Category: Satara

  • केंद्र शासनांच्या प्रमुख योजनांचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात केंद्र शासनाच्या विविध प्रमुख योजनांचा आढावा घेतला. केंद्र शासनाच्या लोक कल्याणकारी योजनाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना देवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही बैठकीत दिले.

    या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    देसाई म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण चे उद्दिष्ट शासनाकडून प्राप्त झाले आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करा. ज्या लाभार्थ्यांकडे घर बांधण्यासाठी जागा नाही अशांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नगर पालिकांचे मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी यांना उद्दिष्ट द्या व वेळावेळी या योजनेचा आढावा घ्यावा.

    जल जीवन मिशन अंर्तत ग्रामीण पाणी पुरवठ्याची मंजूर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करावा. आयुष्मान भारत योजनेंर्गत ई-कार्ड दिले जाते. शासनाने ठरवून दिलेल्या शस्त्रक्रिया या योजनेंतर्गत मोफत करण्यात येते. याचा गरजु लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शिबीरांचे आयोजन करुन ई-कार्डचे वाटप करावे. यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांची बैठक आयोजित करावी. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ई-केवायसी करुन घ्यावे.

    बेठकीत श्री. देसाई यांनी किसान क्रेडीट कार्ड, अटल पेन्शन योजना, स्वनिधी, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, स्वामित्व कार्ड, भारत नेट व स्वामित्व योजना ड्रोनद्वारे गावांचे सर्व्हेक्षण या योजनांचा आढावा घेवून योजना विषयीचे जे प्रश्न जिल्हास्तरावर आहे ते तात्काळ सोडविले जातील. ज्या कामांना मंत्रालयस्तरावर मंजूरी पाहिजे असेल तर अशा कामांचे प्रस्तावही द्यावेत त्यालाही मंजूरी आणली जाईल, असेही त्यांनी बैठकीत सांगितले

  • लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीस परवानगी देण्याची बैलगाडा चालकांची मागणी…

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    सातारा जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये जनावरांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या गाय आणि बैल वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 7 सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर,बाजार भरवण्यावर आणि शर्यतीवर बंदी घातली आहे. बैलगाडा प्रेमी आणि आयोजकांनी लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे.

    अन्यथा बैलाची किंमत कमी होईल…

    बैलांना रोज फेरी मारणे तसेच स्पर्धेमध्ये पळवणे हे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे बैल या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ शकतात आणि त्या बैलाची किंमत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लसीकरण झालेल्या जनावरांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र करून काही अटी शर्ती घालून परवानगी द्यावी अशी मागणी बैलगाडा प्रेमी करत आहेत.

    साताऱ्यात लंपीचा उद्रेक

    दरम्यान सातारा जिल्ह्यातील जनावरांना लंपी त्वचा रोगाचा उद्रेक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात या रोगाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात 5 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. लंपी रोगाने जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 71 गावे बाधित झाली आहेत. आत्तापर्यंत 573 जनावरांना लंपीची लागण झाली आहे, तर 82 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. 449 जनावरांवर सध्या उपचार करण्यात येत आहे.

    जिल्ह्यातील 3 लाख 52 हजार जनावरांना पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 1 लाख 43 हजार 63 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.. पशुसंवर्धन विभागाकडे 2 लाख 81 हजार 900 लसमात्रा उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय शिंदे यांनी दिली आहे.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

    १) लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • सातारा जिल्ह्यात लंपीचा उद्रेक 11 पैकी 10 तालुक्यात शिरकाव

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    राज्यात लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा जिल्ह्यातील जनावरांना लंपी त्वचा रोगाचा उद्रेक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात या रोगाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.

    जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात 5 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. लंपी रोगाने जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 71 गावे बाधित झाली आहेत. आत्तापर्यंत 573 जनावरांना लंपीची लागण झाली आहे, तर 82 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. 449 जनावरांवर सध्या उपचार करण्यात येत आहे.

    जिल्ह्यातील 3 लाख 52 हजार जनावरांना पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 1 लाख 43 हजार 63 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.. पशुसंवर्धन विभागाकडे 2 लाख 81 हजार 900 लसमात्रा उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय शिंदे यांनी दिली आहे.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

    १) लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • काळ्या कुळकुळीत म्हशीला झाले पांढरे शुभ्र रेडकू

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी कराड

    काळ्याभोर म्हशीला नेहमी काळेच रेडकू होत असते मात्र येरवळे जुने गावठाण येथील नितीन मोहिते यांच्या काळ्याभोर म्हशीला मात्र नुकतेच दुधासारखे पांढरे शुभ्र रेडकू झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला

    हे रेडकू पूर्णपणे पांढरे शुभ्र असून ते गायीच्या वासरा सारखे दिसते ही एक दुर्मिळ बाब आहे अपवादात्मक अशा प्रकारची घटना घडू शकते

    विशेष म्हणजे हे रेडकू अगदी पांढरे शुभ्र असून चांगले ठणठणीत आहे काळ्याभोर म्हशीला पांढरे शुभ्र रेडकू झाल्यामुळे नितीन मोहिते व त्यांच्या कुटुंबीयांनाही अचंबा वाटला..

    म्हशीला चुकून गायीचे इंजेक्शन दिले गेले असल्यास असा दुर्मिळ प्रकार घडू शकतो असे डॉक्टरांचे मत आहे

    या पांढऱ्या शुभ्र रेडकाला पाहण्यासाठी येरवळे सह परिसरातील ग्रामस्थांची गर्दी होत आहे..

  • लंपी चर्म रोगाचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही : आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

    हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी चर्म रोगाच्या नियंत्रणासाठी १० लाख लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नसल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह
    यांनी सांगितले.

    समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर कारवाई

    पशुसंवर्धन आयुक्त सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, राज्यात लंपी चर्म रोगाचा झपाट्याने प्रसार होतो आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. तसेच दूध हे मानवी आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे कांही समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर शासकीय कार्यवाही केली जाईल.

    मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी

    या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिका-यांनी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी. जनजागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही (सोशल मिडियाचाही वापर करावा. लंपी आजारावर उपयुक्त असणा-या लस व औषधींची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून करावी. लंपी चर्म आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्यातून लसीकरण मोहीम घ्यावी. त्यासाठी मानधन तत्वावर त्यांच्या सेवा घ्याव्यात अशा सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.

    औषधांची फवारणी करावी

    हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने पशुसंवर्धन विभागाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आणि जिल्हा परिषद सेस यातून औषधे व इतर बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयी श्री सिंह यांनी सांगितले.

    नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित

    शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अधिसूचना प्रसिद्ध करून त्याअन्वयेप्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ (२००९ चा २७) याची कलमे (६), (७), (११), (१२) व (१३) या दूद्व्यारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, संपूर्ण महाराष्ट्र राज्य लंपी चर्म रोगाच्या बाबतीत “नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार गो व म्हैस प्रजातीची नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तसेच गो व म्हैस प्रजातीचा बाजार भरविणे, शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्रदर्शने इ. बाबीस मनाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

    घाबरू नका काळजी घ्या

    सिंह यांनी सांगितले की,हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात दि. ९.०९.२०२२ पर्यंत ७०,१८१ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान मध्ये ४५०६३, पंजाबमध्ये १६८६६, गुजरात मध्ये ५३४४ व हरियानामध्ये १८१० जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमांमधून प्रसारित होणाच्या बातम्यांमुळे पशुपालकांमध्ये अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही, परंतु आवश्यक खबरदारी घ्यावी, असे सिंह यांनी पशुपालकांना आवाहन केले आहे.

    त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो

    लंपी चर्म रोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये, तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

  • सातारा जिल्ह्यात लंम्पीचा प्रादुर्भाव; तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या मंत्री देसाईंच्या सूचना

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सातारा

    लंम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. हा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लंम्पी चर्म रोग प्रादूर्भावाची सद्यस्थितीचा आढावा श्री. देसाई यांनी मंत्रालय, मुंबई येथून दूरदृश्यप्रणाली द्वारे घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (दूरदृश्यप्रणाली द्वारे), सातारा जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    देसाई म्हणाले, लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिसरातील पशुधनास तातडीने लसीकरण करावे. ज्या गावांमधील पशुधनास लंम्पी आजारची लागण झाल्याचे समजतात तात्काळ भेट देवून पशुधनास उपचार करावे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने सज्ज रहावे. लंम्पी आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाकडूनही मदत केली जाईल. जिल्ह्यातील पशुपालकांनी पशुधनास लंम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून औषधोपचार करावेत, असेही आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी केले. जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यात लंम्पी चर्म रोगाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

    जिल्ह्यात 46 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून त्यापैकी 17 हजार 241 लसमात्रांचा वापर करुन पशुधनास लसीकरण करण्यात आले. 26 हजार 659 लसमात्रा शिल्लक असून त्याद्वारे लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे. तसेच पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडे 2 लाख लसमात्रांची मागणी करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी बैठकीत सांगितले.