Category: sugercane

  • लै भारी डोक्यालिटी ! ‘हा’ पठ्ठया विकतोय 100 रुपये किलोने ऊस

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सरतेशेवटी ऊस कारखान्याला जाईपर्यंत शेतकऱ्याच्या हातात किती रक्कम येते हे काही सांगायला नको…सर्व खर्च वजा करून शेतकऱ्याच्या हातात थोडी थोडकी रक्कमच हातात येते. मात्र एका पठ्ठ्याने ऊस विकण्याचा एक भारी फंडा शोधून काढलाय त्यामुळे त्याला चांगला नफाही मिळतोय.

    sugercane

    ऊस १०० रुपये किलो

    या व्यक्तीने उसाचे ग्रे विकण्याचा व्यवसाय थाटलाय… यापूर्वी आपण उसाच्या रसाचा व्यवसाय अनेकदा पहिला असेल. मात्र हा व्यक्ती उसाचे गरे विकतो आहे. या उसाच्या गऱ्यांची किंमत १०० रुपये किलो आहे. हा व्यक्ती अगदी उसाची सालं काढून गरे अगदी पद्धतशीरपणे तुकडे करून लिंबू ,मसाला, मीठ मारून देतो आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

    सध्याची परिस्थिती पाहता शेती क्षेत्रामध्ये नवनवीन युक्ती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय यशस्वी करणे गरजेचे आहे. शेती बरोबरच शेतीपूरक व्यवसाय करणे आणि त्यातून नफा मिळवणे हा गरजेचे बनले आहे.

    No Result

    View All Result

    error: Content is protected !!

    Join WhatsApp Group
  • शेतकऱ्यांनी केले विक्रमी उसाचे उत्पादन, भारत बनला जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक

    हॅलो कृषी ऑनलाईन : कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाणारा भारत 21व्या शतकात अन्न उत्पादनाच्या क्षेत्रात नवा अध्याय लिहित आहे. जगातील अव्वल गहू आणि तांदूळ उत्पादक देशांपैकी एक असलेल्या भारताने आता साखर उत्पादनाच्या बाबतीत इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. ज्या अंतर्गत भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश बनला आहे. भारताचा हा ऐतिहासिक प्रवास देशातील शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. उदाहरणार्थ, देशातील शेतकऱ्यांनी यंदा विक्रमी उसाचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश बनण्यात यशस्वी ठरला आहे.

    भारतीय साखर उद्योगासाठी हे वर्ष अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरले आहे. उदाहरणार्थ, ऊस उत्पादन, साखर उत्पादन, साखर निर्यात, ऊस खरेदी, उसाची थकबाकी भरणे आणि इथेनॉल उत्पादनाच्या सर्व नोंदी या हंगामात करण्यात आल्या आहेत.

    5 हजार लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन

    चालू हंगामात देशात विक्रमी उसाचे उत्पादन झाले आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात या हंगामात 5 हजार लाख मेट्रिक टनांहून अधिक उसाचे उत्पादन झाले आहे. तर यापूर्वी 2021-22 मध्ये देशात 419 मेट्रिक टन ऊस उत्पादनाचा अंदाज जाहीर करण्यात आला होता.

    359 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन

    देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रत्यक्षात यंदा ५ हजार एलएमटी उसापैकी ३५७४ एलएमटी उसाचे गाळप साखर कारखान्यांनी केले. यामध्ये सुमारे ३९४ एलएमटी साखरेचे (सुक्रोज) उत्पादन झाले आहे. यापैकी 35 एलएमटी साखर इथेनॉल तयार करण्यासाठी वापरली गेली आणि 359 एलएमटी साखर साखर कारखान्यांनी तयार केली.

    भारताने साखर निर्यातीच्या क्षेत्रातही नवा अध्याय लिहिला आहे. उदाहरणार्थ, चालू हंगामात भारताने विक्रमी १०९.८ लाख मेट्रिक टन साखर निर्यात केली आहे. यासह भारत साखर निर्यातीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, साखर निर्यातीतून देशाला सुमारे 40,000 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.

     

     

     

  • विजतारांच्या घर्षणाने अर्धा एकर ऊस जळून खाक; शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान




    विजतारांच्या घर्षणाने अर्धा एकर ऊस जळून खाक; शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    शेतातून गेलेल्या विजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगी मध्ये अर्धा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्‍या ढालेगाव येथे घडली आहे .यावेळी शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .

    पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील शेतकरी माणीक बालासाहेब शिंदे यांच्या ढालेगाव शिवारात मालकिच्या गट क्र . 50 मध्ये क्षेत्र 0 हे 20 आर एवढ्या क्षेत्रावर ऊस असुन आज रविवार 02 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:40 वाजता विजेच्या शेतातून विजावितरणच्या तारांमध्ये घर्षण होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला आहे .

    दरम्यान शेतकर्‍याने प्रशासनाकडे ऊसाचा पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे .

    error: Content is protected !!





  • उसाच्या 265 बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…

    हॅलो कृषी ऑनलाईन : हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड करतात. मागच्या दोन वर्षात तर राज्यात ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी अशा ठिकाणी देखील उसाचे उत्पादन घेतले गेले जिथे परंपरागत उसाची शेती केली गेली नाही. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखरेचे देखील चांगले उत्पादन राज्यामध्ये झाले आहे. असे असताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उसाबाबत एक महत्वाचा सल्ला दिला आहे. ते शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये बोलत होते.

    यावेळी बोलताना पवार यांनी म्हंटले की, सध्या रानं ओली आहेत, वापसा नाही. त्यामुळे आत्ता लगेच उसाची तोडणी झाली तर रिकव्हरी चांगली होणार नाही. रिकव्हरी चांगली आली तरच उतारा चांगला पडतो, साखर जास्त निघते. साखर जास्त निघाली, तर भाव चांगला मिळतो. एका टन ऊसातून किती साखर निघते यावर ते अवलंबून असतं. काही ठिकाणी १० टक्के, ११ टक्के, १२ टक्के निघते. कोल्हापुरात तर टनामागे ११४ किलो साखर निघते. म्हणजे १४ टक्के साखर निघते. एवढा विरोधाभास आहे.”

     २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका

    पुढे बोलताना त्यांनी उसाच्या बेण्याबद्दल सांगितले ते म्हणाले “एका टनातून किती साखर निघणार हे जमिनीच्या पोतावर, उसाचं बेणं कोणतं आहे यावर अवलंबून असतं. माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका. तुमचा ऊस वेळेवर जायचा असेल, भाव चांगला मिळवायचा असेल तर ८६-०-३२ , ८०-०५, १०-००१, १२-१२-१ ही उसाची बेणी वापरा,” असा सल्ला अजित पवारांनी दिली.

    “आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा शुगर इन्स्ट्युट ही संस्था चालवतो. तिथं नवीन उसाचं बेणं तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कमी पाण्यात त्या उसाला दशी न पडता उसाचं टनेज जास्त येईल यावर संशोधन करत आहेत. त्यातून काही वाणांचा शोध लगाला.”

    संदर्भ -लोकसत्ता

  • मागणीनुसार एकरकमी एफआरपी देऊ | Hello Krushi

    हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली

    आम्ही एकरकमी ‘एफआरपी’बाबत यापूर्वीही स्पष्ट केले आहे; मात्र एफआरपी तीन हप्त्यांत द्यावी, अशी ‘क्रांती’च्या सभासदांचीच मागणी आहे. जे शेतकरी एकरकमी एफआरपीची मागणी करतील, त्यांना एकरकमी देऊ, अशी माहिती आमदार अरुण लाड यांनी दिली. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २६ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार लाड बोलत होते.

    यावेळी बोलताना आमदार लाड म्हणाले, की गेल्या वर्षी केवळ ३५ शेतकऱ्यांनीच एकरकमी एफआरपी नेली. राज्यातील एफआरपीपेक्षा जास्त दर देणारा कारखाना ‘क्रांती’ आहे. यावर्षी एफआरपीपेक्षा ८० रुपये जास्त रक्कम शेतकऱ्यांना देत आहोत.यातील ४० रुपये भागविकास निधी व उर्वरित ४० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दीपावलीपूर्व जमा करत आहोत. कारखान्याची २९७५ रुपये एफआरपी असताना या वेळी शेतकऱ्यांना ३०५५ रुपये देत आहोत. आजवर कारखान्याने शेतकऱ्यांना जशी हवी तशी एफआरपी दिली आहे.

    यापूर्वी बहुतांश ऊस उत्पादकांनी तीन हप्त्यांत एफआरपीची रक्कम द्यावी, असे सांगितले, त्यानुसार दिली आहे. आज रोजी १४ हजार एकर ऊस नोंद आहे. यातून आपण १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. शासनाने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३६०० रुपये करावा. कारखान्‍याने शेतकऱ्यांची, बँकांची देणी व कर्मचाऱ्यांच्या बोनससह पगार व तोडणी वाहतूक कमिशन डिपॉझिट अशी सर्व देणी वेळेत दिली आहेत.

    यावेळी उपाध्यक्ष उमेश जोशी, उद्योजक उदय लाड, क्रांती दूध संघाचे किरण लाड, दिलीप लाड, जिल्‍हा परिषद सदस्‍य शरद लाड, जयवंत कुंभार, निवृत्ती पाटील, प्रशांत चौगुले यांच्यासह कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्‍हाणे, सचिव अप्‍पासाहेब कोरे उपस्थित होते. दिलीप पार्लेकर यांनी सूत्रसंचालन केले.

     

  • राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील ऊस उत्पदक शेतकरी आणि कारखानदारांसाठी महत्वाची बातमी आहे. यांच्या वर्षी राज्यात गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक संपन्न झाली.

    यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. गेल्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतकऱ्यांना 42 हजार 650 कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक 98 टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

    138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज

    यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे 14 लाख 87 हजार हेक्टरवर असून राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे 203 कारखाने सुरू होणार असून यंदा 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. महाराष्ट्राने गेल्या हंगामात 137.36 लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे.

    टन 3050 रुपये एफआरपी

    यंदाचा गाळप हंगाम सरासरी 160 दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी 10.25 टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन 3050 रुपये एफआरपी देण्यात येणार आहे. दरम्यान, देशात सध्या 60 लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात 30 लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून 100 लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा वाटा 60 लाख मेट्रीक टन आहे.

    325 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती

    इथेनॉल निर्मितीमध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा 35 टक्के आहे. पुढील वर्षी 325 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सादरीकरणा दरम्यान सांगण्यात आले. साखर निर्यातीबाबत खुला सर्वसाधारण परवान्याबाबत गेल्या वर्षीचे धोरण कायम ठेवण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी उस तोडणीसाठी यांत्रिकीकरणावर भर, सहवीज निर्मिती आदीबाबत चर्चा करण्यात आली.

    या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.

     

  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, यावर्षी गळीत हंगाम लवकर सुरु होणार

    हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. यंदाच्या वर्षी उसाचे गाळप १ ऑक्टोबर पासूनच सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

    याबाबत बोलताना अतुल सावे म्हणाले की, मागच्या वर्षी ऊस गाळप हंगाम संपल्यावर सुद्धा अनेक शेतकऱ्यांकडे ऊस शिल्लक होता. त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती उद्भवणारा नाही यासाठी लवकरच ऊस गाळप हंगाम सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 सप्टेंबरला याबाबत एक बैठक घेऊन 1 ऑक्टोबरपासून गाळप सुरु करण्याचं ठरलं आहे. पंधरा दिवस अगोदरच गाळप सुरु केल्यास शेवटच्या टप्प्यात ऊस उरणार नाही असं सावे म्हणाले. सोबतच यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आणि सरकारला सुद्धा नुकसानभरपाई देण्याची गरज पडणार नाही असेही सावे म्हणाले आहेत.

    पुढे बोलताना ते म्हणाले, यावर्षी आम्ही एक नवीन मोबाईल ॲप तयार केला आहे. ज्यात शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. यावेळी नोंदणी करतांना शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या कारखान्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. सोबतच दोन कारखान्यात नोंदणी करता येणार असून, ज्यात आपला ऊसाची क्वालिटी काय आहे, आपला ऊस कधी लागलेला आहे, त्यानुसार ॲपच्या माध्यमातून ऊस कारखान्यात पाठवता येणार, असल्याचं सावे म्हणाले.

     

     

  • ज्वारीवर लष्करी आळीचा हल्ला तर सोयाबीनवर मोझॅक; असे करा वावरातल्या पिकांचे व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    सोयाबीन : सोयाबीन पिक सध्या फुलोरा ते शेंगा वाढीच्या अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास सोयाबीन पिकास संरक्षित पाणी द्यावे. कोरडवाहू सांयाबीन पिकात पोटॅशियम नायट्रेट 1% म्हणजेच 13:00:45 खताची (100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून) फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त झाडे तात्काळ उपटून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकर 15-20 पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 140 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक फवारावे.

    खरीप ज्वारी : उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 % 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 % 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिक सध्या पोटरी अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे‍.

    बाजरी : बाजरी पिक सध्या पोटरी अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे‍.

    ऊस : ऊस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर फवारणी करावी.

    हळद: पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).