परभणीत पावसाची दडी, सोयाबीन वाळून चालल्याने शेतकरी चिंतेत
हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यात मागच्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याविना सोयाबीन वाळू लागले आहे. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पीक असल्यामुळे आणि नेमके याच वेळी पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहे. सुरुवातीच्या काळात सर्वत्र जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळं सोयाबीन पिक पिवळे पडले होतो. … Read more