Category: Soybean

  • राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; कशी घ्याल पिकांची काळजी ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 11 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीसाऱ्यासह मुसळधार पावसाची तर जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात ; दिनांक 12 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्यवस्थापन

    १) कापूस

    कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    २) सोयाबीन

    पुढील दोन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची स्वच्छ हवामानात काढणी करावी.

    ३)तूर

    तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. शक्य असेल तेथे तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

    ४) खरीप भुईमूग

    काढणीस तयार असलेल्या खरीप भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

    ५) मका

    मका पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते. पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

    ६) रब्बी ज्वारी

    रब्बी ज्वारी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात (1 ते 15 ऑक्टोबर) करावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

    ७) रब्बी सूर्यफूल

    रब्बी सुर्यफुलाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. पेरणी संकरीत वाणासाठी 60X30 सेंमी तर सुधारित वाणासाठी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे.

  • Soybean Market Price : सोयाबीन दराची घसरण चिंताजनक; पहा आज किती मिळाला दर ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावानुसार आज सोयाबीनला कमाल 5200 रुपयांचा भाव मिळालेला आहे.

    हा भाव उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळालेला आहे. आज उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 160 क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5000, कमाल भाव 5200 आणि सर्वसाधारण भाव 5100 मिळाला तर उमरखेड डांकी बाजार समितीमध्ये देखील हेच दर राहिले.

    तर सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 6,902 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव ४४०० कमाल भाव 5181 आणि सर्वसाधारण भाव 5000 रुपये इतका मिळाला.

    इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दर हे कमाल दर 4000 ते 5000 रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनचे उतरलेले दर ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

    आजचे सोयाबीन बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    10/10/2022
    जळगाव क्विंटल 126 4205 4650 4400
    सिल्लोड क्विंटल 84 4100 4400 4200
    कारंजा क्विंटल 4000 4210 4900 4540
    श्रीरामपूर क्विंटल 64 4000 4750 4500
    परळी-वैजनाथ क्विंटल 2500 4150 4951 4730
    राहता क्विंटल 51 3850 4850 4600
    सोलापूर लोकल क्विंटल 459 3935 4925 4720
    अमरावती लोकल क्विंटल 1590 4000 4725 4362
    परभणी लोकल क्विंटल 210 4300 5000 4900
    नागपूर लोकल क्विंटल 2462 4200 5000 4800
    अमळनेर लोकल क्विंटल 24 4500 4870 4870
    हिंगोली लोकल क्विंटल 555 4585 5000 4792
    लातूर पिवळा क्विंटल 6902 4400 5181 5000
    अकोला पिवळा क्विंटल 676 3905 4940 4495
    यवतमाळ पिवळा क्विंटल 103 4405 5001 4703
    चिखली पिवळा क्विंटल 360 4175 4812 4493
    देगलूर पिवळा क्विंटल 63 4461 5000 4730
    बीड पिवळा क्विंटल 89 3800 4951 4471
    भोकर पिवळा क्विंटल 333 3800 4903 4351
    जिंतूर पिवळा क्विंटल 4 4545 4545 4545
    मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1400 4390 5185 4825
    दिग्रस पिवळा क्विंटल 115 4650 5000 4850
    जामखेड पिवळा क्विंटल 296 4200 4800 4500
    गंगाखेड पिवळा क्विंटल 15 4850 5100 5000
    देउळगाव राजा पिवळा क्विंटल 90 3000 4800 3800
    वरोरा पिवळा क्विंटल 20 4300 4700 4500
    केज पिवळा क्विंटल 577 3976 5000 4800
    मुरुम पिवळा क्विंटल 603 4500 5151 4826
    उमरखेड पिवळा क्विंटल 160 5000 5200 5100
    उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 70 5000 5200 5100
    सोनपेठ पिवळा क्विंटल 835 3900 4895 4501
  • सद्य हवामान स्थितीत वावरातल्या पिकांची कशी घ्याल काळजी ? वाचा तज्ञांचा सल्ला

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या खरीप पिकांची काढणी सुरू आहे.  सोयाबीन सह वावरातील इतर खरीप पिकांची काढणी सुरू आहे मात्र पावसाचा अंदाज असल्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन तज्ञांच्या मार्फत करण्यात आला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    सोयाबीन : पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. सोयाबीन पिकाची काढणी पुढे ढकलावी.

    खरीप ज्वारी : पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले खरीप ज्वारी पिकाची कणसे गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले कणसे व कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. खरीप ज्वारी पिकाच्या कणसांची काढणी पुढे ढकलावी.

    बाजरी : बाजरी पिकाची कणसे गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले कणसे व कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. बाजरी पिकाच्या कणसांची काढणी पुढे ढकलावी.

    ऊस : पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर ऊस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

    हळद : पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर हळद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

    हरभरा : हरभरा पिकाच्या पेरणीसाठी बीडीएनजी-9-3, बीडीएनजी-797 (आकाश), दिग्विजय, जाकी-9218, साकी-9516, फुले विक्रम, फुले विक्रांत, पीडीकेव्ही कांचन, विश्वास इत्यादी वाणांपैकी निवड करावी. करडई पिकाच्या पेरणीसाठी शारदा, परभणी कुसुम (परभणी-12), पूर्णा (परभणी-86), परभणी-40 (निम काटेरी), अन्नेगीरी-1, एकेएस-327, एसएसएफ-708,आयएसएफ-764 इत्यादी वाणांपैकी निवड करावी.

  • वावरतील सोयाबीन कापूस, पिकांची काय घ्यावी काळजी ? रब्बी मका, ज्वारीसाठी कुठले वाण वापराल ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    १) कापूस

    पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझीन 25% 400 मिली किंवा डायफेन्थुरॉन 50% 240 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    २)सोयाबीन :

    काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची स्वच्छ हवामानात काढणी करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी किंवा ढिग करून झाकून ठेवावे.

    ३)तूर :

    तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. शक्य असेल तेथे तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

    मका वाण :

    रब्बी हंगामात मका पिकाच्या पेरणीसाठी धवन, शक्ती-1, करवीर, डेक्क्न-105 इत्यादी वाणांपैकी एका वाणाची निवड करावी.

    रब्बी ज्वारी:

    पेरणीसाठी परभणी सुपर मोती (एसपीव्ही-2407), परभणी मोती (एसपीव्ही-1411), परभणी ज्योती (एसपीव्ही-1595/सीएसव्ही-18), पीकेव्ही क्रांती, फुले यशोदा, सीएसव्ही-22 आर, सीएसव्ही-29आर (एसपीव्ही-2033), मालदांडी (एम35-1), फुल रेवती (एसपीव्ही-2048), फुले सुचित्रा इत्यादी वाणांपैकी निवड करावी.

    रब्बी सुर्यफुल :

    पेरणीसाठी लातूर सुर्यफुल-8, फुले भास्कर, मॉर्डन, लातूर संकरित सुर्यफुल-171, लातूर संकरित सुर्यफुल-35 इत्यादी वाणापैकी वाणाची निवड करावी.

  • सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार




    सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    खरिपात पेरणी केलेल्या सोयाबीनच्या तब्बल १० बॅगला पेरणी केल्यानंतर ३ महिण्याचा अवधी होऊनही शेंगा न लागल्या नसल्याने एका शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असुन बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या झुवळा झुटा येथील शेतकर्‍याने प्रशासनाकडे तक्रार करत आता नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे.

    तालुक्यातील जवळा झुटा येथील राजेंद्र सुरेशराव जवळेकर असे फसवणुक झालेल्या शेतकर्याचे नाव असून त्यांनी जवळा झुटा येथील गट क्र . 19 मधील जमीनीमध्ये पाथरी येथील एका कृषी केंद्रावरुन खरेदी केलेले. ग्रीन गोल्ड सिडस या कंपनीचे 10 बॅग सोयाबीन बियाणे खरीप हंगामात पेरले होते.

    मात्र सदरील बियाणे पेरणी करून तीन महिने उलटले असून सोयाबीनची फक्त वाढ झालेली असुन अद्यापही या पिकाला शेंग अथवा कसल्याही प्रकारचा माल लागलेला नाही. याप्रकरणी आता या शेतकऱ्याने तक्रारीसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली असून पिकाची पाहणी करुन संबंधित कंपनी विरुद्ध कार्यवाही करुन पिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

    error: Content is protected !!





  • सोयाबीन बाजारभाव स्थिर; पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळाला भाव ?




    सोयाबीन बाजारभाव स्थिर; पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळाला भाव ? | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेलया राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

    हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5100, कमाल भाव ५२०० आणि सर्वसाधारण भाव 5100 रुपये इतका मिळाला आहे.

    तर आज सर्वाधिक आवक ही वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 3000 क्विंटल इतकी झाली आहे. तर त्याकरिता किमान भाव ४६०० रुपये कमाल भाव ५००१ रुपये आणि सर्वसाधारण भाव 4800 रुपये इतका मिळाला आहे.

    आजचे सोयाबीन बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    29/09/2022
    माजलगाव क्विंटल 134 4000 4811 4500
    सिल्लोड क्विंटल 3 4900 4900 4900
    श्रीरामपूर क्विंटल 9 3500 4000 3750
    तुळजापूर क्विंटल 110 4700 4975 4800
    मोर्शी क्विंटल 70 4500 4800 4650
    राहता क्विंटल 11 4200 4791 4500
    सोलापूर लोकल क्विंटल 193 4170 5010 4765
    नागपूर लोकल क्विंटल 94 4500 4991 4888
    हिंगोली लोकल क्विंटल 500 4600 5011 4805
    मेहकर लोकल क्विंटल 500 4200 5100 4500
    ताडकळस नं. १ क्विंटल 94 4800 5100 4900
    अकोला पिवळा क्विंटल 855 3333 4970 4765
    यवतमाळ पिवळा क्विंटल 130 4650 4935 4792
    मालेगाव पिवळा क्विंटल 3 4836 4861 4836
    चिखली पिवळा क्विंटल 131 4251 4725 4638
    बीड पिवळा क्विंटल 10 4750 4750 4750
    वाशीम पिवळा क्विंटल 3000 4600 5001 4800
    वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 300 4450 5000 4750
    भोकर पिवळा क्विंटल 16 4504 4815 4660
    हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 125 4200 4800 4500
    मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 300 4425 4905 4725
    मलकापूर पिवळा क्विंटल 273 4000 5051 4555
    गेवराई पिवळा क्विंटल 1 4650 4650 4650
    गंगाखेड पिवळा क्विंटल 15 5100 5200 5100
    देउळगाव राजा पिवळा क्विंटल 18 3950 4900 4250
    धरणगाव पिवळा क्विंटल 79 4155 4820 4695
    केज पिवळा क्विंटल 23 4500 4800 4735
    उमरगा पिवळा क्विंटल 5 4241 4830 4500
    पुर्णा पिवळा क्विंटल 27 4200 4750 4451
    काटोल पिवळा क्विंटल 20 3500 4800 4500

    error: Content is protected !!





  • बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग आणि किडींचा हल्ला; कसे कराल व्यवस्थापन ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    1)सोयाबीन : उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% 250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल 5% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे. उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारावे.

    २)खरीप ज्वारी : पिकावरील कणसातील अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा मॅलाथिऑन 5% भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो प्रमाणे धुरळणी करावी किंवा मॅलाथिऑन 50% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    ३)ऊस : पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    ४)हळद : हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

    ५) हरभरा : हरभऱ्याच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चोपन व आम्ल जमिनीत हे पीक बरोबर येत नाही. पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास हे पीक उमळते. या पिकास कोरडे व थंड हवामान मानवते.

    ६) करडई : करडई पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचरा आणि ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. खरीपातील मुग, उडीद किंवा सोयाबीन काढणीनंतर करडई पीक घ्यावे.

  • Soybean : याला म्हणतात कष्टाचं चीज ! सोयाबीन रोपाला तब्बल 417 शेंगा




    Soybean : याला म्हणतात कष्टाचं चीज ! सोयाबीन रोपाला तब्बल 417 शेंगा | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : कमी वेळात चांगले उत्पादन आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीन (Soybean) या पिकाची लागवड करतात. त्यात मागच्या दोन तीन वर्षांपासून सोयाबीनला बाजारात चांगली किंमत मिळवू लागल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल सोयाबीन लागवडीकडे आहे. यंदाच्या वर्षी देखील राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मात्र अनेक भागात पावसामुळे सोयाबीनला फटका बसला आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन वर रोग आणि किडींचा हल्ला झाला आहे. तर काही ठिकाणी शेंगाचा भरल्या नाहीत. असे असताना परभणी मधील एका शेतकऱ्याच्या शेतात एका रोपाला तब्बल ४१७ शेंगा लागल्या आहेत.

    होय …! आम्ही बोलत आहोत परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातल्या मुक्काम खोरस येथील शेतकरी गणेश रामराव दाढे (३२) या शेतकऱ्याबद्दल… खरे तर या भागात सर्रासपणे कपाशीचे पीक घेतले जाते. पण कपाशीच्या पिकाला खर्च येत असल्यामुळे यंदा दाढे यांनी सोयाबीन (Soybean) लागवड करायची ठरवली. पण ते एवढं सोपं नव्हतं. कारण या निर्णयाला घरच्या मंडळींसहित गावातील मित्रपरिवाराचाही विरोध होता. मात्र या सगळ्यांचा सल्ला झुगारत दाढे यांनी सोयाबीनचा घ्यायचे ठरवले. सुरवातीला लोक त्यांच्यावर हसत होते. मात्र त्यांच्या कष्टाचे चीज झाले असून त्यांच्या सोयाबीन पिकाला चांगल्या शेंगा आल्या आहेत.

    दाढे यांनी सोयाबीनचे (Soybean) वाण KDS 726 याची लागवड केली. २५ एकरमध्ये लागवडीसाठी त्यांना १८ बॅगा बियाणे लागले. विशेष म्हणजे या वाणाची बॅग 22 किलोची असते. इतर बॅगा 30 किलोच्या असतात. पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यानंतर त्यांना एकरी 15 क्विंटल प्रमाणे विक्रमी 300 क्विंटल पेक्षा जास्त सोयाबीन होण्याची शक्यता आहे.

    खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनला अतिवृष्टीचा मोठा धोका असतो. पण योग्य व्यवस्थापन केल्यामुळे पीक चांगले आले असून चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळेल अशी आशा गणेश रामराव दाढे यांना आहे.

    error: Content is protected !!





  • शेवटच्या टप्प्यात असे करा सोयाबीन पिकावरील किड आणि रोग व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून बऱ्याच ठिकाणी पापडी अवस्थेतील शेंगा भरत आहेत, अशा अवस्थेत सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात चक्री भुंगा,खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी ( स्पोडोप्टेरा- लष्करी अळी) या पंतगवर्गिय किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर काही ठिकाणी केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. या किडींचे वेळीच व्यवस्थापन नाही केल्यास सोयाबीन उत्पन्नात मोठे नुकसान होऊ शकते. त्यासोबतच पावसाचा खंड पडल्याने पिकास पाण्याचा ताण बसत आहे.

    त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी सोयाबीन वर रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामध्ये प्रादुर्भाव झालेली पाने सुरुवातीला पाण्यात भिजल्या प्रमाणे दिसतात त्यानंतर लवकरच हिरवट-तपकिरी ते लालसर-तपकिरी होतात. संक्रमित भाग नंतर तपकिरी किंवा काळ्या रंगाचा होतो. जास्त पाऊस किंवा जास्त दमट परिस्थितीत, बुरशीच्या मायसेलियल वाढीप्रमाणे पानांवर जाळी तयार होते. पानांवर गडद तपकिरी स्क्लेरोशिया तयार होतात. रिमझिम पावसामध्ये या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन उत्पन्नात घट येऊ शकते त्यामुळे वेळीच उपायोजना करणे आवश्यक आहे

    तसेच मागिल काही वर्षांच्या अनुभवावरून असे लक्षात येते की येणाऱ्या काळात शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन खालील प्रमाणे कीड व रोगांचे व्यवस्थापन करावे.

    कीड आणि रोगांचे व्यवस्थापन

    किडीकरीता 

    क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % – ६० मिली प्रती एकर किंवा थायमिथोक्झाम १२.६%+ लँम्बडा सायहँलोथ्रिन ९.५% (पूर्वमिश्रित कीटकनाशक) – ५० मिली प्रती एकर किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ % + लँम्बडा सायहँलोथ्रिन ४.६ %- ८० मिली प्रती एकर (पूर्वमिश्रित कीटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८% – १०० ते १२० मिली प्रती एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन ८.४९ % + इमिडाक्लोप्रीड १९.८१ % (पूर्वमिश्रित कीटकनाशक) -१४० मिली प्रती एकर यापैकी कुठलेही एक कीटकनाशक फवारावे.

    वरील कीटकनाशक सर्व प्रकारच्या किडी (खोडकीडी आणि पाने खाणा-या अळ्या) करीता काम करतात.
    म्हणून किडीनुसार वेगळे-वेगळे कीटकनाशक फवारण्याची आवश्यकता नाही.

    पानावरील ठिपके, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट,शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाकरीता

    टेब्युकोनॅझोल १०%+ सल्फर ६५ % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – ५०० ग्रॅम प्रति एकर किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ % -२५० मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन २०% – १५० ते २०० ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन १३.३ %+ इपिक्साकोनाझोल ५ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -३०० मिली प्रति एकर फवारावे.

    पिवळ्या मोझॅक रोगाकरिता प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून बांधावर न टाकता नष्ट करावीत आणि रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी किडीचे व्यवस्थापन करावे

    पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे तसेच कोरडवाहू सोयाबीनला अवर्षणप्रवण परिस्थितीत तग धरून ठेवण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच १३:००:४५ खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

    फवारणी करताना पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही

    किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी .

    डॉ.के.टी.आपेट
    वनस्पती रोगशास्त्र विभाग
    डॉ.जी.डी.गडदे आणि डॉ.डी.डी.पटाईत
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

    अधिक माहितीसाठी संपर्क करा
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
    परभणी
    ☎ ०२४५२-२२९०००

  • खरिपातील कापसावर थ्रिप्स तर सोयाबीन वर लष्करी अळीचा हल्ला ;बळीराजा हवालदिल !

    हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे, परभणी प्रतिनिधी

    खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या कापूस पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव झाल्याने कापुस लाल झाला पडला असून दुसरीकडे सोयाबीन पिकावर लष्करी अळीने हल्लाबोल केला आहे .अतिवृष्टी व पावसाच्या खंडानंतर आधीच उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येणार असताना आता किटकांनी हल्ला केल्याने परभणी जिल्हातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

    जिल्हातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेली संकटाची मालिका थांबायचे नाव घेत नाहीये .आधी मान्सूनचे उशिरा आगमन झाले त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या . त्यात अतिवृष्टी पावसाचा खंड यामुळे जिल्ह्यातील शेतीशिरात पेरणी केलेले क्षेत्र यातून मिळणारे अपेक्षित उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.

    आपण जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्राची प्रतिनिधी माहिती घेतल्यानंतर जिल्ह्याचे चित्र याविषयी कल्पना येईल .मागील आठवड्यात खरिपातील पावसाच्या खंडानंतर शेतकऱ्यांना विमा अग्रीम देण्यासाठी ५२ महसूल मंडळापैकी आठ महसूल मंडळांची निवड करण्यात आली आहे .त्यामध्ये निकषांमध्ये बसत असतानाही पाथरी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळ वगळण्यात आले आहेत नेमकी काय परिस्थिती पाथरी तालुक्यातील महसूल मंडळामध्ये आहे याविषयी आपण घेतलेला हा मागवा व सद्य परिस्थिती.

    यंदा पाथरी तालूक्यातील चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या प्रस्तावित क्षेत्रापैकी ऊस वगळता ७१ .७२% क्षेत्रावर म्हणजे ३७ हजार ३८० हेक्टर हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण केली .यामध्ये सर्वाधिक १६ हजार ६५४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी तर मागील वर्षी मिळालेल्या चांगल्या दरामुळे १६ हजार ४३२ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती.

    जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. सततच्या पावसाने खरिपात पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटल्या गेली .ही पिके कशीबशी सावरत असताना ऐन फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये ऑगष्ट महिण्यात पावसाने मोठा खंड दिला .१० ऑगस्ट पासून ते ५ सप्टेंबर पर्यंत तालुक्यात येणाऱ्या चारही महसूल मंडळांमध्ये यावेळी पावसाने ओढ दिली होती .या खंडामुळे फुल अवस्थेत असणाऱ्या सोयाबीनला मोठा फटका बसला तर कापसामध्ये ही पातेगळ होऊन स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केलेली मेहनत वाया गेली .आस्मानी संकटापुढे स्थानिक शेतकरी हातबल होता दरम्यान अग्रीम विमा मिळेल अशा आशेवर असणारा शेतकरी चारही महसूल मंडळ अग्रीम विमा देण्यातून वगळण्यात आल्याने सुलतानी संकटाने होरपळून निघाला.

    दरम्यान ५ सप्टेंबर पासून तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये पावसाचे जोरदार पुनरागमन झाले होते .दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून शेत शिवारात मात्र सर्वच पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या फवारण्या करूनही कापूस पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव झाला असून यामुळे कापूस लाल पडला आहे तर कापसाची पातेगळ मोठ्या प्रमाणात झाल्याने कापसामध्ये ४०% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत .महागड्या फवारण्या करूनही हा रोग काही आटोक्यात येत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत .तर दुसरीकडे सर्वाधिक पेरणी क्षेत्र असलेल्या फुलगळ होऊन उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक हा बुरशीजन्य रोग व मोठ्या प्रमाणात पाणी खाणाऱ्या लष्करी अळीचा हल्ला झाल्या असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे . सततच्या या संकटांच्या मालिकेने स्थानिक शेतकरी मात्र हातबल झाला असुन व्यथा सांगावी तरी कोणाला ? असा त्याच्यापुढे प्रश्न पडला आहे .