Category: Raju Shetti

  • एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्या; राजू शेट्टींची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद आज जयसिंगपूर येथे पार पडली. यंदाची ही २१ वी ऊस परिषद होती. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ही परिषद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी या मागणीसह इतरही ठराव आणि मागण्या करण्यात आल्या. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

    काय आहेत मागण्या ?

    –अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी.
    –भारनियमन त्वरित रद्द करून शेती पंपाला विनाकपात दिवसा 12 तास वीज द्यावी.
    –ऊस दर नियंत्रित अद्यादेश 1966 अ यामध्ये असणारा रिकव्हरी बेस 8.5 टक्के कायम ठेवून नंतरच्या सर्व दुरुस्त्या मागे घ्याव्यात.
    –केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर 35 रुपये करण्यात यावा.
    –कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशा मागण्या या ऊस परिषदेतून करण्यात आल्या.

    ऊस परिषदेतील ठराव

    1) महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक क्षेतकऱ्यांना दोन टप्यात एफआरपी देण्याची केलेली कायद्यातील बेकायदेशीर दुरूस्ती शिंदे फडणवीस सरकारने तातडीने रद्द करावा.

    2) गतवर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी पूर्णपणे देऊन अधिक 200 रूपये तातडीने देण्यात यावेत. महसुली विभाग सूत्राप्रमाणे 2020-21, 2021-22 या गळीत हंगामातील साखर कारखान्यांचा आरएसएफप्रमाणे निघणाऱ्या दराची घोषणा करावी.

    3) साखर आयुक्तांच्या नियंत्रणाखाली राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे तातडीने ऑनलाईन करून वैधमापन विभागाकडून साखर कारखान्यांचे वजनकाट्यांच्या कॅलिब्रेशनमध्ये एकसमानता सुसूत्रता आणि पारदर्शकता राहण्यासाठी सर्व साखर कारखान्यांना वजन काट्यांची कार्यान्वयिन संगणक प्रणाली एकच असणे व त्यांचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैद्यमापन विभागाकडून व्हावे.

    4) अवकाळी व अतिवृष्टी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या जिरायत पिकाला हेक्टरी सात हजार रुपयांची केलेली मदत अतिशय तोकडी आहे. द्राक्ष, डाळींब, सोयाबिन, कापूस, तूर, धान, मका, माजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची अग्रीम रकम दिवाळीपूर्वी देण्यात यावी व भाषित पिकाला हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत करण्यात यावी.

    5) शेतीपंपाचे होणारे मारनियमन त्वरीत रद्द करून शेतीपंपाला विनाकपात दिवसा 12 तास बीज देण्यात यावे. तसेच प्रलंबित बीज पंपाचे कनेक्शन ताबडतोब देणेत यावे. व्याज, दंडव्याज, इंपन अधिभार, इतर कर बगळता उर्वरीत मुद्दलात 50 टक्के रकम सवलत म्हणून देण्यात यावी.

    6) ऊस दर नियंत्रण अयादेश 1966 (अ) अस्तित्वात आला, त्यावेळी असणारा रिकव्हरी बेस 8.5 टक्के तोच कायम ठेवून नंतरच्या सर्व दुरुस्त्या तातडीने मागे घ्याव्यात.

    7) केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर 35 रूपये करण्यात यावा. साखरेच्या निर्यातीस कोटा सिस्टीम न ठेवता ओपन जनरल लायसन्स अंतर्गत मान्यता देऊन गुन्हाळ प्रकल्पांना इथेनॉल उत्पन्नाची परवानगी देण्यात यावी.

    8) ऊस तोडणी यंत्राने तोडणी केल्यास वजावट करावयाचे पाचटाचे वजन ४.५ टके एवढी तोडणी घट करण्यात आलेली आहे. ती रद्द करून १.५ • टक्के करण्यात यावी.

    9) केंद्र सरकारने साखर कारखान्यांना साखरेच्या पोत्यावर नाबार्डकडून ३ टक्के व्याज दराने तारण कर्ज यावे.

    10) कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. परणाची उंची एक इंचाने देखील वाढवणे आम्हास कदापि मान्य नाही. सदर निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा.

    11) भूमिअधिग्रहण कायद्यामध्ये महाविकास आघाडी सरकारने केलेली दुरूस्ती सरकारने तातडीने मागे घ्यावी. तसेच लम्पी सारख्या आजारामुळे शेतकऱ्यांचे पशुधन पूर्णतः धोक्यात आलेले आहे. यामुळे केंद्र सरकारने बंद केलेला पशुधन विमा तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावा.

    12) गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळासाठी ऊस दरातून कपात करून घेण्यात येणारी रकम साखर कारखान्यांना ऊस तोडणी मजूर पुरवल्यानंतर

    मगच कपात करण्यात यावी.

    13) चालू गळीत हंगामासाठी संपूर्ण एकरकमी एफआरपीसह अधिक 350 रूपये प्रतिटन पहिली उचल म्हणून देण्यात यावी.

  • पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरु होऊ देणार नाही : राजू शेट्टी

    हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आम्ही एफआरपीपेक्षा जास्त ऊसाला दर मिळावा म्हणून भांडतो. परंतु तुमच्या सातारा जिल्ह्यात एफआरपी पेक्षा 100-200 रूपये दर कमी दिला जात आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता संघटित होणे गरजेचे आहे. तेव्हा सातारा जिल्ह्यात पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू होवू देणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. नागठाणे (ता. सातारा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एकरकमी एफआरपी व आले पिकांची एकत्रित खरेदी यासाठी ‘जागर’ सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

    काटामारी शेतकऱ्यांच्या मुळावर

    यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, ‘काटामारी शेतकऱ्यांच्या मुळावर आली असून, ही रोखण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांप्रमाणे ऑनलाइन प्रणालीचा वापर कारखानदारांनी करावा, यासाठी शासनावर स्वाभिमानी दबाब वाढवेल. आले खरेदी करताना व्यापारी नवे- जुने करत आहे. ही पद्धत शेतकऱ्यांच्या नुकसानीची आहे. यासाठी सातारा, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणी सभा घेऊन एकत्रित खरेदी करण्यास भाग पाडणार आहे. यातूनही काही व्यापारी वाकड्यात गेल्यास त्यांची गाठ स्वाभिमानीशी आहे.

    काटामारीतून होत असलेली साखर चोरीमुळे २२५ कोटींचा जीएसटी बुडविला जात असल्याचे संबंधित विभागाला निदर्शनास आणू दिले आहे. कारखान्यांनी काटामारीतून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुटले आहेत. ही लूट थांबविण्यासाठी साखर कारखान्यांनी पेट्रोलियम कंपन्यांप्रमाणे ऑनलाइन वजनकाटा बसविण्यासाठी सरकारवर दबाव आणणार आहे. आले व्यापाऱ्यांनी प्रचलित परंपरेनुसार आल्याची एकत्रित खरेदी करावी, अन्यथा स्वाभिमानीशी गाठ आहे, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

    यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य बाळकृष्ण साळुंखे, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जयकुमार कोल्हे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, देवानंद पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, अॅड. विजयराव चव्हाण, अॅड. सतीश कदम, कृषिभूषण मनोहर साळुंखे आदी उपस्थित होते.

  • जोपर्यंत किमान हमीभाव कायदा लागू होत नाही, तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटात : राजू शेट्टी




    जोपर्यंत किमान हमीभाव कायदा लागू होत नाही, तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटात : राजू शेट्टी | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : MSP कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. दिल्लीतील पंजाब खोर इथे MSP गॅरंटी किसान मोर्चाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी या अधिवेशनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील सहभाग नोंदवला. देशाला अन्न धान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर करत असताना शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे. देशातील 80 टक्के शेतकरी हे अल्पभुधारक आहेत. त्यामुळं किमान हमीभावाचा कायदा लागू करावा अशी भूमिका यादरम्यान शेट्टींनी मांडली.

    यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील 460 ग्रामपंचातीच्या गावसभेमध्ये देशाच्या संसदेत हमीभावाचा कायदा मंजूर करावा तसेच राष्ट्रपतींनी तसा त्यांना आदेश द्यावा असे ठराव एकमताने मंजूर केला आहे. लवकरच हे ठराव राष्ट्रपतींना सुपुर्द करणार असल्याची माहिती देखील राजू शेट्टींनी यावेळी दिली. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात संसदनं अनेक कायदे केले ते अधिकारी व मंत्र्याच्या इच्छेखातर. मात्र, इतिहासात प्रथमच 2017 पासून किमान हमीभावाच्या कायद्यासाठी शेतकरी रस्त्यावरची लढाई लढत असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

    केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवून शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे. संपुर्ण देशातील शेतकरी ही लूट थांबवण्यासाठी संघटित झालेला आहे. यामुळं याआधी संसद मार्ग आणि जंतर मंतरवर सुरु झालेली ही लढाई आता शेतकऱ्यांच्या थेट बांधावर आणलेली असून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तसेच गुजरातपासून आसामपर्यंतचा शेतकरी या लढाईत समाविष्ट झाला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

     

     

    error: Content is protected !!





  • ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला, ‘जागर एफआरपीचा’ अभियान

    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस हंगामाची दिशा ठरवण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे.

    ‘जागर एफआरपीचा’ अभियान

    याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘चार वर्षांपासून एफआरपीचा दर २७०० ते २९०० इतका आहे, मात्र खतांचे वाढलेले दर, मजुरी लक्षात घेता आता एफआरपीची रक्कम वाढवून मिळणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने एफआरपीच्या रकमेत जी वाढ केली ती तोडणी, ओढणीमध्येच संपते. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या साखरेची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात साखर निर्यात झाली आहे.

    तसेच इथेनॉल आणि कच्च्या साखरेचे दरही अधिक आहेत. ब्राझीलमध्ये यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षात भारताच्या साखरेला जागतिक बाजारात चांगली मागणी असेल. हे सर्व पाहता साखर कारखान्यांना वाढीव एफआरपी देणे शक्य आहे. तसेच कारखाने जी उपउत्पादने बनवतात, त्याचीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आता वाढीव एफआरपी अधिक किती रक्कम हे १५ ऑक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेत ठरेल.

    खतांचे आणि मजुरीचे वाढलेले दर आणि साखर कारखान्यांना झालेला नफा लक्षात घेऊन एफआरपी (रास्त आणि किफायतशीर दर)ची रक्कम अधिक मिळावी, अशी आमची मागणी असणार आहे. तसेच एफआरपीची रक्कम का वाढवून मिळावी यासाठी ९ ठिकाणी ‘जागर एफआरपीचा’ हे अभियान घेऊन या बाबत शेतकऱ्यांना जागरूक केले जाणार आहे.

    शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळेच पक्ष लुच्चे

    या बाबत प्रबोधन करण्यासाठी ‘जागर एफआरपीचा’ हे अभियान राबवले जाणार आहे. महाविकास आघाडीने एकरकमी एफआरपी न देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला. नव्या सरकारने महाविकास आघाडीचे सर्व निर्णय रद्द केले. फक्त एकरकमी एफआरपीचा निर्णय रद्द केला नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळेच पक्ष लुच्चे आहेत, असे शेट्टी म्हणाले.

     

  • कारखाने खुशाल सुरु करा; पण मागच्या वर्षीच्या थकीत FRP चं काय? : राजू शेट्टींचा सरकारला सवाल

    हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्याक्षतेखाली झालेल्या बैठकीत यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यंदाचा गळीत हंगाम तर जाहीर झाला मात्र मागच्या वर्षीच्या थकीत FRP चं काय असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे. शिवाय थकीत FRP चे 900 कोटींसह, 200 रुपये अधिकचे मिळेपर्यंत एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला आहे.

    आधी थकीत रक्कम द्या आणि मग कारखाने सुरु करा अन्यथा शेतकऱ्यांच्या संघर्षाला सामोरे जा असा इशाराच शेट्टी यांनी दिला आहे. शिवाय मागील वर्षी कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा झाला होता. त्यामुळं 200 रुपये अधिक देण्याची कारखान्यांची क्षमता असल्याचे राजू शेट्टी म्हणाले यंदाचा अहानागाम सुरु कराल मात्र मागील थकीत FRP चे काय ? असा थेट सवाल शेट्टी यांनी सरकारला केला आहे.

    आधी शेतकऱ्यांची देणी भागवा…

    पुढे बोलताना शिट्टी म्हणाले , FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाना सुरु होऊ देणार नाही. गेल्या वर्षी निर्यात झालेल्या साखरेला चांगला दर मिळाला. देशांतर्गत साखरेला चांगला दर मिळाला. तसेच इथेनॉलच्या उत्पादनामुळं रोख पैसे उपलब्ध झाल्यामुळं साखर कारखान्यांकडे FRP शिवाय 200 रुपये ज्यादा देण्याची क्षमता तयार झाली आहे. हे पैसे जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार हा संघर्ष थांबणार नाही.

    तर ऊसाचा बुडका कारखानदारांच्या पाठित

    15 ऑक्टोबरपासून तुम्हाला साखर कारखाने सुरु करायचे असतील तर खुशार सुरु करा. मात्र, शेतकऱ्यांची FRP आणि 200 रुपये ही देणी भागवा आणि मग कारखाने सुरु करा असे शेट्टी म्हणाले. कारखान्यांना ऊस देण्यासाठीच ऊस लावला आहे. निव्वळ ऊसच मागत राहिलात तर ऊसाचा बुडका कारखानदारांच्या पाठित बसल्याशिवाय राहणार नसल्याचे शेट्टी  म्हणाले.

  • मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं तरी ते फक्त दही हंडीच फोडतायेत, राजू शेट्टींचा एकनाथ शिंदेंना टोला

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणाचा दर्जा रसातळाला गेला आहे. सर्वसामान्य माणसाला देखील याची किळस येऊ लागली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं, पण ते फक्त दही हंडीच फोडत असल्याचि टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

    पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या दोन महिन्यात राज्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे. जनावरांवर लम्पीसारखा आजार आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन यंत्रणा कामाला लावण्याची जवाबदारी पालकमंत्र्यांची असते. मात्र, जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री मिळाले नाहीत. यामुळं या सरकारचे अस्तित्व शून्य झाले असल्याचे शेट्टी म्हणाले.

    एवढा मोठा पाऊस पडला, जमिनी वाहून गेल्या, शेती पिकं वाया गेली. तरी महसूल खात्यान घरात बसून पंचनामे केले. कृषी अधिकारी शिवारात फिरकले नाहीत याचा हा परिणाम आहे. त्यांना जाब विचारणार कोण. अजूनही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. पालकमंत्रीच नाहीतर आढावा कोण घेणार? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

    मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं, पण ते फक्त दही हंडीच फोडत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. गणपतीच्या काळात घरा घरात जाऊन दर्शन घेत राहिले. मुख्यमंत्र्यांनी धार्मिक असावं, उत्सव साजरा करावा, पण उत्सव साजरा करण्यापूर्वी महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची आपल्यावर जबाबदारी आहे याचं भान ठेवलं पाहिजे असेही शेट्टी यावेळी म्हणाले.

  • Lumpy : सरकारने तातडीने सर्व पशुधनाचा विमा उतरवावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी (Lumpy) हा त्वचा रोगाचा आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये हा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. या आधारावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. येत्या 10 दिवसात लसीकरणाचा साठा उपलब्ध करून द्यावा, खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचा केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने विमा उतरवण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

    राज्य सरकारकडून पशुधनाचा विमा उतरवावा

    राजस्थान हरियाणा नंतर आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लंपी (Lumpy) रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे. अशातच लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. तातडीची उपाययोजना म्हणून येत्या दहा दिवसात लसीकरणाचा साठा उपलब्ध करुन द्यावा. खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचे केंद्र आणि राज्य सरकारकडून तातडीने विमा उतरवावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

    पशुसंवर्धन विभागात डॅाक्टरांचा तुटवडा, अनेक ठिकाणी पदे रिक्त

    गुजरात आणि राजस्थान या राज्यामध्ये वेळेत योग्य उपचार न झाल्यानं लम्पी (Lumpy) या आजारानं मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली आहेत. सदर आजारातील देशी जनावरांच्या मृत होण्याची टक्केवारीचे प्रमाण जवळपास 10 टक्क्यांपर्यंत गेले आहे. मात्र, संबंधित राज्य सरकारकडून अपयश लपवण्यासाठी चुकीची आकडेवारी दर्शवली जात आहे. या आजारामुळेच देशामध्ये दुधाचा तुटवडा निर्माण होवू लागला आहे. राज्य सरकारने लसीकरणास जरी सुरुवात केली असली तरी राज्यात पशुसंवर्धन विभागात डॅाक्टरांची पदे भरलेली नसल्याने डॅाक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे.

    लम्पी स्कीन (Lumpy) आजाराचा प्रामुख्याने देशी जनावरामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. महाराष्ट्रात खिलार, साहिवाल, गीर, देवणी, कोकण गीर, रेड सिंधी कांक्रेट या देशी जनावरांची संख्या जास्त आहे. बाजारांमध्ये जनावरांच्या किंमती गगनाला भिडल्या असून, या आजारात जनावरे दगावल्यास पशुपालकांना हा मोठा फटका बसणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. ज्याप्रमाणं कोरोना काळात कमी हप्त्यामध्ये जनतेला विमा उपलब्ध करुन दिला त्याचप्रमाणे राज्यातील सर्वंच जनावारांचा येत्या दहा दिवसात तातडीने विमा उतरवण्यात यावा. जेणेकरुन एखादे जनावर यामध्ये दगावल्यास संबंधित पशुपालकास होणाऱ्या नुकसानीचे अर्थसहाय्य मिळून त्या कुटुंबास आधार मिळेल, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

  • पूर्ण ‘एफआरपी’ शिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी

    हॅलो कृषी ऑनलाईन : या हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. इस्लामपूर येथे बुधवारी (ता. ७) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

    पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांनी गेल्या वेळी दिलेली एफआरपी तुकड्याने दिली. ती पंधरा टक्के व्याजासकट दिली पाहिजे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कारखान्यांनी तो पाळावा. कारखान्यांना चांगला दर मिळाला आहे. त्यांनी यंदा एफआरपीपेक्षा अजून २०० रुपये जादा द्यावेत आणि तेही हंगाम सुरू होण्यापूर्वी द्यावेत, अशी स्वाभामिनीची आग्रही भूमिका आहे. या हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही

    ते पुढे म्हणले , ‘‘केंद्र शासनाने निर्यात साखरेला चांगला भाव दिला आहे. कारखान्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे २०० रुपये वाढवून द्यावेत. कारखाने बिगर सभासदांकडून घेत असलेले पैसे बेकायदेशीर आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या ठेवींची मागणी करावी,’’ असे आवाहन शेट्टी यांनी केले.

    ‘‘साखर कारखान्यांद्वारे होणारी काटामारी गंभीर आहे. जवळपास एका खेपामागे दोन ते अडीच टन उसाची काटामारी होते. वर्षाला सरासरी ७० हजार टन केवळ काटामारीतून मिळतात. ही साखर काळ्या बाजारात विकली जाते. यातून एकट्या राज्याचा विचार केला तर २०० कोटींच्या वर जीएसटी सरकारचा बुडतो. शासनाने कारखान्यांच्या गोडाउनवर छापे टाकावेत म्हणजे बेहिशेबी साखर किती आहे, ते कळेल,’’ असेही शेट्टी म्हणाले.