांच्या कष्टाचे चीज झाले असून त्यांच्या सोयाबीन पिकाला चांगल्या शेंगा आल्या आहेत.

    दाढे यांनी सोयाबीनचे (Soybean) वाण KDS 726 याची लागवड केली. २५ एकरमध्ये लागवडीसाठी त्यांना १८ बॅगा बियाणे लागले. विशेष म्हणजे या वाणाची बॅग 22 किलोची असते. इतर बॅगा 30 किलोच्या असतात. पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यानंतर त्यांना एकरी 15 क्विंटल प्रमाणे विक्रमी 300 क्विंटल पेक्षा जास्त सोयाबीन होण्याची शक्यता आहे.

    खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनला अतिवृष्टीचा मोठा धोका असतो. पण योग्य व्यवस्थापन केल्यामुळे पीक चांगले आले असून चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळेल अशी आशा गणेश रामराव दाढे यांना आहे.

    error: Content is protected !!





  • प्रेरणादायी ! 1 हजार पशुधनाचे सरपंचाकडून लम्पी प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    जिल्ह्यातील पाथरी तालूक्यात येणाऱ्या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी पुढाकार घेतल्यानंतर १ हजार पशुधनाचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे . विशेष म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन ही लसीकरण मोहीम दोन्ही गावच्या सरपंचांनी मोफत राबविली आहे.

    तालूक्यातील वाघाळा गावचे सरपंच बंटी घुंबरे व सिमुरगव्हाण चे सरपंच विष्णु उगले यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत स्वतःच्या गावातील पशुधनाला लम्पी आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागशी समन्वय साधत शनिवार १७ सटेंबर रोजी मोफत लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन केले होते . यामध्ये वाघाळा गावात ७०० तर सिमुरगव्हाण येथील ३०० पशुधनाचे लसीकरण करण्यात आले . दरम्यान राज्य सरकार येत्या काही दिवसात लम्पी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन लसीकरण मोहीम हाती घेणार आहे त्याआधी सामाजीक दायित्वातून पशुधनाची दोन्ही सरपंचानी घेतलेली काळजी तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.

    वाघाळा येथे लसीकरण यशस्वीतेसाठी सरपंच बंटी घुंबरे यांच्यासह अभिजीत घुंबरे , महेश घुंबरे , पशुवैद्यकीय अधिकारी शिंदे , संभाजी काकडे , सखाराम बोबडे , सुरेश होके यांनी तर सिमुरगव्हाण येथे उपसरपंच सुनील नायकल , ग्राम पंचायत सदस्य रामजी उगले,गणेश उगले, विकास कदम,रामेश्वर उगले,चांगदेव उगले, विष्णु रामभाऊ उगले,सेवक मारोती गवारे,ग्राम रोजगार सेवक बळीराम उगले,दिलीप उगले,ओमप्रकाश उगले,माऊली उगले , डॉ . पि. एल.जाधव , डॉ .चोरे ,डॉ .रवी विरकर , डॉ . रिजवान अन्सारी , डॉ . गजानन बनगर यांनी परिश्रम घेतले .